Tuesday, 11 February 2025

बाबा


"बाबा"

क्षण
( ११ मे २०१२ सकाळी ७ वा. घटना स्थळ हॉस्पीटल, ती वय ३३वर्ष आणि आई ५६ वर्ष)
हॉस्पीटलच्या दारासमोर रीक्षा थांबली. मी लगबगीने पाकिटातुन पैसे दिले. उरलेले परत घ्यायचही न पाहता धाव ठोकली ती जीन्याकडे. तीन मजले जीव धडधडत असतानाही चार चार पायऱ्या झपाझप चढत होते. म्हणून इतर लोकच बाजुला सरकत वाट आपल्या जीवाची काळजीनी देत होते कदाचित. कधी खांदयावरची पर्स सावरत तर कधी खांदयावरची ओढणी सावरत मी विचाराच्या वेगासारखीच धावतच तिसरा मजला गाठत ब्रेक लागल्यासारगी धापा टाकत पोचले.
अतिदक्षता विभागा बाहेर आई जीन्यावर पाय जमतील तीतके जवळ घेत तोंडाला खांदयावरचा पदर लावुन बसवी होती. मी थबकताच तीनं वर पाहिलं आणि जोरात हुंदका देत दाराकडे बोट दाखवलं. इतक्यात दार उघडले माझा हात आपसुकच छातीवर गेला. आई ताडकन उठुन उभी राहिती आपल्या माणसासाठी तुटणारा जीव, असहाय्यता, काहुर भिरभिरणारे मन सगळं सगळं तरळत होतं तीच्या चेहऱ्यावर. माझा चेहरा घामाने डबडबला, दोन्ही हात एकमेकांत वर खाली होऊ लागले. ती नर्स दूसरीकडे निघुन गेली. मी जीन्याच्या बारला धरलेल सोडलं आणि अतिदक्षता विभागाच दार उघडून आत डोकावलं. आई सरळ खाली बसली तीन तोंड दोन्ही पायात खुपसलं होतं हे मी बघितलं.
मी आत गेले. सर्वत्र शांतता. एक लहानसा टपटप आवाज तर मधेच स्ट्रेचर हलवल्याची करकर. बाबांच्या पलंगाजवळ मी पोचले. हिरवा कपडा छातीपर्यंत पांघरला होता. (शांत मुद्रा गार शरीर) मी हाताला हात लावला तो बर्फासारखा थंडगार होता. नकळून टपाटप अश्रू माझ्या हातावरून त्यांच्या हातावर पडू लागते. नर्स आत आली तीनं ईसीजी मशिनकडे बोट दाखवतं. हलकेच डोळे बंद करत पाठ थोपटतली, सलाईनच काहीतरी केलं आणि मागच्या टेबलजवळ बसली. इतक्यात काहीतरी कुई कुई  आवाज आला. माझ्या हृद‌याची धडधड वाढली आणि ईसीजी मशिनवर बाबांची कमी होताना दिसु लागली. माझा हात बाबांच्या छातीवर डोक्यावर झरझर फिरू लागला. देवाचा जप आपोआप मी पुटपुटु लागते. नर्स धावत आली. तीन त्या मशिनवर चे आकडे पाहिले सलाइनच बटण बंद केले. माझी बाबांचा हात चोळण्याची गडबड चालूच होती. तीन मला थांबवलं, मी थबकले, असहाय्य केविलवाण्या नजरेन मी तीच्याकड़े बघितलं. तीनं डोळे खाली करून नकारार्थी मान डोलावतली. निर्जीवपणे पटापट ती मशिन बंद करू लागती. मला मोठा हुंदका आला गपकन खाली खुर्चीत बसले. दोन्ही हातांनी मी माझा चेहरा झाकला ढसाढसा रडू लागले. नर्सनी बाबांचे होन्ही हात पण त्या हिरव्या पांघरुणात घातले तशी मी सावरले, झपकन तीन बाबांचा चेहरा झाकण्या आधी दोन्ही हातांनी त्यांचा चेहरा कुरवाळला, तीनं मला थोपटलं बाजुला केलं आणि त्यांनी हिरव्या पांधरुणात स्वतःला झाकुन घेतलं. बाहेर धाव घेतली.
मी धडपडत अडखळत अतिदक्षता विभागाबाहेर धाव घेतली.
गौरी
११ जुन २०१२

++++++++

आदरणीय ताईस मनापासून नमस्कार मागच्या आठवड्यात बाबांच कळलं मन सुन्न झाल. प्रत्येकाच्या आयुष्यात बाबा या व्यक्तिचं एक वेगळच स्थान असतं. ती जागा भरून काढणं खुपच कमींना जमत. आयुष्यातली जवळ जवळ २२-३३ वर्ष जे आपले आधार, हक्क, आणि बरच काही असणारे आता पुन्हा दिसणार नाहीत हे पचवण फारच जड असतं. मी यातून नुकतीच गेल्यामुळे समोर येवून तुला भेटणं मला शक्यच नाही.
माझे बाबा गेले त्याच्या आधी मी एक दोन जवळचे नातेवाइक गेले त्यांच्या आप्तांना भेटायला गेले होते. मला त्याच्याविषयी प्रेम आपुलकी आत्मियता होती. त्याची त्यांनाही जाणीव होती, कोणाकडू‌नही सहाज म्हटल जाइत तेच मी पण मृणाले होते. "काळजी घे, तुझे दुःख मी समजू शकते. सावर स्वतःला " वगैरे. पण तीन वर्षापूर्वी बाबा गेले तेव्हा मला लोक भेटायला आले तेव्हा वाटलं की अरे नाही माझ्या जगातली पोकळ जागा, ते दु:ख नाही समजू शकत हे सर्व जण. ज्यांनी ते अनुभवलय पेललय तेच समजू शकतीत. हे सर्वजण सांगत आहेत तितक सोप नाहीये हे सत्य स्विकारणं. ते गेले नाहीत. ते प्रसन्न आनंदी आणि Positive energy च्या नावान माझ्या बरोबर आहेत. शरीरानं नसले तरी आर्शिवादाच्या रूपानं माझ्या आजू बाजूसच आहेत. हे मला कसं लिहाव वाटलं माहितीय ताई? तुझी "Still alive post" वाचून. फेसबुकवरची पोस्ट वाचल्यावर एवढं सगळं comment मधे देणे शक्यच नव्हतं पण भावना पोचणं गरजेच होतं आणि सहज पेन उचललं गेल.
त्यामुळे ज्यांचे बाबा गेले अस समजत ना ताई तेव्हा काहूर माजतं मनात. कोणतीही व्यक्ती असो तडक जावून घट्ट मिठी मारावी वाटते. पण ते सहज शक्य नसतं. एखादी व्यक्ति शेवटची घटका मोजतानाचा साक्षिदार होणं फार अवघड आहे. माझ्या समोर एक-एक श्वास माझ्या बाबांचा कमी होत होत शून्य होताना मी पाहिलाय अनुभवताय....
तो जगात कोणाच्याच वाट्याला येवू नये असं वाटतं. गेलेल्या प्रत्येक बाबांच्या मूलीत मला मीच दिसते. काही तासानी मन शांत होतं. जगरहाटी चालू होते. पण मनातत मनातच राहतं. आज मात्र मी मन पानावर उतरवलय खरं, पण वाचताना एखाद्याला काय वाटेल कोण जाणे.
So ताई बाबा "Still alive with positive energy" असच म्हणेन मी. माझ्या शब्दांमुळे जर मन दुखावलं असेत तर क्षमस्व. तू आमचा आदर्श, कणा आहेस अशीच माझ्या /आमच्या पाठीशी रहा.
नमस्कार
गौरी 
३१.०७.२०१५
++++
आदरणीय बाबांना जिथे कुठे असाल तिकडे सा.न.वि.वि. पत्रास कारण तसच आहे काल तुमची तिची झाल्यापासून तुमची खूप आठवण येत आहे. त्यात सध्या एक पुस्तक वाचतेय, प्रत्येक भागात तुमची जागा शोधली जात होती. मृत्यु नंतरचा प्रवास हा कधीही चर्चा सुद्धा न केलेला विषय, जड देह सूक्ष्म देह सिल्वहर कॉर्ड हे नवीन शब्द समजले. तुमच्या अनुभवलेल्या विश्वाची कल्पनाच करू लागले.
जड देह म्हणजे शरीर आणि प्राण म्हणजे सूक्ष्म देह आत्मा. सूक्ष्म देह जड देह सोडताना सिल्वर कॉर्ड मार्फत बाहेर पडतो, तो पूर्णपणे विलग होईतोवर माणूस जीवंत असतो. तुमचा शेवटचा सहवास आणि हा भाग झर्रकन डोळ्यासमोरून गेला. या स्थितीत असताना त्या माणसाला बोलता आल नाही तरी आजुबाजुच समजत अस म्हणतात. म्हणजे मी त्या क्षणी म्हटलेली स्तोत्र, तुमच्याशी बोललेली वाक्य तुम्हालाण समजती असतील. तुमच्या अंगावरून फिरलेले हात, मायेचा स्पर्श, गायू पोथी वाचतेय बाबा तुम्हाला काही होणार नाही हे सगळ सगळ मी म्हटलेलं कळल असेल ना बाबा? त्यावेळी आम्ही कमनशिबीच होतो म्हणा हव तर तुम्ही आम्हाला समजून घेत होतात. पण मी तुम्ही झोपलेले जागे का नाही होत आहात? याचाच विचार करत हलवत होते.
जड देह सोडून जाताना दिव्य आत्मे मदत करतात. तुम्हाला नक्कीच महाराजांनी सहज सोडवत असणार अपार श्रद्धा भूक्ती तुमची त्यांच्या ठायी होतीचा ती कामी आली असणारच! सूक्ष्म देहाला जड देह असे पर्यंत समजत नाही. तो बावचळतो गोंधळतो जड देहाला शोधतो. म्हणून लगेचच अंत्यसंस्कार करतात. गायू, लीना येईपर्यंत तुमवा सूक्ष्म आत्मा आमच्या भोवती आपल्या घरात असणार, नाही नाही होताच. याची कल्पना पुस्तक वाचल्यावर आली. तुमची सग‌ळी प्रिय माणस पाहून तुम्हाला आनंदच झाला असणार. बाबा तुमची पेंडसे कंपनी पण सगळी होती बरका तेव्हा. तुमचा त्यांच्यावर भारीच जीव माहितीय मग.. कोणताही कार्यक्रम झाला आणि तेव्हा तुम्ही नसला की तुम्ही विचारत माझ्या बद्दत काय म्हटला ग तो हा ती ही... पण त्यावेळी तुम्हाला सगळे दिसत असतील आणि तुम्हीच आमच्यात नव्हतात.
अंत्यसंस्कार झाल्यावर आत्मा प्राण पंचमहाभूतांत विलीन होण्या मार्गक्रमण करतो. पंधरा दिवस तो या भूतलावर फिरतो आणि आपल्या आप्तेष्टांना दहाव्या दिवशी कावळ्याच्या रूपात भेटतो. आत्ता पर्यंत नुसता खोकला आला की आम्ही तुम्हाला शोधायचो आणि दहाव्याला दहा कोवळ्यात तुम्ही कोणते? आम्ही ओळखु शकत नव्हतो. आईवर फार जीव होता तुमचा ती एकटी कशी राहिल? याचा विचार होता ना? म्हणून काही क्षण थांबलात ना तेव्हा ? खर सांगा. अहो पण ती आख्ख्या गल्लीला सांभाळेल अशा गट्सची आहे हे विसरतात का? तुमच्यासाठी भरपूर दानधर्म आणि तुमचा पुढचा प्रवास सुखकर होवो यासाठी आईन पण सगळ करायच ठरवलं होत आणि
केलं सुद्धा.
पंच‌महाभूतात विलीन होण्यापूर्वी चुका सुख दु:ख असे बरेच हिशेब दयावे लागतात. स्वर्ग किंवा नर्क यात चार पाच पायऱ्या आधी आहेत. कर्म- कर्म चांगलं असलं की वजन वाढत ते 'चांगल' पारड्याचं. ती व्यक्ती स्वर्गाच्या आधीच्या लोकात प्रवेश करते. तिकडे फकत प्रेम, आदर, आनंद याच भावना असतात. वाइट विचार शिवतच नाहीत. द्वेश, राग, सूड बुद्धी, याच्या पलिकडे जातो माणूस असा हा लोक. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही तिकडेच गेले असणार. आयुष्यभर चांगलं वागलात, कोणाला दुखावली नाही ना? याचाच विचार करत जगलात. कोणीही चुकला तरी माफ करत गेलात. तो वाईट वागला तरी आपण चांगलच वागायचं गौरी, सुडबुद्धी चांगली नाही अस म्हणणारा माणूस याच लोकात शोभून दिसतो.
सूक्ष्म देहाच्या अस्तित्वाची जाणीव संवेदना आभास कावळ्यालाच होते. ती जाणीव इतरांपेक्षा या  पक्ष्याला तीव्रतेने जाणवते. म्हणूनच सूक्ष्म देह कावळ्याच्या रूपात दहाव्या दिवशी दर्शन देतात. आपली इच्छा पूर्ण झाली की पिंडाला शिवतात. त्याच बरोबर माणूस मरण पावणार ही वेळ जवळ आली की, जवळ कावळे ओरडतानाचे पण अनुभव आहेत. तसेच वर्षात सूक्ष्म देह मार्गस्थ होण्यापूर्वी तो कावळ्याच्या रुपात फिरू शकतो. साधारण तुमचे वर्ष श्रादध झाल्यावर किंवा आधी श्राद्ध पक्षात तुमची तिथी करतानाचा माझा अनुभव साधारण असाच आहे. सर्वपित्रीला स्वयंपाक सुरू होता बाहेर कावळा टेरेसच्या पत्र्यावर बसून खुपच ओरडत होता. मला या सगळ्याची अजिबात कल्पना नव्हती. झाडावर काहीतरी झालय may be म्हणून मी आणि अमित बाहेर डोकावलो. पाहतो तर एक कावळा सारखा आत डोकावून पाहात होता आणि ओरडत होता. काय गंमत आहे, कबुतरं येत होती आज कावळा? अस मी म्हटल तर अमित टेरेसमधून डोकवत  म्हणाला की अहो घाणेकर तुमची मुलगी सुखात आहे. काळजी करू नका. आणि ओरडू नका वहिनींचा स्वयंपाक व्हायचाय, जेवायची वेळ झाली की ठेवणार आहेत त्या तुम्हाला पण. टुकुर टुकर पाहिल त्यानं आणि चक्क उडून गेला मग मात्र कधी आला नाही. तेव्हा आमच्या दोघांच्या ध्यानी मनी पण नव्हते.
मनुष्य जन्म अनेक योनी जन्म झाला की मिळतो. जीवन अत्यंत अमूल्य आहे. त्यानंतर मुक्तीचाच मार्ग असतो. बाबा तुम्हाला मुक्तीच मिळाली असणार तुमच्या भगवंताच्या चरणी तुमचा प्राण विलीन झाला असणार यावर गायुचा पण नक्कीच दुजोरा असेल. असेच रहा तिकडून आमच्याकडे पहा आम्ही हे समजून आनंदी आहोत.
आपली आवडती माणसं त्यांच्यासारख्याच दुसऱ्या माणसाच्या रूपात दिसू शकतात, क्षणभर तो भास होतो. अस कधी होवू शकत. खुपच आठवण आली तर काही निमिष पुण्यात्मे दिसू शकतात. ती व्यक्ती काही क्षण दिसते. ती खरी-खोटी किंवा तशीच दिसणारी पण बरच साम्य असणारी दूसरी पण असू शकते. काही दिवसापूर्वी आयुर्वेद रसशाळेच्या चौकात सिग्नलला मी सर्वात पुढे होते. सिग्नल असूनही मनात धास्ती असल्या सारखा एक सेम टू सेम तुमच्यासारखाच माणूस मला दिसला. बाबा अगदी तुमच्या सारखे कपडे, चालण्याची पद्धत, थांबलेल्या गाड्या असूनही हात दाखात रस्सता क्राॅस करणारे, आनंदान हसून माझ्या बघत काही निमिष ती व्यक्ति डोळ्यासमोरून सरकली. जणू काही तुम्हीच हसून टाटा करत आहात.
एक क्षण वाटल तुम्हाला थांबवाव. पण ते तुम्ही
नाही याची पक्की खात्री होतीच. तसेच दूसरी कोणी व्यक्ती असेल तर त्यांना काय वाटेल ? आणि सिग्नल पण सुटणार होता. टचकन डोळे भरून आले. पुढच्या चौकात लोक माझ्याकडे बघू लागलेली मला समजलं. मी थांबले पहिला गायूला फोन लावला. दुदैवाने ती बोलू शकती नाही. काही क्षण मोठा श्वास घेता. गाडीवरच प्राणायाम करून मी घरी आहे. आता काही वाटत नाही पण ती व्यक्ती तुमचाच भास होती.
अशा प्रकारे योग्य कर्म करत जास्तीत जास्त पुण्य जमवत, सकारात्मक विचार करत, चुकलेल्याना माफी देत आयुष्य सुंदर जगू शकतो हा विचार पुन्हा उजळला. या पुस्त‌कामुळे मी आज शांत प्रसन्न चैतन्यदायी अनुभवत आहे. स्वतःकडे जगण्याचा आनंद घेण्याचा अजुन दृढ असा दृष्टीकोन मिळालेली मी जास्तीत जास्त आनंदाचे क्षण जमवत जाणार आहे. जाते आहे तुमचा आर्शिवाद असू द्या. भगवंताच्या चरणी विठीनल झालेल्या तुम्हाला माझा पुन्हा एकदा सा.न.
आज या पुस्तकामुळे तुमचा मृत्यु नंतस्था प्रवास समजला. त्या लेखकांना मनापासून धन्यवाद! 
तुमचीच गौरी
०७.१०.२०१५
++++++

