Thursday 20 June 2024

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय आणि तो काय सांगतो ?

  

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय आणि तो काय सांगतो ?

हिंदू धर्माचा संस्थापक कुणी नाही कारण हिंदू ही जगण्याची पद्धत आहे,संस्कृती आहे .एका माणसाने दुसर्या माणसाला दिलेली जगण्याची कला म्हणजे हिंदू धर्म.

हिंदू धर्म  हा भारतीय ऊपखंडातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म. संस्कृत भाषेत याचा अर्थ 'शाश्वत मार्गअसा होतोअनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहेकी ज्याचा कोणीही संस्थापक नाहीहिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धतीमतेतत्त्वज्ञान आणि संप्रदायांचा समावेश आहे.  जगातील हिंदू धर्मीयांची संख्या साधारण  अब्ज १२ कोटी एवढी आहे

बहुसंख्यांक हिंदू हे भारत, नेपाळ आणि माॅरिशस ह्या देशांत राहतातहिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत असे म्हटले जातेत्यापैकी मुख्य त्रिदेव आहेत जे सृष्टीचे उत्पत्तीपालनपोषण  संहार करतात

ब्रह्मदेव, विष्णूदेव)भगवान महादेव

हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो.

या धर्माची सुरुवात सिंधू नदीच्या पलीकडील भारत देशात झाली आणि बाहेरील देशातील लोक सिंधू नदीच्या पलीकडे लोक म्हणून ओळखत असत. पर्शियन लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत. भारतात विविध धार्मिक समजल्या जाणाऱ्या विचारसरणी होत्यामूर्तिपूजा ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यइतकेच नाही तरमूर्तिपूजेमुळेच हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले

हिंदू संस्कृतीतील धर्माची विचारधारा- हेच सांगते की ईश्वर चराचरात अधिवासित तर आहे. तसेच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणांतून मुक्ततापितृमातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालनव्यक्तिगतव्यावसायिककौटुंबिक कर्तव्ये पार पाडणेजातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणेआदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते

हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रुती आणि स्मृती या दोन भागात विभागलेले आहेतश्रुती हा हिंदू धर्माचा सर्वोच्च ग्रंथ आहेजो पूर्णपणे अपरिवर्तनीय आहेम्हणजेच तो कोणत्याही युगात बदलला जाऊ शकत नाही

श्रुती अंतर्गत वेदऋग्वेदसामवेदयजुर्वेद आणि अथर्ववेदब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे येतातवेदांना श्रुती असे म्हणतात कारण हिंदू मानतात की हे वेद देवाने ऋषींना गाढ ध्यानात असताना सांगितले होते.  श्रुती आणि स्मृती यांच्यात काही वाद असेल तरच श्रुती वैध असेलश्रुती वगळताइतर सर्व हिंदू धर्मग्रंथांना स्मृती म्हणतातकारण त्यात अशा कथा आहेत ज्या लोक पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतात आणि नंतर लिहितातसर्व स्मृती ग्रंथ वेदांची स्तुती करतातते वेदांपेक्षा कमी आहेतपरंतु ते सोपे आहेत आणि बहुतेक हिंदूंनी वाचले आहे (फार थोडे हिंदू वेद वाचतात). प्रमुख स्मृती ग्रंथ आहेत इतिहास - रामायण आणि महाभारतभगवद्गीतापुराणमनुस्मृतीधर्मशास्त्र आणि धर्मसूत्रआगम शास्त्रभारतीय तत्त्वज्ञानाचे सहा मुख्य भाग आहेत - सांख्य तत्त्वज्ञानयोगन्यायवैशेषिकमीमांसा आणि वेदांत.

१) आपले धर्मग्रंथ स्पष्टपणे सांगतात की ईश्वर एक असला तरी त्याची अनेक रूपे आहेत आणि कोणीही कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही धर्मात त्याची पूजा करू शकतो.

२) तुम्हाला ज्या देवाची उपासना करायची आहे त्याचे रूप निवडा. 

३) प्रार्थना करा आणि तुम्ही निवडलेल्या परब्रह्म (ईश्वराच्यारूपावर मनापासून विश्वास ठेवा.

४) हिंदू धर्मातील काही पवित्र ग्रंथ वाचा. भगवद्गीता आणि उपनिषद ही उत्तम उदाहरणे आहेतहिंदू धर्म हा शांतीचा धर्म आहे.

५) हिंदू धर्माचे काही सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुनर्जन्म एक आहेआणि ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धही झाले आहेहिंदूंचा असा विश्वास आहे की माणूस मृत्यूनंतर पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि या चक्रातून सुटण्यासाठी मोक्ष (मोक्षप्राप्त करणे आवश्यक आहे.

६) कर्म हा हिंदू धर्माचा आणखी एक सिद्धांत आहे ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही चुकीचे वागता त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे पश्चात्ताप करत नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षा होईल.

७) इतर धर्मांचा आदर करा आणि कोणत्याही धर्मात धर्मांतर करू नका किंवा कोणाचाही धर्म बदलू नका.

