२०२४ हे वर्ष परमेश्वरानी छान छान दर्शनं घडवली. सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग चेरी ऑन द टॉप हि कि द्वारकाधीश दर्शन पण घडवलं.
पुणे ते वेरावल
अनेक वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून समजल होतं कि भगवान श्री कृष्ण निजधाम भूमी आहे. जवळजवळ १४-१५ वर्षांपूर्वीच ती जागा पाहायला मिळेल का? अस वाटायचं. मनात ती कशी असेल ? भगवंत तिकडे कसे असतील मी बॅक ऑफ द माईंड विचार करत असे. तिच्या तोंडी वेरावल गावाचं नाव पण ऐकलं होत. एखादी गोष्ट घडण्यासाठी तिचे बीज खूप आधी तो पेरतो मग आपला ध्यास किती प्रमाणात असेल तसे ते घडत असावे. तेव्हाची इच्छा या दिवाळीत पूर्ण करून घेतली त्यांनीच...
पुण्यातून वेरावला पोचायला ट्रेननी जवळजवळ २०-२१ तास लागले. खाडीचा भाग, भरपूर छोटी जहाज भारताचा झेंडा लावलेलं गाव पाहून कल्पना आली कि हवामान दमट असणार आहे. ठरवलेला वाहनचालक अचानक येऊ न शकल्याने त्यांनी त्यांचे ७४ वर्षाचे वडील गाडीबरोबर पाठवले होते. वेरावळ रेल्वे स्टेशनहुन आम्ही दुपारी ३. ३० ला सोमनाथला निघालो. आजोबा भारी होते. वाटेत ते सांगत होते मोदींची स्तुती करत होते. सोमनाथ द्वारका मध्ये सुधारणा केल्यानी लोक सुखावले वाटले. वेरावल बघुन गोव्याची आठवण झाली. वाटेत काही भागात थोड्या थोड्या अंतरावर गस्त घालणारे पोलिस व चौक्या दिसल्या. सोमनाथ ट्रस्टची जमीन अनधिकृतपणे ताबा घेतलेली सोडवून सुरक्षेसाठी त्या आहेत, हे मला गाईडकडून समजलं.
सोमनाथ
सोमनाथ ला पोचलो मोजून २० मिनिटात. छोटसच पण अभूतपूर्व ऐतिहासिक गावच जणू!
माहेश्वरी अतिथी भवन मध्ये आम्ही उतरलो होतो. चार महिना लाईट शो जो बंद होता तो नेमका आजच सुरु झाला आहे असे गेल्या गेल्याच समजलं. फार आनंद झाला.
आवरून आम्ही सोमनाथ च्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. समुद्रदर्शनला सायकल ट्रॅक पण आहे. किरकोळ तिकीट घेऊन तो परिसर नीटनेटकेपणाने जपला आहे. मस्त पायवाट करून कडेला भिंती बांधून सुरक्षित तो बांधला आहे. छोटी चौपाटी वजा आहे. इकडे गेल्यावर सोमनाथ ज्योतिर्लिंग चे सलग दर्शन उजवीकडे आणि डावीकडे उड्या मारणारा समुद्र असे एकाच फ्रेम मध्ये पाहता येते. इकडून फोटो काढू शकतो. आत फोटो काढू शकत नाही आपण.
सोमनाथच्या महादेवाची आरती ७ वाजता असते. तेव्हा अचानक गर्दी झाली. लाईट शो तिकीट खिडकी ६. ३० ला उघडते आणि ती आतच आहे. आधी तिकीट काढून मग सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाला गेलो. लाईट शो ८ वाजता आणि ९ वाजता असतो. आम्ही ८ च तिकीट काढलं.
आता महत्वाचा मुद्धा हा कि सोमनाथ ज्योतिर्लिंग देवळात जाताना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोठ्या पर्स काहीही आत नेऊ देत नाहीत. बाहेर काउंटर वर जमा करून मगच आत जावे लागते. तुम्ही कोणी जाणार असाल तर मोठी पर्स रूमवर ठेवून छोटी पर्स आणि मोबाइलला इतकंच न्या. पैशाची छोटी पर्स आत नेऊ देतात. मोबाइलला जमा करून नंतर आत चपला जमा करून मग आत जात येते. लाईट शो बघून बाहेर येईपर्यंत फोने चपला जवळ नसतात त्यामुळे कुठं भेटायचं दर्शन झालं कि ते ठरवून मगच आत जायचं कारण स्त्री पुरुष रंग वेगवेगळ्या आहेत. वयस्कांना बॅटरीची मोटार गाडी करून आत जायची सोय आहे.
