आजकाल घरटी एक लेकरू असते, मामा आत्याची पण लेकरं आधी सारखं सुटीत म्हणा, कार्याला म्हणा येतीलच असा राहिलं नाहीये. मग या पिढीनी गेट टुगेदर करून म्हणा किंवा मुद्दाम ठराविक समविचारी जमून जर आनंद साजरा केला तर त्यात काही गैर नाही. शुभ कार्यकतील आनंदाची व्याख्या पण बदलत चाललेली दिसतेय. मग मानव एकत्र येण्याचे मार्ग शोधून तो आनंद घेऊ लागलेला जाणवतोय. त्यात जमलेल्यानी एकत्र आलेले सुगंधित मंत्रमुग्ध क्षण फोटोत बंद केले तर काय बिघडलं? अनेकांचा सतत गावभर भटकणं आणि फोटो काढत फिरणं ते ईतरांना "आम्ही कशी मजा केली" दाखवणं यावर आक्षेप असतो. ज्याला त्याला आपल्या नैतिक जबाबदाऱ्या समजतात त्यातून तो त्याला ज्यात आनंद मिळेल ते तो करतो. मला एकच पटलंय कि आनंद साजरा करून तो वाटावा तर तो वाढतो. तो वाटताना इतरांना तो दिखावा वाटणं अथवा तो आनंद पाहून स्वतः आनंदी वाटण हे ज्याच्या त्याचा मानसिकतेवर अवलंबून आहे. आपण आपली आनंदाची व्याख्या करताना ईतरांच्या आनंदाच्या व्याख्येला धक्का न लागता करणं हे आपोआपच जमतं.
हे सांगायचं कारण असं कि मी तो सुंदर अनुभव काल घेतला. मी कालची सकाळ एका उर्जावान ऊत्साही व्यक्तीबरोबर घालवली. मी आजवर घरात एकत्र जमलो किंवा काही सण समारंभ कारणानं जमलो कि आनंदी क्षण टिपले होते. मस्त आवरून (ते पण नीट ठरवून बर का! ) बाहेर फोटो आणि सहजतेनं वावरतानाचे व्हिडीओ काढायची वेळ कमी आली होती. आपण वयाचे भान विसरून पण वयाला शोभेल असेच आवरून दोन तास मुक्त बागडू शकतो. तेव्हाचे आपले आनंदी जीवाचे छायाचित्रण करून ते कॅमेऱ्यात टिपू शकतो. तो आनंद त्या उत्साही व्यक्तिमत्वाबरोबर घेतला.
मुद्दा हा नाही कि इतर करतात म्हणून मी करून बघितलं तर मुद्दा हा आहे कि ते करून मी स्वतःला आनंदी होण्याची संधी दिली. जे करताना मी हलकेपण अनुभवला. दोन तास त्या बागेत मनमुराद हुंदडताना मी फुलपाखरू होते. एरवीसारखी मी नीट आहे ना? माझ्याकडे कोणी बघत तर नाही ये ना? मी वयापेक्षा काहीतरी भुक्कड तर दिसत नाहीये ना? माझी पर्स फोन आहे ना? मी ते नीट सांभाळलय ना ? आता काकू वयाची आहे तर वयाला नीट दिसेल अशी मी बागेत वावरतेय ना ? अशा नेहेमीच्या चौकटीत मी नव्हते. ते दोन तास मी माझी होते. मी आणि ती व्यक्ती होतो बाकी जगाची चिंता नव्हती. कोण बघतय का ? हसतय का? बागेतले काय म्हणतील माझ्या बद्दल? हे विचार नव्हते. उलट मी मंद स्मितहास्यानी त्यांना सामोरी जात होते. हातात काही नाही, डोक्यात कसलेही बोजड विचार नाहीत. चौथीतल्या मुली कशा असतात - हव तिथं बसावे, हव तिथं उभं राहून असा फोटो काढ तसा व्हिडीओ काढ यात होते. आपण जसे असतो त्यात जर मस्त असू आनंदी असू तर इतरांना पण ते तसेच दिसतो हा अनुभव काल आला. तशी वर्दळ कमी होती बागेत पण जे जे दिसले ते ते हातानी खुणवुन, मंद हसुन किंवा फोटो काढेपर्यंत बाजूला थांबून आनंदात सहभागी होत छान दिसतंय दोघी हीच पावती देत होते. अगदी त्या क्षणी जर आनंदी संप्रेरकाची पातळी तपासली असती तर ती उत्तम संतुलनात आढळली असती. आयुष्य सुखद जगताना आनंदी संप्रेरके संतुलन असायला हवी ना, त्यासाठी आपण आधी आनंदी असायला हवं. याची सुरुवात आधी आपण इतरांना आनंदी बघून होते. इतरांना आनंदी पाहून जाणीव होते कि आपण सुद्धा हे करून आनंदी होऊ शकतो. यात हेवा नसतो. यात आनंद वाटावा हा हेतू असतो.
मी तो आनंद काल मनमुराद घेतला. आनंद हा संसर्गजन्य आहे. हा रोग नाही ती थेरपी आहे. यात इतरांना आनंदी पाहून आपण आनंदी होतोय यातच एक गमक आहे. नैतिक जबाबदाऱ्या तर कोणाला चुकत नाहीत. आयुष्यात आधी सारखं खूप माणसं भेटणं कमी झालाय. मग आयुष्य आनंदी होणं थांबवायचं कि ते कसं आनंदी होऊ शकत हे शोधायचं यातल मी ठरवलंय.
मी कालची सकाळ खूप वेगळी जगले. यासाठी माध्यम ठरलेल्या सर्वांचे खूप खूप आभार.
श्रीकृष्णाची कृपाच कि तो चौथीलतला आनंद आज सेहेचाळीसमधे दिला. मधे मधे हि आनंदाची थेरपी असायलाच हवी. बघा पटलं तर ! या भेटूया थेरपीला.
जय श्री कृष्ण
गौरी पाठक
२१.०७. २०२५
सुंदर
ReplyDeleteअति उत्तम.... खूप छान
ReplyDeleteStay blessed dear Gauri. Enjoy happy and healthy life
ReplyDeleteधन्यवाद सख्यांनो
ReplyDeleteहा सहजसाध्य सहजराव नितांत सुंदर आहे ग. नाण्याच्या दोन बाजू ठरलेलं असतं च की. मला जे भावत ते माझ्या पुरतं खरंय न , बस्स
ReplyDeleteहो मग काय तर
Deleteनेहमीप्रमाणेच सुंदर 👌
ReplyDelete