Sunday, 14 June 2026

पुण्यातील पेशवेकालीन २१ गणपती


ॐ श्री गणेशाय नमः 
पेशवेकालीन गणपती कोणते? ते कुठे आहेत? काय इतिहास आहे? असे प्रश्न लेक विचारत होता. यावर एक शोध घेतला. यंदाच्या १७ मे २०२६ च्या अधिक महिन्याच अवचित्त साधून यांच दर्शनास प्रारंभ करू. जसे योग आणतील बाप्पा तसे होतील. ही आमच्या मनातली इच्छा त्या गणरायानच पुरी करून घेतली. 

१) मातीचा गणपती
२) मोदी गणपती
) श्रीमंत पेशवे गणेश मंदिर
४) चिमण्या गणपती मंदिर
५) भिकारदास मारूती गणपती मंदिर
६) अमृतेश्वर सिद्धेश्वर गणपती देऊळ 
७) गणेश मंदिर चतुश्रृंगी देवी टेकडी
८) श्री पार्वतीनंदन देवस्थान 
९) वरद गुपचुप गणपती
१०) केदारेश्वर गणपती 
११) गुंडाचा गणपती
१२) त्रिशुंड गणपती
१३) जुन्या जाईचा गणपती
१४) लक्ष्मी-नरसिंह गणपती

१) गणपती चे नाव : मातीचा गणपती 
पत्ता : नारायण पेठ 
माहिती : ही मूर्ती शाडूच्या मातीपासून बनलेली अत्यंत दुर्मिळ अशी प्राचीन मुती आहे चार फूट उंच व दोन अडीच फुट रुद असलेली ही मुर्ती पूर्वी मातीचीच राहिल्याने हिला मातीचा गणपती महटले जाते. लोक माती गणपती असा चुकीचा उल्लेख करतात. या मंदिराचा इतिहास १७४० च्या सुमारास, म्हणजेच पेशवे काळातील मानला जातो. काही ठिकाणी या मुर्तीला स्वयंभू मानले जाते. पूर्वी येथे जुना वाडा होता, जिथे मोरया गोसावीनी ही मुर्ती घडवली असल्याची आख्यायिका आहे. मंदिरासमोर आवारात दगडी दीपमाळ आजही पाहता येते पूर्वी या मंदिराचे आवार प्रशस्त असल्याची ती खूण आहे. सभामंडपात शिवलिंग आणि विष्णुमूर्ती आहे. गणराय इथे चर्तुभुज स्वरुपात आहेत.
फोटो :

२) गणपती चे नाव : मोदी गणपती
पत्ता :   नारायण पेठ 
माहिती :  पुण्यातील नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिर हे सुमारे २०० वर्षांहून अधिक जुने असून, १८००-१८११ च्या सुमारास पेशवे काळातील हा गणपती जागृत मानला जातो. सुश्रूशेठ मोदी, जे पेशवे काळात दुभाषी होते, त्यांच्या नारायण पेठेतील बागेत जमिनीतून ही मूर्ती सापडली, म्हणून याला 'मोदी गणपती म्हटले जाते. रत्नागिरीचे भट नंतर पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी हे मंदिर बांधले. सर्वप्रथम गाभारा आणि कळस बांधण्यात आले. लाकडी मंडप नंतर १८६८ मध्ये बांधण्यात आला येथील लाकडी कोरीवकाम उत्कृष्ट असून त्यामुळे मंदिराला एक उबदार आणि प्रसन्न अनुभव येतो. पेशवेकालीन मंदिरांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना मोदी गणपती मंदिर.
फोटो :

) गणपती चे नाव : श्रीमंत पेशवे गणेश मंदिर
पत्ता :   शनिवार वाडा 
माहिती :  पेशवेकालीन गणपती मंदिर ते पुण्यातील शनिवारवाड्याच्या पूर्वेकडील बाजूस आहे. ऐतिहासिकदृष्ट्‌या पेशवे, विशेषतः बाळाजी बाजीराव, गणपतीला अत्यंत पूजनीय मानत असत. किल्ल्याचा गणेश दरवाजा याच भागाकडे जातो, ज्याचा गणेश रंगमहालाशी जवळचा संबंध होता. गर्दीच्या रस्त्याच्या कडेला असूनही भगवान गणेशाची स्वयंभू लाल मूर्ती गर्भगृहाला एक गहन आध्यात्मिक वलय प्रदान करते.
फोटो :  : 