++++++

Sunday, 9 February 2025

माझ्या आयुष्यातील आरसा "अंगण"

माझ्या आयुष्यातील आरसा "अंगण"

"अंगण" म्हणजे घराचा आरसा म्हणतात. घराची, त्यात जपल्या जाणाऱ्या संस्कारांची झलक अंगणात होते. माझं माहेर वाडा संस्कृतीतल असल्यामुळे अंगण म्हटलं की मला तेच आधी आठवतं. माणसांनी गजबजलेली मागे पुढे अशी दोन अंगणं असा भरगच्च वाडा होता आमचा. 

(संग्रहीत)
वाड्याच पुढच अंगण सतत दिसायचं कारण ते घरासमोर होतं. आमच्या खिडकीतून ते दिसायचं. अंगण म्हणजे दंगा, अंगण म्हणजे दुपारच्या कामाचा कारखाना, अंगण म्हणजे पत्ते; नवा व्यापार आणि शिरापुरीचे रंगलेले डाव. याच अंगणात टिपरी पाणी पण व्हायचं. याच अंगणात रात्री भिंतीवरल्या सावल्या पाहुन काल्पनिक सिनेमे चालायचे. याच अंगणात वाड्यातले लग्नाचे जागरण गोंधळ व इतर कार्यक्रम होत असत. चारी बाजुनी घरं मधे अंगण याच साजर रूप दसरा पाडव्याला असायचं. याच अंगणात टोपलीत मांजराची पिल्लं ठेवायचो; आपुलकीने आमच पुढचं अंगण ओतप्रोत भरलेल असायचं. याच अंगणात लहानांपासून मोठ्यांपर्यंतची भांडण पण होत असत. आता आठवण म्हणून फक्तं पुसटशी रेघ उरलीय त्याची.

असच चेहेलपहेल असलेल आमचं मागच अंगण. आरोळे वहिनीनी लावलेली उंबर, कापुस आंबा अशी पण मोजकीच झाडं होती. अर्थात तुळस होतीच. या अंगणात आंधळी कोशिंबीर रंगत असे. इकडे मोठी मोरी होती. जवळच विहिर होती. पूर्वी ऊघडीच होती नंतर बंद केली. याच अंगणाला होळी पेटवायचा मान होता. वाडा संस्कृतीचा वारसा आणि आमच्या मनाचा आरसाच होती ही दोनही अंगणं'.

आता चित्र वेगळ पण तितकच मनमोहक. फलॅट संस्कृतीचा आरसा अंगण म्हणजे टेरेस. अंगणाची जागा जागा टेरेसनी घेतलेली, पण ती पण हक्काची जागा. पण हे आधुनिक अंगण पण काही कमी नाही. याच अंगणात माझे लेकरू दुडु दुडू धावताना पाहिलय. तुळशीतली माती खाणं, दिवाळीत किल्ला करणं हे मी आणि त्याया लेकरानं याच अंगणात अनुभवतय. मोठी नाही पण लहान वाळवणं इकडे होतातच. ब्रम्हकमळाला भरपुर फुल येतात तेव्हा त्याची पुजा इकडे होते, जणु गर्भार बाईच झोकातल डोहाळजेवणच सुरू आहे.

या माझ्या छोट्याश्या अंगणात तुळस, कढीपत्ता, लाल-  पिवळा जास्वंद, तगर, मोगरा, अनंत, मिरची, झेंडू, शेवंती आनंदान गुण्या गोविंदान नांदत आहेत. मधे मधे एकवेळ पुरेल एवढी मेथी येतेच. तो आनंद काय वर्णावा, आपण लावलेलं झाड, त्याच आलेलं फळ काय आनंद.

  हा आनंद मला माझ हे छोटसं अंगण देतं. सूर्योदय पाहात, वाचन, लिखाण, व्यायाम इकडेच होतो. याच अंगणात कॅरम पत्ते डाव भिडतात. अलिकडेच या अंगणात मी रांगोळ्या पण काढते. माहेरी अंगणात रांगोळी काढण्याची उर्वरित ईच्छा आता एकडे पुरी झाली. माझ्या या सोनपावलाच्या अंगणात केन वुडचा झोका बांधुन किती तरी डोहाक जेवण झाली.

मला जितक स्वयंपाकघर आवडतं आवडतं तितकच अंगणही निटनेटकच आवडतं. जे आहे त्यात आनंद मानून आपण सुखी होऊ शकतो हे मला या माझ्या पिटुकल्या अंगणानी शिकवलं. लहान लहान गोष्टीतला आनंद शोधायला शिकवलं. मी या माझ्या आयुष्यातल्या दोन्ही अंगणांची खूप खुप आभारी आहे. एकाने माहेरचं सुख दिलं तर दुसऱ्याने सासरचं!
धन्यवाद! तुम्हाला आठवतय का तुमच अंगण? दोन चार वाक्यात कमेंट बॉक्स मधे लिहा. मला आवडेल.

