Sunday, 29 June 2025

निरूपण – परतवारी


निरूपण – परतवारी - सुधीर महाबळ यांचे पुसतक

सलग पाच वर्ष वारीचा एक लहानसा टप्पा पांडुरंगाच्या कृपेने केला गेला. जसं जसं वर्ष जातात तसं तसं वारी, पांडुरंग याच्यावर माझा जीव जास्त जडू लागला आहे. एक छोटा टप्पा करून, मला ओढ लागली कशी काय? काय असेत ते दिव्यत्व जेव्हा पूर्ण वारी करतात, दरवर्षी वारी करून काय वाटल मी लिहिती झाले, परंतु यावर्षी वारीच्या पूर्ण प्रवासाची त्यातील सर्व टप्पयाची, त्यात वाहत्या राहणाऱ्या वैश्णवांची दररोजची कार्य मला समजुन घेण्याची आतुरता निर्माण झाली. पुणे सासवड टप्यात तो मोठा अवाका आणि क्षमता पुसटशीच जाणवली. हो पुसटशीच कारण हे टिचभरच आहे. पूर्ण २५० कि.मी ज्या ध्यासानं  देहभान विसरून ती मंडळी जातात , चालतात, अनुभवतात त्यापुढे अगदी टिचभरच अनुभव आहे हा माझा.

रविवारी रात्री सासवडहून परतले. मनात खुप खळबळ होती. अनंत प्रश्न होते. मी क्षणभरच अनुभवलेला अनुभव अव्दितीय वाटत होता. तो किंचीतसाच आहे. मग नक्की भगवंताकडे जाण्याची वाटचाल कशी आहे? आयुष्यात टप्याटप्यान वारी करेन पांडुरंगाची इच्छा असेत तस होईलच पण आज मनात खूप कुतुहल, चुळबुळ जाणवली. सोमवारी कामाच्या प्रवाहात आले. पण मनात वारीचे अनेक प्रश्न होते. मन शांत करण गरजेच होतं आणि ती  हुरहुर पांडुरंगान जणू जाणतीच. मुमुक्षि ग्रुपवर सुधीर महाबळ यांचं परतवारी पुसक वाचा अशी रेणूची पोस्ट आली.

खलास मी शोध सुरू केला. झपाटल्यासारखा, ते शोधल आणि सुधीर महाबळांच्या नजरेत‌ली वारी अनुभवली. आज पहाटे ते पूर्ण झालं. सकाळी सातला मन ओसंडून व्हायलं, वारीचा एकेक भाग मी त्यांच्या बरोबर होते - नजर किती एमएम नी बारीक हवी हा मोलाचा धडा आज मला मिळाला. परतवारीतलं काय भिडलं ते नोंद  करत गेले. आयुष्यान जर कधी उद्‌धविग्न वाटल तर वाचायच म्हणून नोंद केली. ती अशी - 

वारीला जाताना "ऐश्वर्यकारी" आणि येताना "वैराग्यवारी" ही उपमाच मन जिंकून जाते. वारीतला माणूस स्वतः "मी"  बाहेर काढतो आणि देह नावाच यंत्र पाहू शकतो ही कल्पना भारी वाटती. बाबुरावांच्या पात्रामुळे संसार संपला ठरवायच कसं? हे खुप आवडतं भौतिकातून आध्यात्मिक होतानाची बारीक पुसट लाईन क्रॉस करतानाची संकल्पना उर्फ टिप या सदरात मी नोंदली. 

जगताना आपण आपल्यातता चंद्र आणि सूर्य कसा बघायचा ही भावना जब्रा आहे. अफाट वैराग्य आणि मनाचा तोल सांभाळतानाची अफाट ग्रहणशक्ती कमावती जाते ती वारीत. माळीणीची मानसिकता किती मोलाची होती. आपण कपड्‌याच्या मोहात कसे अडकतो, तीनं  मात्र  मातीचे पाय पुसाया स्वतःच लुगडं दिलं. का ? तर पायी वारीच्या वारकऱ्याची पायधूळ ती माऊलीच की हो! हाच विचार. ..... आपण माती लागली कि कपडे कसे झटकतो. 

