५ मे २०२६
आज अशा एका सासुचा वाढदिवस आहे जी घर आणि नोकरी दोन्हीत संतुलनात जगून पुढच्या पिढीच्या सुनांना आदर्श आहेत. माझी यांची खरी ओळख मे २०११ ची मुलाच्या मुंजीतली जवळपास १५-१६ वर्ष सहवास. तोवर मी नावापुरतच ओळखत होते. सणासुदीचे मेसेज करत होते तो नंबर होता पांढुर्णा पाठक ईतकच. मुंजीत खरी दोस्ती झाली कारण तेव्हाच आईंचा साठावा होता मी वाढदिवस शुभेच्छा पत्र मागवली होती. काकूंचा मनाचा मोठेपणा मी तेव्हा बघितला अनुभवला. त्यांच्या लग्नाच्या गप्पा, जगतानाचे चढ उतार खुप खुप मोकळ्या झालो. मला पण हक्काच मायेच स्थान मिळालं. माझ्या प्रत्येक यशात त्यांचे कौतुकाचे शब्द मला पोचतातच. एक गोष्ट खुप छान आहे त्यांची त्या परिवर्तनाला सामोर जायला सदैव तत्पर असतात. आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण कस जमवायच हे मी त्यांच्यात नेहमीच बघत आलेय.
एक गोष्ट त्यांची भारीय ती म्हणजे कोणत्याही लवाजम्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे लग्न मुंज अस काहीही असलेल्या ठिकाणी मग भरल घर म्हणा कार्यालयातली गडबड म्हणा त्या चुमडीत उठून आंघोळ कपडे आवरून एकदम तयार आसतात. आणि यजमान घरी म्हणतात सांगा काय काम आता करायचय मी तयार आहे. तोवर ईतर आम्ही कुठ न्हाऊ? कुठ आवरू? आधी काय करायच? कोण आधी जातय ? यातच तोवर सौ. वंदना काकु साडी नेसून तयार, कपडे आवरून बॅग बिग आवरून रेडी. काही मिळालं नाहीचा बाऊ नाही की कुठं पसारा नाही की कुठं गाजावाजा नाही कशाचाच!
आपल्यासारखीच नोकरी-घर सांभाळून जगणार्या मोठ्या जावेच कौतुक असणारी ही धाकटी जाऊ मनानं मोठी आणि धैर्यवान म्हटली पाहिजे.
मला कौतुक वाटलेली आणखी एक गोष्ट - त्यांच्या मुलांच्या लग्नात मी गेलेले तेव्हा त्यांनी प्रचंड गडबडीत असूनही मला त्यांच्या ऑफिसमधल्या सहसाधीका मैत्रिणीची भेट करवली होती. तूच समजू शकतेस ही मैत्रिण मला किती मोलाची आहे म्हणून मला तीला तुला भेटवायच होतं.
आज वंदना काकुचा वाढदिवस म्हटल चला जरा माणसं वाचुया. मग मन श्रीमंतीची मोजदाद पाहून सुखावतं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार वंदना काकु!
