Sunday, 29 June 2025

 

1 Shiv temple sutarwadi near pashan lake
2 shri someshwar temple baner
3 Siddeshwar Vruddheshwar Mandir, near savarkar bhawan shivaji nagar
4 Amruteshwar - Siddheshwar Temple, shaniwar peth
5 Shree Tarkeshwar Mandir, Yerawada
6 Panchaleshwar Mahadev Mandir, Erandwane near savarkar cloth holi
Rameshwar Mandir, Mandai
8 Shree Umamaheshwar Mahadev Temple,natu baug, shukrawar peth
9 Peshwe Kalin Mahadev Mandir, parvati paytha
10 Adinath Pimpaleshwar Mahadev Temple, swargate near vipashyana kendra
11 Shree Laxmishwar Mahadev Temple, Rasta peth

12 Shree Nageshwar Shiv Mandir, somwar peth
13 Vittahl wadi mahadev, sinhagad road
14 Baneshar mahadev baner cave

15 Pataleshwar j m road
16 Wagheshwar mahadev wagholi

निरूपण – परतवारी


निरूपण – परतवारी - सुधीर महाबळ यांचे पुसतक

सलग पाच वर्ष वारीचा एक लहानसा टप्पा पांडुरंगाच्या कृपेने केला गेला. जसं जसं वर्ष जातात तसं तसं वारी, पांडुरंग याच्यावर माझा जीव जास्त जडू लागला आहे. एक छोटा टप्पा करून, मला ओढ लागली कशी काय? काय असेत ते दिव्यत्व जेव्हा पूर्ण वारी करतात, दरवर्षी वारी करून काय वाटल मी लिहिती झाले, परंतु यावर्षी वारीच्या पूर्ण प्रवासाची त्यातील सर्व टप्पयाची, त्यात वाहत्या राहणाऱ्या वैश्णवांची दररोजची कार्य मला समजुन घेण्याची आतुरता निर्माण झाली. पुणे सासवड टप्यात तो मोठा अवाका आणि क्षमता पुसटशीच जाणवली. हो पुसटशीच कारण हे टिचभरच आहे. पूर्ण २५० कि.मी ज्या ध्यासानं  देहभान विसरून ती मंडळी जातात , चालतात, अनुभवतात त्यापुढे अगदी टिचभरच अनुभव आहे हा माझा.

रविवारी रात्री सासवडहून परतले. मनात खुप खळबळ होती. अनंत प्रश्न होते. मी क्षणभरच अनुभवलेला अनुभव अव्दितीय वाटत होता. तो किंचीतसाच आहे. मग नक्की भगवंताकडे जाण्याची वाटचाल कशी आहे? आयुष्यात टप्याटप्यान वारी करेन पांडुरंगाची इच्छा असेत तस होईलच पण आज मनात खूप कुतुहल, चुळबुळ जाणवली. सोमवारी कामाच्या प्रवाहात आले. पण मनात वारीचे अनेक प्रश्न होते. मन शांत करण गरजेच होतं आणि ती  हुरहुर पांडुरंगान जणू जाणतीच. मुमुक्षि ग्रुपवर सुधीर महाबळ यांचं परतवारी पुसक वाचा अशी रेणूची पोस्ट आली.

खलास मी शोध सुरू केला. झपाटल्यासारखा, ते शोधल आणि सुधीर महाबळांच्या नजरेत‌ली वारी अनुभवली. आज पहाटे ते पूर्ण झालं. सकाळी सातला मन ओसंडून व्हायलं, वारीचा एकेक भाग मी त्यांच्या बरोबर होते - नजर किती एमएम नी बारीक हवी हा मोलाचा धडा आज मला मिळाला. परतवारीतलं काय भिडलं ते नोंद  करत गेले. आयुष्यान जर कधी उद्‌धविग्न वाटल तर वाचायच म्हणून नोंद केली. ती अशी - 

वारीला जाताना "ऐश्वर्यकारी" आणि येताना "वैराग्यवारी" ही उपमाच मन जिंकून जाते. वारीतला माणूस स्वतः "मी"  बाहेर काढतो आणि देह नावाच यंत्र पाहू शकतो ही कल्पना भारी वाटती. बाबुरावांच्या पात्रामुळे संसार संपला ठरवायच कसं? हे खुप आवडतं भौतिकातून आध्यात्मिक होतानाची बारीक पुसट लाईन क्रॉस करतानाची संकल्पना उर्फ टिप या सदरात मी नोंदली. 

जगताना आपण आपल्यातता चंद्र आणि सूर्य कसा बघायचा ही भावना जब्रा आहे. अफाट वैराग्य आणि मनाचा तोल सांभाळतानाची अफाट ग्रहणशक्ती कमावती जाते ती वारीत. माळीणीची मानसिकता किती मोलाची होती. आपण कपड्‌याच्या मोहात कसे अडकतो, तीनं  मात्र  मातीचे पाय पुसाया स्वतःच लुगडं दिलं. का ? तर पायी वारीच्या वारकऱ्याची पायधूळ ती माऊलीच की हो! हाच विचार. ..... आपण माती लागली कि कपडे कसे झटकतो. 

वारीतील धनगर सदा जगमित्र यात मला गजर चित्रपटातल एक पात्रं आठवलं. जगात वावरताना संशय येतो पण वारी सारख्या अनोळखी अफाट जन सागरात चांगली साधी सरळ निष्कपट माणसं जगात आहेत हा विश्वास मिळतो. जगताना तो सकारात्मकतेकडची वाट दाखवतो.

वारीत कल्याणकरांचा ट्रक दोन वेळच जेवण देतो. मला तो एकदा तरी बघायचाच आहे. महाबळांनी अनेकदा भसाड्या आवाजातला कर्णा असा उल्लेवा केला आहे. पुणे सासवड टण्यात हा कर्कश भसाड्या आवजातला कर्णा चांगलाच अनुभवला आहे.

'झांबळे' हा नवीन शब्न समजता. मोलाची उच्चं बैठकीची माणसं या प्रवासात ओळखाची दृष्टी मिळते. जी दृष्टी जगताना उपयोगी पडेल, खरंच!  रात्री म्हणजे पहाटे १ वाजता उठुन १.३० वाजता चाल  सुरु करतानाचं रात्रीच नयनरम्य वर्णन मी प्रथमच समजले,  अनुभवते. हे मी परत पूर्ण लिहूनच काढणार आहे. 'जैसे चंद्रा आड आभाळ' ओवी झांबळे शब्दाचा अर्थ सांगते.  ही पूर्ण ओवी शोधणार आहे मी. पहाटेचा रस्ता आणि काळ्या रंगाच्या विविध छटांमध्ये महाबळाना सापडलेला पांडुरंग महाबळांच्या नजरेतून पाहताना वाटल की मी तो रास्तच चालत आहे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधी बद्दलच्या नामदेवांच्या ओव्या मी शोधुन वाचणार आहे. मगच यातल वाचलेल उच्चारेन, हा माझा घराचा अभ्यास असेल. आपण घरात राहायता जागा नाही म्हणणारे पांढरपेशी पण वारीत येणाऱ्या वारकरी लोकांना एक शेतातली खोली ठेवणारं - आजीच मोलाच्या मनाचं कुटुंब जीवाला चिमटा काढून जातं. वर्ष श्राद्ध घरात पण तरी शेतावरच्या घरात वारकरी नेहमीप्रमाणे जेवणार. घराला कुरुप नसत याकाळात का? तर माऊती येतील आणि वापरून जातील. हा अनुभव खुप काही शिकवून जातो. माऊलींना पाहायची एक नाविन्यपूर्ण पद्धत समजली.  माऊली वर्षभर नजरेत भरून राहवे यासाठी दोन्ही तळहात जमिनीलगत, समांतर आणि मनगट भुवईतोवर घेत माऊलींना पाहायचं- अहाहा! सुखद अति सुखद संकल्पना.

पहाटे उठुन वारकरी चाल सुरू करतात. परतवारीतल पौर्णिमेनंतरची पहाट - वर्णन काय ? तर - 'चंद्राच्या स्वच्छ प्रकाशाचा पूर' काय ती उपमा ! कार्य ते शब्दांच वैभव!