साडेपाच ला आम्ही मोबाईल पर्स जमा करून सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देवळात गेलो. आत गेल्यावर तिकीट काढून रांगेत लागलो. सुंदर कलाकुसरीचे काम असलेले खांब बघत संध्याकाळचा गारवा अंगावर घेत आपण आत जातो.
ज्योतिर्लिंग असलेले गर्भगृह, सभा मंडप, नृत्यमंडप असे तीन भागात हे आहे. देवळाच्या डाव्या बाजूला फोटो गॅलरी आहे. देवळाच्या उजव्या भागाला बाण स्तंभ आहे. त्या बाणाचे टोक ज्या भागाकडे आहे तिकडे जमिनीचा शेवट आहे. त्यापुढे फक्त पाणी.. देवळाच्या दगडाचा रंग चंदनासारखा दुधाळ आहे. शिष्त कडक होती पण ती गरजेची पण आहे.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षे नंतर मी प्रत्यक्ष सोमनाथ ज्योतिर्लिग समोर उभी होते. अस्टरची जांभळी आणि पांढरी शेवंतीनी सजवलेला देव रूपवान दिसत होता. पाय उंचावून पाहिलेलं रांगेतून तेव्हाच अंगावर शहरे आलेले अजूनही तस्सेच होते. हीच ती पावन भूमी जिकडे जवळ जवळ सर्व देवतांची पायधूळ लागली. भगवान महादेवाचे प्रत्यक्ष रूप पाहून मन भावविभोर होते. किती दुष्टांनी हि वास्तू उधवस्त करायचा प्रयत्न केला पण सनातन धर्माचे हे सत्व असणारे शिवलिंग स्वतःच अस्तित्व आपल्या सारख्यांसाठी भक्कमपणे उभे ठाकून आहे. महादेवाची लीला अपरंपाराच ! सोम अर्थात चंद्र यामुळे याची इकडे स्थापना झाली. त्या चंद्राला पण मनापासून नमस्कार. महादेवाचे शिवलिंग उंच आहे आणि मोट्ठे पण.... अहाहा!! मनभर बघू पण दिले कारण खूप गर्दीच नव्हती. फोटोमध्ये जेवढा मोठा गाभारा आहे तो बाहेरून दिसत नाही फक्त मधे शिवलिंग आणि मागची पार्वती माता दिसते. तेजस्वी रूपाची पार्वती माता.... दर्शन घेऊन बाहेर आलो... गर्दी नव्हती परत रांगेत गेलो, सुरेख दर्शन आणि घंटा डमरू वाद्यांबरोबरची आरतीपण मिळालं. आरतीचे शब्द कळत नव्हते पण मन आल्हाददायक अनुभूती घेत होतं.
जय सोमनाथ
सात नंतर बाहेरून लाईट सुरु झालेले देऊळ मनमोहक दिसत होते. वारा पण आता छान सुटलेला. तसेच लाईट शो कडे गेलो. आत गेल्यावर बाण स्तंभ दिसतो. जवळून बघू दिला हात लावायला अलाऊड नाही. बारा ज्योतिर्लिंगातले हे पहिले ज्योतिर्लिंग यातला हा बाण स्तंभ आहे तसा आहे. त्यावर " आसमुद्रांत दक्षिण द्रव पर्यंत अबाधित ज्योर्तिमार्ग " असे लिहिलेले आहे.
अमिताभजींच्या आवाजातला सोमनाथचा ईतिहास ऐकत बघत आपण भारावून जातो. आताच्या पिढीला आपण काय बघतोय का बघतोय ? हे समजतं. यात मला नवीन माहिती समजली ती अशी की बरेच योद्धा होते सोमनाथ ज्योतिर्लिंग वाचवणारे. त्यातले एक हमीरजी गोहिलजी. यांचा स्मारक पुतळा सोमनाथ ज्योतिर्लिंग देवळाच्या समोरील चौकात आहे. आपली जमिन यवनांपासून वाचवणारे असे अनेक योद्धे आपल्याला ठाऊकच नाहीत याची तीव्र जाणीव मला झाली.
