Monday, 2 January 2023

१) पौष (डिसेंबर जानेवारी ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

पौष महिना महत्वं : पौष महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो. पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पौष महिन्यात रात्र लहान असून थंडीमुळे वातावरणामध्ये रोगजंतूंचे प्रमाणही वाढलेले असतात. त्यामुळे वातारवण दूषित होऊन आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून आधीपासून पौष महिन्यात लग्न न करण्यावर भर देण्यात आला आहे. नवा संसार सुरू करताना या गोष्टींचा आयुष्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणूनही पूर्वीच्या दिग्गज मंडळींनी हे नियम केले असावेत.

पौष महिन्यातील सण :
भोगी : संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो.  र्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.

मकरसंक्रांत :या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. तिळवण व बोरन्हाण पण करतात. 
प्रभु श्रीराम व हनुमान मित्रता मकरसंक्रांत दिवशी झाली होती.


 

मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे झालेले दिनमान जाणून लागते. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्याचे पुण्य वर्णन अधिक आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागरात सामील झाली.

किंक्रांत :  संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. 

प्रजासत्ताकदिन : भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.

पौष महिन्यातील यात्रा, जयंत्या :  
१) शाकंभरी नवरात्र, शुक्ल पक्ष अष्टमी पौष :
शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता.
२) नृसिंह सरस्वती रथ उत्सव आळंदी, पौष पौर्णिमा  :
श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीनरसिंहसरस्वती या नावाचे एक थोर दत्तावतारी सत्पुरुष होऊन गेले. स्वामींनी तेथे एकूण १२ वर्षे वास्तव्य केले व ज्या दिवशी हा १२ वर्षांचा काल पूर्ण झाला त्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमा शके १८०७ रोजी श्रीज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे जीवंत समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपविले. त्यांचा मठ आणि समाधीस्थान आळंदीला गोपाळपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. 
३) नृसिंह सरस्वती जयंती, कारंजा, पौष शुक्ल द्वितीया  :
महाराजांचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता,  "काळे वाडा".  कारंजा,  नगरीत झाला. 
४) पुत्रदा एकादशी, षटतिला एकादशी: तिळाचे दान करतात

गीते, कविता, गाणी :

१) आज का दिन है अति पावन
मकर संक्रांति का है दिन
आज उड़ेगी आकाश में पतंग
होंगे लाल पिले सब रंग
गंगा में डुबकी लगाओ
करो शीतल तन और मन
दान करो चीनी चावल धान
कमाओ पुण्या बनाओ परमार्थ
जोड़ो हाथ ईशवर से वर माँगो
सब जन जीवन का हो कल्याण


(२) मकर राशि पर सूर्य जब, आ जाते है आज!
उत्तरायणी पर्व का, हो जाता आगाज!!
कनकअौं की आपने, ऐसी भरी उड़ान!
आसमान मे हो गये, पंछी लहू लुहान!!
फिरकी फिरने लग गई, उड़ने लगी पतंग!
कनकअौं की छिड़ गई, आसमान मे जंग!!
अनुशासित हो कर लडें, लडनी हो जो जंग!
कहे डोर से आज फिर, उडती हुई पतंग!!
कहने को तो देश में, अलग अलग है प्रान्त!
कहीं कहें पोंगल इसे, कहे कहीं सक्रांत!!
उनका मेरा साथ है, जैसे डोर पतंग!
जीवन के आकाश मे, उडें हमेशा संग!!
मना लिया कल ही कहीं, कही मनायें आज!
त्योंहारो के हो गये, अब तो अलग मिजाज!!
त्योहारों में धुस गई, यहांँ कदाचित भ्राँति!
दो दिन तक चलती रहे, देखो अब संक्राँति! 

राम इक दिन चंग ऊडाई | इंद्रलोक मे पहुंची जाई |
तिन सब सुनत तुरंत ही, दीन्ही दोड़ पतंग||
खेंच लइ प्रभु बेग ही, खेलत बालक संग ||
 
 लॉजिक नवीन पिढी साठी :