एक बिगारी काम करणारा वारकरी रोजंदारीच काम करणारा.  आयुष्यात महिनाभर वारील राहून टिळेकरी काम करतो. जीवनाच अजब तर्कशास्त्र ते अस की दिवसात ६०रू पण वारीत टिळेकरी दिवसाला ७०० रु. कमावतो. विश्वास हा कि माऊनी महिनाभर पोट  भरतात उपाशी ठेवत नाहीत. फुकट काही करायची मागायची वेळ येऊ देत नाहीत माऊली. महाबळांच्याच शब्दात तर्क वाचावा हे खरे. वीतभर पोर आणि हातभर टिपणी मस्त जोड.

आधी भाकरी ठेवायता फडकं नव्हतं हो ... आता माऊनींची वारी करतो परिस्थिती बरी आहे. यांच्या लेखीच देवाला का मानावं हे वाचाव.  काय पद्‌धत असते ना गावातल्या लोकांची सांगायची स्तुत्य होती ती कान्होबांची बोली महाबळांच्या लेखी. देह हा तुझाच रे भगवता 'इदं न मम'. मेल्यावर देहावर तुळशीपत्रं ठेवतात, पण वारकरी आधीच तुळशीमाळ घालून ते करतात. यात येणाऱ्या घामच रूपक काटा आणणारं भाष्य वाटलं सोपानकाकांचं. म्हातारी साठी ज्ञानेश्वरी विकत घेणाच्या मारुतीच्या पूर्ण कथानकामुळे जीव कोंडतो. हुंदकाच येतो. आपण काय किंमत करतो पोथ्यांची ? सोन समोर पण बघण्याची दृष्टी गमवत चाललोय.

नीरा नदितला पादुका स्नान सोहळा मला प्रत्यक्ष पाहायचाच आहे. हरीपाठाचा  २७वा अभंग नक्की वाचणार. (झाला महार पंढरीचा हि चाल ) मला वाटत माहेरी जाऊ गं...  नामदेवाच दर्शन घेऊ गं ... 
उत्तम  (भाग - स्नेहबंध ते नादब्रहम)

विवंचना टाकून  वारकऱ्यांसारखं नाचून पहा का? ते  तेव्हाच कळेल. वरातीत नाचतो ते नव्हे. हरीनामात रमून बेभान नाचणं,  अहो भाग्य लागतं  यासाठी सहज जमत नाही ते.  पण प्रयल तर करा... वैष्णवजनच ते जे बेभान नाचतात. माऊली सदा धनगर यांचा भाग वाचण्यासारखाच. प्लॅस्टिक कागदाच महत्व वाचताना हसू आलं कारण दिवेघाटात मी ते अनुभवलं ना..  रेनकोट खिसगणतीत निघाला की.

सुखी माणसाचा सदरा वाचताना जुने काही संदर्भ आणि व्यक्ति झरकन डोळ्या समोरून गेल्या. अचानक येणारी सर गर्दी सारून रस्ता दाखवते हा अनुभव दोनदा सासवड टप्प्यात आला. सॅकची चेन उघडल्या सारखा (भा.पो.) अंथ माणसाच्या भजनाचा गजर... हे दृश्य मेंदूत कोरलं गेलं .... अहा काय शब्द..  महाबळांना साष्टांगच !

आपण इथवर आलो  पण हा नामाचा महिमा. हा मात्र आहे २८ किमी चाल  दिवेघाट यात तो समजला.  रामकृष्णहरी.... ईठोबा माऊनी तुकाराम.... हरिणामामुळे त्रास आणि वेदनेचे विचार डायव्हर्ट होतात. जगताना याचा वापर करायचा ही शिकवण....

कल्याणचे सखाराम त्यांच्याकडचे मोफत जेवण सासवडला थांबवतात. पुढे गरज नसते १००% पटलं.  'सखा आकाशा एवढा' सदरात अन्नदानाच अत्यंत सुंदर महत्व पटवल त्यांनी.  प्रत्येक प्रकारच्या दानाचा सविस्तर संदर्भ आयुष्यभर लक्षात राहील. अन्न्दान महापुण्य का ? हे कधीही विसरणार नाही.

सुखाचं मोजमाप, मांगल्य शोधण्याची सवय वारीत लागते ही बहुमूल्य लेणी अवगत झाली. वर्षभर जपलेली १० ची नोट वारीत दान केलेली माऊलींनी स्विकारली या भावनेत पावतीला नमस्कार करणारी वयस्क आजी पैशाचं आणि समाधानाचं,  मारुलीच्या प्रतीच्या ध्यासाचं मोल शिकवून जाते.

माऊली परत आळंदीत पोचतात ते वर्णन मस्तच. यात माऊलीची पण दृष्ट काढती जाते वाचतानाच टपटप टपकतं मन गालावर. वारी करताना बंधन नाही पण शिस्त पाळत क्षमतेप्रमाणे, नामाचा महिमा अनुभवत काहीही अपेक्षा न ठेवता चालत राहायच हे यात समजत. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलेले भक्तांचे चार प्रकार मी मात्रं नोंद केले. 

पुणे ते सासवड पायी वारीनंतर, परतवारी पुस्तकामुळे का कोण जाणे मन शांत झाले. मला हलकं वाटायला लागलं. रेणू‌चे आणि महाबळांचे आणि यांना आयुष्यात आणणाऱ्या पांडुरंगाचे अनंत अनंत आभार. 

जय श्री कृष्ण 
गौरी पाठक 
२८ जुन २०२५

Tuesday, 24 June 2025

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा..

वारी म्हणजे नियमित पाने भगवंतास भेटायला जाणे! पंढरीची वारी म्हणजे भावपूर्ण धार्मिक आध्यत्मिक यात्राच कि... जी जीवनातील अनेक रहस्य उजागर करते. हि करायची ईच्छा मनात यावी लागते. ती मनात अनंताही तोच आणि ती पुरी करून घेणारेही तोच असतो, पांडुरंग!

मागे सलग चार वर्ष पांडुरंगाच्या कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी लाभली. या प्रवासातील मुमुक्षूनि मिळून यंदा पुणे ते सासवड टप्पा करू असा मागच्या वर्षी मनात आखलं होते. त्याचा पांडुरंगी आठवं करून दिला आणि ती पूर्ण करून घेतली. 

ai दिंडीमुळे खूप सहज सुकर झाला हा मार्ग. पहाटे ४.३० वाजता चांदणी चौकात आम्ही पोचलो. ५. ३० ला मगरपट्टा हडपसर ला पोचायचे नियोजन होते.

ai दिंडीचे सगळे जण एकत्र जमलो. कोरडा नास्ता चहा कॉफी होती. रेनकोट ताब्यात घेतले. आणि ai दिंडी पुणे सासवड पायी वारीसाठी प्रस्थान झाली. कोणी झेंडे कोणी म्युझिक सिस्टिम असे बरेच सामान घेतलेले व्हॉलेंटियर होते. सगळे एकरूप  बघताना उभारी वाटत होती. यंदाचे टोपीचे वाक्य पाहून जोश वाटत होता : रक्षण्या सिंदूर, 'वर' करी शूर. 

मगरपट्टा साऊथ गेटवर एकत्र जमून नामाचा गजर झाला. अभंग आणि माउलींचा गजर यातला सहभाग भारावून टाकणारा होता. आम्ही गाडीत बसलो तेव्हा एक सूचना मला जास्त आवडली आणि भावली सुद्धा. जेव्हा मुख्य रस्यावर लागू तेव्हा आधी त्या हमरस्त्याला नमन करा. ज्यावरून अनेक वारकरी पांडुरंगाची आस मनात घेऊन अनेक वर्ष चाल करत आहेत तो आदरणीय समजावा. त्यावरून माउली स्वतः जात आहेत अनेक वर्ष. अनेक संत मंडळींची पायधूळ त्यालाल लागली आहे. त्याला  नमस्कार करूनच आपण वारीच्या भाकीसागरात मिसळुया. काय सुरेख भावना आहेत. मनापासून आभार त्या दादांचे ज्यांनी असा सुंदर विचार दिला. कोणाला कसा दिसेल भेटेल भगवंत ते आपण सांगू शकत नाही पण मार्ग दाखवणारा पण नामांतुल्यच मानव नाही का ! 

