१४) मार्ग

आजकाल घरटी एक लेकरू असते, मामा आत्याची पण लेकरं आधी सारखं सुटीत म्हणा, कार्याला म्हणा येतीलच असा राहिलं नाहीये. मग या पिढीनी गेट टुगेदर करून म्हणा किंवा मुद्दाम ठराविक समविचारी जमून जर आनंद साजरा केला तर त्यात काही गैर नाही. शुभ कार्यकतील आनंदाची व्याख्या पण बदलत चाललेली दिसतेय. मग मानव एकत्र येण्याचे मार्ग शोधून तो आनंद घेऊ लागलेला जाणवतोय. त्यात जमलेल्यानी एकत्र आलेले सुगंधित मंत्रमुग्ध क्षण फोटोत बंद केले तर काय बिघडलं? अनेकांचा सतत गावभर भटकणं आणि फोटो काढत फिरणं ते ईतरांना "आम्ही कशी मजा केली" दाखवणं यावर आक्षेप असतो. ज्याला त्याला आपल्या नैतिक जबाबदाऱ्या समजतात त्यातून तो त्याला ज्यात आनंद मिळेल ते तो करतो. मला एकच पटलंय कि आनंद साजरा करून तो वाटावा तर तो वाढतो. तो वाटताना इतरांना तो दिखावा वाटणं अथवा तो आनंद पाहून स्वतः आनंदी वाटण हे ज्याच्या त्याचा मानसिकतेवर अवलंबून आहे. आपण आपली आनंदाची व्याख्या करताना ईतरांच्या आनंदाच्या व्याख्येला धक्का न लागता करणं हे आपोआपच जमतं.
हे सांगायचं कारण असं कि मी तो सुंदर अनुभव काल घेतला. मी कालची सकाळ एका उर्जावान ऊत्साही व्यक्तीबरोबर घालवली. मी आजवर घरात एकत्र जमलो किंवा काही सण समारंभ कारणानं जमलो कि आनंदी क्षण टिपले होते. मस्त आवरून (ते पण नीट ठरवून बर का! ) बाहेर फोटो आणि सहजतेनं वावरतानाचे व्हिडीओ काढायची वेळ कमी आली होती. आपण वयाचे भान विसरून पण वयाला शोभेल असेच आवरून दोन तास मुक्त बागडू शकतो. तेव्हाचे आपले आनंदी जीवाचे छायाचित्रण करून ते कॅमेऱ्यात टिपू शकतो. तो आनंद त्या उत्साही व्यक्तिमत्वाबरोबर घेतला.
मुद्दा हा नाही कि इतर करतात म्हणून मी करून बघितलं तर मुद्दा हा आहे कि ते करून मी स्वतःला आनंदी होण्याची संधी दिली. जे करताना मी हलकेपण अनुभवला. दोन तास त्या बागेत मनमुराद हुंदडताना मी फुलपाखरू होते. एरवीसारखी मी नीट आहे ना? माझ्याकडे कोणी बघत तर नाही ये ना? मी वयापेक्षा काहीतरी भुक्कड तर दिसत नाहीये ना? माझी पर्स फोन आहे ना? मी ते नीट सांभाळलय ना ? आता काकू वयाची आहे तर वयाला नीट दिसेल अशी मी बागेत वावरतेय ना ? अशा नेहेमीच्या चौकटीत मी नव्हते. ते दोन तास मी माझी होते. मी आणि ती व्यक्ती होतो बाकी जगाची चिंता नव्हती. कोण बघतय का ? हसतय का? बागेतले काय म्हणतील माझ्या बद्दल? हे विचार नव्हते. उलट मी मंद स्मितहास्यानी त्यांना सामोरी जात होते. हातात काही नाही, डोक्यात कसलेही बोजड विचार नाहीत. चौथीतल्या मुली कशा असतात - हव तिथं बसावे, हव तिथं उभं राहून असा फोटो काढ तसा व्हिडीओ काढ यात होते. आपण जसे असतो त्यात जर मस्त असू आनंदी असू तर इतरांना पण ते तसेच दिसतो हा अनुभव काल आला. तशी वर्दळ कमी होती बागेत पण जे जे दिसले ते ते हातानी खुणवुन, मंद हसुन किंवा फोटो काढेपर्यंत बाजूला थांबून आनंदात सहभागी होत छान दिसतंय दोघी हीच पावती देत होते. अगदी त्या क्षणी जर आनंदी संप्रेरकाची पातळी तपासली असती तर ती उत्तम संतुलनात आढळली असती. आयुष्य सुखद जगताना आनंदी संप्रेरके संतुलन असायला हवी ना, त्यासाठी आपण आधी आनंदी असायला हवं. याची सुरुवात आधी आपण इतरांना आनंदी बघून होते. इतरांना आनंदी पाहून जाणीव होते कि आपण सुद्धा हे करून आनंदी होऊ शकतो. यात हेवा नसतो. यात आनंद वाटावा हा हेतू असतो.