संक्रांतीला नव्या नवरीला हलव्याचे दागिने का घालतात ? स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू.  तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. भारत मुळातच हा संस्कृती प्रधान देश आहे. सण साजरे एकत्रित केले कि प्रेम वाढतं. नव वधू ला नवीन घरी सामावून घेण्यासाठी कदाचित हा प्रयत्न असावा. 
काळी साडी मुद्दाम असते हवामान अनुकुलता साधलीय त्यात. रथसप्तमी पर्यंत हळदीकुंकू करण्यामागे हेच कारण असेल कि भेटी गाठी व्हाव्या . 
नवीन पिढीनं आपली संस्कृती समजून घेऊन जपली तरच ती टिकेल. शास्त्रीय कारण तर आहेच. काळ्या रंगाचे कपडे थ॔डीला चांगले ऊबदार शास्त्रीयदृष्ट्या ऊत्तम. तसेच या हवामानात सूर्यकिरणांना महत्व आहे ते शरीराला योग्य असे असतात. पौष महिना सूर्याचे तेज आणि देवगुरू बृहस्पतीच्या दिव्यतेने संपन्न आद्ध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध महिना मानतात. 
थंडीत सूर्य जास्त महत्वाचा मग त्याची किंमत ठेवा तो देतोय फुकट डी विटॅमीन ते जास्तीत जास्त घ्या. काळा रंग त्यात मदत करतो म्हणुन काळे कपडे घालतात. हेच लाॅजिक असावे. ऊन्हात वेळ घालवावा म्हणुनही मकर संक्रांतीला पतंग ऊडवण्याची पद्धत पडली असेल. पतंगाला स्वतंत्रता, आनंद, शुभ संदेश वाहकाच प्रतिक मानतात. भगवान श्रीरामानी लहानपणी पतंग ऊडवलेला ऊल्लेख रामचरित मानसगान मधे तुलसीदासजीनी केलेला आहे. पूर्वजांनी सगळ्याची ऊत्तम सांगड घातली आहे आपण ती शोधली पाहिजे.
 

Wednesday, 24 August 2022

हर हर महादेव! बारा ज्योतिर्लिंग

बारा ज्योतिर्लिंग 

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।
उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे।
हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥४॥

 **************************************************


ॐकारेश्वर मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे.
************************
 
 
*****************
भीमाशंकर भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.
**************************

************
सोमनाथ म्हणजे "सोमचा देव" किंवा "चंद्र".या जागेला प्रभासा ("वैभवाचे स्थान") असेही म्हणतात.
*************************************
 
***************
श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. 
************************
 
**********

काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात.
ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे.तेथे दर्शन घ्यावयाचे तर,तीन हार न्यायची पद्धत आहे.एक हार शंकराला,दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो.
******************************************
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर हे मध्य प्रदेश राज्यात उज्जैन येथे आहे. रुद्र सागर तलावच्या बाजूला हे मंदिर आहे.
*****************************************************
*************

Tuesday, 28 June 2022

वारी २०२२

पांडुरंग.. पांडुरंग...पांडुरंग....

पालखी म्हटलं कि पुण्यात उत्साहाचं वातावरण कायम असतंच. न कळत्या वयापासूनच पालखीच्या दर्शनाला जाण्याचा योग्य येत आला. लक्ष्मी रोडवर कितीही गर्दी असली तरीही बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन करवून आणणारच. तेव्हा एवढच कळायचं कि हे केलं कि बाबा खूप आनंदात असतात. रात्री जेवणं झाली कि आमचा पूर्ण वाडा अनवाणी निवडुंग्या विठोबा देवळात पालखीचे दर्शन घ्यायला जायचा. जीवनाचा एक भागच होता तो तेव्हा.

एखादी गोष्ट आपण करतो , ती करावीशी वाटते यामागे खूप आधी पासून तयारी आत सुरु असावी असं मला वाटत. लहानपणीच्या बाबांच्या आनंदच रहस्य पालखीत आहे हे कुठंतरी अंतर्मनात नोंद होत. कदाचित त्यामुळे पण थोडा भाग तरी पायी वारी करावी अशी मनातली सुप्त इच्छा तीव्र होत होत, यंदा पांडुरंगांनीच ती पूर्ण केली. मनाचा हिय्या केल्या खेरीज काही गोष्टी होत नाहीत हे मात्र पटलं. गेले काही वर्षं दरवर्षी विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर महाराज यांच्या रांगोळ्या काढण्याची इच्छा झाली. प्रत्यक्ष हा देव कसा असेल याचा विचार सतत मनात आला कि मन तयार होऊन त्या काढल्या जायच्या. अशा अनेक गोष्टी एकत्र येऊन आळंदी ते पुणे पायी वारी करण्याचा मानस तयार झाला. इच्छा असली कि परमेश्वरच मार्ग दाखवतो. निसर्ग पण सहकार्य करतो. मुमुक्षी ग्रुपवर आयटी वारी दिंडी नोंदणी अशी लिंक आली आणि आनंदाला पारावर राहिला नाही. नवऱ्याला इच्छा बोलून दाखवली आणि तो तत्काळ जा म्हटलं. घरातल्या पांडुरंगाच्या साथी शिवाय हे शक्यच नव्हते.