बघता बघता हमरस्त आला. कपाळावर गंध आलं, सगळ्यांचे पिशवीतून टाळ वर आले, ai दिंडीच्या टोप्या आता डोक्यावर  स्थिरावल्या. सातच्या सुमारास ai दिंडी प्रस्थान झाले. हडपसर गाडीतळ जवळ अफाट जनसमुदाय एकत्र मिळाला. आनंदाचा पूर होता, वातावरणात भक्तीमय सूर होता. हडपसर गाडीतळ चौकात उजवीकडे वळावे असे दिशादर्शक -- दिंडीचे कार्यकर्ते मार्ग दाखवत होते. त्याशिवाय त्या प्रचंड जनसमुदायाच्या मार्ग समजणे अवघडच होते. सर्व मंडळी भेकरे नगर कडे मार्गस्थ झाली. एक ढोलकी वाले दादा ai दिंडीचा झेंडा आणि अभंग म्हणणारे एक दादा यांच्या मागे आम्ही निघालो. मस्त टाळ, मृदंग रस्ता आमी आम्ही पांडुरंगाच्या नाम गजरात निघालो. इथून पुढे सगळे जण आपापली चाल चालत होते. गट गटांनी ai दिंडीच्या माऊली पुढे सरसावताना दिसत होत्या. 

मगरपट्टा साऊथ गेट ते हॉटेल विजय एक्सझीक्युटिव्ह १३ - १४ किलोमीटर चाल होती. किलोमीटर हे मापन घरी पोचलो तेव्हा शोधलं. मुखी माऊली च नाव सोबत करायला त्याच भावाचे साथीदार असतील तर कसली आठवण येतेय बाकीची. 

या वाटेवर अनंत माऊलींचं दर्शन होतं : काही माऊली (वारकरी) सुसाट वेगानं पंढरीची वाट पकडतात ती भगवंताच्या भेटीची आस दाखवतात, काही माऊली (वारकरी) भौतिकातील वस्तू कशा क्षुल्लक आहेत याची पावती देतात, काही माऊली आपल्या ठाम भक्तीवर कसा वातावरणाचा पडसाद न पडत ती अखंड ठेवत चालायचं हे शिकवतात,  तर काही माऊली कष्टी असूनही आपण हसून राहू शकतो हे भेगांचे पाय असूनही हसतमुख चेहऱ्यातून दाखवतात, काही तर पोटाची खळगी भरायची ती तेवढीच तिचा फाफट पसारा असायची गरज नाही हे दाखवतात, काही माऊली साठवणूक करून परमार्थ करा हे शिकवतात कसं ते विचार करा. वारी करताना स्वतःच्या गरजा काय आणि किती याचा साक्षात्कार होतो. मानवाने  आध्यात्मिक व्हावं म्हणजे नेमका कसं ते यात समंजत.  आयुष्यात काय कमावलं पाहिजे म्हणजे काय गमावत नाही याची झलक मिळते. 


त्यामानाने मगरपट्टा ते दिवेघाट सुरु होण्यापूर्वीची जागा यात थोडा आता अराम करून घाट चढू असा वाटणं साहजिकच होत. सगळेजण ai दिंडीनी नियोजन केलेल्या जेवणाच्या जागेवर एकत्र जमलो. १२ वाजता विजय हॉटेल वर पोचलो. हा रस्ताभर रस्त्याचं काम सुरु असल्याने वारकरी विभागले जात होते. अरुंद पुलावरून जाताना खरी सामंजस्याची बैठक समजून आली. कोणी  नसूनही अजिबात न धक्काबुक्की करता तो भाग पुढे सरसावलो. कोणी पण पायावर पाय पडला, हेलपाडाला तरी माऊली म्हणत पुढे सरसावले जात होतो. आपोआपच ती असं लक्षात आलं. मधेच दोनदा जोरात आलेल्या पावसाच्या सरी पांगापांग करून गेलेल्या. मज्जा आली. जीवाची उलघाल जणू तो विठुराया पाहतोय आणि पाणी शिंपडत असे वाटले.  हॉटेल विजय ला थोडा विश्राम जेवण करून मग रिंगण झालं. फुगल्या झाल्या. जरा चार्ज झालो. बरोब्बर १. ३० वाजता सर्वजण दिवेघाट चढायला सुरु झाले.  मनात हाच विचार होता कि हे पंढरीनाथा किती आहे मोठा हा घाट तूच नेरे त्याच्या पार. तो चढताना लक्षात आलं कि आयुष्यात भाग्याने लाभलेला हा पुणे सासवड पायी वारीचा हा टप्पा. त्यातला दिवेघाटाचा भाग खरोखरच त्या मुख्य वारकरी मंडळींच्या साथीनं, अभंगाच्या ठेक्यानं आणि माउलींच्या घोषानं सहज पार पडला. आज शरीराचे, भक्तीचे आणि परमेश्वराच्या ओढीचे मोल समजले. आळंदी पुणे टप्प्यापेक्षा हा मोठा आहे. तो त्यांनाच पार करवला.  हे पांडुरंगा अशीच मायेची पाखर अनुभवत आपल्या सेवेत राहण्याचीबुद्धी द्या.
 
दोन्ही बाजूला हिरवा डोंगर मधे वारकरी काय सुरेख नजर होता. हिरव्यागार रस्त्यावर पारिजातकाचं जणू पायघड्या घातलाय असा तो घाट दिसत होता. कितीतरी माऊली नामाचा गाजर करताना डिसास्ट होत्या आम्ही त्यात मम म्हणत जोडले जात होतो. थोड्या वेळातच आम्ही रेनकोट काढला बेकार उकडायला लागलं होतं. आपण कल्पनाही करू शकत नाही असं सामान लादून वारकरी चढ चढतात. जवळजवळ १२ वळणं गेली मग ती विठुरायाच्या काळ्या मूर्तीची किनार दिसू लागली.



 हेच ते पठार, हाच तो विठोबा, जो पाहत घाट चढत येतो आपण आणि शारीरिक वेदना विसरून गहिवरून जातं मन... या लोभस मूर्तीची झलक दिसू लागली कि आपोआपच उभारी येते. .. मनात कालवाकालव होते...  जणु  तो आपल्याचकडे बघून मंद हसतोय असं वाटत. जेव्हा आपण अगदी समोर पोचतो त्या सावळ्या मूर्तीच्या तेव्हा ती मूर्ती नाही तो हलकासा हालत भगवंताचं भासतो... 


हि अनुभूती अंगारवर शहारा आणते, काय उच्च अनुभूती... हलकं वाटत. .. ते लोभस सावळं रूप पाहून अहा !
मागे काय झालं ? पुढे काय होईल ? कशाकशाचाही विचार येत नाही. अफाट जनसमुदायाच्या लाटेवर आपण आपोआपच पुढे जात राहतो... पावलं जड होतात, आपण मागे वळून वळून पाहत राहतो... इकडे जरा गडबड होती एक वारकरी आजी चक्कर येऊन कोसळ्याच समजलं. त्यामुळे आणखी काही क्षण तिकडे थांबायला मिळालं. डोळे भरून तो सावळा रुक्मिणीकांत हृदयात साठवला. आज जो तो बघितला तो परत नाही दिसायचा. कितीहि वेळा आले या घाटात तरी नाही. आजचा विठुराया वेगळाच. आज समजलं कि पालखी जाताना लागणाऱ्या गावाच्या नावाचा अर्थ खरंच अर्थपूर्ण आहे. प्रत्येक टप्प्यात वेगळी गुपितं लपलेली आहेत. 

घाट उतार सुरु झाला आणि मनात ज्ञानेश्वर माऊलींची पावलं पालखी आता दिसेल याचे वेध लागले. पुढे ४-५ किलोमीटर वर पंचवटी फॅमिली रेस्टोरंट मध्ये सगळ्यानी जमायचं नियोजन होत. घाट उतरताना जो गार वारा  अनुभवाला तो वेगळाच होता. त्यात आनंद होता, त्यात मनाचा हिय्या होता, त्यात भेटीची आर्तता होती, त्यात अनुभवलेली कृपेची हळुवार फुंकर होती, त्यात भगवंताच्या प्रेरणेने झालेली ईच्छा त्याच्याच मुळे पूर्ण होतानाच समाधान होत. आत्ता समोर असेल पंचवटी रेस्टोरंट म्हणत चार पाच किलोमीटर गेले असतील. त्याच्या जवळ पोचायच्या आधी मस्त थंडगार लिंबू सरबत दोनदा दिलं त्या पांडुरंगी, त्यालाच दया आली असेल कदाचित आम्हा पामरांची. 

