Tuesday 14 February 2023

३) फाल्गुन ( फेब्रुवारी - मार्च ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

फाल्गुन महिना महत्व : 
फाल्गुन हा उत्सवाचा महिना. या महिन्याला मधुमास असेही म्हणतात. या महिन्यात झाडे हिरवी, गुलाबी नाजूक पाने लेऊन वसंत ऋतूचे छान स्वागत करीत असतात.  एकीकडे सरती थंडी , हलकेच जाणवणारी उन्हाची चाहूल,ऐन भरातला वसंत ऋतू सृष्टीसौंदर्याचा अनुपम सोहोळा असतो. कोकिळांचे कूजन पण चालू असते. धार्मिकतेतूनही या महिन्याचे पावित्र्य वेगळे ठरते.

फाल्गुन महिन्यातील सण
होळी    : हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. ... पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते  साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा;  पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी. होळीच्या दिवशी होलिका राक्षसीचा वध झाला. हिरण्यकश्यपूचाही वध झाला. चांगल्या गोष्टीचा विजय झाला. या उत्सवाला होलिकादहन किंवा  शिमगा, हुताशनी महोत्सव, कामदहन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तर कोकणातील शिमगा या नावाने ओळखले जाते. 


रंगपंचमी / धुळवड   : फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.  या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. रंगपंचमी फाल्गुन वद्य पंचमीला या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला 'रंगपंचमी' हे नाव आहे. 
 
(रंगपंचमी खेळताना चा फोटो)

 शितळ शिमगा : काही भागात हा सण असतो. मुलांच्या गळ्यात साखरेच्या गाठ्या घातल्या जातात. कोणी कोणी या सुमारास आलेल्या द्राक्षांची माळ करून ती सुद्धा लहान मुलांच्या गळ्यात घालतात. हे सगळे प्रकार मुलांना उन्हाळ्यापासून त्रास होऊ नये यासाठी केले जातात. यालाच शितळ शिमगा असे म्हणतात. हा शितळ शिमग्याचा सण रंग पंचमीच्या दिवशी साजरा करतात.

जयंत्या यात्रा
१) पापमोचन, आमलकी एकादशी
२) तुकाराम बीज   : फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.

३) एकनाथ षष्ठी   : फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी एकनाथ महाराजांनी समाधी घेतली. सहायोग एकत्र येतात ती ही नाथ षष्ठी महत्व आहे. दत्ताची आरती (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाणएकनाथांनीच लिहलीय.

४) संभाजी महाराज पुण्यतिथी  : फाल्गुन अमावस्या, अमावास्येच्या दिवशी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले.

५) छत्रपती शिवाजी महाराज जयंती : लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे. 

गाणी कविता :
 
कौन रंग फागुन रंगे
कौन रंग फागुन रंगे, रंगता कौन वसंत,
प्रेम रंग फागुन रंगे, प्रीत कुसुंभ वसंत।
रोमरोम केसर घुली, चंदन महके अंग,
कब जाने कब धो गया, फागुन सारे रंग।
रचा महोत्सव पीत का, फागुन खेले फाग,
साँसों में कस्तूरियाँ, बोये मीठी आग।

पलट पलट मौसम तके, भौचक निरखे धूप,
रह रहकर चितवे हवा, ये फागुन के रूप।

मन टेसू टेसू हुआ तन ये हुआ गुलाल
अंखियों, अंखियों बो गया, फागुन कई सवाल।

होठोंहोठों चुप्पियाँ, आँखों, आँखों बात,
गुलमोहर के ख्वाब में, सड़क हँसी कल रात।
अनायास टूटे सभी, संयम के प्रतिबन्ध,
फागुन लिखे कपोल पर, रस से भीदे छंद।
अंखियों से जादू करे, नजरों मारे मूंठ,
गुदना गोदे प्रीत के, बोले सौ सौ झूठ।
पारा, पारस, पद्मिनी, पानी, पीर, पलाश,
प्रंय, प्रकर, पीताभ के, अपने हैं इतिहास।
भूली, बिसरी याद के, कच्चेपक्के रंग,
देर तलक गाते रहे, कुछ फागुन के संग।
- दिनेश शुक्ल
 