वारीतील धनगर सदा जगमित्र यात मला गजर चित्रपटातल एक पात्रं आठवलं. जगात वावरताना संशय येतो पण वारी सारख्या अनोळखी अफाट जन सागरात चांगली साधी सरळ निष्कपट माणसं जगात आहेत हा विश्वास मिळतो. जगताना तो सकारात्मकतेकडची वाट दाखवतो.

वारीत कल्याणकरांचा ट्रक दोन वेळच जेवण देतो. मला तो एकदा तरी बघायचाच आहे. महाबळांनी अनेकदा भसाड्या आवाजातला कर्णा असा उल्लेवा केला आहे. पुणे सासवड टण्यात हा कर्कश भसाड्या आवजातला कर्णा चांगलाच अनुभवला आहे.

'झांबळे' हा नवीन शब्न समजता. मोलाची उच्चं बैठकीची माणसं या प्रवासात ओळखाची दृष्टी मिळते. जी दृष्टी जगताना उपयोगी पडेल, खरंच!  रात्री म्हणजे पहाटे १ वाजता उठुन १.३० वाजता चाल  सुरु करतानाचं रात्रीच नयनरम्य वर्णन मी प्रथमच समजले,  अनुभवते. हे मी परत पूर्ण लिहूनच काढणार आहे. 'जैसे चंद्रा आड आभाळ' ओवी झांबळे शब्दाचा अर्थ सांगते.  ही पूर्ण ओवी शोधणार आहे मी. पहाटेचा रस्ता आणि काळ्या रंगाच्या विविध छटांमध्ये महाबळाना सापडलेला पांडुरंग महाबळांच्या नजरेतून पाहताना वाटल की मी तो रास्तच चालत आहे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधी बद्दलच्या नामदेवांच्या ओव्या मी शोधुन वाचणार आहे. मगच यातल वाचलेल उच्चारेन, हा माझा घराचा अभ्यास असेल. आपण घरात राहायता जागा नाही म्हणणारे पांढरपेशी पण वारीत येणाऱ्या वारकरी लोकांना एक शेतातली खोली ठेवणारं - आजीच मोलाच्या मनाचं कुटुंब जीवाला चिमटा काढून जातं. वर्ष श्राद्ध घरात पण तरी शेतावरच्या घरात वारकरी नेहमीप्रमाणे जेवणार. घराला कुरुप नसत याकाळात का? तर माऊती येतील आणि वापरून जातील. हा अनुभव खुप काही शिकवून जातो. माऊलींना पाहायची एक नाविन्यपूर्ण पद्धत समजली.  माऊली वर्षभर नजरेत भरून राहवे यासाठी दोन्ही तळहात जमिनीलगत, समांतर आणि मनगट भुवईतोवर घेत माऊलींना पाहायचं- अहाहा! सुखद अति सुखद संकल्पना.

पहाटे उठुन वारकरी चाल सुरू करतात. परतवारीतल पौर्णिमेनंतरची पहाट - वर्णन काय ? तर - 'चंद्राच्या स्वच्छ प्रकाशाचा पूर' काय ती उपमा ! कार्य ते शब्दांच वैभव!

एक बिगारी काम करणारा वारकरी रोजंदारीच काम करणारा.  आयुष्यात महिनाभर वारील राहून टिळेकरी काम करतो. जीवनाच अजब तर्कशास्त्र ते अस की दिवसात ६०रू पण वारीत टिळेकरी दिवसाला ७०० रु. कमावतो. विश्वास हा कि माऊनी महिनाभर पोट  भरतात उपाशी ठेवत नाहीत. फुकट काही करायची मागायची वेळ येऊ देत नाहीत माऊली. महाबळांच्याच शब्दात तर्क वाचावा हे खरे. वीतभर पोर आणि हातभर टिपणी मस्त जोड.

आधी भाकरी ठेवायता फडकं नव्हतं हो ... आता माऊनींची वारी करतो परिस्थिती बरी आहे. यांच्या लेखीच देवाला का मानावं हे वाचाव.  काय पद्‌धत असते ना गावातल्या लोकांची सांगायची स्तुत्य होती ती कान्होबांची बोली महाबळांच्या लेखी. देह हा तुझाच रे भगवता 'इदं न मम'. मेल्यावर देहावर तुळशीपत्रं ठेवतात, पण वारकरी आधीच तुळशीमाळ घालून ते करतात. यात येणाऱ्या घामच रूपक काटा आणणारं भाष्य वाटलं सोपानकाकांचं. म्हातारी साठी ज्ञानेश्वरी विकत घेणाच्या मारुतीच्या पूर्ण कथानकामुळे जीव कोंडतो. हुंदकाच येतो. आपण काय किंमत करतो पोथ्यांची ? सोन समोर पण बघण्याची दृष्टी गमवत चाललोय.