सौः गौरी पाठक.
०३.०४.२०२०
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++


अंगण ईतिहास 
*अंगणाचे स्थापत्य नियोजन सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरू झालेल दिसतं. *भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अंगणांना वेगवेगळी नावे आहेत. केरळमध्ये, त्याला नालुकेट्टू (खोल्यांच्या संचाने वेढलेले मध्यवर्ती अंगण), राजस्थानमध्ये हवेली , गुजरातमधील वाडा घरे ,अहमदाबादमधील पोलमधील घरे इत्यादी म्हणून संबोधले जाते. रोमन संस्कृतीत घराच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेला कर्णिका असे संबोधले जाते , जिथे ते बागकाम करतात आणि पावसाचे पाणी गोळा करतात. *गोव्यात, ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही अनेक "राजंगन" किंवा अंगणातील घरे आहेत. या प्रकारची वास्तुकला कर्नाटकातील थोट्टीमाने शैली, तामिळनाडूतील चेट्टीनाड शैली आणि राजस्थानातील हवेलींच्या वंशावळीत येते . *अंगण इमारतीचा कार्बन फूटप्रिंट अधिक प्रभावीपणे कमी करते.  
(संग्रहित)

Tuesday, 28 January 2025

ऑफिस ऑफिस

माझं ऑफिस माझं माहेरच !
अनेक वर्ष दिवसातले ठराविक तास एकत्र राहून आपण नकळत एका छान नात्यात बांधले जातो. रक्ताचा माणूस पण वेळ पडली तर त्रयस्थ म्हणून सल्ला देण्यास चुकेल पण हे नातं तस नसतं. आपल म्हणणं समजून तो त्यावर व्यक्त होतो, वेळप्रसंगी चूक पण दाखवतो. यांनी दाखवलेली चूक समजते, राग येत नाही. जगात कस वागावं? काय चूक काय बरोबर हे यातूनच समाजत. 
मी पदवीधर झाल्या नंतर नोकरी केलीच पण मोठ्या कंपनीत लागले ती मराठे इन्फोटेकलाच. आमचं ऑफिस गोकुळ होत. 
बावीस पुरुष आणि मी एकटीच महिला होते. मी ग्राफिक डिझाईनर होते. माझ्या वयाचे चार जण होतो, बाकी वयानी अनुभवांनी मोठे होते. मार्केटींगचे पण सगळे सहकारी मस्त होते. 
फिल्डवरचे अनुभव ऐकत लंच होत असे. माझे लग्न झाले तेव्हा रुखवत सामान नेताना पासून सगळी मदत केलेली. लग्नानंतर ऑफिसला आल्यावर उखाणा घेऊनच आत घेतले. इतपत सगळे या सहकार्यांनी केले. पुणे शाखेतली पहिली महिला असल्याचा आजही मला खूप अभिमान आहे. सध्याच्या जीवनात जगताना मुख्य असणारा "ई-मेल" हा कसा करायचा? हे मी इकडे शिकले. अकाउंट पण नव्हतं तेव्हा माझं. शिस्त, काटकसर, तसेच कामावरच प्रेम कसे असावे हे मी इकडेच शिकले. आमची दरमहा १ तारखेला ठाणे ऑफिस ला मीटिंग असायची. सगळ्यांबरोबर मी त्यांच्याच डब्यात चढून आपोआप जायची यायची. लोकलची अजिबात नसलेली सवय हळू हळू झाली. खूप छान सांभाळून घेत असत. रोज रोज नवीन शिकायला मिळायचे. टेलिमाकेर्टिंगच कोणी नव्हतं ते पण काम कमी तिथं आम्ही मध्ये शिकले. हा गुण इकडेच रुजला. एक रजेवर असेल तर दुसर्यांनी न सांगता त्याचे टेबल बघायच आपलं काम समजून. हे आज काल पाहायला मिळत नाही. जरा कुठं वजन जास्त झाले रे झाले कि ताशेरे उमटत जणू काही माझे पालकच होते सहकारी दोस्त लोक. काही जण काळाआड झाले पण बाकीचे अजूनही बोलतो. 
खूप महत्वाची आणि वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे सगळे मॅनेजर, मालक आणि आम्ही एकत्र गोल करून लंच करत असू. आयुष्यात हे पुढे कधीच बघितले नाही. पाच सहा वर्ष आठ आठ तास एकत्र काम करून आम्ही सगळे दुसरे घरचं झालो होतो. सहकाऱ्यांच्या लग्नाला एकत्र जाणे, केळवण, डोहाळजेवण, मुलांचे वाढदिवस साजरे करतानाचे अनंत गमतीचे किस्से. काय मजा असायची. अडीअडचणीत तर आधारच होत असत एकमेकांचे. 
पुण्याबाहेरचे मार्केटिंगचे सहकारी येत असत. तेव्हा जेवणाचे बेत होत असत. ठाणे पुणे ऑफिस ची एकत्र सहल पण जबरदस्त होती. आमचे कंपनीचे मुख्य हेड कडक पण फणस होते. त्यांचे वडील कधी कधी येत असत, ते माणसे बरोबर पारखत. त्यांना बघून मी हे टिपले होते. मराठे इन्फोटेक मध्ये मला जिगरी दोस्त पण मिळाले. जे अजूनही त वरून ताकभात आहेत. ईथं असतानाच मला मुलगा झाला. तेव्हा पण सहकार्यांनी खूप मदत केली. डिरेक्टरी येणार असली कि दिवस रात्र काम होत असायचं. पॅन्ट्रीतल्या गॅस वर कायम चहा होत राहायचा. हे एक सुख होत.
ऑफिसची पुणे शाखेतली माझ्या पाच सहा वर्ष खूप मोलाची होती. लहान वयात लाभेलेलं मार्गदर्शन, प्रेम आपुलकी मी विसरू शकत नाही. मराठे इन्फोटेक (MID) माझ ऑफिस तर होतच पण माझं माहेर म्हणून जास्त होत. आयुष्यात असलेलं हे दुसरं माहेरचं, माझ्या सारखी भाग्यवान मीच असाच म्हणते मी.
गौरी पाठक पुणे
##############

अभिप्राय 

मस्तच!

तुमचा ऑफिस चा पहिला दिवस मला पण चांगला आठवतो
राखाडी रंगाची काठपदराची साडी आणि गुलाबाचे फुल देऊन सगळ्यांचे स्वागत करतानाची तुमची छबी आजही आठवते
ट्रिप ला काढलेले तुमचे फोटो, शिरीन ची डोकं फिरवलेली वेबसाईट आजही नाशिकला जाताना द्वारका सर्कल वरचं त्यांचं ऑफिस पाहिलं की हमखास तुमची आठवण होते
अस म्हणतात की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुमच्या जीवनाचा संपूर्ण पट डोळ्यासमोरून जातो
मला खात्री आहे त्या वेळेचा माझ्या प्रवासाचा पट हा 70% MID च्या आठवणींचा असेल
आपण सगळे शेवटच्या क्षणापर्यंत MID चेच असणार हे मात्र नक्की
👍👍
++++
 khup chan vatl junya athvani jaglya zalya

Thursday, 23 January 2025

दृष्टीहीन जगातले डोळस आत्मे.

जय श्रीकृष्ण 
आज गुरुवार लाइट जाणार ठाऊक होतं पण मायनस वन पार्किंगला अंधार असेल अस लक्षात नव्हतं. मोबाईलचा टाॅर्च लावला आणि ज्युपीटर शोधली.  फोन खिशात ठेवला पण किल्ली लावायला कुठ सापडतय. चर्र झालं क्षणभर विचार आला की दृष्टीहीन महिला ज्यांना मी भेटणार होते त्या कस जगत असतील? जेव्हा पासून मी त्या अंध महिलांच्या संस्थेला भेट देणार ठरवल तस मला उत्सुकता वाढत होती.
आणि तो दिवस आला. दहा वाजता निघायच होतं तासाभरात पोचू. उपकार कसे केले दाखवायच म्हणून नव्हे तर ब्रह्मविद्येच्या अभ्यासात शिकले की स्वतः च्या ठणठणीत शरीराचे आभार माना यासाठी अशा संस्थांना भेट द्यायची हा हेतू. आपल्याकडे सर्व अवयव ठणठणीत आहेत, ते नसलेले कसे जगतात पाहून आपण ते मानू शकतो आणि समाजाच देणं पण दिलं जातं.

शिर्डी साईबाबा संस्थांतर्फे चालवली जाणारं हे अंध महिला आश्रमसिंहगड रोडवर आहे.  शोधत शोधत गेलो पण मनात घरघर होतीच. आश्रमासमोर मोठ पटांगण, त्यात सहा सात झोके होते. ईकडे एकत्रित कार्यक्रम होतात हे नंतर समजलं. सहा सात पायरी चढुन वर गेलो तर एक ऊंच प्रसन्न व्यक्तिमत्त्व हसत स्वागत करत समोर. वाॅचमननी तांदूळ आत नेण्यास मदत केली. आत ऑफिस मधे बसलो. ओळख झाली, त्यांनी आश्रमाची थोडी माहिती दिली आणि मागे टिव्ही रूममधे सगळ्यांना बोलवत आहोत तिकडे जा, सांगुन त्या मिटींगला गेल्या.
ऊजवीकडून वळल्यावर सरळ जाताना आधी खोल्या लागल्या. सगळीकडे त्या आपापल्या फिरत होत्या कोणी आधारानं तर कोणी आवाजानं, दोनचार हलक्या धडकल्या पण. आम्ही अचानक मधे होतो त्यांचा तो हमरस्ता होता. आपापल्या आवडीचे सोईचे कपडे घालतात अस दिसलं. दोन खोल्या गेल्यानंतर बैठकीची खोली टिव्ही रूम आली. मोठे तीन सोफे, शेजारी संगमरवरी देवघर, समोर उजवीकडे खुर्च्या मधे सतरंजी. कोणी कुठ बसायच जागा ठरलेली असावी. एक चोवीस तासाची प्रेमळ मावशी प्रत्येकीच नाव घेऊन मदत करत होत्या. जीवाची घरघर थांबुन आता ते गलबलुन आलं होतं. कोण आलय ? नाव काय? विचारल कोणीतरी.  मी नाव सांगितल आणि तुमच्या बरोबर हळदीकुंकू तीळगुळ वाणासाठी आलेय म्हटलं. एका सुरात टाळ्या झाल्या. 
आता सगळ्या जमल्या होत्या. मी जय श्रीकृष्ण म्हणत वर बघता का कुंकू लावते म्हटलं की पटकन वर बघत हसतमुखाने लावुन घेत होत्या. तीळगुळ आईंनी दिला. हात धरून रूमाल देतेय वापरा बरका म्हणत वाण ही देऊन झालं. स्त्री सुलभ स्वभावच तो काठ काठ तपासत कापड हाताळत होत्या. काही जणी अजुनही आपल्याच विश्वात होत्या पण साहजिकच आहे. ईतर सहकारींना पण वाण दिलं.
नंतर मावशी म्हटल्या खाली बसा आणि विचारा काय करता किंवा ईतर बोला त्यांना आवडेल. जरा प्रश्न पडला आधी पण ऐकेकीशी बोलताना जरा बरं वाटलं. एकेक जण काय करतो विरंगुळा म्हणून आणि ईकडं कशा आल्या सांगत होत्या. एक गोष्ट मात्र सारखी होती त्या जीवनात खुष होत्या. अडचणीवर मात करून आनंदी जगायला शिकल्या होत्या. आश्रमातच बरं वाटतं असही काही जणी म्हटल्या. एक जण भजन छान म्हणते मी म्हटल्या आणि सुरेख भजन म्हटलं. गोपालजी कृष्णाच गाण सुमधुर आवाजात त्यांच्यात बसुन ऐकलं आणि कान्हाजी बरोबरच आहेत अस वाटलं. एवढ्यात माझा वाढदिवस आहे हे त्यांना कळलं. गौरीताईचा वाढदिवस आहे अग, ह्या ताईचा वाढदिवस आहे, पटापट  एकमेकींना सांगितलं. टाळ्या वाजवत happy birthday song म्हटलं. एका आजींनी वाढदिवसाच सुरेख गाणं म्हटलं.