घरच्या या माउलीला नमस्कार करून पहाटे साडेतीनला आयटी दिंडीच्या बसमध्ये बसले. आळंदी फाटा पर्यंत बसनी जाऊन पुढे पायी वारी असणार होती. आयटी दिंडीचे बसमधले नवखे सहकारी अर्ध्या तासात आपलेसे झाले. उत्तम अभंग म्हणणारे एक काका आमच्या दिंडीत होते. त्यांच्यामुळे तो भक्तीचा भाव सतत बहरत होता.

काय असतं पंढरपूरला ? एवढे सगळे घरदार सोडून का जातात तिकडे ? इतके भराभर का चालतात ? असे अनंत प्रश्न जे मनात होते त्यांची समर्पक उत्तरं या पूर्ण पायी वारीत मला समजली.

वारीच्या शेवटच्या टप्प्यात झी मराठी चे मुलाखतकार भेटले त्यांनी वारीत काय शिकलात? हा प्रश्न विचारला होता. 
सर्वधर्मसमभाव शिकवते वारी. एकच छत वारी, त्यातला एकच देव पालखी आणि सर्वजण एकच ती माउली. विश्व हे परमेश्वराच्याच अंशांनी जोडून बनलेले आहे. आपण ते पाहण्याची दृष्टी कमावतो आणि असे अनेक अंश मिळुन जेव्हा नामाचा गजर होतो तेव्हा समजते महती ती त्या पांडुरंगाच्या पंढरीची. विश्वातल्या त्या आनंदाचा स्रोत दाखवते वारी. आपल्या कमीत कमी गरजा दाखवते वारी. आपल्यातल्या परमेश्वराच्या अंशाचे मंदिर "देह" त्याची किंमत पटवते वारी. समर्पण शिकवते वारी. मोह त्यागून जगायला मार्ग दाखवते वारी.
 

आयटी दिंडीतली एक गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे जे नियमाने वारी करतात ते वारकरी आणि आपण मात्र त्या वारकऱ्यांचे सेवेकरी. आपली त्या अनेक वर्षे पायी वारी करणाऱ्यांशी तुलना होऊच शकत नाही. हे प्रत्यक्ष वारी केली कि मगच समजत. आज आय टी वारी दिंडी च्या सर्व कार्यकर्त्यांचे आभारच मानेन कारण हा मोठा अनुभव समजण्या अनुभवण्यासाठी ते माध्यम ठरले. पंढरीच्या वाटेसाठी ते मार्गदर्शक ठरले.  या पायी वारीत दोन छान मैत्रिणी मिळाल्या. वाटलंच नाही कि आम्ही भेटून काही तसाच झाले होते.

टाळ वाजवण्याची पद्धत, गवळण ऐकून अपसुख दिला जाणारा ठेका, रिंगण करताना येणारी सर्वांग सळसळ, मनातल्या मनात म्हटलेल भजन खणखणीत आवाजात म्हणायला मिळाल्यावरच अतीव आनंद ... काय काय शिकले, समजले म्हणून सांगू ?
 
तूच माझी माय तूच माउली
तुझ्या भेटीची हि आस मन लागली
थोर तुझे रूप अन तुझी पंढरी
उभा तू दिसशी असा त्या विटेवरी !
 
