वारी म्हणजे नियमित पाने भगवंतास भेटायला जाणे! पंढरीची वारी म्हणजे भावपूर्ण धार्मिक आध्यत्मिक यात्राच कि... जी जीवनातील अनेक रहस्य उजागर करते. हि करायची ईच्छा मनात यावी लागते. ती मनात अनंताही तोच आणि ती पुरी करून घेणारेही तोच असतो, पांडुरंग!
मागे सलग चार वर्ष पांडुरंगाच्या कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी लाभली. या प्रवासातील मुमुक्षूनि मिळून यंदा पुणे ते सासवड टप्पा करू असा मागच्या वर्षी मनात आखलं होते. त्याचा पांडुरंगी आठवं करून दिला आणि ती पूर्ण करून घेतली.
ai दिंडीमुळे खूप सहज सुकर झाला हा मार्ग. पहाटे ४.३० वाजता चांदणी चौकात आम्ही पोचलो. ५. ३० ला मगरपट्टा हडपसर ला पोचायचे नियोजन होते.
ai दिंडीचे सगळे जण एकत्र जमलो. कोरडा नास्ता चहा कॉफी होती. रेनकोट ताब्यात घेतले. आणि ai दिंडी पुणे सासवड पायी वारीसाठी प्रस्थान झाली. कोणी झेंडे कोणी म्युझिक सिस्टिम असे बरेच सामान घेतलेले व्हॉलेंटियर होते. सगळे एकरूप बघताना उभारी वाटत होती. यंदाचे टोपीचे वाक्य पाहून जोश वाटत होता : रक्षण्या सिंदूर, 'वर' करी शूर.
मगरपट्टा साऊथ गेटवर एकत्र जमून नामाचा गजर झाला. अभंग आणि माउलींचा गजर यातला सहभाग भारावून टाकणारा होता. आम्ही गाडीत बसलो तेव्हा एक सूचना मला जास्त आवडली आणि भावली सुद्धा. जेव्हा मुख्य रस्यावर लागू तेव्हा आधी त्या हमरस्त्याला नमन करा. ज्यावरून अनेक वारकरी पांडुरंगाची आस मनात घेऊन अनेक वर्ष चाल करत आहेत तो आदरणीय समजावा. त्यावरून माउली स्वतः जात आहेत अनेक वर्ष. अनेक संत मंडळींची पायधूळ त्यालाल लागली आहे. त्याला नमस्कार करूनच आपण वारीच्या भाकीसागरात मिसळुया. काय सुरेख भावना आहेत. मनापासून आभार त्या दादांचे ज्यांनी असा सुंदर विचार दिला. कोणाला कसा दिसेल भेटेल भगवंत ते आपण सांगू शकत नाही पण मार्ग दाखवणारा पण नामांतुल्यच मानव नाही का !
बघता बघता हमरस्त आला. कपाळावर गंध आलं, सगळ्यांचे पिशवीतून टाळ वर आले, ai दिंडीच्या टोप्या आता डोक्यावर स्थिरावल्या. सातच्या सुमारास ai दिंडी प्रस्थान झाले. हडपसर गाडीतळ जवळ अफाट जनसमुदाय एकत्र मिळाला. आनंदाचा पूर होता, वातावरणात भक्तीमय सूर होता. हडपसर गाडीतळ चौकात उजवीकडे वळावे असे दिशादर्शक -- दिंडीचे कार्यकर्ते मार्ग दाखवत होते. त्याशिवाय त्या प्रचंड जनसमुदायाच्या मार्ग समजणे अवघडच होते. सर्व मंडळी भेकरे नगर कडे मार्गस्थ झाली. एक ढोलकी वाले दादा ai दिंडीचा झेंडा आणि अभंग म्हणणारे एक दादा यांच्या मागे आम्ही निघालो. मस्त टाळ, मृदंग रस्ता आमी आम्ही पांडुरंगाच्या नाम गजरात निघालो. इथून पुढे सगळे जण आपापली चाल चालत होते. गट गटांनी ai दिंडीच्या माऊली पुढे सरसावताना दिसत होत्या.
मगरपट्टा साऊथ गेट ते हॉटेल विजय एक्सझीक्युटिव्ह १३ - १४ किलोमीटर चाल होती. किलोमीटर हे मापन घरी पोचलो तेव्हा शोधलं. मुखी माऊली च नाव सोबत करायला त्याच भावाचे साथीदार असतील तर कसली आठवण येतेय बाकीची.