४) गणपती चे नाव : चिमण्या गणपती मंदिर
पत्ता :  सदाशिव पेठ 
माहिती : ऐतिहासिकदृष्ट्या, ही मुर्ती एका खुल्या, मोकळया चौथऱ्यावर स्थापित होती. देवतेसाठी दररोज अर्पण केल्या जाणाऱ्या धार्मिक वस्तू विशेषतः अक्षता (पवित्र तांदळाचे दाणे) यामुळे चिमण्यांचे थवे त्या ठिकाणी आकर्षित होत असत आणि त्यातूनच हे लोकप्रिय नाव पडले. १९५० च्या दशकापर्यंत, या देवस्थानात कोणत्याही औपचारिक रचनेऐवजी केवळ एका खुल्या चौधन्यावर ठेवलेली गणेशाची मुर्ती होती, आज, त्या जागी एक औपचारिक मंदिराची वास्तू उभी आहे.
फोटो : 

५) गणपती चे नाव : भिकारदास मारूती गणपती मंदिर
पत्ता :   सदाशिव पेठ
माहिती :  हे देऊळ सुमारे २०० वर्ष जुने ऐतिहासिक देऊळ आहे. १८१८ च्या सुमारास गुजराती समाजातील एक सधन सराफ 'भिकारदास' यांनी बांधले होते. हे दररोज शेकडो गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करत असत. त्यांच्या या समाजोपयोगी आणि परोपकारी कार्यामुळेच या मंदिराला 'भिकारदास मारुती' असे नाव पडले. मंदिराच्या परिसरात एकेकाळी माळी वस्ती आणि मोठी बाग होती.
फोटो : 
 

६) गणपती चे नाव : अमृतेश्वर सिद्धेश्वर गणपती देऊळ 
पत्ता :  शनिवारपेठ
माहिती :  अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिरे ही पुण्यातील शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठावर ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या १८ व्या शतकातील, पेशवाकालीन मंदिर संकुलाचा भाग आहेत. अ‌द्वितीय गणपती मूर्ती कलात्मक दगडी स्थापत्यकला आणि ऐतिहासिक शनिवारवाडा परिसराशी असलेले सान्निध्य ही येथील प्रमुख वैशिष्टये आहेत. अमृतेश्वर मंदिर १७८ मध्ये बांधण्यात आले आणि ते भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिराचे तोड पश्चिमेकडे आहे आणि त्यात एक भूमिगत गर्भगृह आहे. शिवाचे वाहन असलेल्या बैलाची दगडी मूर्ती आणि कळस असलेली मंडप नावाची एक ओसरीसारखी रचना, या दोन्ही गोष्टी आजही मंदिराच्या आत आहेत. भूमिगत गर्भगृहात कोरीव खांब असलेली एक लहान कमान आहे. १८२३ मध्ये, ज्या जमिनीवर अमृतेश्वर तिमेश्वर मंदिर परिसर वसलेला आहे. शिवाजी महाराजांच्या दरबारातील जवळचे नातेवाईक असलेले चित्राव घराणे यांना ती जमीन  देण्यात आली होती, जे पिढ्यानपिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्या काम करत होते. शनिवार पेठेच्या अरूंद गल्ल्यामध्ये, मुठा नदीच्या शांत काठावर अमृतेश्वर-सिदेशवर मंदिर १८२३ मध्ये गानो बाबाजी चित्राव यांनी राम मंदिराचे बांधकाम सुरू केले. यानंतर, १७३८ मध्ये पेशव्याच्या दरबारातील एक सरदर अबुजी नाईक बारामतीकर यांनी सिद्देश्वर मंदिर बांधले. हे मंदिर नागर आणि पर्शियन प्रभावासह मराठा शैलीत बांधलेले आहे. अबूजी नाईक यांनी आपल्या गुरुंची भक्ती सिद्ध करण्यासाठी त्यांच्या भुमीवर गुरुः दक्षिणा म्हणून हे सादर अर्पण केले होते. त्यामुळे हे या संकुलाचे एक विशेष वैशिष्ट्य ठरले. वास्तुकता क्या संमपरसा आणि गहरी लवचिकतेची एक बहुस्तरीय कथा आहे. हे संकुल शहराचा मध्ययुगीन भूतकाळ आणि मराठा वैभव याच्यातील दुवा साधते. त्याची मध्य रचना सत्ता आश्रय आणि भक्तीच्या कथा सांगते.
फोटो :  
 