तुमचीच सौ. गौरी
++++++
२७ एप्रिल २०२६
आज मी साठ वर्षे पूर्ण सुखासमाधानाने घालवलेल्या व्यक्ती बरोबर आमचा २५ वर्ष मैत्रीचा दिवस साजरा करतेय. कळल नाही ना? थांबा सांगते. ही आमची नीलूताई आज तीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत आणि आमची ओळख २५ वर्षांपूर्वी माझ्या लग्नात झाली म्हणून आमचा २५ वा मैत्री दिवस! आहे की नाही मजा. खरतर ही नणंद कमी आणि सखीच जास्त होती. घरातल्या प्रत्येकाच्या स्वभावाचे पैलू सांगत तीनं मला कधी आपलसं केलं कळलच नाही. आज खुप छान वाटल जेव्हा विचार आला की एका ६० पूर्ण करत असणार्याच्या आयुष्यातली आपण २५ वर्ष त्याला ओळखतोय! खुपच वेगळी अनुभूती, असो. या व्यक्तीनं आम्हा भावजयांना सासरच्या गराड्यात कधीच तिराईत भासू दिलं नाही. नीटनेटक राहायची फार आवड असणारी, भावांवर जीव ओवाळून टाकणारी, घरासाठी खंबीर ऊभी राहणारी, कौतुकानं खाऊ घालणारी, वेळ आली तर तडफदार बोलणारी पण फणसासारखी अशी ही खुप प्रेमळ आणि हक्काची आहे. ताई माहेरवाशीण म्हणून घरी आल्यावर ओटी भरल्याखेरीज मी कधीच जाऊ दिलेल नाही. ती आमची जुळलेली वेगळीच नाळच म्हणा हवं तर! लहानपण हट्ट करत मामा मामींकडून लाड पुरवत घालवलेली ही नीलू - मामींच्या तोंडी (आईंच्या) नेहमीच असते. मी तीला तीच्या अरुणा मामींच्या आठवणींतून नेहमीच बघत आलेय आणि येतेय. आज २००१ सालच्या पुतण्याच्या मुंजीपासून ते २०२५ मधल्या आई बाबांच्या कार्यक्रमातला तीच्याबरोबरचा सगळा काळ आठवला. दिवस जात राहतील आम्ही पण वयान मोठ्या होऊ पण या सुंदर आठवणी हृदयाच्या कुपीतच राहतील. माहेरवाशीण म्हणून ये, रहा आणि ओटी भरू दे हे आमंत्रण ताई तुला कायमचच बरं का! आजच्या तुझ्या सुंदर दिवसासाठी तुला अनंत शुभेच्छा व नमस्कार आणि मिठी २५ व्या मैत्री दिवसासाठी!
तुझीच गौरी
+++++++
माझ्या आयुष्यातील २०१० मधला ट्वीनस डेचा हा आमचा हा फोटो. खर वाटणार नाही आमच एकमेकींच मोजुन दोन महिन्यांत जे सुत जुळलं तेआज १९-२० वर्ष जवळजवळ आहे तस्सच आहे. मागची दोन वर्ष आम्ही रोज भेटण शक्य नसल तरी ते आहे तसच आहे. आज मिताला ५८ वर्ष सुरू झालं पण ती आजही ४० शीच वाटते मला.
गरजेपेक्षा ईतरांचा विचार जास्त करणारी, कोणाच्या कोणी केलेला पदार्थ त्याची कृती लक्षात ठेवणारी, घरातल्या मुंग्याना छोटा ढीग साखर उंबरठ्यावर ठेवणारी, जगातलं कोणी येऊ दे गरम करून वाढायची कायम तयारी असणारी, मनातल दु:ख कधीही डोळ्यांच्या किनारीवरही दिसू न देणारी, माझ्या फुसक्या सहलीचे फोटोही दुसर्या दिवशी तितक्याच तन्मयतेनं पाहणारी, कामाला दैवत मानणारी, आद्ध्यात्माची आवड असणारी मिता मला अशीच अखंड ९० पर्यंत पाहायची आहे. हो जाऊ ना आम्ही तेव्हाही ९०-८०च्या असू तरी विष्णू जी की रसोईला. तीच्या माझ्या आयुष्यातील ही १९-२० वर्ष आमच्या आयुष्यातील चंगळ होती. ती सोबत होती तेव्हा तीला बघून बघून मी पण अनेक गोष्टीत तयार झाले ती अजुन काही गोष्टीत मात्र मला बघून तयार होण बाकी आहे. तीला वाढदिवसाच्या अमोघ शुभेच्छा आणि पापी😘
तुझीच गौरी
++++
७ एप्रिल २०२६
सुप्रभात!