या वाटेवर अनंत माऊलींचं दर्शन होतं : काही माऊली (वारकरी) सुसाट वेगानं पंढरीची वाट पकडतात ती भगवंताच्या भेटीची आस दाखवतात, काही माऊली (वारकरी) भौतिकातील वस्तू कशा क्षुल्लक आहेत याची पावती देतात, काही माऊली आपल्या ठाम भक्तीवर कसा वातावरणाचा पडसाद न पडत ती अखंड ठेवत चालायचं हे शिकवतात, तर काही माऊली कष्टी असूनही आपण हसून राहू शकतो हे भेगांचे पाय असूनही हसतमुख चेहऱ्यातून दाखवतात, काही तर पोटाची खळगी भरायची ती तेवढीच तिचा फाफट पसारा असायची गरज नाही हे दाखवतात, काही माऊली साठवणूक करून परमार्थ करा हे शिकवतात कसं ते विचार करा. वारी करताना स्वतःच्या गरजा काय आणि किती याचा साक्षात्कार होतो. मानवाने आध्यात्मिक व्हावं म्हणजे नेमका कसं ते यात समंजत. आयुष्यात काय कमावलं पाहिजे म्हणजे काय गमावत नाही याची झलक मिळते.
त्यामानाने मगरपट्टा ते दिवेघाट सुरु होण्यापूर्वीची जागा यात थोडा आता अराम करून घाट चढू असा वाटणं साहजिकच होत. सगळेजण ai दिंडीनी नियोजन केलेल्या जेवणाच्या जागेवर एकत्र जमलो. १२ वाजता विजय हॉटेल वर पोचलो. हा रस्ताभर रस्त्याचं काम सुरु असल्याने वारकरी विभागले जात होते. अरुंद पुलावरून जाताना खरी सामंजस्याची बैठक समजून आली. कोणी नसूनही अजिबात न धक्काबुक्की करता तो भाग पुढे सरसावलो. कोणी पण पायावर पाय पडला, हेलपाडाला तरी माऊली म्हणत पुढे सरसावले जात होतो. आपोआपच ती असं लक्षात आलं. मधेच दोनदा जोरात आलेल्या पावसाच्या सरी पांगापांग करून गेलेल्या. मज्जा आली. जीवाची उलघाल जणू तो विठुराया पाहतोय आणि पाणी शिंपडत असे वाटले. हॉटेल विजय ला थोडा विश्राम जेवण करून मग रिंगण झालं. फुगल्या झाल्या. जरा चार्ज झालो. बरोब्बर १. ३० वाजता सर्वजण दिवेघाट चढायला सुरु झाले. मनात हाच विचार होता कि हे पंढरीनाथा किती आहे मोठा हा घाट तूच नेरे त्याच्या पार. तो चढताना लक्षात आलं कि आयुष्यात भाग्याने लाभलेला हा पुणे सासवड पायी वारीचा हा टप्पा. त्यातला दिवेघाटाचा भाग खरोखरच त्या मुख्य वारकरी मंडळींच्या साथीनं, अभंगाच्या ठेक्यानं आणि माउलींच्या घोषानं सहज पार पडला. आज शरीराचे, भक्तीचे आणि परमेश्वराच्या ओढीचे मोल समजले. आळंदी पुणे टप्प्यापेक्षा हा मोठा आहे. तो त्यांनाच पार करवला. हे पांडुरंगा अशीच मायेची पाखर अनुभवत आपल्या सेवेत राहण्याचीबुद्धी द्या.
दोन्ही बाजूला हिरवा डोंगर मधे वारकरी काय सुरेख नजर होता. हिरव्यागार रस्त्यावर पारिजातकाचं जणू पायघड्या घातलाय असा तो घाट दिसत होता. कितीतरी माऊली नामाचा गाजर करताना डिसास्ट होत्या आम्ही त्यात मम म्हणत जोडले जात होतो. थोड्या वेळातच आम्ही रेनकोट काढला बेकार उकडायला लागलं होतं. आपण कल्पनाही करू शकत नाही असं सामान लादून वारकरी चढ चढतात. जवळजवळ १२ वळणं गेली मग ती विठुरायाच्या काळ्या मूर्तीची किनार दिसू लागली.
हेच ते पठार, हाच तो विठोबा, जो पाहत घाट चढत येतो आपण आणि शारीरिक वेदना विसरून गहिवरून जातं मन... या लोभस मूर्तीची झलक दिसू लागली कि आपोआपच उभारी येते. .. मनात कालवाकालव होते... जणु तो आपल्याचकडे बघून मंद हसतोय असं वाटत. जेव्हा आपण अगदी समोर पोचतो त्या सावळ्या मूर्तीच्या तेव्हा ती मूर्ती नाही तो हलकासा हालत भगवंताचं भासतो...
हि अनुभूती अंगारवर शहारा आणते, काय उच्च अनुभूती... हलकं वाटत. .. ते लोभस सावळं रूप पाहून अहा !