७) गणपती चे नाव : गणेश मंदिर 
पत्ता :  चतुश्रृंगी देवी टेकडी
माहिती :  पेशवे काळात पुण्यात दुर्लभशेठ पितांबरदास महाजन नावाचे एक मोठे आणि श्रीमंत सावकार राहत होते. ते नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. नियमितपणे वणीला जाणे त्यांना उतारवयात शक्य होत नव्हते, त्यामुळे ते अत्यंत दुःखी असायचे. त्यांना देवीचा दृष्टांत झाला आणि ऊत्खलनात मूर्ती सापडली. तिकडेच त्यानंतर त्यांनी इ.स. १७८६ मध्ये तिथे एका भव्य मंदिराची स्थापना केली. सुमारे १७० हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. या टेकडीवर मुख्य देवीसोबतच भगवान गणेश आणि दुर्गामातेची मंदिरेही आहेत. गणपतीचा फोटो काढण्यास मनाई आहे.
फोटो : 

८) गणपती चे नाव : श्री पार्वतीनंदन देवस्थान 
पत्ता :  गणेशखिंड
माहिती :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि राजमाता जिजाबाई यांच्याशी संबंधित ऐतिहासिक वारसा आहे. अंदाजे ४०० वर्ष जुने हे देऊळ अतिशय रम्य आणि शांत आहे.  हा गणपती म्हणजे गावाची रक्षकदेवता मानली जात होती. पाषाणमध्ये शिवरामभट चित्राव हे सिद्धपुरुष राहात होते. त्यांच्या नजरेस मंदिराची जीर्णावस्था आली. त्यांनी मंदिराची डागडुजी केली. शिवरामभटांच्या विनंतीवरून श्रीमंत नानासाहेबांनी ते सरकार जमा करून घेतले. चित्राव यांना याची सेवा सोपवण्यात आली असा उल्लेख आहे.
फोटो : 
 

९) गणपती चे नाव : वरद गुपचुप गणपती
पत्ता :  शनिवार पेठ 
माहिती :  वरद गुपचूप गणपती मंदिर अनन्यसाधारण इतिहासाचे साक्षीदार ठरले आहे. लोकमान्य टिळक, न. चि. केळकर यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती येथे नियमित येत असत, असे सांगितले जाते. १९ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या देवस्थानाला वरदविनायक किंवा गुपचूप गणपती असेही म्हटले जाते. या देवळाच्या प्रवेशद्वारावर दक्षिणाभिमुख नगारखाना आहे. प्रशस्त प्रांगणात डाव्या बाजूला उत्तराभिमुख सभामंडप आणि गर्भगृह आहे, तर उजव्या बाजूला मोठी ओसरी आणि त्याला लागूनच दीक्षित कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. गर्भगृहातील गणपतीची मूर्ती मूळ काळ्या पाषाणाची आहे. त्याला शेंदूर लेपाने आकार देण्यात आला आहे. डाव्या सोंडीचे, चतुर्भुज आणि मांडी घातलेले गणेशाचे हे रूप तीन फूट उंच मूर्तीत प्रकट झाले आहे. गर्भगृहाच्या मागे शमीचे मोठे झाड असून तेही मंदिराएवढेच जुने असल्याची मान्यता आहे. येथील शंकूच्या आकाराचे ३० फूट उंचीचे शिखर सुंदर रंगवलेले आहे.
फोटो : 

१०) गणपती चे नाव : केदारेश्वर गणपती 
पत्ता :  कसबा पेठ
माहिती :  हे देऊळ बरोबर कसबा गणपतीच्या मागे आहे, हे अत्यंत प्राचीन (सुमारे ९०० वर्षे जुने) मंदिर असून येथे भगवान शिव (केदारेश्वर) यांची पूजा केली जाते. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर श्रीगणेशाची मूर्ती देखील कोरलेली आहे. पेशवेकाळात १७३० च्या सुमारास सध्याच्या मंदिराची उभारणी झाली.
फोटो : 