४. ४५ ला संध्याकाळी पंचवटीला पोचलो. एकेक करत हळूहळू सगळे पोचत होते. काहीजण काळे लॉनवर पसरलो, काही जण पितळ भाकरी कडे वळलो तर काही जण पुढे सासवड ला जाताना पण दिसत होते. तासाभरात कीर्तन सुरु झालं.  आता माऊलींच्या रथाकडे डोळे लागले होते. कथेकरी महाराज खूप मौल्यवान माहिती देत होते. बाहेरचे सेवेकरींचे आवाजही खूप येत होते.  

८ च्या सुमारास तो क्षण आला. सगळी भौतिक व्यवधानं विसरून -- दिंडीचे १८०० डोळे त्या सासवडच्या वाटेवर विखुरले होते. त्या क्षणा पर्यंत त्याच्या अनमोलतेच्या दिव्यतेची कल्पनाच करत होतो. माउलींचा रथ जस जसा जवळ येऊ लागला तस तसं मन भिरभिरत होतं. ती दिव्यता जवळ येताना भासत होती. आपोआपच आसमंतात वेगळेपण येताच येत. फुलांचा सजवलेला रथ त्यामानाने जरा संथ गतीनं येत होता त्यामुळे आम्ही तो डोळे आणि मन भरून पाहू शकलो. जमिनीवर संध्याकाळचा किंचितसा अंधार तर वर आकाशातला भरून आलेला ढगांचा काळसर रंग त्यात दिव्य प्रकाश रोषणाईतील रथ हलकेच समोर आला. आतून चंदेरी प्रकाश बाहेर झेपावत होता.
 प्रत्येक मनावर तो पाखर करत होता. नंतर त्या सुंदर तेजोमय रथातली पालखी नजरेस पडली आणि जगाचं भानच राहिलं नाही. अहो माऊली आल्या होत्या... आणि नेत्रांवाटे पूर हि आला होता... का कोण जाणे उर गदगदून भरून आलं आणि चित्ती समाधान पावलं. खरंच कि रे पंढरीनाथा अजबच कि रे तुझी लीला क्षणभर दर्शनाने जीव सुखावून गेला! 
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा... गाण्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा... 
माउली दर्शनंतरच्या भक्तिमय संगीत कार्यक्रमातील या ओळी मनाला खूप भिडल्या. भक्तीच्या आनंदाचं महत्व आयुष्यात असाच टिकवण्याची बोधी द्या पांडुरंग!

भरून पावलेली -- दिंडीची ९०० मनं सुंदर प्रवासाच्या सुगंधी आठवणीत बसनी घरी परतताना  मनात पुढच्या वर्षीच्या टप्याची चर्चा सुरु होती.. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे -
"पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे |
बहू खेचरीच रान | बघ हे वेडे होय मनं ||"

राम  कृष्ण हरी !!
सौ. गौरी पाठक 
_____________________________________

Monday, 16 June 2025

बदलाला सामोरे जाताना...

 


आज सलग २१-२२ वर्ष कामावर जातानाचा रस्ता माझा दोस्त झालाय. रोजचा सहवास माणसाला जीव लावतो खरंय. पण अनेक वर्ष सलग सतत त्याच रस्त्यावरून त्या ठराविक वेळी प्रवास करताना तो आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटकच होऊन जातो. 

मला आठवतंय : रोज सकाळी निघालं कि समोर दिसणारी फुल तोडून पिशवीत भरून जाणारी एक आजी, एक उंच माणूस तिरक्या चालीनी चालत जातानाचा, चौकात लाल दिवा लागला कि थांबल्यावर दिसणारे फुल विक्रेते, यांची तर पूर्ण परिवाराची ओळख झालेली आहे, जे लेकरू ती बाई कडेवर घेऊन फुल विकते तीच मोठी होऊन गर्भारशी होईतोवर मी बघत आले आहे, आता ती बाई फुटपाथवर बसलेली असते, यांच्यात पुरुष कधी दिसत नाहीत, ठराविक वेळेला एका देवळा समोर उभं राहून घट्ट डोळे मिटून आर्त विनवणी करणारे एक काका, जे कोडं आहेत मला कि रोज आर्ततेने हे काय मागतात?, थोडं पुढं माग झालं कि ते दिसत नाहीत मग समजायचं आज एक तर लवकर किंवा उशिरा निघाले मी. अनेक वर्ष सकाळी भेटणारी पेट्रोल पंपावरची ताई आता कुठंपण दिसली तर हसून ओळख देते, हक्कानं विचारणा होते कि ताई खूप दिवस पेट्रोल भरायला आल्या नाहीत? घरातून निघताना पासून कामावर पोचेपर्यंत चे माझे सुप्रभात चे मानकरी...  बरेच आहेत. एक आजोबा मला म्हणतात भेटलं कि - "काय ग काल सुटी होती का ? " तुझं सुप्रभात ऐकलं नाही कि सकाळची सुरुवात होत नाही. तू माझी सुप्रभात क्वीन आहेस. असा सकाळचा प्रवास असणार असेल तर कोणाचं जगणं कंटाळवाणं असेल. जिना साफ करणाऱ्या, सकाळी कामावर पोचतानाच दिसणाऱ्या रास्ता सफाई कामगार बायका, कशा विसरू शकेन मी, सणासुदीला नटून थाटून कामावर जाताना कधी त्या मला तर कधी मी त्यांना हातानं छान दिसतंय खुणावल जायचोच. कशी मौल्यवान आठवण आहे हि! गाडीवर असताना दिसणारे सम सुखी अनेक आहेत. घरी जाताना दिसणारी गजरेवाली ताई, कॅलेंडर विकणारे काका, असे अनेक अनेक आहेत.

आयुष्यात नोकरी कारण गरजेचं आहेच पण ती करताना गेले २१-२२ वर्षात असे सकाळचे संध्याकाळचे घड्याळ असणारे अपरिचित असूनही मला आपले वाटतात. कोणी कोणाला काहीही देत नाही घेत नाही फक्त हसतो, काय जादु आहे ना स्मितहास्यात !

काल अचानक मेट्रोने ये जा करायचा योग आला. तो मार्ग खरंच सोयीचा आहे. कालांतरानं तो अवलंबला जाणार आहे, ती गरज असणार आहे आणि सोय सुद्धा. याची काल हलकीशी जाणीव झाली. मी प्रथमच एकटीनं मेट्रोचा प्रवास केला. पूर्णवेळ मी काचेतून खाली पुणं बघत होते, परंतु मला माझा २२ वर्षाचा कामावर जातानाचा सगळ्या घड्याळांचाच विचार येत होता. ती वीस मिनिटं मी माझ्या आयुष्यातली २२ वर्षातली कामावर जातानाची येतानाची सगळी घड्याळं डोळ्यासमोर काचेवर पाहत होते. दुचाकी सोडून मेट्रोची प्रवासाची सुरुवात होतानाच्या बदलला सामोरं कसं जाईन याच विचारात मी होते. मन आनंदी पण होतं पण तळमळ, हुरहूर पण वाटत होती. या घड्याळांची मला खूप आठवण येईल. जर या नवीन वळणावरच्या बदलला मला समोर खरोखर जायची वेळ आली तर माझं कसं  होईल?

त्या २१-२२ वर्षातली माझी घड्याळं कालांतरानं पुसट होतील या भीतीनं आज मी लिहायला बसले आहे.  मला ती कधीही आठवतील अगदी स्पष्ट मला खात्री आहे पण तरी आज बदलला सामोरं जाताना लिहावंच असं वाटलं. आयुष्यात पुढे अनेक वळणं येणं बाकी आहे. हि तर सुरुवात आहे. नवीन घड्याळ वाट पाहत असतीलच कि... कान्हाजी म्हणतात कि आपण जिथे आहोत तिकडचे असावे. कधीही बदलाला सामोरे जाताना सकारात्मकच असायला हवं. आयुष्यातलील सुंदर अनुभवांनी शिकावं आणि चुकांनी सुधारावं. समोरच्यांचे नकारात्मक विचार पण चांगलं शोधून सकारात्मकता वाढवण्यासाठी अमलात आणायला शोधायचे हा टास्क अश्या प्रकारच्या बदलांना सामोरे जाताना खूप उपयोगी पडेल. 