मागे काय झालं ? पुढे काय होईल ? कशाकशाचाही विचार येत नाही. अफाट जनसमुदायाच्या लाटेवर आपण आपोआपच पुढे जात राहतो... पावलं जड होतात, आपण मागे वळून वळून पाहत राहतो... इकडे जरा गडबड होती एक वारकरी आजी चक्कर येऊन कोसळ्याच समजलं. त्यामुळे आणखी काही क्षण तिकडे थांबायला मिळालं. डोळे भरून तो सावळा रुक्मिणीकांत हृदयात साठवला. आज जो तो बघितला तो परत नाही दिसायचा. कितीहि वेळा आले या घाटात तरी नाही. आजचा विठुराया वेगळाच. आज समजलं कि पालखी जाताना लागणाऱ्या गावाच्या नावाचा अर्थ खरंच अर्थपूर्ण आहे. प्रत्येक टप्प्यात वेगळी गुपितं लपलेली आहेत.
घाट उतार सुरु झाला आणि मनात ज्ञानेश्वर माऊलींची पावलं पालखी आता दिसेल याचे वेध लागले. पुढे ४-५ किलोमीटर वर पंचवटी फॅमिली रेस्टोरंट मध्ये सगळ्यानी जमायचं नियोजन होत. घाट उतरताना जो गार वारा अनुभवाला तो वेगळाच होता. त्यात आनंद होता, त्यात मनाचा हिय्या होता, त्यात भेटीची आर्तता होती, त्यात अनुभवलेली कृपेची हळुवार फुंकर होती, त्यात भगवंताच्या प्रेरणेने झालेली ईच्छा त्याच्याच मुळे पूर्ण होतानाच समाधान होत. आत्ता समोर असेल पंचवटी रेस्टोरंट म्हणत चार पाच किलोमीटर गेले असतील. त्याच्या जवळ पोचायच्या आधी मस्त थंडगार लिंबू सरबत दोनदा दिलं त्या पांडुरंगी, त्यालाच दया आली असेल कदाचित आम्हा पामरांची.
४. ४५ ला संध्याकाळी पंचवटीला पोचलो. एकेक करत हळूहळू सगळे पोचत होते. काहीजण काळे लॉनवर पसरलो, काही जण पितळ भाकरी कडे वळलो तर काही जण पुढे सासवड ला जाताना पण दिसत होते. तासाभरात कीर्तन सुरु झालं. आता माऊलींच्या रथाकडे डोळे लागले होते. कथेकरी महाराज खूप मौल्यवान माहिती देत होते. बाहेरचे सेवेकरींचे आवाजही खूप येत होते.
८ च्या सुमारास तो क्षण आला. सगळी भौतिक व्यवधानं विसरून -- दिंडीचे १८०० डोळे त्या सासवडच्या वाटेवर विखुरले होते. त्या क्षणा पर्यंत त्याच्या अनमोलतेच्या दिव्यतेची कल्पनाच करत होतो. माउलींचा रथ जस जसा जवळ येऊ लागला तस तसं मन भिरभिरत होतं. ती दिव्यता जवळ येताना भासत होती. आपोआपच आसमंतात वेगळेपण येताच येत. फुलांचा सजवलेला रथ त्यामानाने जरा संथ गतीनं येत होता त्यामुळे आम्ही तो डोळे आणि मन भरून पाहू शकलो. जमिनीवर संध्याकाळचा किंचितसा अंधार तर वर आकाशातला भरून आलेला ढगांचा काळसर रंग त्यात दिव्य प्रकाश रोषणाईतील रथ हलकेच समोर आला. आतून चंदेरी प्रकाश बाहेर झेपावत होता.
प्रत्येक मनावर तो पाखर करत होता. नंतर त्या सुंदर तेजोमय रथातली पालखी नजरेस पडली आणि जगाचं भानच राहिलं नाही. अहो माऊली आल्या होत्या... आणि नेत्रांवाटे पूर हि आला होता... का कोण जाणे उर गदगदून भरून आलं आणि चित्ती समाधान पावलं. खरंच कि रे पंढरीनाथा अजबच कि रे तुझी लीला क्षणभर दर्शनाने जीव सुखावून गेला!
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा... गाण्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा...
माउली दर्शनंतरच्या भक्तिमय संगीत कार्यक्रमातील या ओळी मनाला खूप भिडल्या. भक्तीच्या आनंदाचं महत्व आयुष्यात असाच टिकवण्याची बोधी द्या पांडुरंग!
भरून पावलेली -- दिंडीची ९०० मनं सुंदर प्रवासाच्या सुगंधी आठवणीत बसनी घरी परतताना मनात पुढच्या वर्षीच्या टप्याची चर्चा सुरु होती.. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे -
"पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||
बहू खेचरीच रान | बघ हे वेडे होय मनं ||"
राम कृष्ण हरी !!
_____________________________________