हॉली बासिल पासूनच हा आमचा आनंदी प्रवास भजनं, टाळांचा गजर याच्या तालात सुरु होता. समोर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार होती. तिचे दर्शन घेऊन आयटी दिंडी त्या महासागरात मिसळणार होती. जसजशी पालखी दर्शनाची वेळ जवळ येत होती तसं मन आतुर होत होत. पालखी पुढच्या दिंड्या दिसू लागल्या होत्या, टाचा उंचावून उंचावून पाहण्याची धडपड सगळ्यांचीच सुरु होती. ....... आणि तो क्षण आला. ... फुलांनी नखशिखांत सजवलेला रथ, माऊलींची पालखी दुरून दिसू लागली. नामाचा जयघोष वाढला. काही फुटाच्या अंतरावर अगदी समोर तो रथ आला आणि मन भरून आलं. भावना डोळ्यांमार्फत झरझर वाहू लागल्या. आसमंतात उच्च प्रतीचे सुरेख स्पंद उधळण करत माउलींचा रथ पुढे सरकत होता. थोडं दुरून पादुकांचे दर्शन होतं ना होत तोच पुढे सरकला. काय सांगू लोक हो नुसत्या दर्शनं मनात काय झालं ! अशाच अखंड हरिनामाच्या प्रवाहात वाहत पंढरपुरात काय होत असेल याची झलक समजली आणि काय असतं पंढरपुरात या प्रश्नाच सहज सोप्पं उत्तर मिळालं. पंढरीचा आनंद काय असेल याची थोडी कल्पना आली. लवकरच अनुभूती पण येईल. पांडुरंगानं आध्यात्मिक मार्गाचा फलक दाखवलाय  आता त्याला हेच मागणं -
 
हेचि दान देगा देवा
तुझा विसर व व्हावा ...

पुढे दिघी नाक्याजवळ आय टी दिंडीच रिंगण झालं. उत्तम अनुभव होता. पायी चालताना आपण वाहत्या प्रवाहाचे प्रवासी आणि काठावरचे लोक पाहतायत अस वाटत होत. वाटेत पाणी वाटप होत होतं त्यामुळे ओझं वाचत होत. फुलेनगर जवळ आमची गंधम सोसायटीत जेवणाची, बसण्याची, घरच्या शौचालयाची (हे महत्वाचं होत.) उत्तम सोय केलेली होती. सोसायटीत सुंदर दत्तमंदिर होतं. जेवण झाल्यावर देवळात आरती झाली. दुपारचे दोन वाजले होते. ऊन वाढलं होतं. पावसाची मध्ये मध्ये चिन्ह दिसत होती. पावलं झपाझप चालत होती. संगमवाडी आली. हरी नामाचा गजर आयुष्यातली पायवाट चालताना ती किती सुखद करतो, खरंच ! संचेतींच्या पुलावर आलो तेव्हा वाटलं किती पटकन आलो खरंतर चाल खूप झालेली पण मनातला हर्ष त्यावर मात करत होता. यावेळी माऊली मुक्ताबाईंची पालखी दिसली. अतिशय छान दर्शन झालं. पाताळेश्वराला पोचलो जवळच असलेल्या अमृततुल्यचा चहा घेतला. पिताना मागचे २४ तास झर्रकन डोळ्यासमोरून गेले. आनंदाच्या लहरी मनात उमटत होत्या.

बरेच चालून गेल्यावर पुढे दर्शन हाॅटेल जवळ एक रिक्षा मिळाली. नळ स्टॉप पर्यंत जस जमेल तसं सोडेन म्हटला तो. तूच आमचा विठ्ठल पोचवं बाबा घरी असच बोललो शेवटी आम्ही दोघी. तो तयार झाला. फिरून फिरून कसाबसा नळ स्टॉपला आलो मैत्रीण उतरली. पुढचा रास्ता सुरु होता मला घरापर्यंत पांडुरंगांनीच सुखरूप पोचवलं.
खरी गंमत पुढे झाली. रिक्षातून उतरून पैसे दिले. तेवढ्यात तो रिक्षावाला थांबा म्हणाला. मला वाटलं पैसे पडले कि काय म्हणून तो खाली वाकला. पण त्यांनी चपला काढल्या गुढघ्यावर बसला आणि चक्क माझ्या पायावर डोकं ठेवलं. मला समजेना. तर म्हणाला नाही म्हणू नका वारी करून आलात ना, पुण्यवान झाला तुमचा आत्मा! तुम्हीच माझा विठठल मला नमस्कार करू द्या. माझी आई म्हनती वारी करून आलेल्याच्या पायावर डोकं ठेऊन नमस्कार करायचा तो पांडुरंग होऊनच येतो. हे शब्द ऐकून हुंदकाच आला. अश्रू अनावर झाले. मगाशी झी मराठी च्या मुलाखतकारानी विचारलेलं कि विठ्ठलाला काय मागाल ? त्यावर मी दिलेलं उत्तर होत कि पांडुरंगानी भरभरून दिलय, तो देत पण राहील. मला ते सांभाळायची योग्य कर्म करायची बुद्धी तेवढी लाभु  दे. योग्य विकल्प चयन करण्यासाठी कायम मार्ग दाखवू दे. आणि दोन तासात अनुभव आला या रिक्षावाल्यामार्फत कि माणसांत पण देव पाहू शकतो. तो दिसला कि आपल्यातला पण  दिसेल. रिक्षावाल्याने वारीचा गाभाच घरी पोचता पोचता समोर ठेवला. धन्य धन्य तो पांडुरंग आणि धन्य धन्य ते वारकरी !

