पौष महिना महत्वं : पौष महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो. पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. महत्त्वाची बाब
म्हणजे पौष महिन्यात रात्र लहान असून थंडीमुळे
वातावरणामध्ये रोगजंतूंचे प्रमाणही वाढलेले असतात. त्यामुळे वातारवण दूषित
होऊन आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून आधीपासून पौष महिन्यात लग्न न
करण्यावर भर देण्यात आला आहे. नवा संसार सुरू करताना या गोष्टींचा
आयुष्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणूनही पूर्वीच्या दिग्गज मंडळींनी हे
नियम केले असावेत.
पौष महिन्यातील सण :
भोगी : संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो.
र्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.
मकरसंक्रांत :या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन
स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत
करायचे हा कार्यक्रम असतो. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. तिळवण व बोरन्हाण पण करतात.
प्रभु श्रीराम व हनुमान मित्रता मकरसंक्रांत दिवशी झाली होती.
मकर संक्रांतीच्या
दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे झालेले दिनमान जाणून
लागते.
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. मकरसंक्रांतीच्या
दिवशी गंगेत स्नान केल्याचे पुण्य वर्णन अधिक आहे कारण मकर संक्रांतीच्या
दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागरात सामील झाली.
किंक्रांत : संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या
राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले.
प्रजासत्ताकदिन : भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने
संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.
पौष महिन्यातील यात्रा, जयंत्या :
१) शाकंभरी नवरात्र, शुक्ल पक्ष अष्टमी
पौष :शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता.
२) नृसिंह सरस्वती रथ उत्सव आळंदी, पौष पौर्णिमा :
श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीनरसिंहसरस्वती या नावाचे एक थोर दत्तावतारी सत्पुरुष होऊन गेले. स्वामींनी तेथे एकूण १२ वर्षे वास्तव्य केले व ज्या दिवशी हा १२ वर्षांचा काल पूर्ण झाला त्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमा शके १८०७ रोजी श्रीज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे जीवंत समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपविले. त्यांचा मठ आणि समाधीस्थान आळंदीला गोपाळपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे.
३) नृसिंह सरस्वती जयंती, कारंजा, पौष शुक्ल द्वितीया :
महाराजांचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता, "काळे वाडा". कारंजा, नगरीत झाला.
महाराजांचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता, "काळे वाडा". कारंजा, नगरीत झाला.
४) पुत्रदा एकादशी, षटतिला एकादशी: तिळाचे दान करतात
गीते, कविता, गाणी :
१) आज का दिन है अति पावन
मकर संक्रांति का है दिन
आज उड़ेगी आकाश में पतंग
होंगे लाल पिले सब रंग
गंगा में डुबकी लगाओ
करो शीतल तन और मन
दान करो चीनी चावल धान
कमाओ पुण्या बनाओ परमार्थ
जोड़ो हाथ ईशवर से वर माँगो
सब जन जीवन का हो कल्याण
मकर संक्रांति का है दिन
आज उड़ेगी आकाश में पतंग
होंगे लाल पिले सब रंग
गंगा में डुबकी लगाओ
करो शीतल तन और मन
दान करो चीनी चावल धान
कमाओ पुण्या बनाओ परमार्थ
जोड़ो हाथ ईशवर से वर माँगो
सब जन जीवन का हो कल्याण
(२) मकर राशि पर सूर्य जब, आ जाते है आज!
उत्तरायणी पर्व का, हो जाता आगाज!!
कनकअौं की आपने, ऐसी भरी उड़ान!
आसमान मे हो गये, पंछी लहू लुहान!!
फिरकी फिरने लग गई, उड़ने लगी पतंग!
कनकअौं की छिड़ गई, आसमान मे जंग!!
अनुशासित हो कर लडें, लडनी हो जो जंग!
कहे डोर से आज फिर, उडती हुई पतंग!!
कहने को तो देश में, अलग अलग है प्रान्त!
कहीं कहें पोंगल इसे, कहे कहीं सक्रांत!!
उनका मेरा साथ है, जैसे डोर पतंग!
जीवन के आकाश मे, उडें हमेशा संग!!
मना लिया कल ही कहीं, कही मनायें आज!
त्योंहारो के हो गये, अब तो अलग मिजाज!!
त्योहारों में धुस गई, यहांँ कदाचित भ्राँति!
दो दिन तक चलती रहे, देखो अब संक्राँति!