काहुर माजतं म्हणजे काय आणि तरी हसत चेहरा ठेवत मला राहण कसबच होतं. आता खरी परिक्षा माझी होती. गौरी ताई आता तु एखाद गाण म्हण त्याशिवाय सोडणार नाही आम्ही.  झालं!  एकही गाण डोळ्यासमोर येईना. शेवटी गुगलबाईला हाक मारली आणि सुंदर ते ध्यान अभंग म्हटला. आणखी काहींशी बोलण झालं. आईशी पण गप्पा मारल्या. एका आजींनी लगबगीने जाऊन क्रोशाचा विणलेला टेबल क्लाॅथ आणला. हा तुझ्यासाठी आहे आवडेल ना?  आधी मी नको म्हटलं पण त्या ऐकेना. आजच सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट हेच होतं. आपल्याकडच काढुन असच सहज समोर आलेल्या अपरिचित बाईला देण्यासाठी मन खुप मोठं लागतं. आज साने आजी आठवल्या.
नंतर आम्ही परत ऑफिस मधे जायला निघालो तर एक काकु हाक मारून चहा आणतेय बसा म्हटल्या. खरं सांगते फार छान वाटलं. ऑफिस च्या शेजारी खोलीत बसायची सोय होती. त्यांनी केलेल्या वस्तू ठेवलेल्या पाहात होतो तोच चहा आला. मावशींनी त्यांचा आश्रमाचा सविस्तर दिनक्रम आणि काय काय मदत लागु शकते सांगितलं.
(त्यांनी केलेल्या वस्तू)
चहा झाल्यावर आश्रम दाखवलं. खोलीत जाऊन बोलण झालं. पलंगावर बसुन मण्यांच काम करताना बघुन आश्चर्य वाटलं, ईकड ४० नंतर सुई ओवताना फ्या फ्या होते म्हणतो आणि यांना बघा. मणी, रंग सामान कस ओळखतात जरा चर्चा झाली. स्पर्श नावाची देणगी आपण वापरतच नाही अस वाटलं. ज्यावर या जगतात.
दृष्टी कमी किंवा नाही तरी आवरून राहणं, आपली कला जपणं बघुन कौतुक वाटलं. नंतर डायनिंग हाॅल, स्वयंपाकाची मोठ्ठी खोली, परसदार, ओपीडी, व्यायामाची खोली दाखवली. परिसर नीटनेटका स्वच्छ होता. मुख्य मॅडमशी बोलुन सगळ्यांना टाटा करत खाली ऊतरलो. सगळ्याच पूर्ण दृष्टीहीन नाहीत काहींना कमी अधिक प्रमाणात दिसतं त्या ईतरांना मदत करतात.
आज अवयवांच महत्व तर समजलच पण आज एकमेकांना साथ देण सांभाळणं आपलस करून घेण पण किती मोलाच आहे हे पण समजलं. नवीन आलेल्या महिलेला त्याच आधी सामावुन घेतात आमच काम फक्त लक्ष ठेवण अस समजलं तेव्हा वाटलं की हा चांगुलपणा धडधाकट जगात पण असायला हवा, वाढायला हवा. तस झाल तर जग आणखी सुंदर होईल.
२१.०१.२०२५

#####
वा वा !!!! गौरी बाई !!! किती छान !!!
सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप आभार की तुम्ही त्या आश्रमाला भेट दिलीत. दुसरे आभार यासाठी कि तुम्ही ते सगळे शब्दबद्ध केलेत आणि ते ही इतक्या सुंदर पद्धतीने. 
एका बाजूला तो आश्रम आणि दुसऱ्या बाजूला तुमचे लिखाण !!!! दोन वेगळे गिफ्ट मिळाले. तुम्ही जे लिहिले त्यातून ते सगळे अगदी तसेच दिसले जसे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले.
हल्ली आपल्या वाढदिवसाला लोक काय काय करतात !! हा विचार न केलेला बरा. कारण टेकनॉलॉजीच्या ह्या प्रवाहात असे काही वाहून जात आहे की, ते परत मिळेल याची काही शास्वती नाही. त्यात तुम्ही, तुमचे पाय ज्या दिशेला वळले, अश्या आश्रमाला भेट दिलीत जे खरे मंदिर आहे. तिथे खरा देव आहे. जसे तुम्ही स्पर्शाची देणगी या बद्दल लिहीले त्याप्रमाणे अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची असून पण माणसाला जाण नाही. प्रत्येक गोष्टीची उणीव त्या ठिकाणी आहे जिथे ती नाही आहे, पण जिथे आहे, तिथे मात्र ती गोष्ट व्यर्थ आहे. कारण असणाऱ्याला किंमत नाही आहे. 
तुमच्या जाण्याने, नक्कीच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा संचारली असेल, आपल्याकडे पण येणारे कोणीतरी आहे, याची जाणीव त्यांना झाली असेल आणि सगळ्यात महत्वाचे, की टेकनॉलॉजीच्या जगात माणुसकी टिकून आहे, हे त्यांना समजले असेल. 

तुमच्या या पुढाकारासाठी तुमचे खूप कौतुक. दिवसेंदिवस, तुमचे व्यक्तिमत्व खुलत चालले आहे, लिखाणातून, विचारातून. समोर बरेच दिसते पण त्यातली प्रत्येक गोष्ट बघण्याची नजर प्रत्येकाकडे नसते, जी तुमच्याकडे आहे. असेच करत जा, यातून एक प्रेरणा मिळाली. 
धन्यवाद
******

Friday, 29 November 2024

श्रीकृष्ण रूपं


१) श्री राधारमण जी, वृंदावन 
याची स्थापना 500 वर्षांपूर्वी गोपाळ भट्ट गोस्वामी यांनी केली होती.


२) श्री द्वारकाधीश कृष्ण, द्वारका 
भगवान श्रीकृष्णांचा पणतु वज्रनाभ याने ऊत्तराच्या संकेतानुसार मूर्ती बनवुन घेऊन हे देऊळ बांधले होते.


३) श्री बांके बिहारी जी, वृंदावन 

४) श्री राधावल्लभ लाल जी, वृंदावन 

५) श्री नाथ जी, नाथद्वारा, 

६) श्री रणछोर जी, डाकोर

७) श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा 


८) श्री केशवराज जी, बेट द्वारका 







Tuesday, 5 November 2024

सोमनाथ आणि द्वारका २०२४

२०२४ हे वर्ष परमेश्वरानी छान छान दर्शनं घडवली. सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग चेरी ऑन द टॉप हि कि द्वारकाधीश दर्शन पण घडवलं. 

पुणे ते वेरावल   
अनेक वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून समजल होतं कि भगवान श्री कृष्ण निजधाम भूमी आहे. जवळजवळ १४-१५ वर्षांपूर्वीच ती जागा पाहायला मिळेल का? अस वाटायचं. मनात ती कशी असेल ? भगवंत तिकडे कसे असतील मी बॅक ऑफ द माईंड विचार करत असे. तिच्या तोंडी वेरावल गावाचं नाव पण ऐकलं होत. एखादी गोष्ट घडण्यासाठी तिचे बीज खूप आधी तो पेरतो मग आपला ध्यास किती प्रमाणात असेल तसे ते घडत असावे. तेव्हाची इच्छा या दिवाळीत पूर्ण करून घेतली त्यांनीच... 
पुण्यातून वेरावला पोचायला ट्रेननी जवळजवळ २०-२१ तास लागले. खाडीचा भाग, भरपूर छोटी जहाज भारताचा झेंडा लावलेलं गाव पाहून कल्पना आली कि हवामान दमट असणार आहे. ठरवलेला वाहनचालक अचानक येऊ न शकल्याने त्यांनी त्यांचे ७४ वर्षाचे वडील गाडीबरोबर पाठवले होते. वेरावळ रेल्वे स्टेशनहुन आम्ही दुपारी ३. ३० ला सोमनाथला निघालो. आजोबा भारी होते. वाटेत ते सांगत होते मोदींची स्तुती करत होते. सोमनाथ द्वारका मध्ये सुधारणा केल्यानी लोक सुखावले वाटले. वेरावल बघुन गोव्याची आठवण झाली. वाटेत काही भागात थोड्या थोड्या अंतरावर गस्त घालणारे पोलिस व चौक्या दिसल्या. सोमनाथ ट्रस्टची जमीन अनधिकृतपणे ताबा घेतलेली सोडवून सुरक्षेसाठी त्या आहेत, हे मला गाईडकडून समजलं.

सोमनाथ  
सोमनाथ ला पोचलो मोजून २० मिनिटात. छोटसच पण अभूतपूर्व ऐतिहासिक गावच जणू!
माहेश्वरी अतिथी भवन मध्ये आम्ही उतरलो होतो. चार महिना लाईट शो जो बंद होता तो नेमका आजच सुरु झाला आहे असे गेल्या गेल्याच समजलं. फार आनंद झाला.
आवरून आम्ही सोमनाथ च्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. समुद्रदर्शनला सायकल ट्रॅक पण आहे. किरकोळ तिकीट घेऊन तो परिसर नीटनेटकेपणाने जपला आहे. मस्त पायवाट करून कडेला भिंती बांधून सुरक्षित तो बांधला आहे. छोटी चौपाटी वजा आहे. इकडे गेल्यावर सोमनाथ ज्योतिर्लिंग चे सलग दर्शन उजवीकडे आणि डावीकडे उड्या मारणारा समुद्र असे एकाच फ्रेम मध्ये पाहता येते. इकडून फोटो काढू शकतो. आत फोटो काढू शकत नाही आपण. 
सोमनाथच्या महादेवाची आरती ७ वाजता असते. तेव्हा अचानक गर्दी झाली. लाईट शो तिकीट खिडकी ६. ३० ला उघडते आणि ती आतच आहे. आधी तिकीट काढून मग सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाला गेलो. लाईट शो ८ वाजता आणि ९ वाजता असतो. आम्ही ८ च तिकीट काढलं. 
आता महत्वाचा मुद्धा हा कि सोमनाथ ज्योतिर्लिंग देवळात जाताना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोठ्या पर्स काहीही आत नेऊ देत नाहीत. बाहेर काउंटर वर जमा करून मगच आत जावे लागते. तुम्ही कोणी जाणार असाल तर मोठी पर्स रूमवर ठेवून छोटी पर्स आणि मोबाइलला इतकंच न्या. पैशाची छोटी पर्स आत नेऊ देतात. मोबाइलला जमा करून नंतर आत चपला जमा करून मग आत जात येते. लाईट शो बघून बाहेर येईपर्यंत फोने चपला जवळ नसतात त्यामुळे कुठं भेटायचं दर्शन झालं कि ते ठरवून मगच आत जायचं कारण स्त्री पुरुष रंग वेगवेगळ्या आहेत. वयस्कांना बॅटरीची मोटार गाडी करून आत जायची सोय आहे. 
साडेपाच ला आम्ही  मोबाईल पर्स जमा करून सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देवळात गेलो. आत गेल्यावर तिकीट काढून रांगेत लागलो. सुंदर कलाकुसरीचे काम असलेले खांब बघत संध्याकाळचा गारवा अंगावर घेत आपण आत जातो.
ज्योतिर्लिंग असलेले गर्भगृह, सभा मंडप, नृत्यमंडप असे तीन भागात हे आहे. देवळाच्या डाव्या बाजूला फोटो गॅलरी आहे. देवळाच्या उजव्या भागाला बाण स्तंभ आहे. त्या बाणाचे टोक ज्या भागाकडे आहे तिकडे जमिनीचा शेवट आहे. त्यापुढे फक्त पाणी.. देवळाच्या दगडाचा रंग चंदनासारखा दुधाळ आहे. शिष्त कडक होती पण ती गरजेची पण आहे. 
अनेक दिवसाच्या प्रतिक्षे नंतर मी प्रत्यक्ष सोमनाथ ज्योतिर्लिग समोर उभी होते. अस्टरची जांभळी आणि पांढरी शेवंतीनी सजवलेला देव रूपवान दिसत होता. पाय उंचावून पाहिलेलं रांगेतून तेव्हाच अंगावर शहरे आलेले अजूनही तस्सेच होते. हीच ती पावन भूमी जिकडे जवळ जवळ सर्व देवतांची पायधूळ लागली. भगवान महादेवाचे प्रत्यक्ष रूप पाहून मन भावविभोर होते. किती दुष्टांनी हि वास्तू उधवस्त करायचा प्रयत्न केला पण सनातन धर्माचे हे सत्व असणारे शिवलिंग स्वतःच अस्तित्व आपल्या सारख्यांसाठी भक्कमपणे उभे ठाकून आहे. महादेवाची लीला अपरंपाराच ! सोम अर्थात चंद्र यामुळे याची इकडे स्थापना झाली. त्या चंद्राला पण मनापासून नमस्कार. महादेवाचे शिवलिंग उंच आहे आणि मोट्ठे पण.... अहाहा!! मनभर बघू पण दिले कारण खूप गर्दीच नव्हती. फोटोमध्ये जेवढा मोठा गाभारा आहे तो बाहेरून दिसत नाही फक्त मधे शिवलिंग आणि मागची पार्वती माता दिसते. तेजस्वी रूपाची पार्वती माता.... दर्शन घेऊन बाहेर आलो... गर्दी नव्हती परत रांगेत गेलो, सुरेख दर्शन आणि घंटा डमरू वाद्यांबरोबरची आरतीपण मिळालं.  आरतीचे शब्द कळत नव्हते पण मन आल्हाददायक अनुभूती घेत होतं.
जय सोमनाथ 


सात नंतर बाहेरून लाईट सुरु झालेले देऊळ मनमोहक दिसत होते. वारा पण आता छान सुटलेला. तसेच लाईट शो कडे गेलो. आत गेल्यावर बाण स्तंभ दिसतो. जवळून बघू दिला हात लावायला अलाऊड नाही. बारा ज्योतिर्लिंगातले हे पहिले ज्योतिर्लिंग यातला हा बाण स्तंभ आहे तसा आहे. त्यावर " आसमुद्रांत दक्षिण द्रव पर्यंत अबाधित ज्योर्तिमार्ग " असे लिहिलेले आहे. 

