Tuesday 26 December 2023

माहेर एक चार्जर

काल संध्याकाळी दिडतास माझ्या छायाकाकुकडे मनमुराद गप्पा झाल्या. काकु खुप ओघवत बोलत होती... आधी तीचा रिक्षाचा झालेला अपघात टाके ..  त्रास त्यातून नशीब बलवत्तर म्हणुन डोळा बचावला ... आता सांगितल तरच कळेल की लागलेलं... वगैरे... सगळं ती बोलत होती...

बोलता बोलता अचानक तीच्या शेंदूर्णीच्या घरावर विषय वळला. तीच्या आईच घर कस होतं? ओसरी पडवीवरची वर्दळ ... सगळ सांगताना ती लहानपणातच्या गावातच ऊतरली होती.
आता कोणाच वाड्याकडे पाहणं होत नाही,  शेत बघणारा होता त्याचीच पुढची पिढी नशिबवान तीच कसा ऊपभोग घेतेय... वरचा मजला पडायला आल्यान पाडावा लागला.. वर कशा खोल्या होत्या खाली कशा होत्या... दिंडी दरवाजा ते मागचा वाड्याचा भाग मी तर पूर्ण वाडा काकुबरोबर फिरूनच आले...

मी म्हटल काकु जा वाडा पडायच्या आधीच एक फोटो काढून ठेवा आठवण...

तर म्हटली आहे जुना वाड्याचा फोटो😍 आठवडाच झाला मी जुने फोटो बघताना दिसला. 
मी तीच्याकडुन ऐकलाला वाडा  कसा असेल? मला पाहायला आवडेल फोटो. मी लगेच तीला म्हटल. परत काढलास पसारा की फोन कर येईन म्हटल मी. (छाया काकूला.)

थोडाच वेळ आधी गुडघा दुखतोय फिजीओ सुरूय खाली बसायच नाहीये, खुप वेळ ऊभ राहायच नाहीये म्हणणारी काकु झपकन खाली बसली... पाय पसरले कपाटा खालुन काही तरी काढु लागली.
मी ओरडले अग बाई तु मांडी का घातलीयस? दुखतय ना तुला? तर म्हणाली दोन मिनीटानी काही होत नाही. झपकन पिशवी काढली पाय सरळ केला आणि खुर्चित बसली.
हे माहेरच्या घराच लहानपणचं चार्जिंग होतं बरका! हे मला पिशवीतला वाड्याचा फोटो काढुन दाखवला  तेव्हा समजलं.
तो सुरेख जुना वाडा अगदी तस्साच होता. तो दाखवताना काकु खुप तरूण होती...
माहेरच्या घराच माणसांच चार्जिंग कसल भारी असतं ते मी अनुभवलं.
वयाच्या या वळणावर आल की बाई माणसाला यावर विचारास वेळ मिळतो... मधलं आयुष्य नैतिक जबिबदारी विवंचना कर्तव्यात व्यस्त असतं. मग वाटल बरं झालं विषय काढला, ती केवढी फ्रेश झाली.

त्या पिशवीत चार पाच आणखी जुने फोटो होते. मला तर पर्वणीच!  चार पाच ओळखले दोन ओळखु आले नाही म्हणुन आजोळ गाठलं.

आणि काकुच्या शेंदुर्णीच्या वाड्यापासून माझ्या लहानपणच्या पावन मारूतीच्या वाड्या पर्यंत पोचले.

आज त्यामुळे मी पण माझ्या आजीच्या घरच्या आठवणीत रमले.  तेव्हाचे शेजारी नावडकर आंग्रेशी बोलण झालं. त्या दोघांना पण आनंद झाला फोटो बघुन. आजही ते संपर्कात ओहेत माझ्या.

एक चारोळी आठवली ...

आठवणींच्या देशात
मी मनाला पाठवत नाही 
जाताना ते खूष असतं
पण येताना त्याला येववत नाही 


सौ. गौरी

No comments:

Post a Comment