११) गणपती चे नाव : गुंडाचा गणपती
पत्ता :  कसबा पेठ 
माहिती :  पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस  यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती‘ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे. हत्तीचे शिर मानवी शरीरावर ठेवल्यावर तंतोतंत दिसेल अशी ही मूर्ती आहे. हत्तीच्या शिरोभागातील गंडस्थळे, मोठे कान आणि प्रशस्तपणा या मूर्तीमध्ये पूर्णपणे उतरला आहे. सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे. नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते.
आम्हा दोघांना तर हा बाप्पा मिश्कीलपणे हसून पाहतोय असच वाटत होतं. खरच प्रसन्न हसरी मुद्रा मनात आतवर आनंद देणारी मूर्ती.
फोटो : 
  

१२) गणपती चे नाव : त्रिशुंड गणपती
पत्ता :  कसबा पेठ
माहिती :  हे सोमवार पेठेतील एक ऐतिहासिक आणि अद्वितीय देऊळ पेशवेकालीन असून ते २६८ वर्षे जुने आहे. बाप्पाची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. या मूर्तीला तीन सोंड (त्रिशुंड), सहा हात आहेत आणि बाप्पा मोरावर बसलेले आहेत. या देवळाच्या एक तळघर आहे, जे वर्षातून फक्त एकदा गुरुपौर्णिमेला भाविकांसाठी उघडले जाते. तळघराचे वैशिष्ट्य: मुख्य मूर्तीवर केलेला जलाभिषेक थेट खाली तळघरात असलेल्या समाधीवर पडतो. मंदिराच्या तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज (दलपतगिरी गोसावी) यांची समाधी आहे. 
फोटो : 
  

१३) गणपती चे नाव :  जुन्या जाईचा गणपती
पत्ता :  शुक्रवार पेठ 
माहिती :  या गणपतीचा इतिहास पेशवे काळाशी जोडलेला आहे.  हा पुण्याच्या जुन्या पेठांमधील एक महत्त्वाचा आणि श्रद्धास्थान असलेला गणपती मानला जातो. अशी आख्यायिका आहे की, पूर्वीच्या काळी या मंदिराच्या परिसरात किंवा मूर्तीवर जाईच्या फुलांचा  भरपूर वापर होत असे, किंवा ती जागा जाईच्या वेलींनी वेढलेली होती. म्हणून नाव पडलं. राजा दिनकर केळकर म्युझियम च्या अगदी जवळ हे आहे.
फोटो: 
१४) गणपती चे नाव :  लक्ष्मी-नरसिंह गणपती
पत्ता :  सदाशिव पेठ 
माहिती : हे देऊळ सुस्थितीत, आकर्षक, सुंदर असून जुन्या काळाची जादू आणि वातावरण निर्माण करते. त्या काळात पुण्यात बांधल्या गेलेल्या पारंपरिक वास्तूंबद्दल हे मंदिर बरेच काही सांगते. हे मंदिर इ.स. १७७४ मध्ये बांधले गेले असून ते जवळपास २५० वर्षे जुने आहे. सुरुवातीच्या क्रांतिकारकांपैकी एक असलेले वासुदेव बळवंत फडके १८६५ पासून काही वर्षे या मंदिराच्या परिसरात राहिले होते. त्यामुळे या मंदिराला स्वतःचा असा एक इतिहास लाभला आहे. या देवळाला वासुदेव फडकें यांचा सहवास लाभलेला आहे. सदाशिव पेठ नाव येण्याआधीच हे देऊळ आहे. गणेश भट्ट जोशींना चालवण्यास पेशव्यांनी हे दिले. दृष्टांत झाल्याप्रमाणे काशीला गेल्यावर रमणा भागात ज्याला तेव्हा निवडुंगाच बन म्हणत तिकडे ती सापडली‌ अडीच फुट ऊंचीची पद्मासनातली ती आहे. गणपतीच पांढरी मूर्ती खुप सुबक आहेच तशीच आकर्षक आणि नीट निरखून पाहिले तर प्रभावी पण आहे.
फोटो : 

१५) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती
फोटो :

१६) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती 
फोटो :

१७) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती 
फोटो :

१८) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती 
फोटो :

१९) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती 
फोटो :