अमिताभजींच्या आवाजातला सोमनाथचा ईतिहास ऐकत बघत आपण भारावून जातो. आताच्या पिढीला आपण काय बघतोय का बघतोय ? हे समजतं.  यात मला नवीन माहिती समजली ती अशी की बरेच योद्धा होते सोमनाथ ज्योतिर्लिंग वाचवणारे. त्यातले एक हमीरजी गोहिलजी. यांचा स्मारक पुतळा सोमनाथ ज्योतिर्लिंग देवळाच्या समोरील चौकात आहे. आपली जमिन यवनांपासून वाचवणारे असे अनेक योद्धे आपल्याला ठाऊकच नाहीत याची तीव्र जाणीव मला झाली. 
सोमनाथचा बीच वाॅक वे, सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि नंतर लाइट शो बघुन घरी जाताना देवात ठेवायला मस्त शंख घेतला. इतक्यात ठरवलेला वाहनचालक आला भेटला आणि प्रभू रामचंद्रांच देऊळ पाहायला घेऊन गेला. अत्यंत भव्य प्रसन्न मूर्ती आहेत. पाच फुट वगैरे ऊंची असेल, अस वाटत पटकन खाली ऊतरून येतील आता. याच्याच मागे परशुरामांच देऊळ व कुंड आहे. याच्या मागे समुद्र किनारी श्री चंद्रभागा शक्तिपीठ आहे. जो त्रिवेणी संगमाचाच भाग आहे.
न चुकता राम मंदिरात साष्टांग नमस्कार घालायला  गाईड कम वाहनचालकानी लावला. सनातन धर्माची ओळख हीच आहे ती आपण पुढच्या पिढीला आठवण करून दिली पाहिजे ही गोष्ट फार भावली. आपणच आपली संस्कृती जपायची तर ती जगेल हे त्याची वाक्य फार आवडली. नंतर काठियावाडी थाळी एकदा तरी या प्रवासात आस्वाद घ्या अस सांगून तो आम्हाला रूमवर सोडून गेला. दुपारी ३ आणि रात्री १० नंतर जेवण मिळणार नाही अस समजलं. साडेनऊ झालेले मग काय तर जवळच्याच सरदार रेस्टॉरंट मधे मस्त पंजाबी जेवलो आणि मग गुडूप.

दीव बेट  
सकाळी माहेश्वरी अतिथीमधूनच ईडली वडा सांबार नाश्ता करून दीव फोर्टकडे निघालो.
 जातानाचा रस्ता एकदम बढिया आहे. पवनचक्कीच पातं नेतानाचे ट्रक दिसले. प्रथमच तीचा अवाका समजला. पूर्ण हिरवा गार दोन्ही बाजुंनी शेतीनं फुललेला रस्ता, मधेमधे भरपूर नारळाची झाडं. वाटतच नव्हत की गुजरात आहे. भुईमूग ऊस नारळ पलिकडे कपिला नदी.
आता आम्हाला नवीन ठिकाणी जायची संधी लाभली ते म्हणजे "प्राची तीर्थ". मोक्ष तीर्थ पण म्हणतात.  सरस्वती नदीच्या घाटावरहे आहे. जबरदस पाण्याचा प्रवाह, टिपीकल गावाकडचा माहोल. घाटावर पिंपळाच मोठ्ठ झाडं आहे, तिकडे गुरूजी सांगतात तीन लोटा पानी डालो, सौ बार काशी एक बार प्राची असा या जागेचा महिमा.
नमस्कार दक्षिणा फोटो सगळ करून परत दीव बेटा कडे वळलो. वाटेत आजोबांनी परत ईधर नाश्ता करो म्हणुन थांबवलं. परत फाफडाच की...
आलु पराठा खाऊन घरची जरा आठवण झाली. महत्वाच म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह होतं.
सोमनाथ ते दीव बेट दीड तास लागला. ऊकाडा वाढला. आता आजोबांची माहिती देण सुरू झालं. ताड चेक पोस्ट नंतर दीव बेट सुरू होतं. दोन्ही बाजुला दलदलीचा
भाग वर झाडं पण खाली लगदा. केसरीया दीव रोडवरून जाताना IIT Vadodara International Campus  लागला. पुढे आम्ही आय एन एस खुकरी जहाजावर गेलो. किरकोळ तिकीट आहे. फोटो काढू शकतो पण क्लिप नाही. जहाजावरचे निवृत्त सेवेकरी बारीक लक्ष देऊन होते. 
जहाज बघुन आ वासतो आपण आणि शहीद जवानांची यादी बघून अवाक! या जहाजाची माहिती वाचायला स्कॅनर कोड होते ते आपण आपल्या फोनवर वाचायचे. तीन मजली जहाज आतुन बघुन त्यात राहून जीवावर ऊदार होऊन लढणारे कसे जगत असतील कल्पना येते आणि हात जोडले जातात. 
काठावर असंख्य प्रकारच्या दारूच्या टपर्‍या आणि फिशच्या टोपल्याच दिसणार. पुढे दीव किल्ला येतो. मोठ्या खंदकानी तो सुरक्षित आहे, दोन खंदक संपून मुख्य द्वार येतं. कसला भक्कम तो अबब! दणकट किल्ला आतुन पाहताना छान वाटतं. एकंदरच सरकारच या सोमनाथ दीव भागात रस्ते बनवणं काम सुरू आहे.  पोर्तुगीज निर्मित हा किल्ला बर्याच गोष्टींचा साक्ष आहे. या किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे. याठिकाणी ठेवलेल्या तोफा नीट नेटक्या आहेत. आतली दालनं वरवर पाहून कोणती असतील हा अंदाज बांधता येतो. तिहेरी समुद्रात असलेला हा दीव किल्ला चालत बघताना दीडतास जातो आणि पायाचे तुकडे पडतात. लाईट हाऊस पर्यंत जाऊन खाली येताना ते जाणवतं. खंदक संपून बाहेर आल्या आल्या आम्ही लिंबु सरबत आणि नारळपाण्याचा माराच केला.
दीव किल्यासमोर समुद्रात काळ्यापाण्याची शिक्षा असलेला तुरुंग आहे. डागडुजीच काम सुरू असल्याने जाता आलं नाही.
नंतर सेंट पॉल चर्च बघितलं. ईकडे हिंदू, मुसलमान ख्रिश्चन सगळ्या धर्माची लोकं घरं दिसली.
मस्त ऊकाड्याची मजा घेत जालंधर बीचवरून पुढे INS Khukri मेमोरियल पार्ककडे गेलो. तळपत्या एकच्या ऊन्हात फार फिरलो नाही.
खुप रील बघुन माहित झालेलं गंगेश्शर महादेव जागा आली. हे ठिकाण छान व्यवस्था असलेलं आहे. १०-१२ पायर्या ऊतरून खडकात पाच शिवलिंग आहेत. पाणी येत आंघोळ घालत जातं. मस्तच होती जागा, गार वारा आणि गार पाणी. पांडवांनी अज्ञातवासात ईकडे काही काळ घालवला अशी गोष्ट आहे. सुरक्षिततेसाठी कठडे आहेत पण पुढची जमीन शेवाळलेली आहे. सावधच चालाव लागतं.
ईकडून आमची सवारी नागोवा बीचवर गेली. तीव्र ऊताराचा गणपतीपुळ्याला आहे तसा बीच आहे. वाॅटर स्पोर्टस खुप आहेत पण आम्हाला काहीही करायच नव्हतं, नागावला हे सगळ होतंच. 
सकाळची ईडली पराठा विरले होते. फिश, आलुचाट आणि सॅडवीचवर ताव मारता मारता घरी फोन झाले.  
म्हणता म्हणता साडेतीन झाले. नागोवा ते सोमनाथ दोनतास प्रवास मी तर तासभरच बाहेर बघत बघत डुलकीच काढली. जाग आली ती आम्ही श्रीकृष्ण चरणपादुका सोमनाथ ला पोचलो तेव्हाच.
श्रीगोलोकधाम तीर्थ नावान मी जागा प्रचलित आहे. गीता मंदिर, श्रीकृष्ण चरणपादुका, बलराम मंदिर, ओंकारेश्वर महादेव अशी देवळं आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या चरण पादुकांना अभिषेक चालुच होते. मागे हिरण्या नदी आहे. गोलोक गमन करताना देहोत्सर्ग केलेली ही वास्तू......  शेवटची बलराम श्रीकृष्ण भेट ईकडेच झाली. नंतर शेषनाग रूप घेऊन या नदीमार्गेच पाताल लोकात त्याने प्रस्थान केले. 
याच प्रभासतीर्थ काठी यादवकुलवंश नाश / समाप्ती झाली. पुढे शक्तीपीठ देवी हिंगलाज देवीच देऊळ आणि पांडव गुफा ठिकाण बघितलं. मी काही त्या गुफेत गेले नाही फक्त मुलगा गेला. 
hinglaj mata photo

==============

सूर्य मंदीर आणि सूर्य कुंड मस्त आहे.
मस्तच फारच छान वाटतं जुन्या वास्तू त्यांचा इतिहास बघुन समजुन. आता मात्र मस्त चहा घेतला तरच तरतरी येणार होती. मी तर डबल. समोरचा त्रिवेणी संगम घाट बघत सूर्यास्त बघायचा होता पटकन चहा आटोपून घाटावर पोचलो. अतिशय सुंदर सूर्यास्त, पाण्या ऊछल कूद करणारे मासे, बदकं दिवसभराचा शीणच निघून गेला.


संध्याकाळी सोमनाथ ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकर देवस्थान ला भेट दिली. अजबच वाटावं अस मोठ्ठ शिवलिंग आजुबाजुला चांदीचे कोरीवकाम, देवळाचा भाग परत सगळा चंदनाचया रंगाचा... या वास्तूतील अनुभूती आल्हाद दायक होती. आपलेपणा होता, ओढ होती. आजुबाजुची सर्व लोकं समाधानी चेहर्याची होती.
शिवलिंगास हात लावता आला, तो जरासा खरखरीत पण थंडगार स्पर्श अवर्णनीय आहे. काहींच म्हणण आहे की हेच लपवलेल मुळ ज्योतिर्लिंग आहे. पण दोन्ही शिवलिंग सोमनाथ अस म्हणणारे पण आहेत. 