ही माझ्या आयुष्यातील बालपणीचा काळ कसा सुखद होता हे सांगणारी आणि त्यात सहभागी असणारी व्यक्ती - छाया काकू! कायम हसतमुख, आल्या गेल्या सगळ्यांच कायम स्वागत करणारी, जे घरात असेल ते मायेन खाऊ घालणारी, इतरांपेक्षा जरा कमी चपळ पण त्याची तमा न बाळगता सतत सतत घरासाठी कष्ट करणारी, आहे त्यात मन:पूर्वक समाधानी राहून जगणारी अशी माझी काकु खुप मायाळु तर आहेच पण ती आजही माझ्यासाठी तश्शीच आहे. मी माॅन्टेसरीत असताना भावे प्राथमिक शाळेत सोडायला येणारी काकू ते कालपर्यंतची म्हणजे तीच्या पुतणीच्या मुलाच्या मुंजीत गेटपर्यंत बरोबर चालत येणारी काकु आहे तशीच आहे. खरतर मला तेव्हाच हा प्रवास आठवला होता..
काहीवेळा आपण सुद्धा खुप काही करतो, जे फार मोलाच असत पण जगात त्याची ऊचल किंवा दखल घेतली जात नाही, झाकोळलं राहत एखादं व्यक्तिमत्त्व पण तस असल तरी त्याचीही दखल घ्यायची गरज न वाटणारं अथवा त्याची गरजच नाही असा विचार करणारी निर्मळ अशी ही खरच मोलाचा साथीदार होती माझ्या काकाची... माझ्या आदराच्या माणसांच्या सूचीत ही कायमच असतेच असते. काकानंतर माझ तीच्याकडे जाणं तस कमी झालय ती बरेचदा घरी नसते. मला वाटल की मी काकाकडे जाऊन तीला भेटण आता शक्य होत नाही. पण मला आनंदच आहे कारण ती आता मस्त फिरतेय, ट्रीप करते, आनंदी राहते. तीचा आजी आजोबा गट भन्नाट आहे. भारीच वाटत मी भेटते त्यांना आणि त्यांच्या प्रवासाच्या कथा ऐकायचा ग्राहकही बनते. हे कान्हाजी माझ्या लहानपणच्या चंदेरी पानावरच्या या सोनेरी माणसाचा आशिर्वादाचा हात मला अनंतकाल लाभावा.
छायाकाकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🫂
तुझीच (चप्पल शेणात भरली म्हणून ती तिथच सोडून एकच चप्पल घालून घरी येणारी आणि हे अस केल म्हणून मला बघून पोट धरून हसणार्या छायाकाकूची लाडकी)
गौरी
++++++
२७ मार्च २०२६
प्रिय कान्हाजींना माझा नमस्कार
मला या भूतलावर येऊन ईकडच सौंदर्य पाहण विविध नात्यांमधील प्रेम अनुभवणं यासाठी जन्म देणाऱ्या म्हणजेच माध्यम असणाऱ्या आईला अनेक धन्यवाद.आज आईची वयाची ७० वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या कळत्या वयापासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास ४० वर्ष मी तीला सतत काहीना काही करतानाच बघत आले आहे. बाबांसारखी आद्ध्यात्माची गोडी पण माझ्यात हीच्याच मुळे आली आहे. आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावर ऊभं राहायला शिकावं यासाठीची तीची धडपड आम्हाला मोलाची शिकवण होती. त्या सवयीमुळे आजही मी खंबीरपणे ऊभी आहे. आई... ती स्पष्टवक्ती आहे. भरभरून करण्याची, देण्याची दानत तीच्यामधे आहे. ती स्वावलंबी आहेच पण खमकेपणा आणि सतत कोणाला न कोणाला काहीतरी नोंद दाखवणे या गोष्टींवर ती बाबांच्या माघारी स्वतः च स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून ऊभी आहे. खरतर सहज कोणाला समजेल अस व्यक्तीमत्व अजिबात नाही. त्यामुळे दरवेळी ती वेगळी वाटणं साहजिकच आहे. बाबांच्या आठवणी आम्ही दोघी व ती माझ्या पूर्ण माहेरची चौकट आहे. माझ्या चौकटीच्या या टोकावर लक्ष ठेवा कान्हाजी.
आईला वयाच्या सत्तर वर्ष पूर्तीच्या अनंत शुभेच्छा आणि माझा मन:पूर्वक नमस्कार 🙏🏻
सौ. गौरी पाठक