Tuesday 26 December 2023

विदेह राजा

रामायणातील आवडलेले पात्रं "विदेह"

त्रेता युगातल्या प्रभु श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी जानकीचे पिता विदेह. विदेह राजा जनक नावानं जास्त प्रचलित आहेत. रामायणातल्या गोष्टी खरतर अगदी लहानपणा पासून घरोघरी सांगितल्या गेल्या. मलाही त्या ऐकल्याच आठवतय. 
समुद्रावरून ऊडत सीतेपर्यंत जाणारा वीर हनुमान त्यावेळी जास्त अचंबित करत असे.  जस जस मोठी होत गेले तसतसं रामायणातली विविध पात्रं समजायला लागली. प्रत्येक पात्राच महत्व तत्व ऊलगडत गेली.  लहानपणच्ये गोष्टीत नसलेली श्रीरामांची बहीण शांता समजली. वनवासात बरोभर नसुनही बरोबर असणारी उर्मिला समजली. कैकयी मंथराचा पूर्वी राग येत असे कालांतराने कर्म फल योग या गोष्टीवर विचार करू लागले. परमेश्वराच्या योजनेत कोण कोणत पात्र वठवत असतं आपण ओळखु शकत नाही.
प्रत्येक व्यक्तीला दुसरी बाजु असु शकते असा विचार मी करू लागले. या संपूर्ण रामायणात मला आवडलेलं पात्र एकच ते म्हणजे "राजा जनक" अस मी आता ठामपणे सांगु शकते. का आवडतो राजा जनक?  त्याला अनेक कारणं आहेत.  
राजा जनक यांनाच विदेह, मिथिलेष तसेच शीरध्वज नावेनं त्रेता युगात ओळखलं जातं. निमी वंशात जन्मलेले विदेह देशाचे पालक शीरध्वज जनक हे कुलनावान ओळखले जात होते. जनकपूर हे नेपाळमधील मुळ गाव त्यांच. मिथीला नावाची राजधानी त्यांनी वसवली. वैदिक साहित्याची आवड असणारे, तत्वज्ञानी तसेच संसारात राहूनही लोभ मोह काम मान घृणा क्रोध यावर मात केलेले राजर्षि जनक म्हणुन जास्त प्रसिद्ध होते. जो व्यक्ति संत ॠषी पदाला पोचतो तरो जमिनीवर राहतो तो राजर्षि म्हणवला जातो. राजर्षि जनक म्हणुन पण त्रेता युगातली त्यांची ओळख महत्वाची आहे. 
त्रेता युगात असुनही आपला वंश पुत्राच्या नावान न ओळलता जाता आपल्या पुत्रीच्या नावान अजरामर व्हावा अशी ईच्छा करणारे राजा जनक का आवडणार नाहीत? त्याकाळी मुलींना वेद पठण आदि शिक्षा याज्ञवल्क यांच्याकून देण्याच मोलाच काम त्याकाळी त्यांनी केलं. मुलीस स्वतःला पडलेले प्रश्न न डगमगता विचारण्याची तसेच तीच्या शंका निरसन करण्याची मुभा त्यांनी दिली. योग्य निर्णय घेण्याची मुलांमधली कुवत वाढवण्यासाठी केले जाणारे त्यांचे विचार बहुमूल्य होते. ते राजा असूनही युद्धाच्या विरूद्ध होते. भौतिक संपत्ती असूनही मोहात न आडकणारे म्हणुन राजा जनक ओळखले जातात. अष्टवक्र, सुलभा योगीनी तसेच गार्गी योगिनी यांच्यासारख्या ॠषी साधकांशी त्यांचे संवाद होते.  राजा जनक हो ऊत्तम पालक होते ते प्रजेला मुलासारखे जपतं. भूमिजा सीता आयुष्यात आल्यानतर तीचे संगोपन त्यांनी ईतके सुंदर पार पाडले की त्याचे दाखले योग्य निर्णय क्षमतेच्या सीता मातेच्या वागण्यात समजते.
आत्मसन्मानाची बाब असेल तर कोणतीही अग्निपरीक्षा देण्यास मागेपुढे पाहु नको म्हणणारे पिता होते ते. मुलीच्या आयुष्यात यामुळे निर्माण झालेले त्यांच्या संस्काराचे गोंदण तीच्या प्रत्येक कृतीत दिसते. आपली लेकीच्या वनवासाला पतीस सोबत करण्यापासुन ते बाळंतपणास माहेरी न येण्याच्या तीच्या निर्णयात ते सकारात्मकतेने सहभागी होते. प्रकृतीचे नियम गुणधर्मम त्यांनी तीला सुंदर रीत्या शिकवले होते. 
हे अस रामायणातल पात्र आहे की जे निश्कलंक निर्मळ प्रेमळ आणि प्रेरणादायी आहे. या पात्राला कोणतीही नकारात्मक झालर नाही आणि अशीच व्यक्तिमत्वं पडद्यामागची महत्वाची असतात आयुष्यात!
राजा जनकांचा एक तरी गुण आत्मसात करून तो जगता आला तर आपण स्वतःला भाग्यवान समजु.
त्यांचे विदेह नाव खरोखरच सार्थक आहे.
जय श्रीराम!


No comments:

Post a Comment