सोमनाथ ज्योतिर्लिंगच  मुख्य  मंदिर गझनीनं ऊद्वस्थ केलं. त्या जागेच सत्व नष्ट होऊ नये यासाठी विखुरलेल्या मंदिराजवळ अगदी लागुनच हे  पेशव्यांबरोबर मिळुन हे १७८३ मधे अहिल्याबाईंनी बांधलं. यवनापासून वाचवण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी गर्भगृह जमिनीच्या आत बनवुन घेतला होता जेणेकरून ते विद्धवंसक शक्तीपासून वाचावं. एकंदर १७ वेळा हे नष्ट केलं गेल आहे. अस पण समजल लाइट शो मधे की हे ज्योतिर्लिंग जमिनीवर तरंगते होते. 

रात्री गुगलबाईकडून सगळा इतिहास वाचुन काढला.

महादेवाचा पहाटेचा अभिषेक बुक केला. चालतच माहेश्वरी निवासला पोचलो आणि जेवलो. या देवस्थानासाठी किती तरी लोकांनी बलिदान दिलय, वाचवण्यासाठी उभारण्यासाठी कष्ट घेतलेत. याच विचारात असतानाच आजचा ताजा फोटो गुरूजींनी पाठवला आणि ऊद्याच्या अद्भुत क्षणाचा विचार करतच मी झोपी गेले.
अहिल्याबाई होळकर सोमनाथ मंदिर  
पहाटे दोघांची सोवळी आणि पाकिट एवढच घेऊन महादेवाच्या देवळात पोचलो. सविस्तर संकल्प सोडून जप करायला गुरूजींनी सांगितले. सकाळच्या आरतीचा छान अनुभव आला. पंचारतीला ईकडे लांब दांडी दिसली जी तुळशीची काडी आणि वर वात गुंडाळून केलेली अशी होती. अशाच लांबीला मोठ्या पुढे द्वारकेतही दिसल्या.
पंचामृत, भस्म, चंदन, गुलाल, फुलं, तीळ, बेल, गुलाब, पांढरी शेवंती, लहान झेंडु, साखरफुटाणे, गंधगोळी आणि दुध घालायला गवळी येतो ती आख्खी किटलीभर दुध अस सामान घेऊन गुरूजी आले. सगळ्यांना गाभाऱ्यात नेलं.  आधीची सुंदर झालेली मंत्रमुग्ध पुजा , मंद धुपाचा वास, थोडीशी दर्शनासाठी आलेल्यांची कुजबुज आणि शिवलिंगासमोर ऊभे ठाकलेले आम्ही अगदी स्वप्नातलं दृष्य जणू!
पुजा झालेल्या महादेवाला दोन्ही हात लाऊन डोक टेकवुन नंतर मग अभिषेक सुरू केला. आणलेली सर्व सामुग्री प्रत्येकाला ते देत होते, आम्ही ती महादेवास अर्पण करत होतो. प्रत्येक वस्तू का वापरतोय याचं समर्पक ऊत्तर ते सांगतही होते. पुर्ण किटलीभर दुधाचा तिघांना अभिषेक करता आला. ते शिवलिंग ईतक मोठय ते की वाकुन नमस्कार करायला डोकं टेकायला डाव्या हाताचा आधार घ्यावा लागत होता. गुलाल भुरकवलेलं ते भव्य शिवलिंग बघताच मन भरून आलं. गुलाल भुरकवुन एक लहान हिरवट पांढरी फुलं असलेली माळ वर गोल ठेवली आणि मी ते बघुन डोळे डबडबले... भगवंत इतका गोड दिसत होता. मी माझ्या आवडत्या अहिल्याबाईंचं वास्तव्य लाभलेल्या तसेच भगवंताला स्वत: सजवलेल्या त्या जागेवर आहे मी कृतार्थ झाले. काही क्षण सगळे थांबुन नुसत बघतच होतो. शिवलिंगाच्या त्या  थंडगार स्पर्शाची कशालाच सर नाही. असा विचार करतच होते ईतक्यात दर्शनाच्या रांगेतून पुष्प अर्पण सुरू झाली रांग सुरू झाली. जणू काही तो परमेश्वर काही सांगू पाहतोय. ॐ नम: शिवाय!
अभिषेक करून बाहेर आलो तिकडे गुरूजींनी आणखी काही पुजा केली प्रसाद घेतला दक्षिणा दिली. 
(गुरूजींनीच फोटो काढलाआत  मला फार आनंद झाला.) असा भगवंताचा सहवास लाभला की नंतरचा काही काळ मी माझी नसतेच. तो काळ माझ्या जीवनातला सर्वोत्तम काळ असतो. मानसिक रवंथात मी असते. नंतर बाहेर असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्या जवळ मी फोटो काढुन घेतला.  गंधाची चंद्रकोरीच्या आकारातली वाळलेली कपाळावरची चिन्हं छान दिसत होती. 
कपडे बदलून सोमनाथ ज्योतिर्लिंग देवळाच्या अभिषेक खिडकीवर जाऊन अभिषेक नोंदवुन माहेश्वरी निवास भोजनालयात नाश्ता करायला गेलो. मेथीचे ठेपले, बटाटा भाजी शेव खमणी जरा वेगळा नाश्ता मिळाला. दोनदा चहा घेऊन "जय सोमनाथ" म्हणत द्वारकेचा रस्ता धरला. माहेश्वरी निवासच्याच मागे सोमनाथ संग्रहालय आहे हे खुप ऊशिरा समजलं ते बघु शकले नाही. यादव कालीन तसेच सोमनाथ मंदिर चे जुने अवशेष तिकडे आहेत. गुगलवर सगळ आहे. ये
आजोबा आठला गाडी घेऊन हजर होते.  पंधरा मिनिटांत पवित्र स्थल भालका तीर्थ ला पोचताना मधे बाणगंगा शिवलिंग समुद्रात त्यांनी दाखवली.

भालका तीर्थ 
भगवान श्रीकृष्णाची निजधामभूमी.... सोमनाथ पासून ४ किलोमीटरवर ही जागा आहे. ईकडे पूर्ण जंगल होत. मोठ्या डेरेदार वडाच्या झाडाखाली भगवंत आराम करत असताना जरा नावाच्या पारध्याचा चुकून बाण लागून देहत्याग केला अशी कथा आहे. ती ही जागा, जी प्रत्येक श्रीकृष्ण भक्तास ह्रदया जवळची भाऊक गल्ली आहे. 
ईकडे आणखी दोन तीन देवळं आहेत. पाय निघत नाही इथून.
जय श्रीकृष्ण!!!
भालका तीर्थ ते द्वारका चार तास प्रवास आहे. मधे माधवपूर बीच लागतो. नंतर पोरबंदर नंतर द्वारका!  हो भगवंताची भूमी "द्वारका". मधे अजिबात न थांबता जायच ठरलं. आजोबांनी मात्र मधे ब्रेक घेतला. आम्ही पण मग स्थायी खाद्यपदार्थ चव घेऊन निघालो. वाटेत श्रीकृष्ण आणि रूक्मिणी यांचा विवाह झाला ते ठिकाण आजोबांनी दाखवलं. होमकुंड मंडप नीटनेटकेपणे जपला आहे. "माताका हलदी का ऊपटन ईस कुंड में ऊतारा" अशी माहिती मिळाली.

