Tuesday, 11 February 2025

बाबा


"बाबा"

क्षण
( ११ मे २०१२ सकाळी ७ वा. घटना स्थळ हॉस्पीटल, ती वय ३३वर्ष आणि आई ५६ वर्ष)
हॉस्पीटलच्या दारासमोर रीक्षा थांबली. मी लगबगीने पाकिटातुन पैसे दिले. उरलेले परत घ्यायचही न पाहता धाव ठोकली ती जीन्याकडे. तीन मजले जीव धडधडत असतानाही चार चार पायऱ्या झपाझप चढत होते. म्हणून इतर लोकच बाजुला सरकत वाट आपल्या जीवाची काळजीनी देत होते कदाचित. कधी खांदयावरची पर्स सावरत तर कधी खांदयावरची ओढणी सावरत मी विचाराच्या वेगासारखीच धावतच तिसरा मजला गाठत ब्रेक लागल्यासारगी धापा टाकत पोचले.
अतिदक्षता विभागा बाहेर आई जीन्यावर पाय जमतील तीतके जवळ घेत तोंडाला खांदयावरचा पदर लावुन बसवी होती. मी थबकताच तीनं वर पाहिलं आणि जोरात हुंदका देत दाराकडे बोट दाखवलं. इतक्यात दार उघडले माझा हात आपसुकच छातीवर गेला. आई ताडकन उठुन उभी राहिती आपल्या माणसासाठी तुटणारा जीव, असहाय्यता, काहुर भिरभिरणारे मन सगळं सगळं तरळत होतं तीच्या चेहऱ्यावर. माझा चेहरा घामाने डबडबला, दोन्ही हात एकमेकांत वर खाली होऊ लागले. ती नर्स दूसरीकडे निघुन गेली. मी जीन्याच्या बारला धरलेल सोडलं आणि अतिदक्षता विभागाच दार उघडून आत डोकावलं. आई सरळ खाली बसली तीन तोंड दोन्ही पायात खुपसलं होतं हे मी बघितलं.
मी आत गेले. सर्वत्र शांतता. एक लहानसा टपटप आवाज तर मधेच स्ट्रेचर हलवल्याची करकर. बाबांच्या पलंगाजवळ मी पोचले. हिरवा कपडा छातीपर्यंत पांघरला होता. (शांत मुद्रा गार शरीर) मी हाताला हात लावला तो बर्फासारखा थंडगार होता. नकळून टपाटप अश्रू माझ्या हातावरून त्यांच्या हातावर पडू लागते. नर्स आत आली तीनं ईसीजी मशिनकडे बोट दाखवतं. हलकेच डोळे बंद करत पाठ थोपटतली, सलाईनच काहीतरी केलं आणि मागच्या टेबलजवळ बसली. इतक्यात काहीतरी कुई कुई  आवाज आला. माझ्या हृद‌याची धडधड वाढली आणि ईसीजी मशिनवर बाबांची कमी होताना दिसु लागली. माझा हात बाबांच्या छातीवर डोक्यावर झरझर फिरू लागला. देवाचा जप आपोआप मी पुटपुटु लागते. नर्स धावत आली. तीन त्या मशिनवर चे आकडे पाहिले सलाइनच बटण बंद केले. माझी बाबांचा हात चोळण्याची गडबड चालूच होती. तीन मला थांबवलं, मी थबकले, असहाय्य केविलवाण्या नजरेन मी तीच्याकड़े बघितलं. तीनं डोळे खाली करून नकारार्थी मान डोलावतली. निर्जीवपणे पटापट ती मशिन बंद करू लागती. मला मोठा हुंदका आला गपकन खाली खुर्चीत बसले. दोन्ही हातांनी मी माझा चेहरा झाकला ढसाढसा रडू लागले. नर्सनी बाबांचे होन्ही हात पण त्या हिरव्या पांघरुणात घातले तशी मी सावरले, झपकन तीन बाबांचा चेहरा झाकण्या आधी दोन्ही हातांनी त्यांचा चेहरा कुरवाळला, तीनं मला थोपटलं बाजुला केलं आणि त्यांनी हिरव्या पांधरुणात स्वतःला झाकुन घेतलं. बाहेर धाव घेतली.
मी धडपडत अडखळत अतिदक्षता विभागाबाहेर धाव घेतली.
गौरी
११ जुन २०१२