सोमनाथचा बीच वाॅक वे, सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि नंतर लाइट शो बघुन घरी जाताना देवात ठेवायला मस्त शंख घेतला. इतक्यात ठरवलेला वाहनचालक आला भेटला आणि प्रभू रामचंद्रांच देऊळ पाहायला घेऊन गेला. अत्यंत भव्य प्रसन्न मूर्ती आहेत. पाच फुट वगैरे ऊंची असेल, अस वाटत पटकन खाली ऊतरून येतील आता. याच्याच मागे परशुरामांच देऊळ व कुंड आहे. याच्या मागे समुद्र किनारी श्री चंद्रभागा शक्तिपीठ आहे. जो त्रिवेणी संगमाचाच भाग आहे.
न चुकता राम मंदिरात साष्टांग नमस्कार घालायला गाईड कम वाहनचालकानी लावला. सनातन धर्माची ओळख हीच आहे ती आपण पुढच्या पिढीला आठवण करून दिली पाहिजे ही गोष्ट फार भावली. आपणच आपली संस्कृती जपायची तर ती जगेल हे त्याची वाक्य फार आवडली. नंतर काठियावाडी थाळी एकदा तरी या प्रवासात आस्वाद घ्या अस सांगून तो आम्हाला रूमवर सोडून गेला. दुपारी ३ आणि रात्री १० नंतर जेवण मिळणार नाही अस समजलं. साडेनऊ झालेले मग काय तर जवळच्याच सरदार रेस्टॉरंट मधे मस्त पंजाबी जेवलो आणि मग गुडूप.
दीव बेट
सकाळी माहेश्वरी अतिथीमधूनच ईडली वडा सांबार नाश्ता करून दीव फोर्टकडे निघालो.
जातानाचा रस्ता एकदम बढिया आहे. पवनचक्कीच पातं नेतानाचे ट्रक दिसले. प्रथमच तीचा अवाका समजला. पूर्ण हिरवा गार दोन्ही बाजुंनी शेतीनं फुललेला रस्ता, मधेमधे भरपूर नारळाची झाडं. वाटतच नव्हत की गुजरात आहे. भुईमूग ऊस नारळ पलिकडे कपिला नदी.
आता आम्हाला नवीन ठिकाणी जायची संधी लाभली ते म्हणजे "प्राची तीर्थ". मोक्ष तीर्थ पण म्हणतात. सरस्वती नदीच्या घाटावरहे आहे. जबरदस पाण्याचा प्रवाह, टिपीकल गावाकडचा माहोल. घाटावर पिंपळाच मोठ्ठ झाडं आहे, तिकडे गुरूजी सांगतात तीन लोटा पानी डालो, सौ बार काशी एक बार प्राची असा या जागेचा महिमा.
नमस्कार दक्षिणा फोटो सगळ करून परत दीव बेटा कडे वळलो. वाटेत आजोबांनी परत ईधर नाश्ता करो म्हणुन थांबवलं. परत फाफडाच की...
सोमनाथ ते दीव बेट दीड तास लागला. ऊकाडा वाढला. आता आजोबांची माहिती देण सुरू झालं. ताड चेक पोस्ट नंतर दीव बेट सुरू होतं. दोन्ही बाजुला दलदलीचा
भाग वर झाडं पण खाली लगदा. केसरीया दीव रोडवरून जाताना IIT Vadodara International Campus लागला. पुढे आम्ही आय एन एस खुकरी जहाजावर गेलो. किरकोळ तिकीट आहे. फोटो काढू शकतो पण क्लिप नाही. जहाजावरचे निवृत्त सेवेकरी बारीक लक्ष देऊन होते.
जहाज बघुन आ वासतो आपण आणि शहीद जवानांची यादी बघून अवाक! या जहाजाची माहिती वाचायला स्कॅनर कोड होते ते आपण आपल्या फोनवर वाचायचे. तीन मजली जहाज आतुन बघुन त्यात राहून जीवावर ऊदार होऊन लढणारे कसे जगत असतील कल्पना येते आणि हात जोडले जातात.