द्वारका
साधारण दोन वाजता आम्ही श्रीक्षेत्र द्वारकेला पोचलो. सामान टाकल आणि श्रीनाथ भवनला काठियावाडी थाळी जेवायच ठरलं. ईतके पदार्थ होते बाबा रे बाबा!  १७०.०० मधे अनलिमिटेड थाळी.  देतानाच ती ईतकी काठोकाठ होती कशाला लागतय आणखी काही.
द्वारकाधीशांच देऊळ पाचला ऊघडेल समजलं. जरा पडू आराम करू जाऊ अस ठरलं. कसलं काय? करमतय कुठं.  रांग असते वेळ लागेल असा धोशा लावत दोघांना सव्वाचारलाच बाहेर काढलं. आधीच्या अनुभवावरून मोजकाच सामान घ्यायच ठरलं.
एका श्रीकृष्ण भक्ताला मी येताना सहज मनातलं विचारलं गेलं की मी भगवंताकडे रीकामी कशी जाऊ? आहे ते त्याचच दिलेलय फण तरी मला काय नेउ समजेना तर ती म्हणाली बेसनाचे लाडू ने. ते शीळं होत नाही आणि प्रभूंचे आवडीचे आहेत. एका भक्तांकडून सुचवलं, एकाकडून करवुन घेतलं ते कान्हाजींनीच. त्यांना हवं ते बरोबर आपल्याकडून करवून घेतात. अशीच एक मैत्रीण घरी ऊटणं बनवते मी ते पण घेतलेलं.
गोवर्धन पूजेसाठी तांदूळ भोग म्हणुन, बेसनाचे लाडू, पणत्या आणि ऊटणं घेऊन मी निघाले. याखेरीज पाकिट आणि फोन ईतकच बरोबर घेतलं. रूमपासून मोजून १५ मिनिटांत द्वारकाधीश देवळाजवळ पोचलो.
फोन पर्स आत नेऊ शकत नाही. तुलसीमाळा आणि कडक गोड पापडी भोग साठी विकणारे खुप होते. आणि मी देवळासमोर पोचलेसुद्धा... पावलं थबकली.
 ही दोघ चपला फोन ठेऊन येतो म्हणून मला पुढे पाठवल कारण रांगा वेगवेगळ्या होत्या. आणलेल नेऊ देतीलच या विश्वासावर ते घट्ट छातीशी पकडूनच मी महिलांच्या रांगेत लागले. पाय लटपटत होते, ह्रदयगती तीव्र, सोबत कोण नाही, होता तो  फक्त विचार की तो भगवंत कसा असेल?  कडक तपासतच आत सोडत होते. सहज आत सोडलं. मुख्य दाराबाहेर ऊजवीकडे देवीच दर्शन घेऊन आत पोचले. आणि समोर द्वारकाधीशांचा कळस पाचमजले ऊंच सहा सातव्या भागावर.. मस्त चार पाच रंगी ध्वज फडकत होता. आत गेल्यावर डावीकडे भगवंतांचा लेक आणि नातू यांच देऊळ आहे सरळ अगदी सहज २०-२५ बायकांची रांग फक्त ईतकच अंतर ऊरलं होतं. ऊजवीकडे रांग वळुन समोर भगवंत दिसू लागलेले. आत्म्याला लाभलेली अनुभूती कशी हो सांगु?....  पाय ऊंचावताच धमक्क पिवळ्या पोषाखावर भगवा फेटा गोल फिरून तो ऊंच फडकत भगवंत अत्यंत हसरे समोर येत होते. गर्भगृहात सोनेरी चौकटीत ते विराजमान होते. काळीभोर बारीक नजरबंद तीन चार फुट ऊंच मूर्ती. आपोआपच दोन्ही हात उंचावून मी पण अभिवादन केलं. ते सगळ्यांकडे बघतात, त्यांच सगळ्यांवर लक्ष असतं. ओळ पुढे सरकत होती तस तस जास्त जवळुन दिसु लागलेल. रांगेत "द्वारकाधीश की जय" जयघोष चालुच होता. कोणी ओळखीच नव्हतं पण ते सगळे आपलेच वाटत होते.
आणि चार जणींवर माझा नंबर आला तस्स पिवळा कपड्यांचा त्या चौकटीचा ऊजेड अधिक जाणवू लागला. दोघी राहिल्यावर मला डोकं टेकायला मिळणार होतं. त्यामुळे आधीच मी माझ सगळ सामान शेजारी असलेल्या सुरक्षारक्षकाकडे दिलं त्यानं ते गाभाऱ्यात पाठवलं. गुरूजींनी तांदूळाची पिशवी पायाजवळ ठेवली आणि लाडु पिशवी ऊंचावुन विचारलं "ईसमे क्या है?" मी हातानच गोल गोल दाखवलं. त्यांनी तत्काळ भगवंताचरणी लावुन मला दिलं. तोवर मिझा नंबर आलाच होता. कुठं कुठं बघु? अस झालेलं. द्वारकाधीशांच्या  पायाशी पण एक सुबक मूर्ती होती.  शांतपणे पाहु दिलं, डोकं टेकु दिलं. हातात लाडवाची पिशवी दिली, मी दोन पावलं शेजारी झाले. सुरक्षारक्षक म्हणतो दिदी मन भर गया ना? अस म्हणताच डोळे ईतके भरले की तो माणूस मला दिसेचना. त्याच्या शेजारी ऊभी राहिले आणि लक्षात आलं की दिवे ऊटण पिशवीच राहिलय. मी परत आत वळले तर एक शीटी आली "ऊलटा मत जाओ"  मी फक्त हातातलं ऊटणं आणि दिवे दाखवले " ये रह गया..." " जाने दो मॅडम को" मी परत आत गेले. गुरूजींना ते दिलं कोणताही अडथळा न येता ते त्यांनी घेतलं आणि त्यामुळे परत एकदा ती मनमोहनाची मनमोहक छबी टिपली. आणि बाहेर आले... मी एकटीच खुप हसत होते. प्रत्येक खांबाला हात लावत मागच्या शारदा शक्तिपीठात गुरू शंकराचार्य  यांच्या देवळात गेले. त्याचं देवघर ईतक मोठ्ठय आणि सुरेख पुजा केलेलं, प्रसन्न पण होतं. तिकडन खाली ऊतरून आले तोच लेक शोधत आला आणि मी त्याला कडकडून मिठीच मारली. आज या दोघांमुळेच मला हे सुख लाभल होतं. 
(ब्रज भूमीचे द्वारकाधीश, चतुर्भुज मूर्ती, द्वारका नगरी भगवंतांनी वसवली तेव्हा याजागी हरिगृह होतं त्याच जागी द्वारकाधीशांच गर्भगृह आहे. भगवंतांचे नातू वज्रभान यांनी हे बांधल आहे.)
आता जरा भानावर आले तेव्हा समजल सगळे वर काय बघत आहेत? ध्वज बदणार होते तो प्रहर होता. मग आम्ही पण बसलो दिवसात पाच वेळा ध्वज बदलला जातो हे ठाऊक आहे पण कारण शोधायचय मला. ते बघुन प्रदक्षिणा मार्गातल देवकीमाता देऊळ बघितलं. हे देऊळ जगत देऊळ म्हणून पण ओळखतात. मुख्यद्वार मोक्ष द्वार आणि मागच दार जिकडे ५६ पायर्या आहेत ते स्वर्ग द्वार म्हणतात. सप्तपुरीतली ही एक पुरी. एक दुर्वास ऋषींच देऊळ आहे,  ते बघुन प्रदक्षिणा पुर्ण करून प्रद्युम्न (मुलगा)आणि अनिरुद्ध (नातु) बलदेवजी त्रिविक्रमजी (वामन अवताराचच एक नाव) व बळीराजा यांची देवळं बघुन समोरच कुशेश्वर महादेवाच दर्शन घेतलं अजुन ध्वजारोहण सुरू च होतं. नंतर खुप गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन बाहेर फडूनच कळसाच दर्शन घेतलं. फोन चपला घेतल्या आणि गोमती घाटाकडे वळलो.
गोमती नदी नेपाळहून निघते ती ईकडे अरबी समुद्रात मिळते. पुराणात वाचलं ते अस की ही वसिष्ठ ऋषींची कन्या, गंगेईतकी पवित्र. ऋषी दुर्वासांची सेवा श्रीकृष्ण रूक्मिणी नी ईकडे केली. असा हा पवित्र गोमती घाट जिकडे भगवंतांनी स्वत: स्नान केले होते.  द्वारकाधीश देवळाकडून निघणारे स्वर्गद्वार ५६ पायरी ऊतरून आपण या घाटावर पोचतो.
घाटावरुन सरळ चालत आपण समुद्रनारायण देव मंदिरापाशी जिकडे गोमती समुद्रात मिळते तिकडे पोचतो तो.... घाट.  ईकडे नारायण देव  म्हणजे विष्णु आणि गोमती माता मूर्ती आहेत. समुऊकिनारी अगदी टोकावर हे आहे. ऊंच पायर्या आहेत. आत अंधार होता वर चौथरा दिसला आत या मूर्त्या असाव्या. खुप अंधार होता मी आत गेले नाही.
(गुगलकृपा ...) कारण सुदामासेतू डागडुजी कामामुळे तो बंद होता. गोमतीघाटच्या पलिकडे ऋषी दुर्वास ध्यान स्थल आहे. पंचतीर्थ आहे, पाच गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. सुदामासेतुशिवाय पलिकडे जाता येत नाही.
 पंचतीर्थ मधे
१) चंद्रभागा तीर्थ : पुल / अंगीरा ऋषी - सहदेव कुंड-  चंद्रभागा नदी -  महाराष्ट्र ओरीसा
२) कुशावती तीर्थ - अत्री ऋषी - नकुल कुंड - गोवा
३) गोमती तीर्थ - मरीची ऋषी- - अर्जुन कुंड - गोमती नदी लखनौ
४) जांबवती तीर्थ - कृत ऋषी - भीम कुंड - जांबवती नदी - गया
५) लक्ष्मणा तीर्थ - अत्री ऋषी- युधीष्ठीर कुंड - लक्ष्मणा नदी - हिमाचल व बद्रीनाथ 
पुर्ण घाट आणि द्वारकेच्या रसत्यांवर माणसांसारख्या गाई वासरं फिरतात. दुचाकीस्वार, गाई आणि शेण शेवटपर्यंत बरोबर होतं. (हा खालचा  समुद्र नारायण देऊळ बीचवरून काढलेला फोटो)
जवळच छानस छोटसच चक्रनारायणाच (सुदर्शनचक्र) देऊळ आहे. मनोरथधार नावाची ध्यान गुफा ईकडेच आहे.  घाटावर अशी बरीच देवळ आहेत सगळीकडे मी गेले नाही. सनसेट मात्र खुप छान बघितला द्वारका बीचवरून... द्वारका बीच ते महाराष्ट्र मंडळ निवास वीस मिनिटे गुगलवर दाखवलं. आम्ही चालच गेलो. मधे चहा घेतला. दुपारच काठियावाडी जेवण ऊतरल ईतक घाटावर चालणं झालं. रूमवर गेलो आराम केला. परज जेवायला तासाभरान बाहेर पडलो. गुरूप्रेरना रेस्टॉरंट मधे पाव भाजी दोसा जेवलो. सकाळी आजोबा सात साडेसातला येतील. बेक द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग ऊद्या करायच ठरलं.