++++++++

आदरणीय ताईस मनापासून नमस्कार मागच्या आठवड्यात बाबांच कळलं मन सुन्न झाल. प्रत्येकाच्या आयुष्यात बाबा या व्यक्तिचं एक वेगळच स्थान असतं. ती जागा भरून काढणं खुपच कमींना जमत. आयुष्यातली जवळ जवळ २२-३३ वर्ष जे आपले आधार, हक्क, आणि बरच काही असणारे आता पुन्हा दिसणार नाहीत हे पचवण फारच जड असतं. मी यातून नुकतीच गेल्यामुळे समोर येवून तुला भेटणं मला शक्यच नाही.
माझे बाबा गेले त्याच्या आधी मी एक दोन जवळचे नातेवाइक गेले त्यांच्या आप्तांना भेटायला गेले होते. मला त्याच्याविषयी प्रेम आपुलकी आत्मियता होती. त्याची त्यांनाही जाणीव होती, कोणाकडू‌नही सहाज म्हटल जाइत तेच मी पण मृणाले होते. "काळजी घे, तुझे दुःख मी समजू शकते. सावर स्वतःला " वगैरे. पण तीन वर्षापूर्वी बाबा गेले तेव्हा मला लोक भेटायला आले तेव्हा वाटलं की अरे नाही माझ्या जगातली पोकळ जागा, ते दु:ख नाही समजू शकत हे सर्व जण. ज्यांनी ते अनुभवलय पेललय तेच समजू शकतीत. हे सर्वजण सांगत आहेत तितक सोप नाहीये हे सत्य स्विकारणं. ते गेले नाहीत. ते प्रसन्न आनंदी आणि Positive energy च्या नावान माझ्या बरोबर आहेत. शरीरानं नसले तरी आर्शिवादाच्या रूपानं माझ्या आजू बाजूसच आहेत. हे मला कसं लिहाव वाटलं माहितीय ताई? तुझी "Still alive post" वाचून. फेसबुकवरची पोस्ट वाचल्यावर एवढं सगळं comment मधे देणे शक्यच नव्हतं पण भावना पोचणं गरजेच होतं आणि सहज पेन उचललं गेल.
त्यामुळे ज्यांचे बाबा गेले अस समजत ना ताई तेव्हा काहूर माजतं मनात. कोणतीही व्यक्ती असो तडक जावून घट्ट मिठी मारावी वाटते. पण ते सहज शक्य नसतं. एखादी व्यक्ति शेवटची घटका मोजतानाचा साक्षिदार होणं फार अवघड आहे. माझ्या समोर एक-एक श्वास माझ्या बाबांचा कमी होत होत शून्य होताना मी पाहिलाय अनुभवताय....
तो जगात कोणाच्याच वाट्याला येवू नये असं वाटतं. गेलेल्या प्रत्येक बाबांच्या मूलीत मला मीच दिसते. काही तासानी मन शांत होतं. जगरहाटी चालू होते. पण मनातत मनातच राहतं. आज मात्र मी मन पानावर उतरवलय खरं, पण वाचताना एखाद्याला काय वाटेल कोण जाणे.
So ताई बाबा "Still alive with positive energy" असच म्हणेन मी. माझ्या शब्दांमुळे जर मन दुखावलं असेत तर क्षमस्व. तू आमचा आदर्श, कणा आहेस अशीच माझ्या /आमच्या पाठीशी रहा.
नमस्कार
गौरी 
३१.०७.२०१५
++++
आदरणीय बाबांना जिथे कुठे असाल तिकडे सा.न.वि.वि. पत्रास कारण तसच आहे काल तुमची तिची झाल्यापासून तुमची खूप आठवण येत आहे. त्यात सध्या एक पुस्तक वाचतेय, प्रत्येक भागात तुमची जागा शोधली जात होती. मृत्यु नंतरचा प्रवास हा कधीही चर्चा सुद्धा न केलेला विषय, जड देह सूक्ष्म देह सिल्वहर कॉर्ड हे नवीन शब्द समजले. तुमच्या अनुभवलेल्या विश्वाची कल्पनाच करू लागले.