मग विचार आला लग्नानंतर नवीन दिनचर्या झाली त्या बदलाला पण मी किती दृढ विश्वासाने सामोरी गेले होते. आपलच आपल्याला आठवत जातं कधी कधी. आपण केलेली डबा करून, घर आणि स्वतःला यावरून कामावरची वेळ गाठायची खटपट,  त्या गडबडीतही केली व्रतवैकल्यं, दुखणी खुपणी सगळं. जीवन किती सुंदर असत ना ... सतत काहीतरी नवीन घडत असत अवती भोवती. इतके वर्ष काम करताना जीवनात आलेले दोस्त लोकं. किती बहुमूल्य आठवणी आहेत. कोणी कोणी बरोबर कामाला नाही आता, पण १२ -१६ वर्ष एकत्र ८-८ तास जगलॊ. आनंद, दुःख, त्रागा सगळं एकमेकींना समजू लागलेलं इतकं एकमेकींना ओळखू लागलेलो. हे घड्याळ तर नशिबानीच मिळतं कि.. आयुष्यात सुंदर आईपण अनुभवलं हा सर्वात सुरेख बदल होता आज वरचा आणि वयाप्रमाणे शरीरातील बदलाला पण तर मी किती छान सामोरी जातेय.. खरंच कि...  

काल मेट्रोत बदलाला सामोरे जातानाचा जेव्हा विचार आला तेव्हा लक्षात आलं कि हा होणार बदल फारच लहान आहे. आजवर अश्या अनेक बदलांना सामोरे गेलेली आहे कि मी. पुढे अनेक बदलांना सामोरे जायचे आहेच , कदाचित त्यासाठीच कान्हाजीनी आज सिंहावलॊकन करावलं कि काय कोण जाणे. त्या योगे अनेक लोकांची आठवण झाली ज्यांना अश्या अनेक मोठाल्या बदलांना सामोरे जावे लागले आहे. शिकण्यासारखेच आहे. 

असो आज उजाळा मिळाला त्या सगळ्या घड्याळाच्या आठवणींना.... सगळ्यांना धन्यवाद.  त्यांच्यामुळे कामाचा काळ सुंदर गेला आणि थँक यु त्या छोट्या ताईला जिच्यामुळे मेट्रोचा प्रवास समजून घेताना मजा आली. मला ठाऊक आहे हे फार काही अवघड नाही असं म्हणून काही जण हसतील सुद्धा मला. परंतु माझी काही हरकत नाही कारण त्यांना तो अनुभव अजून यायचा आहे ना ! एखादी गोष्ट अनुभवली कि तिची सुलभता समजते. ते करायची क्षमता असतेच पण वेळ यावी लागते. हे समजायला अवघड आहे, बघा समजतंय का काय म्हणायचंय ते. मी मात्र आज खूप आनंदी आहे खुश आहे. कोणती पण लहानशी गोष्ट मिळाली कि तो आनंद साजरा करायचा, मी श्रीमंत झाले म्हणायचं. माझी जुनी सवय आहे. त्यामुळे पेशी पण आनंदी होतात त्यायोगे मी पण. 

Lets time to party now!

जय श्रीकृष्ण !

सौ. गौरी पाठक 

९९७०१६८०१४


Saturday, 31 May 2025

भुंगा - उडून गेलेला !

भुंगा 


लगोरी नावाची मराठी मालिका होती ना तश्शीच आमची हि लगोरी टीम. आज लगोरी टीमचा ग्रुप कॉल आला. (चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .)

एक : हॅलो ! आलात का सगळ्या ? आज जरा संध्याकाळी भेटूयात का ?
दोन : हो पण काय झालं ग ? anything serious?
एक : नाही पण भुंगा लागलाय डोक्याला तो समजेना का लागलाय ? मग म्हटलं जरा बोलावं.
तीन : चालेल पण आज गुरुवार आहे ग शुक्रवारी भेटू रात्री म्हणजे जरा निवांत असू ना..
चार : खरंय पण ये थोडा वेळ, आवरून ये लागेल तर.
पाच : वेळ सांगा मी पोचते.
एक : ऑफिस नंतर पुलावर या.
तीन : ओके ओके येते.
एक : लव्ह यु गर्ल्स.

अशा बरेचदा भेटी होतात. मैत्री नातंच अस असतं ना कि बोलावलंय आणि जायला जमत नाही असं करूच शकत नाही. तर त्या दिवशी संध्याकाळी हा मुद्दा होता कि एकाच प्रकारचा प्रश्न असेल तरी समान का तोललं जात नाही 
जगात? 

एक : आपल्या आजूबाजूला आपले समजतो ते लोक  असतात. आपण त्यांना जीवापाड जपतो. वेळ पडली  तर त्यांच्या वतीनं इतरांशी भांडतो पण. मग तुम्हाला कधी असं झालाय का?  कि अश्या लोकांबरोबर असताना तुम्हाला गरज आहे तेव्हा त्यांनी  तुमची बाजू घेतली नाही.

दोन : होऊ शकत त्यांना तेव्हा ती गोष्ट झेपलीच नसेल. जर ती तुझी माणसं आहेत तर ती तुझ्या बरोबरच  असणारेत. 

तीन : तू एकटी पडलीस असा वाटलं का तुला तेव्हा ? हं... मला झालेलं अस एकदा कि सगळे माझे, मी सगळ्यांची,
पण एक वेळ अशी आली की माझी बाजू घेणार  कोणीच नव्हतं. नंतर अस व्हायला हवं, तसं हव  म्हणतात. काय उपयोग? तेव्हा माझी बाजू घेतली असती तर मला जास्त आधार वाटलं असता. असं झालेलं  माझ्या बाबतीत पण. नंतर मला समजावलं गेलं कि जाऊ दे बोलून उपयोग नाही तू तुझं बीपी वाढवू नको. 
तीच्या / त्याच्या बाबतील काही बोलत जाऊ नको.

चार : कदाचित त्या व्यक्तीशी त्यांना संबंध न बिघडवता दिवस छान पार पडला जावा वाटलं असेल. 

पाच : हो ते सगळ्यांनाच असत. पण हीच गोष्ट ते तिकडे बोलून हि  करू शकले असते कि - 
उदाहरणार्थ: तुम्हाला जे वाटतंय तस नाही बर का, तिला वेगळं म्हणायचंय तुम्ही वेगळं समजताय. 
हे मी माझ  मत दिलं कारण मला असाच अनुभव आला मागच्याच महिन्यात. 
मी अपसेट होते तरी आवरून कार्यक्रमात गेले घरच्याच बरका तिकडे मी नेहमी सारखी नव्हते. मला ठाऊक नव्हत की माझा चेहरा बोलतोय की मी मारून  मुटकून आलेय किंवा त्रस्त आहे. माझे वाटणारे सगळे होते पण एकानही, "का ग गुमसुम आहेस?  नेहमीसारखी वाटत नाहीस?" अस विचारल नाही. पण तिकडे आलेल्या तिराईत बाईन मला विचारल,"काय ताई आज का शांत शांत?"  तेव्हा मला फार वाईट वाटलेल की माझे वाटणारे असुनही मला कोणी काय झालं पण विचारल नाही. त्यांना  मला का विचाराव वाटल नाही? आपल माणूस अस्वस्थ चलबिचल दिसल तर आपण  बाजुला घेऊन विचारतोच ना? मग माझी वाटणारी ही  माणसं माझी नाही त का?

एक : तेच तर ! मला असच / हेच म्हणायचंय कि माझं म्हणणं जर बरोबर होत हे पटत होत तर तेव्हा मम तरी  म्हणावं ना, नंतर काय उपयोग? ती व्यक्ती सुनावून गेली सगळ्यांमध्ये आणि माझी माझी म्हणत असलेली  माझी वाटणारी ती माणसं चकार शब्द बोलली नाहीत तिकडे? लहान नाही मोठी नाही कोणीच ? का ? 
म्हणजे ती माझी नाहीत का ? चुटपुट भुंगा लागलाय याचाच कि मला वाटतंय कि माझी खूप जोडलेली माणसं  माझ्या मागे  आहेत मग ती मला हवं तेव्हा का नव्हती ? मग ती माझी नाहीत का ?

दोन : सुचलं नसेल त्यावेळी कोणाला काय व्यक्त व्हावं? लगेच टोकाचा विचार करू नको. 

तीन : प्रत्येकाची सपोर्ट करायची पद्धत वेग वेगळी  असते. तू विचार करू नकोस. 

चार : कदाचित नक्की काय झालय हे समजायला पण  वेळ लागतो गं, खूप जण असाल ना तिकडे? 

पाच : आपल्या समजणाऱ्या व्यक्तीला कोणी काही म्हटलंय तर त्यात विषय खोल समजून मग बाजू का  घ्यावी लागावी ? ठाम विश्वास हवा ना कि हि अशी नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे. 
तिला अस म्हणायचं नसणारे.