नागेश्वर ज्योतिर्लिंग (२८ ऑक्टोबर) 
सकाळी लवकर उठून नागेश्वर ज्योतिर्लिंग ला अभिषेक करायचा म्हणून सोवळं आणि पाणी अस किरकोळ सामान घेऊन रूमवरून निघालो. सातला आजोबा हजर. ते खुष होते द्वारकेला सासुरवाडी होती मग काय.
दारूकवन ऊर्फ नागेश्वर ज्योतिर्लिंग अर्धातास वाट होती. पण इतक धुकं होतं की काय सांगू. सूर्य तर धुरकट दिसत होता.  पक्षी जमिनीवर गायांचे गट म्हशींचे गट पण वाटेत खुप होते. गाडी फार फार जपुन चालवावी लागत होती. वाटेत राधा बल्लभ बर्ड पाॅइंट लागतो. मायासर लेक लागतं पत हे सगळं पूर्ण धुक्यातच गुरफटून होतं. १०० मीटर रस्ता दिसत होता फक्तं. सुपरफास्ट आजोबांचा हलेडुले पाळणा झाला होता. तासाभरानी नागेश्वर ज्योतिर्लिंग आलं. समोर अतिभव्य शिवमूर्ती गुलाबीसर रंगाची.
गाव तस फारच छोटस वाटलं. अजिबात गर्दी आही.  चपला काढुन डायरेक्ट तिकीट काऊंटरवर अभिषेक नोंदवायला. ईकडे प्रत्येकी २००.०० अभिषेक पण पुजा की सामग्री  फुल थाली वेगळी घेणे अस होतं.  (तिकडे सगळ गुरूजींनी आणलेल आणि ३०००.०० दक्षिणा होती.) २५०.०० ची थाली घ्या तोवर पितांबर नेसतील अस सांगितलं. दोघ सोवळं नेसले मी थाली घेतली. पायरीवर बसवलं. आत फोटो काढु नका बाहेरू काढा. अस सतत सांगत होते. गाभारा आठ पायरी ऊतरून आत आहे. पुजा साहित्यात दोन चांदीचे नाग होते छोटुसे. ईकडे शंकर पार्वती नाग रूपात आहेत. नागनाथ दर्शन पण म्हणतात.
दवं पडल्यान देवळा भोवतीचा परिसर पूर्ण ओला होता. देवळामागे मोठा तलाव आहे.
दारूका राक्षसीणीला पार्वतीकडू वरदानात मिळालेल हे दारूकावन. मागे भीमगज तलाव आहे.
मोजुन १० मिनिटांत गोपीतलावला पोचलो. गोपी तलावाकाठची माती गोपीचंदन अशी कथा आहे कारण श्रीकृष्ण गोलोक प्रस्थानानंतर सगळ्या गोपींनी या तलावात समाधी घेऊन त्यापण गोलोकी गेल्या.  ईकडे गोपीनाथ मंदिर आहे. वस्ती कमी आणि पुरातन आहे सगळं. स्वच्छता बोंबललेली दिसली. नशीब गोपीतलाव स्वच्छ होता.
तलावाबाहेरच चहा बिस्कीट नाश्ता झाला. आपल्याला चालेल पटेल अस काही खाण्यासारखं नव्हतच. ईकडून ओखा ठिकाणी जाऊन मग सुदर्शन सेतू मार्गे बेट द्वारका जायचं होतं. मधे मिठागरं टाटा नमक फॅक्टरी दिसली. आणि कधी तो पुल आला समजलच नाही. 
जय श्रीकृष्ण 
सुदर्शन सेतू पार करून बेट द्वारका आली की आपण आपल वाहन नेऊ शकत नाही. तिकडच्या टमटमनच सगळं फिरायचं. वैयक्तिक टमटम ५००.०० रू. करूनच आम्ही निघालो कारण पर सीट ५०.०० नी ती भरली की मगच हलणार होती.
बेट द्वारकेच्या प्रवेशद्वारावर पोचलो. परत सगळं लाॅकरमधे टाकलं.  शहाबाधी फरशा होत्या सगळीकडे, परिसर स्वच्छ आणि पोलिस पण थोड्या थोड्या अंतरावर होते.
आत परत वेग वेगळी रांग होती पण बायकांच्या रांगेत तीन जणी पुरूषांच्या रांगेत चारच पुरुष ईतक सहज होतं. सराईतासारखं भर्रकन गेलो ते प्रत्यक्ष केशवराजांसमोरच. हो ईकडे भगवान श्रीकृष्णाला केशवराज म्हणतात. हे कान्हाजी जरा डोळे ऊघडे असलेले आहेत. गुबरे गालाचे लोभस.
ईतकं शांत आणि हवा तितका वेळ दर्शन मिळालं. अगदी मोरपिसापासून तोड्यांपर्यंत न्याहाळता आलं. भगवंतांचा राणीवसा बेट द्वारकेत होता ती ही जागा. जी ब्राम्हण समाजाने नंतर बाधली अस समजल. ज्या वास्तुला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा सहवास लाभला ती ही पवित्र भूमी.. त्यांच्या या संदर्भातील सर्व कथा झरझर डोळ्यासमोर येत होत्या. पांढरट भुरकट माती किती भाग्यवान, ईकडचे लोक रोज हे आध्यात्मिक अस्तित्व अनुभवत असतील ते पण किती भाग्यवान . ही वास्तू जतन करून आपल्या सारख्यांसाठी जपली हे केवढ आपल भाग्य!  बरोब्बर पंधरा वीस मिनिटे आम्ही समोर असू. मन आवरुन बाहेर पडलो मागे साक्षी गोपालच देऊळ आहे. जो आपण येऊन गेलो ची नोंद देतो. ही खुप लहान मूर्ती आहे. आम्ही गेलो तेव्हा श्रृंगार सुरू होता. मोठी गोष्ट लिहली होती पण वाचता कोणाला येतय? बाहेर पडताच सलग दालनं दिसली.
बेट द्वारका लाच भेट द्वारका म्हणतात. सुदामा कृष्णासाठी तांदूळ घेऊन आला ती जुनी वास्तू जतन केलेली दिसलं. जुनं हिरवं निळ गुलाबी कोरीवकाम होतं. सुदामाला बसवलेलं आसन गादी होती दिलेले तांदूळ एक माणूस गादीवर ठेवत होता. बलभीम, रूक्मिणी जांबवंती यांची दालनं पण बघितली. पण मूर्ती बघु शकलो नाही. भोग के लिए पडदे लगाए गए थे.. आपण विचारल कितना समय लगेगा तर वेगवेगळं समजलं. रूक्मिणीचा चेहरा तर बघतच होतो आणि गणि घंटा वाजवत पडदा सारला. आम्ही थोडावेळ वाट पाहून निघालो. मन नखशिखांत तृप्त होतं मी पण निघु म्हटलं. बाहेरचा रस्ता भलतीकडेच होता. चपला काढलेल दार शोधत मस्त चक्कर मारून झाली. फोन ताब्यात घेतले आणि मस्त पेरू खाल्ला.
घरच्यासाठी प्रसाद घेऊन ईकडून बाहेर पडलो. नंतर सोने की द्वारका पावनधाम संग्रहालय आहे ते बघितलं
ईकडे पण डागडुजी कामामुळे जायला रस्ता मागुन होता.
टमटमनी पुढे एका सिख गुरूद्वारा मधे गेलो. मला प्रथमच जाण्याची संधी होती ही. या जागेविषयी या धर्माविषयी मी अनभिज्ञ होते.
गुरूद्वारा भाई मोहकिमसिंहजी - या ठिकाणी ईतकं समाधानी शांत वाटल. हे पाच पैकी चौथे गुरू आहेत. हे त्यांच जन्मस्थान आहे. तिकडे एक काका होते. त्यांनी आपुलकीने माहिती दिली. आल्यामुळे छान वाटल म्हटले. आपले हिंदू धर्मिय लोक ईकडे आले पाहिजेत. त्यांनी नंबर दिला आणि परत याल तेव्हा ईकडे ऊतरा. आता ४० खोल्यांची सोय तयार आहे. आपण ये जा ठेवली तर धर्म वाचेल. ईतकं छान शांत समजवत सांगत होते. लंगरमधे जेवणाचा पण खुप आग्रह केला पण वेळेअभावी थांबु शकलो नाही. परत नक्की येऊ अस म्हणत निरोप दिला.
यानंतर टमटमनी सहा किलोमीटर जाऊन मग मकरध्वज देऊळ आलं. 
श्री हनुमंताचा मुलगा मकरध्वज. समुद्र ओलांडून लंकेला जातान पडलेल्या स्वेद थेंबास माशानी ग्रहण केलं आणि हनुमंत पुत्र मकरध्वज जन्मला. याच संगोपन रावणाचा भाऊ राजा अहिरावणनी पाताळलोकच्या राजानं केलं. ही गोष्ट तिकडे नीट समजली. श्री हनुमान निश्चिंत आणि आनंदी, श्री मकरध्वज देखील आनंदी असा विग्रह ईकडे दिसतो. या दोघांच्या हातात  कोणतेही हत्यार नाही. गुजरातमध्ये आनंदी मनःस्थिती, आनंद  'दांडी'द्वारे व्यक्त केली जाते. श्री हनुमान आणि श्री मकरध्वज विराजमान असलेल्या या मंदिराला 'दांडी हनुमान' म्हणजेच आनंदी हनुमान म्हणतात.  पूर्ण देवळात हनुमान चालीसा चित्रासहीत आहे. 
नंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. आमच्या लिस्टमध्ये हे नव्हतं पण टमटमवाल्याची खुपच ईच्छा होती की ते आम्ही बघावच.
श्री चौरासी धुना सिद्ध पीठ आणि आशापुरा माता मंदिर. कशाच आहे माहिती नव्हती पण खुप यज्ञकुंड होती. हे बेट द्वारकेच्या शेवटच्या टोकाला आहे अगदी.
त्याचही समाधान झालं आम्हाला पण छान वाटलं. एका गुरूंचा फोटो होता ते बघुन गिरनारचे काश्मीरी बापु आठवले. नमस्कार करून परतीचा मार्ग धरला. टमटमवाल्याशी बोलताना समजल की बोटीनं सात तास कराची आहे. खुप आश्चर्य वाटल मग मी विचारलं की भीती वाटत नाही का? तर नाही म्हटला नेव्हीची गस्त असते आणि आपली जन्मभूमी घाबरायच काय? एकंदरच मोदी सरकारन सुखसोई केल्यान रोजगार मिळवून दिला अस समाधानी वक्तव्य त्यानी पण केलं.
परत सुदर्शन सेतुकडे पोचवलं. आजोबा वाट बघतच होते.  परत निघालो तेव्हा आजोबांनी त्यांच्या साडूंच्या बेकरीत चलण्याचा खुप आग्रह धरला. ओखामधे ती बेकरी होती. पण म्हटल चला बघु तरी आपण कशाला परत ओखात येतोय बेकरी बघायला.  वाॅर्डरोब सारखी ऊंच मोठी भट्टी होती. डबल डोअर  कपाट उघडताच भपखन आगीच गरम झोतच... आगीच कपाटभर गरम टोस्ट आले की बाहेर. त्यांनी कधीही कल्पना करू शकत नाही भेटलो नाही तरी असे सगळे भाचे ओळख करून दिले. साडू जी खुष होते. नुसत कस निघायच म्हणुन मी एक नानकटाई च पाकिट घेतलं. ते पैसे घेईनात.  पेहली बार आए हो पैसे नही लेना मुझे.. वरून आग्रहाच कोल्ड्रिंक्स पाजुन तळपत्या ऊन्हाचा दाह कमी करून आम्ही पुढं निघालो. कोणतीही व्यक्ती विनाकारण आयुष्यात येत नाही हे मला आज पटतय कारण कळेलच पुढे आहे.
आम्हाला वाटल आता फक्त रूक्मिणी देऊळ करून रूमवर जायचं पण आजोबांनी मधे मूल द्वारका तीर्थ धामला नेलं. मूल द्वारका तीर्थ मधे रणछोड देऊळ आहे.
कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीच देऊळ वाटेत आहे. रणछोडजींचे मंदिर द्वारकाचे सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे.  भगवान कृष्णाला तेथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची चार फूट उंच मूर्ती आहे.
तिकडच्या गुरूजींनी सांगितले की कृष्णाची द्वारका देवळं तीन . पहिली ही मुल द्वारका - रणछोड नाव मिळाल तेव्हा भगवंत ईकडे आले रूक्मिणी बरोबर या जागी वास केला. दुसरी द्वारका गोमती काठी शहर वसवलं जीकडे द्वारकाधीश देऊळ आहे पण राणीवसा पाण्याच्या मध्यभागी ठेवला ती बेट द्वारका ते तिकडे केशवराज आहेत.
भगवंतांचा एकंदरच सौराष्ट्रात फार वावर झाला हे मला समजलं. आपल्याला ऊगाचच वाटत की मला किती ठाऊक आहे हा माज भगवंत ऊतरवतात जेव्हा ही माहिती ते गुरूजी सांगतात. परमेश्वराची कृपा ते अहंकार चढुच देत नाहीत.
आता आम्ही रूक्मिणी देवळाकडे वळलो.
दुर्वासा ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवी रूक्मिणी काही वर्षां विलग राहिल्या. देऊळ खुप कोरीव आणि समुद्रीखडकांतल बांधकाम अस आहे. 
ईकडे मात्र भोग लावल्यानं जरी पडदा लावला असला तरी आम्ही थांबुन दर्शन घेऊनच पुढे भाडेश्वर महादेव देवळाकडे जो या वेळचा शेवटचा पाॅइंट होता तिकडे गेलो.
समुद्रात भरती आली की हा रस्ता बंद होतो. योगायोगान आम्ही देऊळ पाहू शकलो. दुपारच्या तळपत्या दोन अडीच्या ऊन्हात पाय भाजत ते बघितलं. नंतर समजलं की रूम जिकडे आहेत तिकडून ते चालत जाण्यासारखं होतं. काल लक्षात आले असते तर आलो असतो की जेवल्यावर.  आता मात्र आजोबांची जेवणाची गडबड सुरू झाली होती कारण तीनला बंद होतं. काल रात्री जेवलो तिकडेच डायरेक्ट पोचवलं. सकाळपासून चालतच होतो, नाश्ता पण विशेष केला नव्हता. मग काय तुटून पडलो जेवणावर. पाऊणेक तासात त्यांनी रूमवर सोडलं. बॅग आवरून दीड तास झोपलो आणि संध्याकाळी पाचला वसुबारसेच्या दिवशी सहवास लाभलेल्या कान्हाजींच्या द्वारकेस नमस्कार करून पोरबंदरला निघालो.
पोरबंदर ते पुणे प्रवास आठवणींचा हिंदोळा घेत घेत कसा संपला समजलच नाही. फक्त एक फजिती मात्र लिहणार आहे मी माझी. जीच्यातून मला कान्हाजींनीच सोडवलं. हसु येतय पण स्वतः ची फजिती पण एन्जॉय करता यायला हवीच की.
तर झाल अस की ट्रेन मधे झोपले असताना कानावर पेरू घ्या पेरू आवाज आला. झोपेतच होतं ते  कारण मराठीत कोण ओरडणारे तिकडे. मधल्या बर्थवरून एकदम जागी झाले तर समोर एक मुलगा वरच्या मुलीला पेरू देत होता. मी म्हटल मला हवाय. ते दोघही बघतच राहिले. ते काय भाषा बोलत होते मला आणि माझी त्यांना समजत नव्हती.  किती पैसे सांग. काही समजल नाही. शेवटी माझा चेहरा बघुन की काय त्या मुलीन मला तो रसरशीत पेरू दिला. मला वाटल ती दुसरा घेईल कसल काय तो मुलगा ती दोघही प्रवासी होते. तो विक्रेता नव्हताच. तरी मी पैसे देऊ केले ते दोघे घेईचनात.  ते दोघं हसत कुजबुज आणि मी मनातल्या मनात कुजबुज. प्रतिक्षिप्त क्रिया ही की मी तो पेरू मन लाऊन खाऊ लागले. त्यामुलीनं मला वेट टिशू पण दिला. मी मनापासून हसले. पेरू संपला पोट भरलं. ती दोघं घरी व्हिडिओ काॉलवर हे सगळ जेव्हा इंग्रजी त सांगत होती तेव्हा मला नीट कळली माझी मजा. तेव्हा मला काय वाटल कोण जाणे पटकन तो नानकटाई चा पुडा काढला आणि त्यांच्या हातात दिला. काय खुष झाले ते दोघं. ईतके की तो त्यांनी आईला दाखवला. 
मुद्दा हा की त्या क्षणी ते पैसे घेत नव्हते आणि माझं अस त्यांना देण्यासाठी काहीच नव्हतं हे त्या कान्हाजींना ठाऊक असावं म्हणुन बेकरीची सफर घडवली.
बघा कसे हसतायत.... धन्य ते कान्हाजी आणि धन्य त्यांची लीला!
जय श्रीकृष्ण! जय द्वारकाधीश! जय रणछोड!
******
०६.११.२०२४
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक 
९९७०१६८०१४