जड देह म्हणजे शरीर आणि प्राण म्हणजे सूक्ष्म देह आत्मा. सूक्ष्म देह जड देह सोडताना सिल्वर कॉर्ड मार्फत बाहेर पडतो, तो पूर्णपणे विलग होईतोवर माणूस जीवंत असतो. तुमचा शेवटचा सहवास आणि हा भाग झर्रकन डोळ्यासमोरून गेला. या स्थितीत असताना त्या माणसाला बोलता आल नाही तरी आजुबाजुच समजत अस म्हणतात. म्हणजे मी त्या क्षणी म्हटलेली स्तोत्र, तुमच्याशी बोललेली वाक्य तुम्हालाण समजती असतील. तुमच्या अंगावरून फिरलेले हात, मायेचा स्पर्श, गायू पोथी वाचतेय बाबा तुम्हाला काही होणार नाही हे सगळ सगळ मी म्हटलेलं कळल असेल ना बाबा? त्यावेळी आम्ही कमनशिबीच होतो म्हणा हव तर तुम्ही आम्हाला समजून घेत होतात. पण मी तुम्ही झोपलेले जागे का नाही होत आहात? याचाच विचार करत हलवत होते.
जड देह सोडून जाताना दिव्य आत्मे मदत करतात. तुम्हाला नक्कीच महाराजांनी सहज सोडवत असणार अपार श्रद्धा भूक्ती तुमची त्यांच्या ठायी होतीचा ती कामी आली असणारच! सूक्ष्म देहाला जड देह असे पर्यंत समजत नाही. तो बावचळतो गोंधळतो जड देहाला शोधतो. म्हणून लगेचच अंत्यसंस्कार करतात. गायू, लीना येईपर्यंत तुमवा सूक्ष्म आत्मा आमच्या भोवती आपल्या घरात असणार, नाही नाही होताच. याची कल्पना पुस्तक वाचल्यावर आली. तुमची सग‌ळी प्रिय माणस पाहून तुम्हाला आनंदच झाला असणार. बाबा तुमची पेंडसे कंपनी पण सगळी होती बरका तेव्हा. तुमचा त्यांच्यावर भारीच जीव माहितीय मग.. कोणताही कार्यक्रम झाला आणि तेव्हा तुम्ही नसला की तुम्ही विचारत माझ्या बद्दत काय म्हटला ग तो हा ती ही... पण त्यावेळी तुम्हाला सगळे दिसत असतील आणि तुम्हीच आमच्यात नव्हतात.
अंत्यसंस्कार झाल्यावर आत्मा प्राण पंचमहाभूतांत विलीन होण्या मार्गक्रमण करतो. पंधरा दिवस तो या भूतलावर फिरतो आणि आपल्या आप्तेष्टांना दहाव्या दिवशी कावळ्याच्या रूपात भेटतो. आत्ता पर्यंत नुसता खोकला आला की आम्ही तुम्हाला शोधायचो आणि दहाव्याला दहा कोवळ्यात तुम्ही कोणते? आम्ही ओळखु शकत नव्हतो. आईवर फार जीव होता तुमचा ती एकटी कशी राहिल? याचा विचार होता ना? म्हणून काही क्षण थांबलात ना तेव्हा ? खर सांगा. अहो पण ती आख्ख्या गल्लीला सांभाळेल अशा गट्सची आहे हे विसरतात का? तुमच्यासाठी भरपूर दानधर्म आणि तुमचा पुढचा प्रवास सुखकर होवो यासाठी आईन पण सगळ करायच ठरवलं होत आणि
केलं सुद्धा.
पंच‌महाभूतात विलीन होण्यापूर्वी चुका सुख दु:ख असे बरेच हिशेब दयावे लागतात. स्वर्ग किंवा नर्क यात चार पाच पायऱ्या आधी आहेत. कर्म- कर्म चांगलं असलं की वजन वाढत ते 'चांगल' पारड्याचं. ती व्यक्ती स्वर्गाच्या आधीच्या लोकात प्रवेश करते. तिकडे फकत प्रेम, आदर, आनंद याच भावना असतात. वाइट विचार शिवतच नाहीत. द्वेश, राग, सूड बुद्धी, याच्या पलिकडे जातो माणूस असा हा लोक. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही तिकडेच गेले असणार. आयुष्यभर चांगलं वागलात, कोणाला दुखावली नाही ना? याचाच विचार करत जगलात. कोणीही चुकला तरी माफ करत गेलात. तो वाईट वागला तरी आपण चांगलच वागायचं गौरी, सुडबुद्धी चांगली नाही अस म्हणणारा माणूस याच लोकात शोभून दिसतो.
