Thursday 7 December 2023

सुडकू आद्ध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा.

मला पूर्वी दोन तीन नावात गडबड वाटायची हे कोण ? नावात सारखेपणामुळे आदरणीय गुरूतत्व समजण्यास असक्षम होते मी. मग मी शंका निरसन करण्यासाठी आद्ध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा सुडकू करू म्हटल म्हणजे सगळी आद्ध्यात्मिक गुरू तत्व समजतील.

पहिला गोंधळ होत होता ते श्रीनृसिंहसरस्वती महाराज, श्रीनरसिंह सरस्वती स्वामी, शंकराचार्य आणि नरसिंह / श्रीलक्ष्मी नरसिंह यांच्यात.  लहानपणी हे सगळ गुंतागुंतीच वाटायच. जस जस वाचन वाढल तस तस समजत गेलं. कोणाच अवतार कार्य काय आहे? कोणता अवतार कोणाचा? समजत गेल आणि ऊत्सुकता वाढली. 

तसच भद्रकाली, महाकाली आणि  कालीमाता बद्दल होतं. महाकाली आणि काली ही एकाच अस्तित्वाची भिन्न व्याख्या आहेत . देवी काली ची स्वतःची अनेक रूपे असताना, महाकालीला बहुतेक वेळा अधिक वैश्विक रूप म्हणून समजले जाते जे केवळ कालीचेच नव्हे, तर तिच्या १० हातात असलेल्या सर्व हिंदू देवतांची शक्ती दर्शवते.

असच एक नोंद करून ठेवलेली असावी म्हणुन 

१) श्रीपाद श्रीवल्लभ
दत्तात्रेयांचा पहिला अवतार
जन्म
: भाद्रपद  शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, 
पिठापूर, आंध्रप्रदेश
समाधी: अवतार  समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर : गुरूद्वादशी
कार्यकाळ
१३२० -१३५०  

श्री नृसिहसरस्वती महाराज 

दत्तात्रेयांचा दुसरा अवतार

जन्मलाडाचे कारंजा, पौष शुद्ध इ. स. १३७८
निजानंदीगमनइ. स. १४५८
कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५९


३) श्री नरसिंहसरस्वती स्वामी 
जन्म: ज्ञात नाहीआळंदीत १८७४ ला आले
समाधीपौष शु१५१८८६ आळंदी येथे
कार्यकाळ
१८७४ ते १८८६

४) भैरवनाथ 

भैरवनाथ हे तांत्रिक गोरखनाथ यांचे शिष्य होते, ज्यांचे गुरू मत्स्येंद्रनाथ होते, माता वैष्णो देवीने कालीचे रूप धारण केले आणि भैरवाचे मस्तक कापून टाकले आणि शेवटी त्यांना त्याचे खरे रूप कळले आणि त्यांनी क्षमा मागितली. शेवटच्या क्षणी भैरवाने क्षमा मागितली. देवीला माहित होते की भैरवाचा तिच्यावर हल्ला करण्यामागचा मुख्य हेतू आपली मुक्ती मिळवणे आहे. त्यांनी भैरवांना केवळ पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त केले नाही तर त्यांना एक वरदान देखील दिले ज्याच्या अंतर्गत प्रत्येक भक्ताला वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण करण्यासाठी पवित्र गुहेजवळ असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात जावे लागेल.


५) भैरव / कालभैरव

हिंदू धर्मात कालभैरवाला महादेवाचा पाचवा अवतार मानला जातो आणि महादेवाचा विनाशकारी  एक ऊग्र  अवतार आहे. याचे वाहन कुत्रा आहे. कालभैरवाची आठ रूपे आहेत.


६) वीरभद्र

वीरभद्र हा महादेवांच्या शूर गणांपैकी एक आणि महादेवाचा पहिला अवतार आहे. महादेवाच्या आज्ञेवरून त्याने दक्षप्रजापतीचा शिरच्छेद केला होता.


