आजच्या प्रसंगाचा विचार करतानाच आपोआप हे वाक्य का समोर यावं आणि मला ते मिळतं जुळतं वाटावं, गम्मतच ना!
थांबा सांगते-
सकाळी नेहेमी प्रमाणात बुंगाट निघाले माझ्या रुपेरीवरून, हो रुपेरीच माझी पांढरी ज्युपिटर बरोब्बर. तर कर्वे पुतळ्याकला सिग्नल ला थांबले, मागे कोणी नव्हतेच तरी मी माझ्या सवयी प्रमाणे हात वर करून सूचित केलं कि मी सिग्नलला थांबलेय. हे करत असतानाच मी आरशातून मागे कोण आहे पाहत होते. उजवीकडे एक साधारण पॅन्ट शर्टचा माणूस होता त्याचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं, डावीकडून बुलेटवर एक साधू वजा किंवा गुरुजी वजा साठ एक वयाचे गृहस्थ होते. ते किंचित बारीक नजरेने पाहताना मला जाणवलं. ते डावीकडे आले मी वळून बघितलं, पण का कोण जाणे मला त्यांना सांगावं वाटलं कि माझी सवय आहे सिग्नल ला थांबलं कि हात वर करून खुण करायची. काय सांगू बरेच जण सिग्नल ला थांबत नाहीत सुसाट जातात. आपण आपली जीवाची काळजी घ्यायची दुसरं काय.. त्यांनी बारीकस हसत मन डोलावली. मला उगाचच बर वाटलं. खरा तर काहीही गरज नव्हती स्पष्टीकरण द्यायची पण असो.
मी हसले आणि पुढं बघितलं, तितक्यात त्यांनी हाक मारली, "हे घे ग " आणि खिश्यातुन काहीतरी काढलं, मी प्रश्नार्थक पणे काय म्हणून मन डोलावली. तर म्हणाले "घे घे प्रसाद आहे, आज जया एकादशी आहे. मी मागच्या तुळजाभवानी देवळातला गुरुजी आहे." असा म्हणत त्यांनी चार दाणे पुढे केले, माझ्याकडून कान्हाजीचं नाव ऐकताच तत्काळ डावा हात पुढे केला गेला. कारण ते डाव्या बाजूला होते. मी क्षणभर हसले तो प्रसाद घेतला आणि जर्किनच्या डाव्या खिशात भरला. तेव्हा मला समजलं कि आज जया एकादशी आहे.

गंमत म्हणजे पुढच्या चौकात मी मागे बघितलं तर ते नव्हतेच! पण तो दुसरा गृहस्थ होता....
मी सकाळपासून ज्या ज्या विवंचनांचा, जे जे केल त्याचा, काय करू काय नको याचा असे अनेक विचार करत असताना मला असा संकेत मिळाला कि देवाला पुजताना नतमस्तक होणे पुरेसे नाही, तर मनात नम्रता, भक्ती आणि निस्सीम भाव असणे आवश्यक आहे. तोच भाव आज मला शिकवुन गेला की तू योग्य विचार कर आणि कृती कर. मग कोणत्या रूपानं भगवंत येतील आणि काय सुचवून जातील सांगता येत नाही.
ते गुरूजी फक्त देवळात मूर्तीसमोरच नतमस्तक होणारे नव्हते तर मानवातील चांगुलपणाला पण मानणारे होते. हे वागण संकेत आहे की त्यांच हृदय शांति, भक्ति आणि आत्मसाक्षात्काराकडे अग्रेसर आहे.
कोणत्याही प्रसंगातुन काय घ्यायच हे आपण आपल ठरवायचच, पण ते करताना काय विचार येईल आणि काय सुचेल सांगता येत नाही.
मनाची कवाड आणखी मोकळी झाली. मनावरच हलकसं येऊ घातलेल मळभं भर्रकन सरलं.
कामावर पोचले विचार चक्र तर मगाशीच सुरू झाली होती, कोण होते ते? मला प्रसाद द्यावा का वाटलं असेल त्यांना? लगेच त्या अनमोल प्रसादाचा माझ्या भगवंताबरोबर फोटो काढला खुण म्हणून आणि
तेवढ्यात हा हिंदी कोट मेसेज आला.
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
९९७०१६८०१४
No comments:
Post a Comment