काठावर असंख्य प्रकारच्या दारूच्या टपर्या आणि फिशच्या टोपल्याच दिसणार. पुढे दीव किल्ला येतो. मोठ्या खंदकानी तो सुरक्षित आहे, दोन खंदक संपून मुख्य द्वार येतं. कसला भक्कम तो अबब! दणकट किल्ला आतुन पाहताना छान वाटतं. एकंदरच सरकारच या सोमनाथ दीव भागात रस्ते बनवणं काम सुरू आहे. पोर्तुगीज निर्मित हा किल्ला बर्याच गोष्टींचा साक्ष आहे. या किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे. याठिकाणी ठेवलेल्या तोफा नीट नेटक्या आहेत. आतली दालनं वरवर पाहून कोणती असतील हा अंदाज बांधता येतो. तिहेरी समुद्रात असलेला हा दीव किल्ला चालत बघताना दीडतास जातो आणि पायाचे तुकडे पडतात. लाईट हाऊस पर्यंत जाऊन खाली येताना ते जाणवतं. खंदक संपून बाहेर आल्या आल्या आम्ही लिंबु सरबत आणि नारळपाण्याचा माराच केला.
दीव किल्यासमोर समुद्रात काळ्यापाण्याची शिक्षा असलेला तुरुंग आहे. डागडुजीच काम सुरू असल्याने जाता आलं नाही.
मस्त ऊकाड्याची मजा घेत जालंधर बीचवरून पुढे INS Khukri मेमोरियल पार्ककडे गेलो. तळपत्या एकच्या ऊन्हात फार फिरलो नाही.
खुप रील बघुन माहित झालेलं गंगेश्शर महादेव जागा आली. हे ठिकाण छान व्यवस्था असलेलं आहे. १०-१२ पायर्या ऊतरून खडकात पाच शिवलिंग आहेत. पाणी येत आंघोळ घालत जातं. मस्तच होती जागा, गार वारा आणि गार पाणी. पांडवांनी अज्ञातवासात ईकडे काही काळ घालवला अशी गोष्ट आहे. सुरक्षिततेसाठी कठडे आहेत पण पुढची जमीन शेवाळलेली आहे. सावधच चालाव लागतं.
ईकडून आमची सवारी नागोवा बीचवर गेली. तीव्र ऊताराचा गणपतीपुळ्याला आहे तसा बीच आहे. वाॅटर स्पोर्टस खुप आहेत पण आम्हाला काहीही करायच नव्हतं, नागावला हे सगळ होतंच.
सकाळची ईडली पराठा विरले होते. फिश, आलुचाट आणि सॅडवीचवर ताव मारता मारता घरी फोन झाले.
म्हणता म्हणता साडेतीन झाले. नागोवा ते सोमनाथ दोनतास प्रवास मी तर तासभरच बाहेर बघत बघत डुलकीच काढली. जाग आली ती आम्ही श्रीकृष्ण चरणपादुका सोमनाथ ला पोचलो तेव्हाच.
श्रीगोलोकधाम तीर्थ नावान मी जागा प्रचलित आहे. गीता मंदिर, श्रीकृष्ण चरणपादुका, बलराम मंदिर, ओंकारेश्वर महादेव अशी देवळं आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या चरण पादुकांना अभिषेक चालुच होते. मागे हिरण्या नदी आहे. गोलोक गमन करताना देहोत्सर्ग केलेली ही वास्तू...... शेवटची बलराम श्रीकृष्ण भेट ईकडेच झाली. नंतर शेषनाग रूप घेऊन या नदीमार्गेच पाताल लोकात त्याने प्रस्थान केले.
याच प्रभासतीर्थ काठी यादवकुलवंश नाश / समाप्ती झाली. पुढे शक्तीपीठ देवी हिंगलाज देवीच देऊळ आणि पांडव गुफा ठिकाण बघितलं. मी काही त्या गुफेत गेले नाही फक्त मुलगा गेला.
सूर्य मंदीर आणि सूर्य कुंड मस्त आहे.