२०) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती 
फोटो :

२१) गणपती चे नाव :  
पत्ता :  
माहिती 
फोटो :






______________________


शोध लागलेले गणपती आणि पत्ते 
कसबा गणपती : कसबा पेठ
पार्वतीनंदन गणपती : गणेश खिंड 
चतुश्रृंगी देऊळ गणपती : गणेश खिंड 
दशभुजा गणपती : कोथरूड 
फडके गणपती : सिंहगड रोड राजाराम पूलाजवळ
वडाचा गणपती : दत्तवाडी बाबुराव फुले बागेजवळ घरकुल सोसायटी सिंहगड रोड 
७ सारसबाग गणपती : 
८ नवलोबा / नर्मदेश्वर देऊळ गणपती : सारसबागेसमोरच्या तीन देवी देवळा शेजारी 
९ रमणा गणपती : पर्वती पायथा, लक्ष्मीनगर जवळ
१० पर्वती देवस्थान गणपती
११ भिकारदास मारुती देऊळ गणपती : महाराणा प्रताप बागेमागे बाजीराव रोड
१२ लक्ष्मी नरसिंह देऊळ गणपती : खजिना विहिरचौका जवळ
१३ जुन्या जाईचा गणपती : शुक्रवार पेठ, राजा दिनकर केळकर म्युझियम जवळ
१४ चिमण्या गणपती : सदाशिव पेठ सुजाता मस्तानी जवळ
१५ जोहारी महादेव देऊळ गणपती : 
१६ मातीचा गणपती : 
नारायण पेठ
१७ मोदी गणपती : 
नारायण पेठ
१८ पावसकर गणपती : 
नारायण पेठ केळकर रोड जवळ लोखंडे तालिमीच्या मागे
१९ हरिहरेश्वर देऊळ गणपती :

२० अमृतेश्वर देऊळ गणपती : शनिवार वाड्याजवळ
२१ सिद्धेश्वर देऊळ गणपती : मनपा पुलाच्या शेवटच्या टोकावर
२२ अष्टभुजा नवदुर्गा देऊळ गणपती : नारायण पेठ पोलीस चौकी जवळ नदीकिनारी 
२३ ओंकारेश्वर देवस्थान गणपती : 
२४ वृद्धेश्वर देवस्थान गणपती : 
काँग्रेस भवन समोर सावरकर भवन शेजारी  
२५ निळकंठेश्वर देऊळ गणपती : सोमवार पेठ/ 
मुजुमदार वाडा
२६ पेशवे गणपती : 
शनिवार वाड्याबाहेर लालमहाल समोर
२७ केदारेश्वर देवस्थान गणपती : 
कसबा  गणपतीच्या बरोब्बर मागे 
२८ दशभुजा वल्लभेश्व गणपती  / फडकेवाडा गणपती : 
केदारेश्वर देवळाजवळ कसबापेठेतल्या -  रविवार पेठ
२९ गुंडाचा गणपती  : कसबा गणपतीच्या मागची गल्ली
३० फडके महादेव देऊळ गणपती 
३१ नागेश्वर देऊळ गणपती : 
त्रिशुंड गणपतीच्या अगदी जवळ 
३२ त्रिशुंड गणपती :
३३ लक्ष्मेश्वर देऊळ गणपती : 
केईएम हॉस्पिटल जवळ मुदलियार रोड 
३४ डुल्या मारुती देऊळ गणपती : नागझरीजवळचा : अल्पना टाॅकिज
३५ डुल्या मारुती जवळचा  गणपती : 
शीतळा  देवी चौकात  नानापेठ 
३६ सोमेश्वर देऊळ गणपती : 
रविवार  पेठ 
३७ काळी जोगेश्वरी देऊळ गणपती : 
दत्ताच्या देवळाजवळ बाबू गेनू चॊकातल्या 
३८ रामेश्वर देऊळ गणपती : 
खासगीवाले लिमये मंडई मधील स्वामी मठा समोर शिवाजी रोड 
३९ तुळशीबाग देवस्थान गणपती देवळा जवळ : 
तुळशीबाग राम मंदिराच्या शेजारीच देऊळतला
४० महादेव देवळातला गणपती :गणपती चौक सकाळ प्रेस गल्ली 
समाप्त ......

No comments:

Post a Comment