यंदाच्या नवरात्रीत मी माझ्या रोजच्या बघण्यातील स्वाभिमानी कष्टकरून पायावर उभ्या अशा महिलांचा विचार करून ठरवल की यांचीच ओटी भरायची. यातील प्रत्येक स्त्री शक्ती आपापल नियतीन समोर आणलेल काम किंवा कर्मानुसार समोर असलेल काम किंवा स्वतः च्या क्षमतेवर जे शक्य आहे ते स्वतः आणि परिवारास अर्थाजन म्हणून करताना बघत आलेय. प्रत्येकीच्या कामाची कला क्षमता वेगवेगळी आहे. ती कामं करतानाचा प्रत्येकीचा दृष्टिकोन आणि समोर येतील त्यांच्या बरोबरची कामाबद्दलची देवाणघेवाण विचार पद्धत तितकीच वेगळी आहे.
मनातल माझ्या.......
सर्व हक्क राखीव आहेत.© गौरी पाठक
Thursday, 15 October 2026
नवशक्ती कृतज्ञता २०२६
यंदाच्या नवरात्रीत मी माझ्या रोजच्या बघण्यातील स्वाभिमानी कष्टकरून पायावर उभ्या अशा महिलांचा विचार करून ठरवल की यांचीच ओटी भरायची. यातील प्रत्येक स्त्री शक्ती आपापल नियतीन समोर आणलेल काम किंवा कर्मानुसार समोर असलेल काम किंवा स्वतः च्या क्षमतेवर जे शक्य आहे ते स्वतः आणि परिवारास अर्थाजन म्हणून करताना बघत आलेय. प्रत्येकीच्या कामाची कला क्षमता वेगवेगळी आहे. ती कामं करतानाचा प्रत्येकीचा दृष्टिकोन आणि समोर येतील त्यांच्या बरोबरची कामाबद्दलची देवाणघेवाण विचार पद्धत तितकीच वेगळी आहे.
Jai Radhe Jai Krishna Jai Vrindavan: कमल नेत्र स्तोत्र - Kamal Netra Stotra
Wednesday, 30 September 2026
लोणावळ्यातला मनांचा मेळावा ..
आज अचानक एक सोलो ट्रिप चा योग आला. म्हटलं बघू जाऊन काय अनुभव येतो ते. बस नि प्रवास करताना पहिला तास सगळेच चुपचाप पण नंतर आपोआपच नाश्ता करताना ओळख करून बोलायला लागले. तिथूनच एक तरुण ग्रुप फोटो रील ला भिडला. मला पण खूप आवडत फोटो काढायला काढून घ्यायला. एक गट असा होता तर एक तसा .. अनोळखी असे चार पाच गट दिसले, मला खाद्य मिळालं व्यक्ती वाचनाचं. मस्त दिवसभराच्या चर्चांचा हा आढावा, ऐका तर मग...
Sunday, 13 September 2026
पंचमहाभूते महादेव यात्रा
Monday, 24 August 2026
प्राक्तन
प्राक्तन
प्राक्तनात आपण काय काय बघणार आहोत ते आहे. लिहताना वाचताना जितका अवघड शब्द तितकच अवघड त्याचा अर्थ, भवितव्य साठवणारा. आठवडा झाला मनात हा शब्द कुठतरी करवतीच्या पात्यानं लाकूड कापल्या सारखा कुरतडतोय.
आषाढी एकादशीला भगवान विष्णूंकडून भगवान महादेवाकडे सूत्र सोपवली गेली तोच हा दिवस. पहाटेपासूनच मन प्रसन्न होतं. सोमेश्वर देवळातला एकेक कोपरा अनुभवताना मधेच माहेरचा जुना वाडा आई बाबा सवंगडी आठवत होते. तितक्यात एका मोलाच्या सवंगड्याचा निरोप आला, "काळानं वेळ गाठली गं, आई गेली रूपाली".... आषढीत गुंतलेल मन वार्याच्या वेगानं वैकुंठ गमनास निघालेल्या त्या स्त्री तत्वाकडे भिरभिरू लागलं. का धावले मी? ओढ होती ती, बंध होते ते... आपण आपल्या आयुष्यातली विविध स्वभावांतले आयुष्यातले हेलकावे खात झगडत जगलेली व्यक्ती जेव्हा आता दिसणार नाही समजत तेव्हा काळीज थरथरतं. माणूस किती स्वार्थी नाही का हो? बरेच कंगोरे आहेत या वाक्याला.