सूक्ष्म देहाच्या अस्तित्वाची जाणीव संवेदना आभास कावळ्यालाच होते. ती जाणीव इतरांपेक्षा या  पक्ष्याला तीव्रतेने जाणवते. म्हणूनच सूक्ष्म देह कावळ्याच्या रूपात दहाव्या दिवशी दर्शन देतात. आपली इच्छा पूर्ण झाली की पिंडाला शिवतात. त्याच बरोबर माणूस मरण पावणार ही वेळ जवळ आली की, जवळ कावळे ओरडतानाचे पण अनुभव आहेत. तसेच वर्षात सूक्ष्म देह मार्गस्थ होण्यापूर्वी तो कावळ्याच्या रुपात फिरू शकतो. साधारण तुमचे वर्ष श्रादध झाल्यावर किंवा आधी श्राद्ध पक्षात तुमची तिथी करतानाचा माझा अनुभव साधारण असाच आहे. सर्वपित्रीला स्वयंपाक सुरू होता बाहेर कावळा टेरेसच्या पत्र्यावर बसून खुपच ओरडत होता. मला या सगळ्याची अजिबात कल्पना नव्हती. झाडावर काहीतरी झालय may be म्हणून मी आणि अमित बाहेर डोकावलो. पाहतो तर एक कावळा सारखा आत डोकावून पाहात होता आणि ओरडत होता. काय गंमत आहे, कबुतरं येत होती आज कावळा? अस मी म्हटल तर अमित टेरेसमधून डोकवत  म्हणाला की अहो घाणेकर तुमची मुलगी सुखात आहे. काळजी करू नका. आणि ओरडू नका वहिनींचा स्वयंपाक व्हायचाय, जेवायची वेळ झाली की ठेवणार आहेत त्या तुम्हाला पण. टुकुर टुकर पाहिल त्यानं आणि चक्क उडून गेला मग मात्र कधी आला नाही. तेव्हा आमच्या दोघांच्या ध्यानी मनी पण नव्हते.
मनुष्य जन्म अनेक योनी जन्म झाला की मिळतो. जीवन अत्यंत अमूल्य आहे. त्यानंतर मुक्तीचाच मार्ग असतो. बाबा तुम्हाला मुक्तीच मिळाली असणार तुमच्या भगवंताच्या चरणी तुमचा प्राण विलीन झाला असणार यावर गायुचा पण नक्कीच दुजोरा असेल. असेच रहा तिकडून आमच्याकडे पहा आम्ही हे समजून आनंदी आहोत.
आपली आवडती माणसं त्यांच्यासारख्याच दुसऱ्या माणसाच्या रूपात दिसू शकतात, क्षणभर तो भास होतो. अस कधी होवू शकत. खुपच आठवण आली तर काही निमिष पुण्यात्मे दिसू शकतात. ती व्यक्ती काही क्षण दिसते. ती खरी-खोटी किंवा तशीच दिसणारी पण बरच साम्य असणारी दूसरी पण असू शकते. काही दिवसापूर्वी आयुर्वेद रसशाळेच्या चौकात सिग्नलला मी सर्वात पुढे होते. सिग्नल असूनही मनात धास्ती असल्या सारखा एक सेम टू सेम तुमच्यासारखाच माणूस मला दिसला. बाबा अगदी तुमच्या सारखे कपडे, चालण्याची पद्धत, थांबलेल्या गाड्या असूनही हात दाखात रस्सता क्राॅस करणारे, आनंदान हसून माझ्या बघत काही निमिष ती व्यक्ति डोळ्यासमोरून सरकली. जणू काही तुम्हीच हसून टाटा करत आहात.
एक क्षण वाटल तुम्हाला थांबवाव. पण ते तुम्ही
नाही याची पक्की खात्री होतीच. तसेच दूसरी कोणी व्यक्ती असेल तर त्यांना काय वाटेल ? आणि सिग्नल पण सुटणार होता. टचकन डोळे भरून आले. पुढच्या चौकात लोक माझ्याकडे बघू लागलेली मला समजलं. मी थांबले पहिला गायूला फोन लावला. दुदैवाने ती बोलू शकती नाही. काही क्षण मोठा श्वास घेता. गाडीवरच प्राणायाम करून मी घरी आहे. आता काही वाटत नाही पण ती व्यक्ती तुमचाच भास होती.
अशा प्रकारे योग्य कर्म करत जास्तीत जास्त पुण्य जमवत, सकारात्मक विचार करत, चुकलेल्याना माफी देत आयुष्य सुंदर जगू शकतो हा विचार पुन्हा उजळला. या पुस्त‌कामुळे मी आज शांत प्रसन्न चैतन्यदायी अनुभवत आहे. स्वतःकडे जगण्याचा आनंद घेण्याचा अजुन दृढ असा दृष्टीकोन मिळालेली मी जास्तीत जास्त आनंदाचे क्षण जमवत जाणार आहे. जाते आहे तुमचा आर्शिवाद असू द्या. भगवंताच्या चरणी विठीनल झालेल्या तुम्हाला माझा पुन्हा एकदा सा.न.
आज या पुस्तकामुळे तुमचा मृत्यु नंतस्था प्रवास समजला. त्या लेखकांना मनापासून धन्यवाद! 
तुमचीच गौरी
०७.१०.२०१५
++++++

++++++

No comments:

Post a Comment