Sunday, 13 September 2026

पंचमहाभूते महादेव यात्रा

पंचमहाभूते देवळं ही दक्षिण भारतातील महादेवाची पाच पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. पाच तत्वांना समर्पित पाच देवळं जी निसर्गाच्या पाच घटकांशी निगडित आहेत.

पाच तत्वं पाच देवळं.
१) पृथ्वी: तामिळनाडूच्या कांचीपुरम येथे असलेल एकंबरेश्वर देऊळ हे या तत्वाशी निगडित आहे. येथील लिंग वाळूचे बनलेल असून ते स्थिरता आणि दृढतेच प्रतीक मानल जातं.

२) पाणी : तामिळनाडूच्या तिरुवनाइकावल येथे हे जल तत्वाच महादेवाच देऊळ आहे. जंबुकेश्वर देवळाच नाव आहे.  या शिवलिंगाभोवती एक भूमिगत पाणृयाचा झरा आहे, जो गर्भगृहाच्या आत वर येतो.

३) अग्नी : अरुणाचल टेकडीच्या पायथ्याशी असलेल हे तिरुवन्नमलाई येथील अरूणाचलेश्वर महादेव देऊळ आहे.

४) वायू : आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्ती येथे असलेल श्रीकालहस्ती देऊळ. या देवळातील गर्भगृहातील ज्योतीची हालचाल वायूच्या अस्तित्वाच द्योदत आहे.

५) आकाश : तामिळनाडूतील चिदंबरम येथे असलेले थिल्लई नटराज देऊळ आकाश त्वं दर्शवतं. हे देऊळ चिदंबरम रहस्याच्या माध्यमातून निराकार अवकाश अशा आकाश तत्वाच प्रतिनिधित्व करतं.

सगळ्या देवळांना आपापली कथा आहे.  कैलासापासून ही पाच देवळं यात्रा कार्तिक स्वामीनी केली. त्यामुळे त्याला ं