Sunday 27 March 2022

वार्षिक टाॅनिक ! काॅक्लियाच स्नेहसंमेलन.....

|| जय गजानन ||

दरवर्षीप्रमाणे यंदा पण काॅक्लियाच स्नेहसंमेलन बघायला नव्हे, जगायला जाण्याची बुद्धीच परमेश्वरानं दिली. हो परमेश्वरच, कारण त्यानं बुद्धी दिल्याशिवाय अशा गोष्टी मिळत नाहीत.

सर्वप्रथम मैत्रिण व काॅक्लियाची शिक्षिका सौ.कविताचे आभार, तीच्या माध्यमातुन या कर्णबधिर मुलांच्या शाळेची माहिती झाली. सर्वसामान्यांनी ठणठणीत असलेल्या अवयवांच महत्व कस जाणलं पाहिजे हे दाखवुन देणारी ही संस्था.

वर्षभर योग्य व्यवस्थेत असलेल्या शरीरास गृहित धरून अनेक काम जेव्हा मी करते तेव्हा त्या व्यवस्थेचे आभार मानण्यास मी या चिमुकल्या मुलांच्या भेटीन व स्नेहसंमलनाला जाऊन शिकले.

प्रत्येक कर्णबधिर मुल बोलु शकते यासाठी झटणारी ही संस्था चालवणारे गुरूजन डाॅ. वाचासुंदर सर व सौ. रक्षा देशपांडे यांच्याचडे बघुन वाटतं की समाज सुंदर होण्यासाठी झटणारी ही माणस आहेत म्हणुन जग सुरूय. 

मुलांना पाहुनच समजतं की त्यांना शिकवण किती अवघड आहे. गॅदरींगमधे आपले विद्यार्थी ऊत्तम प्रकारे सादरीकरण करावेत हे करण्यासाठीच त्या शिक्षकांच प्रोत्साहन जेव्हा आपण त्या हाॅलमधे बघतो तेव्हा अवाक होतो. वयाच भान विसरून रममाण होऊन त्या त्यांना बक अप करत असतात. 

कधीकधी आपण जे जे करतो त्याचा ऊल्लेख अनावधानान केला जातो परंतु या मुलांच्या आयाना पाहुन वाटतं यांचा स्तर जास्त मोठा आहे. प्रत्येक आईच लेकरासाठी करते आणि तीच करू शकते हे समजतं, पटतं. आई होण्याच महत्व समजतं.

केलेल्या गोष्टीचा अभिमान न बाळगणे, निसर्गतःच सुव्यवस्थित शरीर मिळालय त्यासाठी परमेश्वरचे आभार मानणे तसेच शारीरिक अव्यवस्था असलेल्या आपल्याच समाज बांधवांसाठी खारीचा तरी वाटा ऊचलणे ही शिकवण दरवर्षीच या स्नेहसंमेलनात मिळते.
कालचच म्हणाल तर एकवेळ हसुन हसुन पुरेवाट करणारे प्रसंग तर टचकन पाणी आणणारे अनेक किस्से अनुभवायला मिळाले. कित्ती खुष होती मुलं, शिक्षकांवर असणारा प्रचंड जीव, ओलावा, विश्वास डोळ्यात तरळत होता. कोरोनाकाळातली ऑनलाईन शाळा नाटक तर काळीज कापुन नेतं- जेव्हा मुलाचे वडिल म्हणतात नोकरी..  पगार नाही.. मोबाईलमधे बॅलन्स कसा भरू??
पालकांनी दाखवलेलं समाजातलं या मुलांना व आईला अनुभवणार खर रूप चलबिचलच करून सोडतं. कालच गॅदरींग पण ऊत्तम झालं. सर्व शिक्षकांचे कष्ट दिसत होतं.

या संस्थेच्या कामाचे  सर्व मार्ग सुखर व्हावेत हीच शुभेच्छा!तसेच वार्षिक टाॅनिकसाठी दरवर्षी मी येईनच... भेटुच!

मनापासुन धन्यवाद!
आपलीच
सौ. गौरी पाठक