८) सर्व लोकांशी शांततापूर्ण आणि प्रेमळ व्हा  मोठ्या प्राण्यांचे मांस टाळणे चांगले आहे किंवा त्याहूनही चांगलेमांस अजिबात खाऊ नका.

 __________________________________________


भारताची संस्कृती आणि परंपरा
भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती
1) नमस्कार 2) हिंदू
  / भारतीय सण 3) एकत्र कुटुंबपद्धती 4) व्रतवैकल्ये आणि उपवास
5) 
मंदिर / धार्मिक स्थळं 6) विवाहसंस्था 7) अतिथी देवो भव: 8) भारतीय अन्न    

भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहेभारतात विविध सण गुण्या गोविंदाने साजरे केले जातातयेथे विविधतेत एकता पाहायला मिळतेआणि हेच भारताचे वैशिष्ट्य आहे कीयेथे जात-पातलिंगधर्म अशा कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाहीअशाच काही संस्कृती आणि परंपरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत

1. नमस्कार : 

नमस्कार हा भारतीय परंपरेतला सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहेभारतात आलेल्या प्रत्येकाचेकिंवा घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत नमस्कार करूनच केले जातेनमस्काराचा अर्थ हा हिंदू धर्मग्रंथवेदांतात नमूद केल्याप्रमाणे अभिवादन करणे असा आहेएक प्रकारे आदरार्थी असणारी ही कृती समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेमकृतज्ञता नक्कीच दर्शविते

2. भारतीय सण : 

भारतीय सण हे भारताची एकता दर्शवितातभारतात दिवाळी असोगणपतीईदनाताळपोंगलहोळी आदी..यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातातया प्रत्येक सणाच्या मागे एक धार्मिक महत्त्व आहेभारतीय सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सण साजरे करत असताना नातेवाईकमित्र-मंडळी एकत्र येतात आणि मोठ्या आनंदातउत्साहात सण साजरा करतातविशेष म्हणजे महत्वाच्या सणांच्या दिवशी शासनातर्फे सुट्टीही जाहीर करण्यात येते

3. एकत्र कुटुंबपद्धती : 

भारताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धत पाहायला मिळतेजिथे आजी-आजोबाआई-बाबामुलगा-मुलगीकाका-काकी हे सगळे एकत्र राहतातयामुळे विचारांची देवाणघेवाण तर होतेचमात्रकठीण प्रसंगी सुद्धा आपली माणसं आपल्या बरोबर असल्याची भावना निर्माण होतेपाश्चात्य देशात एकल कुटुंब पद्धत आहे त्यामुळे मुलांना कुटुंबाचे महत्त्व पटवून देणे थोडे कठीण होऊन जाते

4. व्रतवैकल्ये आणि उपवास : 

भारतात अधिकतर लोक हिंदू धर्मीय आहेतहिंदू धर्म म्हटला की अनेक सण-समारंभव्रतवैकल्य आलेचय या निमित्ताने गृहिणी देवाच्या श्रद्धेपोटी उपवास धरतातकडक व्रत पाळतातदेव-देवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहेनुकताच श्रावण महिना सुरु झाला आहेया निमित्ताने अनेक हिंदू धर्मीय बांधवांनी उपवास ठेवले आहेत

5. मंदिरांमागील कलाकृती :

भारतात हिंदू धर्मीय लोक जास्त असल्या कारणाने या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळं आलीचया धार्मिक स्थळांना एक प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभला आहेभारतातील शिव मंदिरहनुमान मंदिरगणपती मंदिरया मंदिरांची वास्तूत्यातली कलाकुसररंगसंगती ही त्या काळची सामाजिक परिस्थितीचे वर्णन दर्शविते

6. विवाहसंस्था : 

भारतात विवाह संस्कृतीची संकल्पना वैदिक काळापासून सुरु झालेली आहेभारतात विवाहसंस्थेला अनन्य साधारण महत्त्व आहेकारण विवाह म्हणजे दोन जीवांचं मिलन नसून या निमित्ताने दोन कुटुंब एकमेकांशी कायमचे जोडले जातातभविष्याची वचनं पती-पत्नी एकमेकांना देतात

7. अतिथी देवो भव

भारतात आणखी एक प्रथा आहे जी कायम जपली जाते ती म्हणजे अतिथी देवो भव:. घरी आलेला पाहुणा हा देवाच्या रूपाने आला आहे असे मानून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आनंदाने स्वागत केले जाते

8. भारतीय अन्न : पाककृती : 

भारतीय अन्नाला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आहेत्यामध्ये मायाममताआणि ऊब आहेभारतीय अन्नात तिखटगोडआंबटखारटतुरट अशा सर्वच पदार्थांचा समावेश असतोया अन्नामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच पाचन शक्तीही सुधारतेतसेच भारतातील प्रत्येक पदार्थ बनविण्यामागे त्याचे शास्त्रोक्त कारण आहे.


 

No comments:

Post a Comment