आपण आपल्या मांसाचा गोळा जन्माला आला की तो लुसलुशीत जणुकाही परमेश्वराचा स्पर्श अनुभवतो ती आईपणाची भावना तत्क्षणी त्या मातेच्या आणि त्या लेकराच्या मनात आत आत नोंद होते. कालांतरान तीच भावना ऊतार वयातल्या आईच्या स्पर्शात जाणवते. हो हे मी अनुभवलय अनेकदा... हीच भावना आता एखाद माणूस कधीही अनुभवणार नाही ही नुसती कल्पनाच भयाण...
काळावर औषध नसतं, जो येतो तो जातोच, शरीर संपतं आत्मा तोच अनंत आहे. सगळ मान्य असलेली मी त्या सवंगड्यास समजवताना तोकडी पडले. "कालच भेटले ग संध्याकाळी तेव्हा पण माझीच काळजी होती तीला..". "लवकर जा, पाऊस जोरात आहे, रीक्षा मिळणार नाही." आपल्या पहिल्या श्वासापासून तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी आईच! हे वाक्य खणखणीत जगत होते मी आज..
सलग काही वर्षे आम्ही तिघी मैत्रिणी आपल्या काळातले दिवस आठवणी ऊजागर कशा राहतील हे पाहण्यासाठी मातृदिनाच्या निमित्ताने तीघींच्या आई वडिलांना एकत्र घेऊन भेटत असल्याने आमची मे महिन्यात नुकतीच भेट झाली होती. नैतिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माणूस किती पुरा पडणार.. पण तरी कुरकुरत न जगता मार्ग काढणे, जमेल तस जेवढ्यांना भेटता येईल तस भेटण हाच ऊत्तम पर्याय आहे.
जसे माझे बाबा गेल्यापासून जवळपास वर्षभर माझ्या चालू घडामोडीबरोबरच त्यांच्या बरोबरच्या घडामोडी सतत मनात होत्या. तसच गेल्या १२ दिवसांत मी आमच्या तिघींच्या तसेच घरच्यांबरोबरच्या, लहानपणच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात होता.
भावनांचा कल्लोळ मनात माजला की तो पेनाचा पूल करून पानावर घ्यायचा म्हणजे मग मी वर्तमानात नीट जगू शकते. हे मला समजलय.
आमच्या आधीची पिढी... अनंत गोष्टी शिकवल्या, मनावर बिंबवल्या आमच्या मनावर.. कोटी कोटी धन्यवाद तर आहेतच पण अखंड ठणठणीत सहवास लाभावा हीच इच्छा आहे. ही खर तर स्वार्थी ईच्छा आहे पण ती पोकळी भरण्याच सामर्थ्य आमच्यात कमी आहे. कोणी काही म्हटल तरी जगाची रीत आई बापाशिवाय माहेरात जीव नाही. म्हणून ही वाक्यं के. बी. निकुंब यांची कोणाच्याही मनास भिडतीलच .. वादच नाही.. "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, ..."
भावनाशीलता, सहनशीलता, चिकाटी, ध्यास असे अनेक गुण आम्हाला आमच्या आईकडून मिळाले. आम्ही भाग्यवान आहोत. पुरेपूर प्रमाणात आम्ही ते पुढच्या पिढीला देण्यासाठी रीते होतच आहोत...
ऊद्या तेरावा दिवस... काकूंना माझा मनापासून नमस्कार ... तुमच्या कडून शिकलेली तीळाची वडी आणि ऊकडीचे मोदक करताना तुमची अखंड आठवण येत राहील...
परमेश्वर सवंगड्यास धैर्य शक्ती प्रदान करोत आणि सर्व नीट पार पडो. माझा ऊद्या योग नाही.