मी तो आनंद काल मनमुराद घेतला. आनंद हा संसर्गजन्य आहे. हा रोग नाही ती थेरपी आहे. यात इतरांना आनंदी पाहून आपण आनंदी होतोय यातच एक गमक आहे. नैतिक जबाबदाऱ्या तर कोणाला चुकत नाहीत. आयुष्यात आधी सारखं खूप माणसं भेटणं कमी झालाय. मग आयुष्य आनंदी होणं थांबवायचं कि ते कसं आनंदी होऊ शकत हे शोधायचं यातल मी ठरवलंय.
मी कालची सकाळ खूप वेगळी जगले. यासाठी माध्यम ठरलेल्या सर्वांचे खूप खूप आभार.
श्रीकृष्णाची कृपाच कि तो चौथीलतला आनंद आज सेहेचाळीसमधे दिला. मधे मधे हि आनंदाची थेरपी असायलाच हवी. बघा पटलं तर ! या भेटूया थेरपीला.
जय श्री कृष्ण
गौरी पाठक
२१.०७. २०२५
15 Pataleshwar j m road
16 Wagheshwar mahadev wagholi
वारी म्हणजे नियमित पाने भगवंतास भेटायला जाणे! पंढरीची वारी म्हणजे भावपूर्ण धार्मिक आध्यत्मिक यात्राच कि... जी जीवनातील अनेक रहस्य उजागर करते. हि करायची ईच्छा मनात यावी लागते. ती मनात अनंताही तोच आणि ती पुरी करून घेणारेही तोच असतो, पांडुरंग!
मागे सलग चार वर्ष पांडुरंगाच्या कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी लाभली. या प्रवासातील मुमुक्षूनि मिळून यंदा पुणे ते सासवड टप्पा करू असा मागच्या वर्षी मनात आखलं होते. त्याचा पांडुरंगी आठवं करून दिला आणि ती पूर्ण करून घेतली.
ai दिंडीमुळे खूप सहज सुकर झाला हा मार्ग. पहाटे ४.३० वाजता चांदणी चौकात आम्ही पोचलो. ५. ३० ला मगरपट्टा हडपसर ला पोचायचे नियोजन होते.
ai दिंडीचे सगळे जण एकत्र जमलो. कोरडा नास्ता चहा कॉफी होती. रेनकोट ताब्यात घेतले. आणि ai दिंडी पुणे सासवड पायी वारीसाठी प्रस्थान झाली. कोणी झेंडे कोणी म्युझिक सिस्टिम असे बरेच सामान घेतलेले व्हॉलेंटियर होते. सगळे एकरूप बघताना उभारी वाटत होती. यंदाचे टोपीचे वाक्य पाहून जोश वाटत होता : रक्षण्या सिंदूर, 'वर' करी शूर.