७) काली

काली, कालिका किंवा महाकाली ही हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहे. ती मृत्यू आणि परिवर्तनाची देवी आहे. आदिशक्तीचे हे सुंदर रूप म्हणजे दुर्गा देवीचे कठोर, राक्षसी आणि भयभीत रूप आहे, जिचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. रक्तबीजला मारण्यासाठी महाकालीने त्याच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब प्यायला आणि त्याच्या क्रूर प्रतिकृती नष्ट केल्या. रक्तबीजचा वध केल्यावर, काली रागाने तांडव करू लागली आणि तिला शांत करण्यासाठी भगवान महादेवाला तिच्या पायाखाली आडवे पडावे लागले. काली शांत झाली आणि पतीला पायाखाली पाहून तिने आपली जीभ बाहेर काढली अस म्हणतात.

८) भद्रकाली 

भगवान शंकराच्या वीरभद्र अवताराची शक्ती किंवा पत्नी म्हणजे भद्रकाली तीला सहा मुलं आहेत.


९) कालरात्री

माँ दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते. दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माँ कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी साधकाचे मन 'सहस्रार' चक्रात वसलेले असते. यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विध्वंसक रूपांपैकी एक मानली जाते - काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्यु - रुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा.


१०) महाकाली

महाकाली हे ते रूप आहे ज्याला दहा तोंडे, हात आणि पाय आहेत, दुर्गा सप्तशतीमध्ये तिला महाकाली म्हणतात, ज्याचा जन्म देवांच्या हाकेवर पार्वतीजींच्या शरीरातून झाला. 


११) नरसिंह / लक्ष्मी नरसिंह
हा विष्णूच्या दशावतारांपैकी मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
१२) आदि शंकराचार्य
जन्म इ. पू ५०८ कालडी केरळ
समाधी केदारनाथ, ऊत्तराखंड.
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, 
जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ, ज्योतिर्मठ
येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

१३) स्वामीनारायण
वैराग्य स्वीकारलं तेव्हा नीलकंठ वर्णी हे  नाव पडलं. रामानंद स्वामींनी दीक्षा दिल्यावर त्यानीच नीलकंठ वर्णींचं  स्वामीनारायण नाव ठेवलं.
मुळ नाव घनश्याम पाण्डे 
जन्म ३ एप्रिल १७८१ छपिया ऊत्तरप्रदेश
मृत्यु १ जुन १८३० गढडा गुजराथ
हे हिंदु धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. 
लिखाण : शिक्षापात्री व वचनामृत ग्रंथ
यांना भगवान विष्णुंचा अवतार समजतात.

१४) चैतन्यमहाप्रभु ऊर्फ गौरांग
जन्म इ.स. १८ फेब्रुवारी १४८६ नादिया पं. बंगाल
मृत्यु इ.स. १४ जुन १५३४ पुरी, ओडीसा
गौर वर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना 'गौरांग', 'गौर हरि', 'गौर सुंदर' इ. म्हणत. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे  नाव त्यांनी धारण केले. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व  राधा संयुक्त अवतार मानतात. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी बंगाल-ओरिसातच नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांनी त्याकरिता स्वतः ग्रंथरचना केली नाही परंतु इतरांना काव्यनिर्मितीची प्रेरणा दिली.

१५) नित्यानंद महाप्रभु ऊर्फ नित्याई
जन्म १४७४ बीरभूम पं. बंगाल
मृत्यु  १५४०
निताई चैतन्यमहाप्रभु यांचे मित्र होते. चैतन्य नित्यानंद यांनाच निमाई निताई   ( निमाई चैतन्यचे दुसरे नाव) किंवा गौरा निताई संबोधले जाता होते. या जोडीस श्रीकृष्ण बलरामांचा अवतार समजले जाते.
ईस्काॅन टेम्पल चैतन्य महाप्रभू नित्यानंद महाप्रभू

No comments:

Post a Comment