नीरा नदितला पादुका स्नान सोहळा मला प्रत्यक्ष पाहायचाच आहे. हरीपाठाचा  २७वा अभंग नक्की वाचणार. (झाला महार पंढरीचा हि चाल ) मला वाटत माहेरी जाऊ गं...  नामदेवाच दर्शन घेऊ गं ... 
उत्तम  (भाग - स्नेहबंध ते नादब्रहम)

विवंचना टाकून  वारकऱ्यांसारखं नाचून पहा का? ते  तेव्हाच कळेल. वरातीत नाचतो ते नव्हे. हरीनामात रमून बेभान नाचणं,  अहो भाग्य लागतं  यासाठी सहज जमत नाही ते.  पण प्रयल तर करा... वैष्णवजनच ते जे बेभान नाचतात. माऊली सदा धनगर यांचा भाग वाचण्यासारखाच. प्लॅस्टिक कागदाच महत्व वाचताना हसू आलं कारण दिवेघाटात मी ते अनुभवलं ना..  रेनकोट खिसगणतीत निघाला की.

सुखी माणसाचा सदरा वाचताना जुने काही संदर्भ आणि व्यक्ति झरकन डोळ्या समोरून गेल्या. अचानक येणारी सर गर्दी सारून रस्ता दाखवते हा अनुभव दोनदा सासवड टप्प्यात आला. सॅकची चेन उघडल्या सारखा (भा.पो.) अंथ माणसाच्या भजनाचा गजर... हे दृश्य मेंदूत कोरलं गेलं .... अहा काय शब्द..  महाबळांना साष्टांगच !

आपण इथवर आलो  पण हा नामाचा महिमा. हा मात्र आहे २८ किमी चाल  दिवेघाट यात तो समजला.  रामकृष्णहरी.... ईठोबा माऊनी तुकाराम.... हरिणामामुळे त्रास आणि वेदनेचे विचार डायव्हर्ट होतात. जगताना याचा वापर करायचा ही शिकवण....

कल्याणचे सखाराम त्यांच्याकडचे मोफत जेवण सासवडला थांबवतात. पुढे गरज नसते १००% पटलं.  'सखा आकाशा एवढा' सदरात अन्नदानाच अत्यंत सुंदर महत्व पटवल त्यांनी.  प्रत्येक प्रकारच्या दानाचा सविस्तर संदर्भ आयुष्यभर लक्षात राहील. अन्न्दान महापुण्य का ? हे कधीही विसरणार नाही.

सुखाचं मोजमाप, मांगल्य शोधण्याची सवय वारीत लागते ही बहुमूल्य लेणी अवगत झाली. वर्षभर जपलेली १० ची नोट वारीत दान केलेली माऊलींनी स्विकारली या भावनेत पावतीला नमस्कार करणारी वयस्क आजी पैशाचं आणि समाधानाचं,  मारुलीच्या प्रतीच्या ध्यासाचं मोल शिकवून जाते.

माऊली परत आळंदीत पोचतात ते वर्णन मस्तच. यात माऊलीची पण दृष्ट काढती जाते वाचतानाच टपटप टपकतं मन गालावर. वारी करताना बंधन नाही पण शिस्त पाळत क्षमतेप्रमाणे, नामाचा महिमा अनुभवत काहीही अपेक्षा न ठेवता चालत राहायच हे यात समजत. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलेले भक्तांचे चार प्रकार मी मात्रं नोंद केले. 

पुणे ते सासवड पायी वारीनंतर, परतवारी पुस्तकामुळे का कोण जाणे मन शांत झाले. मला हलकं वाटायला लागलं. रेणू‌चे आणि महाबळांचे आणि यांना आयुष्यात आणणाऱ्या पांडुरंगाचे अनंत अनंत आभार. 

जय श्री कृष्ण 
गौरी पाठक 
२८ जुन २०२५

No comments:

Post a Comment