जपण शब्बच किती जिव्हाळ्याची भावना दर्शवतो. जपाव वाटण ईतपत भावना निर्माण होण्यासाठी सहवास असण क्रमप्राप्त आहे अस वाटतं. जीवापाड जपलेलं सदर जेव्हा पासून आलय ना तेव्हा पासून मला माझी आजी आठवतेय. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आजी. तीच्याच अंगाखांद्यावर वाढले मी. तीन सुरूवातीचा अभ्यासही घेतलाय माझा. मला तीनं शिवलेल्या हिरव्या कंच गोधडी शिवाय झोप यायची नाही. मी त्लाया गोधडीला लालवालं म्हणायची. कापडाच्या चिंध्यांची बाहुली तीन मला करून दिली होती. मला तीचा मोलाचा सहवास योग्य वयात लाभला.
पहिलीनंतरच्या प्रत्येक शाळेच्या सुट्टीत मी तीच्या कडे पोचलेली असायची. तीच्या हातान सारवलेल्या शेणाच्या घरात केलेला सगळा दंगा, लाड याची पुढच्या कोणत्याही आनंदाला सर नाही. ती मजा अनुभवताना पाहणारे आता तीघच आहेत.
आजीची एक पेटी होती, कुंकू पावडर ती त्यात लपून ठेवायची असा माझा लहानपणी समज होता. ती सिक्रेट पेटी मला तेव्हापासूनच आवडायची. पुढे आठवी नववी मधे असताना तीन मला ती दिली होती घेऊन जा म्हणून. ती आजारी पण पडायला लागलेली. ती पेटी वापरात कमी आणि अडगळच जास्त होऊ लागलेली. नंतर पेटीत कुंकू कंगव्याची जोडी बदलली होती. ती कात्री कंगवा झालेली. आता ती बाबा वापरत होते. कालांतराने ती अडगळ वाटायला लागली होती घरी पण मी ती आणली मला माझ्या आजी आणि बाबांची जीवापाड आठवण म्हणून...
मी दहावीत होते १९९४ साली तेव्हा आजी देवाघरी गेली. ती गेली, मायेची ऊब असलेल हक्काच लालवाल विरलं, जाताना आठवण राहिली ती त्या बंद पेटीची जी मी आजही जीवापाड जपली आहे.
आजी....ची शृंगार पेटी
####
मायेची चव
प्रभाव पाडणारं पुस्तक
शिक्षेस कारण की
राहून गेलेली गोष्ट
No comments:
Post a Comment