एक : बघ कि ग !

दोन : त्या व्यक्तीकडून आधी पोळलेले असतील कदाचित म्हणून मध्ये पडत नसतील. 

तीन : मग त्यांनी "एक" कडून पण त्यांच्या वेळी हि मध्ये पडेल अशी अपेक्षा ठेवु नये.. 
तेव्हा मात्र हि असली कि चिंता नाही, ते निर्धास्त. 

चार : तुम्ही दोघी खूप नकारात्मक वळण घेत आहात. उलट अशा लोकांपासून दूर राहा हे शिका. 
ज्यांच्या  जवळीकीनी किंवा ज्यांच्या बद्दल बोलुन आपले वाटणारे पण चिडीचूप होतात अशा मुद्द्यांपासून.  आता चार हात दूर राहा.  तुमच्या वेळी कोण खमक उभं होत पाठीशी हे न बघता यातून धडा शिका.  कोणाच्या किती जवळ जायचं? कोण किती बरोबर चुक हे सांगायला जायच की नाही? 
परंतु यामुळे तुम्ही जशा आहेत त्यात बदल करू नका. तुम्हाला वाटलं कि एखाद्या साठी खमकं उभं  राहावं -  राहा, पूर्वग्रह ठेवून जगू नका. "मला नाही आलात ना पाठीशी आता बसा मी पण नाही येत लक्षात ठेवेन " असा नका करू.

पाच : हो म्हणजे तुझं नेहेमीच पालुपद, सोडून द्या आणि जगा.

एक : नाही मी तशी वागुच शकत नाही कारण मी आपल समजल की आपली फळी तुटू द्यायची नाही. कारण जग वाटच बघत असत फुट पडते कधी आणि मजा येते कधी. मला माझी आपल वाटतात त्या 
माणसांची फळी कायमच तटबंदीचीच ठेवायला आवडतं. म्हणून तर तुम्हाला मनातल बोलले.
(चारचा हात धरून) सगळं समजतंय ग पण भुंगा हा लागला कि सोयीसोयीनी का वागतात? हिच व्यक्ती त्यांना सोयीचं वागली बोलली तरी ती तुमची, 
पण तिला गरज असेल तेव्हा त्यांना :- कधी सुचत नाही, तर कधी आता कस बोलावं बाई मधेच? अस वाटत, तर कधी घरात मोठे आहेत ते बघतील असं वाटत, नाहीतर अस परत होऊ नये याचाच विचार करत बसतात. (जी नंतरची गोष्ट आहे.) हे का पण ?

चार : एक मिनिट तू शांत हो. 

दोन : तू जस इतरांशी वागतेस ते तसेच तुझ्याशी वागवेत हा हट्ट नको करू. 

तीन : म्हणजे आला का तुझा कृष्ण परत कर्म कर फल कि अपेक्षा उस पे छोड । हे पण मान्य आहे पण आत्ता ती दुखावलीय त्याच काय?  अचानक आपल कोणी नाही अस मनाला लागलय तीच्या... साधू संत नाही आपण पटकन सोडून द्यायला. 

पाच : ऐका ना आता एक मुद्दा मला पण पटलंय कि आपण जगाला बदलायला जायचं नाही तर, आपण आपलं  सांभाळून जगायचं, वाटलं मदत करावी करायची, नाही वाटलं नाही करायची. Any time available राहण अति नको, विचारू दे समोरच्याला, मदत हवीय म्हणू दे, ready reckoner आपणहून न बनणे म्हणजे त्रास होणार नाही.

दोन : करेक्ट 

तीन : पूर्णपणे तसं नाही पण तसेच काहीसं. पण पूर्वग्रहदूषित नक्कीच जगायचं नाही हे मात्र १००% पटलंय. 

चार : गुणाच्या माझ्या त्या !  इतरांकडे कस असायला हवं? किंवा त्यांनी कसं असावं किंवा करावं हे त्यांना ठरवू द्यायचं आणि लागेल ती सांगतील ती मदत करायची.  
आपल्याबाजूने कोणी बोलो न बोलो स्वतः समर्थ राहायचं जगायला. आपल्यात क्षमता आहे म्हणून तो परमेश्वर आपल्याकडून इतरांसाठी करून घेतो. जे योग्य वागलो त्याचं योग्य वेळी योग्य फळ मिळेल.  ते त्याच प्रकारे परत मिळेल अस नाही. सिम्पल. 

एक : समजायला सोपंय पण झेपायला वेळ लागेल. पण याच व्यक्तींना त्या आहेत तसं म्हटलेलं पण आवडत नाही. लगेच स्पष्टीकरण देतात. कबुल करावं आहेत तश्या स्वतः ला.

दोन : हेच म्हणतेय मी असच त्यांना पण झेपायला वेळ लागला असेल असं कशावरून नाही. त्यांना तेव्हा तुझ्या बाजूनी बोलू शकतो नाही याची खंत असेल असं पण असू शकत. चुकलच, खंत वाटतेय असा सहज कोणी सांगत किंवा कबुल होत नाही. तू झालीस तू होतेस आभार मान. त्यांचं मन त्यांना खात असेलच नक्कीच. 

पाच : Oh! Yes इसमें दम  है ।

तीन : सोड आता खंत बिंत. उडून गेला बघ तो भुंगा... लांबवर...  आपलं ठरलय ना, आनंदी जगायचं, मुक्तं जगायचं, मनात काही जड होईतोवर ठेवायचं नाही. म्हण "जग गेलं उडत, मी आनंदी आहे."

चार : खरंय ग ..

तीन : किती वाजले ? बाई ग दिड तास झाला ? मी पळते तुम्ही बसा. 

चार : जा जा. शब्दाला मान देऊन आलात धन्यवाद !

दोन : मारा ग हिला ... 

एक : मिठी मारत हसत हसत मी पण मारणारे थांबा. 

पाच : चल मी सोडते तुला जाताना. 

आणि नंतरच्या अडीच मिनिटात पाचही जणी गायब. स्वतःच्या विश्वात परत भिरभिरायला याच खात्रीनं कि 
अडकलाच पाय तर चौघी आहेत बाहेर काढायला. 
भुंगा काय कधीच उडून गेलेला दिसला का तुम्हाला ? हा ! हा! हा!
लगोरी उगाच नाव नाही ग्रुपचं!

गौरी पाठक 
१६ मे २०२५
९९७०१६८०१४


Wednesday, 23 April 2025

स्वछंदाचा मार्ग मोकळा !

 स्वछंदाचा मार्ग मोकळा !

विचारात पडलात ना ? मी सांगते स्वछंदाचा मार्ग मोकळा म्हणजे रजोनिवृत्ती , मेनोपॉज वगैरे वगैरे. मग काय तर ! हेच म्हणायचं योग्य आहे हे मी मागच्या काही महिन्यातल्या सहवासात आलेल्या प्रसंगावरून ठरवलं आहे. गेले काही महिने अनेक मत्रिणींत झालेल्या गप्पांवरुन निघालेला निष्कर्ष असा कि पाळी जाणं हा वयाचा टप्पा ही  गोष्ट स्त्रीने स्वछंदाचा मार्ग मोकळा अशा दृष्टीने घ्यायला हवा.  अवघड आहे पण जमेल आणि समजुन घेतल तरच समजेल.