बलम पिचकारी जो तूने मुझे मारी
तो बोले रे ज़माना खराबी हो गयी
मेरे अंग राजा जो तेरा रंग लागा
तो सीधी सादी छोरी शराबी हो गयी
इतना मज़ा क्यूं आ रहा है
तूने हवा में भांग मिलाया
 
लॉजिक नवीन पिढी साठी :
रंगपंचमी :  उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी पण रंगपंचमीच्या पाणी वापर करायचा असा नियम . शरद ऋतू संपून वसंत वृत्तीला प्रारंभ होतो, निसर्ग बद  होणे सुरु होते. शांत वातावरण दाहक होत जाते. उन्हाचा तडाखा वाढत जातो तो कमी करायला पाणी वापर करायची पद्धत पडली असावी. पूर्वजांनी खूप विचार करून पद्धती सुरु केल्या असणार हे यातून दिसेल.  संसकृतीच्या अनुशंगानं वापरण खाण यात सोईचे करण्यासाठी पद्धत असतात. रंगीत पाणी, रंग खेळताना गुलालाचा वापर केल्याने त्वचेला उत्तेजन मिळते. थंडीमुळे कोरडी पडलेली त्वचा गुलाल आणि अबीरमुळे टवटवीत होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच धुळवडीला रंगपंचमी ला शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणावर करतो. त्यामुळे चलनवलन होऊन शरीरातील सूस्तपणा नाहीसा होतो. यातून आपल्याला सकारात्मकता मिळते. याचा उपयोग मानसिक शांतता आणि मानसिक ताजेपणा येण्यासाठी होतो, हा पण मुख्य उद्देश असणारच.  शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी रंगांचा वापर महत्त्वाचा असल्याचे अनेक डॉक्टर सांगतातच. रंगांची विविधता जाणून त्याचे महत्व समजून ते जगावं हा हेतु रंगपंचमी खेळण्यात असावा. लाल रंग ऊर्जा शक्तीच प्रतीक मानतात. पिवळा रंग धर्माचे प्रतीक आहे म्हणतात असा प्रत्येक रंगाचे महत्व आहे. निळ्या रिंगण रंगपंचमी खेळ्यांनी आरोग्य लाभते, भगवान श्री कृष्णा चा आवडता रंग. निळ्या रंगाचा वापर सुरक्षिततेची भावना मजबूत करतो. 

होळी : पांढरे कपडे गाठी बाळाला देतात कारण शितलता. जी त्या नवजात बालकास या वातावरणात गरजेची असते.  भारतीय सण, उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत. गाठी घरोघरी देवून सामाजिक सलोखा कायम राहावा, हा उद्देश असावा. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीने गाठीचे महत्त्व आहे. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सूस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते. होळी भोवती बोंब ठोकतात त्यावर पण विचार करायला हवा, तसे केल्याने शरीरात काय बदल होतो? तर बोंब मारण्याच्या कृतीमागील हेतू शुद्ध असल्याने काही विचारांचे देहातच विघटन होते.
होळीतून व्यक्‍तीकडे शक्‍तीच्या लहरी प्रक्षेपित होतात. बोंब मारण्याची कृती तमप्रधान असूनसुद्धा व्यक्‍तीवर होळीतून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वप्रधान लहरींमुळे वाईट शक्‍तींचे आक्रमण होत नाही. या कृतीतून व्यक्‍तीच्या देहावरील आवरण दूर होते; मात्र ही कृती अत्यल्प केल्यासच तिचा योग्य तो लाभ होतो. कृतीचा अतिरेक झाल्यास व्यक्‍तीवर तिचे दुष्परिणाम होऊ शकतात, शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट तसेच कोणतीही गोस्ट योग्य रीतीने होणे लाभदायक. 

या कालावधीत हवेत बॅक्टरीया पसरण्यास पूरक हवामान असते त्यावेळी योग्य गोष्टी जाळून धूर केला तर तो शारीरिक स्वास्थ्यासाठी मानवाला पूरक ठरतो म्हणून गवऱ्या होळीमध्ये जाळतात. गायीच्या शेणात अनेक गुपिते आहेत. होळी जळाली थंडी पाळली म्हणतात ते याच साठी.