पुंडलिक वरदे हरी विठठ्ल ,
श्री नामदेव तुकाराम !


गौरी माउली

Sunday, 27 March 2022

वार्षिक टाॅनिक ! काॅक्लियाच स्नेहसंमेलन.....

|| जय गजानन ||

दरवर्षीप्रमाणे यंदा पण काॅक्लियाच स्नेहसंमेलन बघायला नव्हे, जगायला जाण्याची बुद्धीच परमेश्वरानं दिली. हो परमेश्वरच, कारण त्यानं बुद्धी दिल्याशिवाय अशा गोष्टी मिळत नाहीत.

सर्वप्रथम मैत्रिण व काॅक्लियाची शिक्षिका सौ.कविताचे आभार, तीच्या माध्यमातुन या कर्णबधिर मुलांच्या शाळेची माहिती झाली. सर्वसामान्यांनी ठणठणीत असलेल्या अवयवांच महत्व कस जाणलं पाहिजे हे दाखवुन देणारी ही संस्था.

वर्षभर योग्य व्यवस्थेत असलेल्या शरीरास गृहित धरून अनेक काम जेव्हा मी करते तेव्हा त्या व्यवस्थेचे आभार मानण्यास मी या चिमुकल्या मुलांच्या भेटीन व स्नेहसंमलनाला जाऊन शिकले.

प्रत्येक कर्णबधिर मुल बोलु शकते यासाठी झटणारी ही संस्था चालवणारे गुरूजन डाॅ. वाचासुंदर सर व सौ. रक्षा देशपांडे यांच्याचडे बघुन वाटतं की समाज सुंदर होण्यासाठी झटणारी ही माणस आहेत म्हणुन जग सुरूय. 

मुलांना पाहुनच समजतं की त्यांना शिकवण किती अवघड आहे. गॅदरींगमधे आपले विद्यार्थी ऊत्तम प्रकारे सादरीकरण करावेत हे करण्यासाठीच त्या शिक्षकांच प्रोत्साहन जेव्हा आपण त्या हाॅलमधे बघतो तेव्हा अवाक होतो. वयाच भान विसरून रममाण होऊन त्या त्यांना बक अप करत असतात. 

कधीकधी आपण जे जे करतो त्याचा ऊल्लेख अनावधानान केला जातो परंतु या मुलांच्या आयाना पाहुन वाटतं यांचा स्तर जास्त मोठा आहे. प्रत्येक आईच लेकरासाठी करते आणि तीच करू शकते हे समजतं, पटतं. आई होण्याच महत्व समजतं.

केलेल्या गोष्टीचा अभिमान न बाळगणे, निसर्गतःच सुव्यवस्थित शरीर मिळालय त्यासाठी परमेश्वरचे आभार मानणे तसेच शारीरिक अव्यवस्था असलेल्या आपल्याच समाज बांधवांसाठी खारीचा तरी वाटा ऊचलणे ही शिकवण दरवर्षीच या स्नेहसंमेलनात मिळते.
कालचच म्हणाल तर एकवेळ हसुन हसुन पुरेवाट करणारे प्रसंग तर टचकन पाणी आणणारे अनेक किस्से अनुभवायला मिळाले. कित्ती खुष होती मुलं, शिक्षकांवर असणारा प्रचंड जीव, ओलावा, विश्वास डोळ्यात तरळत होता. कोरोनाकाळातली ऑनलाईन शाळा नाटक तर काळीज कापुन नेतं- जेव्हा मुलाचे वडिल म्हणतात नोकरी..  पगार नाही.. मोबाईलमधे बॅलन्स कसा भरू??
पालकांनी दाखवलेलं समाजातलं या मुलांना व आईला अनुभवणार खर रूप चलबिचलच करून सोडतं. कालच गॅदरींग पण ऊत्तम झालं. सर्व शिक्षकांचे कष्ट दिसत होतं.

या संस्थेच्या कामाचे  सर्व मार्ग सुखर व्हावेत हीच शुभेच्छा!तसेच वार्षिक टाॅनिकसाठी दरवर्षी मी येईनच... भेटुच!

मनापासुन धन्यवाद!
आपलीच
सौ. गौरी पाठक