एक (पीडित ) : तुला होतो का ग त्रास त्याचा.?
दोन (अनभिद्य) : कसला?
एक : मेनोपॉज चा ग ?
तीन (सकारात्मक ): त्रास का म्हणते ग ? पाळीत दर महिना काही ना काही असतंच कि, आता इतकी वर्ष झाली तो काय त्रास वाटून घेतलं का आपण. 
एक : ज्याला होतो त्यालाच समाजत. 
चार (समजूतदार) : अस नाही ग..  आम्ही पण बायकाच आहोत समजू शकतो, कि शरीरात ठराविक वयानंतर बदल होतात ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. 
एक : जे काही त्रास होतात उदाहरणार्थ फ्लो जास्त असतो, तो दहा दहा दिवस सुरु राहतो, पाय दुखतात, चिडचिड होते, घाम येत राहतो, जीव घाबरा होतो, मग असा होत असेल तर काय आनंद होणारे?
दोन: अरे बाप रे! सगळ्यांना होतो? 
तीन : होतो पण तो आपण थोडं विसरून लक्ष दुसरीकडे वेधून घालवू शकतो. हा बदल होणं म्हणजे आपलं निसर्गानं दिलेलं देणं कर्तव्यदक्षतेने पूर्ण करून आपण आराम करायचं स्वछंद जगायचं वळण आलं असं विचार कर. 
चार : बरोब्बर! आजवर ज्या पिशवीने लेकरू सांभाळली त्या संदर्भात काम केलं तीच काम संपत आल आहे तर तिला हि आतून त्रास होणारच ना? कल्पना करा कि तीच काम परिपूर्ण पणे करून झालय आता तिला आराम करायचा आहे. जस आपण ऑफिस मधून निवृत्त होताना त्रास होतो तसेच समजायचं. त्याला थोडे दिवस गेले कि ते सुरळीत होईलच. 
दोन : हे फार छान वाटलं. विचाराची दिशा आपण देऊ तशी शरीराची दशा.  आधीच्या काळी म्हणजे, आपल्या पणजी किंवा आजीच्या काळी  म्हणूनच चार दिवसात आराम करायला देत असावेत. तो आराम त्यांनी जोवर पाळी असेल तोवर केलेला असायचा म्हणून त्या पिढीला शेवटच्या रजोनिवृत्तीच्या वळणावर जड जात नसेल. 
तीन : असू शकत कारण आपल्या आजीच्या आईच्या तोंडी मेनोपॉज चा त्रास होतो अस कधी ऐकलं नाही बघा आपण. 
चार : आपली आई काकू यात कधी असेल तर कधी नसतील. पिढी बदलली, राहणीमान बदललं म्हणजे मला म्हणायचंय कि त्या चार दिवसात पण त्या कधी दमल्या बाजूला बसल्या असा नव्हतं. आपली पिढी तर कधीच चार दिवस आराम करत नाही तो करून आपलं कसं चालणार ? कदाचित पूर्वजांनी हि पद्धत स्वीकारण्यामागे हा हेतू असेल. 
तीन : खरंय आजीच्या काळात बायकांना कामचं इतकी असायची कि स्वतःकडे इतकं बघितलं जात नसेल. या वळणाचा विचार करायला ती मोकळीच नसेल, लग्न लवकर झाल्यानं तिची बाई म्हणून पुढची जबादारी आतापेक्षा आधीच गळ्यात आलेली असेल. 
एक : ते तेव्हाच झालं. आताच बोला ? जे होतंय ते गप गुमान सहन करायचं? का पण ? त्रास होतोय सांगायचं पण नाही?
तीन : अस नाही त्या त्रासावर उपाय आहेत ते करायचे, ते करताना स्वतःच मन आनंदी कस राहील ते वळण संपेल तोवर आपण कसे स्वतःवर ताबा ठेवू हे पाहायचं. 
पाच (संकुचित ): सांगायचं पण कसं ग? नको वाटतं. 
चार : स्वतःत कमीपणा घेत जगायचं मग शरीरावर निघत. मोकळ जगायचं ग सुंदरी. सगळ्यांनाच हेच होतं काही कमी काही जास्त. 
दोन : पण मग यातून मार्ग काय? 
चार : एक म्हणजे अश्यावेळी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, पौष्टिक खाणे, योग्य झोपणे, असा त्रास होत असलेल्या स्त्री ला "मला नाही बाई असा त्रास " असा धसका वाटेल असा बोलू नये, सर्वात महत्वचं म्हणजे व्यायाम करायचा नेमानं. 
एक : खरंच हे मात्र पटलं सगळ्या कामाला बायका आहेत. व्यायाम तरी नियमित केला जायला हवा. आय अग्री.
चार : नेहेमी पेक्षा खाण्याचं पण रात्रीच थोडं कमी करून झोपायचं. चिट डे असेलच पण बरंका. जे करू त्याचा बाऊ नको.
दोन : हो समजलं. 
तीन : मन मोकळं बोलयला सोयीची व्यक्ती शोधायची आणि नियमित डॉक्टरकडे तपासात आनंदी जगायचं. 
चार : हो खरंच ! नकारात्मक चर्चा जास्तीत जास्त टाळायची. हा आजार या वयात होतोच अस नाही वागायच. हा आजार नाही हे परिवर्तन आहे.
तीन : आपण जसे आहोत तसे स्वीकारायचं काय समजलं का?
पाच :  ?
चार : कालपरत्वे प्रजनन क्षमता कमी होत जाते तेव्हा शरीरातून बाकीची संप्रेरके सहकार्य करत असतातच. पेशींकडून शिकायला हवे त्यांच्या सारखं मदतीला धावून येणारे कोणी नाही. 
दोन : क्या बात है !
पाच : मस्तच!
तीन : गर्भाशयाच्या कामात घट झाल्याने होणारे बदल हे, जगण्यासाठी थेट आव्यश्यक नसले तरी हे गरजेचे आहेत. तेव्हा शांत मनानी स्वतःला शोधु, काळजी घेऊ आणि स्वछंदाचा मार्ग मोकळा होती तो पाहायला शिकू. 
दोन : येस मॅडम (हसत)
एक : हो, जेव्हा आराम करावा वाटेल तेव्हा करायचा, जेव्हा आनंदी वाटेल ते क्षण मात्र जगायचे. 
तीन : हो खरंच कारण या वळणावर पुढची जबाबदारी येतेच आहे हळूच ... तिला वेलकम करायचंय आनंदानी. जाताय कुठ नैतिक जबाबदारी संपत नाही.
चार : बाईचं आयुष्य सोप्प नाही पण स्वछंदाचा मार्ग मोकळा होताना मदत केली तर ते वळण  सहज सरेल. 
पाच : मस्तच. 
(सगळ्या पाचकडे हसुन बघत खळखळाट)
काय मग आहे कि नाही बरोबर? मी पण खूप विचार केलाय यावर. एक डॉक्टर, एक व्यवसाय करणारी, एक गृहिणी, एक एकटी पालक, दोन लेकराची आई, (आजी, पणजी शी पण बोलले) अश्या सगळ्या या वळणावरच्या भेटत गेल्या आणि मी उत्तरं शोधात गेले. थोडक्यात काय मन रिकामं होणं गरजेचं ना... तरच छान छान त्यात भरायला जागा होईल. 
चला काळजी घेऊ काळजी न करता... काय म्हणता? 
सौ. गौरी पाठक 
१४ मे २०२५

Monday, 21 April 2025

चोर पोलिस

चोरपोलिस
ती : अगं काल तू कुठे होतीस? सगळ्या भेटलो तुझी खूप आठवण झाली. 
मी : गावाकडे वास्तुशांत होती माहेरच्या शेजारी होत्या त्यांच्याकडे. . 
ती : अच्छा ! कशी झाली ? गावाकडचं वातावरण दोन दिवस मस्त गेले असतील. 
मी : खरंय! मुख्य शहर ते गाव प्रवास अनुभव मस्त होता. काही घ्याव अस आणि काही आपलं बरय रे बाबा असं होतं.
ती : भर उन्हाळ्यात विदर्भात गावी जायचं सोपं नाही. 
मी : मी त्यांच्या गावी प्रथमच गेले. फार जायची वेळ आलीच नाही कधी. एप्रिल चा उन्हाळा बघून आले. ४३-४५ डिग्रीच्या झळा अंगावर घेतल्या अनेक वर्षांनी.

पुण्यातल्या बस आणि गावातल्या एसटीतला जबरदस्त फरक बघून आले. महिलांच्या राखीव जागा पण पुरुष बसतात. दोन दोन तास दूर असल तरी अगदी सामान्य वर्गातली बाई आणि कलेक्टर ऑफिस ची बाई पण एसटीतूनच प्रवास करताना दिसली. मुंबईच्या मेकअपच्या बायका  आठवल्या या पण तश्याच आवरून मुख्य शहरात मीटिंग साठी जायला बसमध्ये होत्या. आधी मला वाटलं लग्नाच्या गडबडीत आहेत. त्यांना ते उकाड्यातलं बसनी ये जा नेहेमीच असावं. दोन तास उभं राहून एसटीतून जायची हि पहिलीच वेळ असेल माझी. विविध नमुने अनुभवले. कोणी निरखून पाहत होतं, तर कोणी डोळे मोठे करून. आपण शहरी लगेच ओळखू येतो. त्यात एका माणसांनी सहानुभूती दाखवली दोन सीटवर मला तिसरीला बूड टेकायला तरी जागा दिली. कान्हजी त्यांना सुखी ठेवो. आपण छान हसून बघितलं बोललो कि सगळं सहज होतं हे मला जाणवलं. 