उत्तरायणी पर्व का, हो जाता आगाज!!
कनकअौं की आपने, ऐसी भरी उड़ान!
आसमान मे हो गये, पंछी लहू लुहान!!
फिरकी फिरने लग गई, उड़ने लगी पतंग!
कनकअौं की छिड़ गई, आसमान मे जंग!!
अनुशासित हो कर लडें, लडनी हो जो जंग!
कहे डोर से आज फिर, उडती हुई पतंग!!
कहने को तो देश में, अलग अलग है प्रान्त!
कहीं कहें पोंगल इसे, कहे कहीं सक्रांत!!
उनका मेरा साथ है, जैसे डोर पतंग!
जीवन के आकाश मे, उडें हमेशा संग!!
मना लिया कल ही कहीं, कही मनायें आज!
त्योंहारो के हो गये, अब तो अलग मिजाज!!
त्योहारों में धुस गई, यहांँ कदाचित भ्राँति!
दो दिन तक चलती रहे, देखो अब संक्राँति!
राम इक दिन चंग ऊडाई | इंद्रलोक मे पहुंची जाई |
तिन सब सुनत तुरंत ही, दीन्ही दोड़ पतंग||
खेंच लइ प्रभु बेग ही, खेलत बालक संग ||
लॉजिक नवीन पिढी साठी :
संक्रांतीला नव्या नवरीला हलव्याचे दागिने का घालतात ? स्नेहाची
गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह
वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. भारत मुळातच हा संस्कृती प्रधान देश
आहे. सण साजरे एकत्रित केले कि प्रेम वाढतं. नव वधू ला नवीन घरी सामावून
घेण्यासाठी कदाचित हा प्रयत्न असावा.
काळी साडी मुद्दाम असते हवामान अनुकुलता साधलीय त्यात. रथसप्तमी पर्यंत हळदीकुंकू
करण्यामागे हेच कारण असेल कि भेटी गाठी व्हाव्या .
नवीन पिढीनं आपली संस्कृती समजून घेऊन जपली तरच ती टिकेल. शास्त्रीय कारण तर आहेच. काळ्या रंगाचे कपडे थ॔डीला चांगले ऊबदार शास्त्रीयदृष्ट्या ऊत्तम. तसेच या हवामानात सूर्यकिरणांना महत्व आहे ते शरीराला योग्य असे असतात. पौष महिना सूर्याचे तेज आणि देवगुरू बृहस्पतीच्या दिव्यतेने संपन्न आद्ध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध महिना मानतात.
थंडीत सूर्य जास्त महत्वाचा मग त्याची किंमत ठेवा तो देतोय फुकट डी विटॅमीन ते जास्तीत जास्त घ्या. काळा रंग त्यात मदत करतो म्हणुन काळे कपडे घालतात. हेच लाॅजिक असावे. ऊन्हात वेळ घालवावा म्हणुनही मकर संक्रांतीला पतंग ऊडवण्याची पद्धत पडली असेल. पतंगाला स्वतंत्रता, आनंद, शुभ संदेश वाहकाच प्रतिक मानतात. भगवान श्रीरामानी लहानपणी पतंग ऊडवलेला ऊल्लेख रामचरित मानसगान मधे तुलसीदासजीनी केलेला आहे. पूर्वजांनी सगळ्याची ऊत्तम सांगड घातली आहे आपण ती शोधली पाहिजे.
छान! पुढच्या पिढीसाठी उत्तम ठेवा
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteछान प्रयत्न, खूप शुभेच्छा
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteछानच उपक्रम...
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteमनापासून धन्यवाद
ReplyDeleteतिळ व गूळ उष्ण पदार्थ असल्याने त्याचे थंडीत सेवन करावे हा पण संक्रांतीला तिळगुळ वाटण्या मागील उद्देश असावा...
ReplyDeleteखरंय, देण्याचा निसर्गाचा नियम यात आपण शिकतो. दिल्यानं वाढत म्हणतात तसं किंवा वाटल्याने प्रेम वाढते हे यात शिकायला मिळते.
Deleteखूप छान
ReplyDeleteजय गजानन. अभ्यासपूर्ण माहिती. प्रतिभावान लिखाण
ReplyDeleteKhupach Chan 👌
ReplyDeleteसंक्रांतीच्या दिवशी गंगासागर या ठिकाणी यात्रा भरते..या दिवशी लोक या ठिकाणी गंगा स्नान करण्यासाठी येतात..
ReplyDelete