मस्तच फारच छान वाटतं जुन्या वास्तू त्यांचा इतिहास बघुन समजुन. आता मात्र मस्त चहा घेतला तरच तरतरी येणार होती. मी तर डबल. समोरचा त्रिवेणी संगम घाट बघत सूर्यास्त बघायचा होता पटकन चहा आटोपून घाटावर पोचलो. अतिशय सुंदर सूर्यास्त, पाण्या ऊछल कूद करणारे मासे, बदकं दिवसभराचा शीणच निघून गेला.
संध्याकाळी सोमनाथ ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकर देवस्थान ला भेट दिली. अजबच वाटावं अस मोठ्ठ शिवलिंग आजुबाजुला चांदीचे कोरीवकाम, देवळाचा भाग परत सगळा चंदनाचया रंगाचा... या वास्तूतील अनुभूती आल्हाद दायक होती. आपलेपणा होता, ओढ होती. आजुबाजुची सर्व लोकं समाधानी चेहर्याची होती.
शिवलिंगास हात लावता आला, तो जरासा खरखरीत पण थंडगार स्पर्श अवर्णनीय आहे. काहींच म्हणण आहे की हेच लपवलेल मुळ ज्योतिर्लिंग आहे. पण दोन्ही शिवलिंग सोमनाथ अस म्हणणारे पण आहेत.
सोमनाथ ज्योतिर्लिंगच मुख्य मंदिर गझनीनं ऊद्वस्थ केलं. त्या जागेच सत्व नष्ट होऊ नये यासाठी विखुरलेल्या मंदिराजवळ अगदी लागुनच हे पेशव्यांबरोबर मिळुन हे १७८३ मधे अहिल्याबाईंनी बांधलं. यवनापासून वाचवण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी गर्भगृह जमिनीच्या आत बनवुन घेतला होता जेणेकरून ते विद्धवंसक शक्तीपासून वाचावं. एकंदर १७ वेळा हे नष्ट केलं गेल आहे. अस पण समजल लाइट शो मधे की हे ज्योतिर्लिंग जमिनीवर तरंगते होते.
महादेवाचा पहाटेचा अभिषेक बुक केला. चालतच माहेश्वरी निवासला पोचलो आणि जेवलो. या देवस्थानासाठी किती तरी लोकांनी बलिदान दिलय, वाचवण्यासाठी उभारण्यासाठी कष्ट घेतलेत. याच विचारात असतानाच आजचा ताजा फोटो गुरूजींनी पाठवला आणि ऊद्याच्या अद्भुत क्षणाचा विचार करतच मी झोपी गेले.
अहिल्याबाई होळकर सोमनाथ मंदिर
पहाटे दोघांची सोवळी आणि पाकिट एवढच घेऊन महादेवाच्या देवळात पोचलो. सविस्तर संकल्प सोडून जप करायला गुरूजींनी सांगितले. सकाळच्या आरतीचा छान अनुभव आला. पंचारतीला ईकडे लांब दांडी दिसली जी तुळशीची काडी आणि वर वात गुंडाळून केलेली अशी होती. अशाच लांबीला मोठ्या पुढे द्वारकेतही दिसल्या.
पंचामृत, भस्म, चंदन, गुलाल, फुलं, तीळ, बेल, गुलाब, पांढरी शेवंती, लहान झेंडु, साखरफुटाणे, गंधगोळी आणि दुध घालायला गवळी येतो ती आख्खी किटलीभर दुध अस सामान घेऊन गुरूजी आले. सगळ्यांना गाभाऱ्यात नेलं. आधीची सुंदर झालेली मंत्रमुग्ध पुजा , मंद धुपाचा वास, थोडीशी दर्शनासाठी आलेल्यांची कुजबुज आणि शिवलिंगासमोर ऊभे ठाकलेले आम्ही अगदी स्वप्नातलं दृष्य जणू!