मगरपट्टा साऊथ गेटवर एकत्र जमून नामाचा गजर झाला. अभंग आणि माउलींचा गजर यातला सहभाग भारावून टाकणारा होता. आम्ही गाडीत बसलो तेव्हा एक सूचना मला जास्त आवडली आणि भावली सुद्धा. जेव्हा मुख्य रस्यावर लागू तेव्हा आधी त्या हमरस्त्याला नमन करा. ज्यावरून अनेक वारकरी पांडुरंगाची आस मनात घेऊन अनेक वर्ष चाल करत आहेत तो आदरणीय समजावा. त्यावरून माउली स्वतः जात आहेत अनेक वर्ष. अनेक संत मंडळींची पायधूळ त्यालाल लागली आहे. त्याला नमस्कार करूनच आपण वारीच्या भाकीसागरात मिसळुया. काय सुरेख भावना आहेत. मनापासून आभार त्या दादांचे ज्यांनी असा सुंदर विचार दिला. कोणाला कसा दिसेल भेटेल भगवंत ते आपण सांगू शकत नाही पण मार्ग दाखवणारा पण नामांतुल्यच मानव नाही का !
बघता बघता हमरस्त आला. कपाळावर गंध आलं, सगळ्यांचे पिशवीतून टाळ वर आले, ai दिंडीच्या टोप्या आता डोक्यावर स्थिरावल्या. सातच्या सुमारास ai दिंडी प्रस्थान झाले. हडपसर गाडीतळ जवळ अफाट जनसमुदाय एकत्र मिळाला. आनंदाचा पूर होता, वातावरणात भक्तीमय सूर होता. हडपसर गाडीतळ चौकात उजवीकडे वळावे असे दिशादर्शक -- दिंडीचे कार्यकर्ते मार्ग दाखवत होते. त्याशिवाय त्या प्रचंड जनसमुदायाच्या मार्ग समजणे अवघडच होते. सर्व मंडळी भेकरे नगर कडे मार्गस्थ झाली. एक ढोलकी वाले दादा ai दिंडीचा झेंडा आणि अभंग म्हणणारे एक दादा यांच्या मागे आम्ही निघालो. मस्त टाळ, मृदंग रस्ता आमी आम्ही पांडुरंगाच्या नाम गजरात निघालो. इथून पुढे सगळे जण आपापली चाल चालत होते. गट गटांनी ai दिंडीच्या माऊली पुढे सरसावताना दिसत होत्या.
मगरपट्टा साऊथ गेट ते हॉटेल विजय एक्सझीक्युटिव्ह १३ - १४ किलोमीटर चाल होती. किलोमीटर हे मापन घरी पोचलो तेव्हा शोधलं. मुखी माऊली च नाव सोबत करायला त्याच भावाचे साथीदार असतील तर कसली आठवण येतेय बाकीची.
या वाटेवर अनंत माऊलींचं दर्शन होतं : काही माऊली (वारकरी) सुसाट वेगानं पंढरीची वाट पकडतात ती भगवंताच्या भेटीची आस दाखवतात, काही माऊली (वारकरी) भौतिकातील वस्तू कशा क्षुल्लक आहेत याची पावती देतात, काही माऊली आपल्या ठाम भक्तीवर कसा वातावरणाचा पडसाद न पडत ती अखंड ठेवत चालायचं हे शिकवतात, तर काही माऊली कष्टी असूनही आपण हसून राहू शकतो हे भेगांचे पाय असूनही हसतमुख चेहऱ्यातून दाखवतात, काही तर पोटाची खळगी भरायची ती तेवढीच तिचा फाफट पसारा असायची गरज नाही हे दाखवतात, काही माऊली साठवणूक करून परमार्थ करा हे शिकवतात कसं ते विचार करा. वारी करताना स्वतःच्या गरजा काय आणि किती याचा साक्षात्कार होतो. मानवाने आध्यात्मिक व्हावं म्हणजे नेमका कसं ते यात समंजत. आयुष्यात काय कमावलं पाहिजे म्हणजे काय गमावत नाही याची झलक मिळते.