सळसळती तरुणाई
माझ्या कामाच्या प्रवासात अनेक प्रकारच्या प्रशिक्षणार्थींशी माझा संबंध आला. या काळात वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये झालेले बदल मी जवळून पाहिले आहेत. या प्रशिक्षणार्थींचे वय जवळपास २३ किंवा २४ वर्षांचे असते. ऑफिसमध्ये कसे वागावे, कसे बोलावे, कसे बसावे, कामाच्या ठिकाणी कोणत्या गोष्टी करायला हव्यात, तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी हे प्रशिक्षणार्थी येतात. ते येण्याआधीच त्यांचा अंदाज मला येऊ लागतो. अर्ज पाठवण्यापासून ते मुलाखतीला येण्यापर्यंतची त्यांची पद्धत, त्या वेळची देहबोली, प्रत्येक विभागाचे काम समजून घेण्याची त्यांची उत्सुकता या सगळ्या गोष्टी अनुभवातून समजायला लागतात. काळानुसार या मंडळींमध्ये झालेले आमूलाग्र बदल पाहून आज मला लिहावेसे वाटले. का? ते लवकरच समजेल.
मला यांची तक्रार अजिबात करायची नाहीये; पण यांचं वागणं काही केल्या पचनीही पडत नाहीये. कॉर्पोरेट जगतात असेच मातीचे गोळे गेले तर इमारत कशी उभी राहील? आणि उभी राहिलीच, तरी ती किती काळ टिकेल? खरं तर हे वाक्य माझ्या एका सहकाऱ्याने यापूर्वीही मला सांगितलं होतं; पण आजच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने पटतोय.
कोरोनाच्या काळात योग्य आणि सक्षम शिक्षक न लाभल्यामुळे अर्थात परिस्थतीमुळेच कदाचित यांच्यावर ही वेळ आली असावी. हरकत नाही. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, काम करण्याच्या पद्धती बदलतात. पण यात नुकसान कोणाचे आहे?
Tuesday, 18 August 2026
परंपरा, पिढ्या आणि परमात्मा
Tradition, Generations & The Divine
I deeply respect Indian traditions and the wisdom passed down through generations. I believe traditions should not be imposed on the next generation as rules, but understood, experienced, and embraced with meaning. Customs may evolve with time, but the values, ethics and संस्कार at their core should remain.
I also feel fortunate to have had an environment that supported me in practising many of these traditions. And if we can pass on even a little of that wisdom and positivity to the next generation, why not?
Today, I wondered: when we have the opportunity to spread positive thoughts and good energy, shouldn’t we choose to do so?
I am quite sure that there are people who think about me behind my back, perhaps saying, “It is easy to give advice to others; when the same situation happens to her, she will understand. We are here to see” like that. I have had enough amusing experiences to know that such opinions exist—and they probably always will. Honestly, though, they do not bother me.
There are all kinds of people and personalities in society, each with their own way of thinking. We have to learn to live with different perspectives. Their circumstances may have shaped the way they think, and I understand that.
But sometimes, I find myself wondering about one thing. If, for whatever reason, a person is unable to make a positive contribution, that is understandable. But when we have an opportunity to share positive thoughts, kindness, and good energy with others, shouldn’t we make the most of it? Aren’t there more people in this world who can choose to do that, Kanha ji?
Today, I simply put this whole tangle of thoughts into words. I expressed them with a pure heart, without anger or resentment toward anyone.
And while writing all this, I did not once worry about what the future holds for me, or what will happen to me tomorrow. I have absolutely no anxiety about it, because I have complete faith in the One who is watching over everything "My Kanhaji".
And then, this evening, Kanha ji gave me a beautiful experience—and it was this:
And then, in the evening, I met a beautiful 70–80-year-old couple. We spoke about traditions, Nag Panchami and life. As I was leaving, the auntie smiled and said, “You will do it. And who knows, the next generation may be just as enthusiastic as you. They will be fortunate to have you.”
I was speechless.
A question in the morning… and by evening, Kanha ji had planted a person on my path with the answer.
Maybe this is what “Yachi Dehi, Yachi Dola” truly means. ❤️
Jai Shri Krishna. 🙏
Moral: We may not control people’s opinions, but we can always choose to leave positivity wherever we go.