पुजा झालेल्या महादेवाला दोन्ही हात लाऊन डोक टेकवुन नंतर मग अभिषेक सुरू केला. आणलेली सर्व सामुग्री प्रत्येकाला ते देत होते, आम्ही ती महादेवास अर्पण करत होतो. प्रत्येक वस्तू का वापरतोय याचं समर्पक ऊत्तर ते सांगतही होते. पुर्ण किटलीभर दुधाचा तिघांना अभिषेक करता आला. ते शिवलिंग ईतक मोठय ते की वाकुन नमस्कार करायला डोकं टेकायला डाव्या हाताचा आधार घ्यावा लागत होता. गुलाल भुरकवलेलं ते भव्य शिवलिंग बघताच मन भरून आलं. गुलाल भुरकवुन एक लहान हिरवट पांढरी फुलं असलेली माळ वर गोल ठेवली आणि मी ते बघुन डोळे डबडबले... भगवंत इतका गोड दिसत होता. मी माझ्या आवडत्या अहिल्याबाईंचं वास्तव्य लाभलेल्या तसेच भगवंताला स्वत: सजवलेल्या त्या जागेवर आहे मी कृतार्थ झाले. काही क्षण सगळे थांबुन नुसत बघतच होतो. शिवलिंगाच्या त्या थंडगार स्पर्शाची कशालाच सर नाही. असा विचार करतच होते ईतक्यात दर्शनाच्या रांगेतून पुष्प अर्पण सुरू झाली रांग सुरू झाली. जणू काही तो परमेश्वर काही सांगू पाहतोय. ॐ नम: शिवाय!
अभिषेक करून बाहेर आलो तिकडे गुरूजींनी आणखी काही पुजा केली प्रसाद घेतला दक्षिणा दिली.
(गुरूजींनीच फोटो काढलाआत मला फार आनंद झाला.) असा भगवंताचा सहवास लाभला की नंतरचा काही काळ मी माझी नसतेच. तो काळ माझ्या जीवनातला सर्वोत्तम काळ असतो. मानसिक रवंथात मी असते. नंतर बाहेर असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्या जवळ मी फोटो काढुन घेतला. गंधाची चंद्रकोरीच्या आकारातली वाळलेली कपाळावरची चिन्हं छान दिसत होती.
कपडे बदलून सोमनाथ ज्योतिर्लिंग देवळाच्या अभिषेक खिडकीवर जाऊन अभिषेक नोंदवुन माहेश्वरी निवास भोजनालयात नाश्ता करायला गेलो. मेथीचे ठेपले, बटाटा भाजी शेव खमणी जरा वेगळा नाश्ता मिळाला. दोनदा चहा घेऊन "जय सोमनाथ" म्हणत द्वारकेचा रस्ता धरला. माहेश्वरी निवासच्याच मागे सोमनाथ संग्रहालय आहे हे खुप ऊशिरा समजलं ते बघु शकले नाही. यादव कालीन तसेच सोमनाथ मंदिर चे जुने अवशेष तिकडे आहेत. गुगलवर सगळ आहे. ये
आजोबा आठला गाडी घेऊन हजर होते. पंधरा मिनिटांत पवित्र स्थल भालका तीर्थ ला पोचताना मधे बाणगंगा शिवलिंग समुद्रात त्यांनी दाखवली.
भालका तीर्थ
भगवान श्रीकृष्णाची निजधामभूमी.... सोमनाथ पासून ४ किलोमीटरवर ही जागा आहे. ईकडे पूर्ण जंगल होत. मोठ्या डेरेदार वडाच्या झाडाखाली भगवंत आराम करत असताना जरा नावाच्या पारध्याचा चुकून बाण लागून देहत्याग केला अशी कथा आहे. ती ही जागा, जी प्रत्येक श्रीकृष्ण भक्तास ह्रदया जवळची भाऊक गल्ली आहे.
ईकडे आणखी दोन तीन देवळं आहेत. पाय निघत नाही इथून.
जय श्रीकृष्ण!!!
भालका तीर्थ ते द्वारका चार तास प्रवास आहे. मधे माधवपूर बीच लागतो. नंतर पोरबंदर नंतर द्वारका! हो भगवंताची भूमी "द्वारका". मधे अजिबात न थांबता जायच ठरलं. आजोबांनी मात्र मधे ब्रेक घेतला. आम्ही पण मग स्थायी खाद्यपदार्थ चव घेऊन निघालो. वाटेत श्रीकृष्ण आणि रूक्मिणी यांचा विवाह झाला ते ठिकाण आजोबांनी दाखवलं. होमकुंड मंडप नीटनेटकेपणे जपला आहे. "माताका हलदी का ऊपटन ईस कुंड में ऊतारा" अशी माहिती मिळाली.