किती का तापेना डोक्याला पंचा बांधून सायकलवर, दुकानात, एस टी स्टॅडवर शो मस्ट गो ऑन म्हणत काम करणारे दिसले. नेहमीपेक्षा वेगळ जग बघितलं. फरक काही नाही नैतिक जबाबदारीत अडकलेलेच सगळे जीव खर तर!

आपण कुठही गेलो तरी घरातल मोठ माणूस समोर बघितलं की छान वाटतं. तशीच आत्त्या सामोर आली.
पाणी द्या गss, चहा मांडा, पांघरूण दिल का सगळ्यांना?, झोप लागली का? अशा अनेक गोष्टी जातीन तपासणारी पिढी संपुष्टात येऊ लागलीय याची तीव्रतेने जाणीव झाली. आपल्या पिढीला ही दिसली पण पुढच्या पिढीला सगळ्यांना ही दिसेल का? हा प्रेमळ अनुभव त्यांना मिळेल का? मिळाला तर त्याची त्यांना कदर असेल का? अनेक प्रश्न समोर फिरत होते.
आपण कस असल पाहिजे याच्या चेकलीस्टमधे मनात नोंदी झाल्या.

मला आवडेल म्हणून चांगला वास असलेलं कढीपत्ता झाडाच रोप एकान आणलं, एकिन ते मातीत बांधून दिलं, नंतर पुढे एकीन जाईतोवर मोकळ करून ठेऊ म्हणत पाणी शिंपडलं, ते बघुन बाबांचे शब्द आठवले. आपल्यासाठी कणभर का होईना कोणी दिल ना तरी मणभर प्रेमान ते जपायच अस बाबा मला सांगायचे. गावाला अस देण्याची पद्धत असतेच ठाऊक आहे पण मी पण ते पुण्यापर्यंत जपलं. प्रत्येकात काही तरी चांगल शोधावं तस मी त्यात फक्त माया बघितली. बघु वाढत कस ते?

एक गोड अनुभव सांगते. पोचले तिकडच्या घरी एक लहान मुलगा आणि मुलगी होती. सगळे कामात व्यस्त होते. संध्याकाळी मी तेनाली रामा २ चा कालचा भाग फोनमध्ये बघू अश्या विचारानी  फोन हातात घेतला सोनीवर तेनाली ऊघडलं. ते एका लहानगीन बघितलं. ती मुलगी आनंदून म्हटली, "अरे काकू तेनाली रामा पाहतायत." मी म्हटलं, "हो मला आवडतंच ते." तर मला टाळी देत ती खुश होऊन म्हटली, "हो मी पण बघते काकू, आज बुडल आठ वाजत लागत ते." मी म्हटलं, "झालेलं पण पाहत येतं कि चल टीव्ही वर पाहू." पण नाही अस दिसत नाही बरोब्बर आठला ते दिसतं असा पटकन ती म्हटली. मग समजलं कि गावात केबल वर जुने एइपिसोड दिसत नाहीत. किती छान सवय होती वेळेत पाहायची. आपण शहरी लोक कालचे पण पाहू शकतो त्यामुळे वेळेची किंमतच नाही आपल्याला. ते लेकरू खूप आश्चर्यात विचारात होतं कि काकू तुमच्याकडे असं कधी पण दिसत का ? किती निरागस मन असतं लहान मुलांचं. मी पटकन म्हटलं,  "तुमचच बरय वेळ पाळून बघायचं."  तीच्या डोळ्यातली ती चमक वेगळीच होती. मला आनंद हा होता कि गावात असूनही ती तेनाली रामा बघायची आवड बाळगून होती. खूप खूप आनंद झाला. बाकीचे दोघे आमच्या भोवती घुटमळत होते. त्यांना काही इंटरेस्ट नसावा. त्यांना आश्चर्य हे होत कि शहरातली काकू पण बघते याचंच. मी म्हटलं, "ते मस्तच असतं" तर ती मुलगी काय म्हणावी त्यांना ठाउकें का ? सी आयडी सारखा जुन्या काळी  चतुर म्हणून ओळखले जायचे तेनाली रामा. हे ऐकून तर मला आनंद झालाच कि इतक्या खेडेगावात राहून पण इतकी माहिती असून हे लहान लेकरू त्यात इंटरेस्ट दाखवत त्याच महत्व तिच्या बरोबरीच्यांना सांगत होतं. पुढच्या पिढीला हे माहित आहे, ते पण गावातल्या हे बघून मन भरून आलं.  दुसरी म्हणाली, "ठीके आता ते उद्या बघ ग." आणि  मला म्हणाली, "चार जण लागतात चोर पोलीस खेळायला, काकू तुम्ही आमच्या बरोबर खेळता का?" मी म्हटलं, "इकडे लपायची जागा मला माहित नाही ग?" मला झपकन लहानपण आठवलं. वयानी काय वेळ आणली चोर पोलीसला नाही म्हणतोय आपण जरा हसू आलंच. तर मला म्हणते कि "अहो काकू कागदातला चोर पोलीस खेळायचं." " ते कसं ? मला माहित नाही ग." मी बाळबोधपणे विचारलं. मला खूप हसल्या दोघी. मला त्यांना बघुन भारी वाटलं. हो शहरात हे खेळत नाहीत ? मला काय ठाऊक खेळाच नाव वेगळय, पण हरकत नाही ही माघार घेण आवडलं मला. मी म्हटलं शहरातले काहीही शिकायला केव्हाही तयार असतात. शिकवलं तर खेळेन. मस्त शिकवणी झाली आणि तासभर खेळ झाला. तो तास बालपणात रमून गेले मी. चिठ्ठी घेतानाच आनंद, चिठ्ठ्या फ़ेकतानाचा आनंद मनमुराद घेतला. कार्यक्रम काय होता हे मला तेव्हा महत्वाचं नव्हतं. आला क्षण आनंदी जगायचं, हे मी नुसतं म्हणत नव्हते तर तो जगत होते. खेळताना केलेला डॅंबिसपणा ती खुणवाखुणवी मला समजत होती. पण ती पण माझ लहापण आठवून गेली. मुख्य शहरापासून लांबच्या गावातल्या अशा मुलांना जवळून पाहता आलं. काय सुरेख योग होता. ज्या कामासाठी मी गावाला गेले होते ते झालच होतं. पण तेनाली रामा आवडतं अशी एक छोटुशी मैत्रीण पण मिळाली होती. चार लहानांत लहान होऊन मला खेळता आलं. मस्त वाटलं. 

दुसऱ्या दिवशी रिक्षा बोलावली होती मी निघाले होते. रिक्षातून ती मला दिसली. मला न समजताच मी तीला पटकन टाटा केला. तिनी पण तितक्याच आपुलकीनं चाललात काकू ? अशा म्हणत हात वर हलवत  टाटा केला, सायंकावरून थांबत. किती क्षणिक भेट पण मला ती जवळची वाटून गेली. त्या चारही लेकरांना कान्हजी भरभरून प्रेम देतो आणि योग्य मार्ग दाखवित हीच मनापासून इच्छा !

याच टीमला काल संध्याकाळी भातुकली खेळताना मी दुरून पाहत होते. मला माझी लहानपणची जिन्यातली भातुकली आठवली. आजकाल शहरात भातुकली खेळ दिसतच नाही. इकडे तो बघून मनातला एक कप्पा उघडला होताच तो निघताना परत आणखी आठवणींनी भरून बंद केला आणि परत आले. 

सगळ्यात आनंददायक गोष्ट ही वाटली की त्यांना मला खेळायला बोलवावं वाटलं. भले घरात गडबड केली म्हणून काकुला विचार खेळते का? अस ही असेल. मला माहित नाही पण त्यांना मी खेळायला चालणार होते चौथी सवंगडी म्हणून याचा मला फार आनंद झाला.

ती :  खरच तु खुप छान अनुभवलस. जे दिसेल ते वेगळ्या नजरेनं पाहायला तु शिकवलस. 
मी : धन्यवाद सुंदरी!  खर सांगू तशा खुप गोष्टी बघितल्या पण मांडून ठेवण्यासारख मात्र मांडलच. तुझ्यामुळे त्याला व्यक्त रूप आलं हे छान झालं. माझही मन हलकं झालं.
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
२१ एप्रिल २०२५