द्वारका
साधारण दोन वाजता आम्ही श्रीक्षेत्र द्वारकेला पोचलो. सामान टाकल आणि श्रीनाथ भवनला काठियावाडी थाळी जेवायच ठरलं. ईतके पदार्थ होते बाबा रे बाबा! १७०.०० मधे अनलिमिटेड थाळी. देतानाच ती ईतकी काठोकाठ होती कशाला लागतय आणखी काही.
द्वारकाधीशांच देऊळ पाचला ऊघडेल समजलं. जरा पडू आराम करू जाऊ अस ठरलं. कसलं काय? करमतय कुठं. रांग असते वेळ लागेल असा धोशा लावत दोघांना सव्वाचारलाच बाहेर काढलं. आधीच्या अनुभवावरून मोजकाच सामान घ्यायच ठरलं.
एका श्रीकृष्ण भक्ताला मी येताना सहज मनातलं विचारलं गेलं की मी भगवंताकडे रीकामी कशी जाऊ? आहे ते त्याचच दिलेलय फण तरी मला काय नेउ समजेना तर ती म्हणाली बेसनाचे लाडू ने. ते शीळं होत नाही आणि प्रभूंचे आवडीचे आहेत. एका भक्तांकडून सुचवलं, एकाकडून करवुन घेतलं ते कान्हाजींनीच. त्यांना हवं ते बरोबर आपल्याकडून करवून घेतात. अशीच एक मैत्रीण घरी ऊटणं बनवते मी ते पण घेतलेलं.
गोवर्धन पूजेसाठी तांदूळ भोग म्हणुन, बेसनाचे लाडू, पणत्या आणि ऊटणं घेऊन मी निघाले. याखेरीज पाकिट आणि फोन ईतकच बरोबर घेतलं. रूमपासून मोजून १५ मिनिटांत द्वारकाधीश देवळाजवळ पोचलो.
फोन पर्स आत नेऊ शकत नाही. तुलसीमाळा आणि कडक गोड पापडी भोग साठी विकणारे खुप होते. आणि मी देवळासमोर पोचलेसुद्धा... पावलं थबकली.
ही दोघ चपला फोन ठेऊन येतो म्हणून मला पुढे पाठवल कारण रांगा वेगवेगळ्या होत्या. आणलेल नेऊ देतीलच या विश्वासावर ते घट्ट छातीशी पकडूनच मी महिलांच्या रांगेत लागले. पाय लटपटत होते, ह्रदयगती तीव्र, सोबत कोण नाही, होता तो फक्त विचार की तो भगवंत कसा असेल? कडक तपासतच आत सोडत होते. सहज आत सोडलं. मुख्य दाराबाहेर ऊजवीकडे देवीच दर्शन घेऊन आत पोचले. आणि समोर द्वारकाधीशांचा कळस पाचमजले ऊंच सहा सातव्या भागावर.. मस्त चार पाच रंगी ध्वज फडकत होता. आत गेल्यावर डावीकडे भगवंतांचा लेक आणि नातू यांच देऊळ आहे सरळ अगदी सहज २०-२५ बायकांची रांग फक्त ईतकच अंतर ऊरलं होतं. ऊजवीकडे रांग वळुन समोर भगवंत दिसू लागलेले. आत्म्याला लाभलेली अनुभूती कशी हो सांगु?.... पाय ऊंचावताच धमक्क पिवळ्या पोषाखावर भगवा फेटा गोल फिरून तो ऊंच फडकत भगवंत अत्यंत हसरे समोर येत होते. गर्भगृहात सोनेरी चौकटीत ते विराजमान होते. काळीभोर बारीक नजरबंद तीन चार फुट ऊंच मूर्ती. आपोआपच दोन्ही हात उंचावून मी पण अभिवादन केलं. ते सगळ्यांकडे बघतात, त्यांच सगळ्यांवर लक्ष असतं. ओळ पुढे सरकत होती तस तस जास्त जवळुन दिसु लागलेल. रांगेत "द्वारकाधीश की जय" जयघोष चालुच होता. कोणी ओळखीच नव्हतं पण ते सगळे आपलेच वाटत होते.
आणि चार जणींवर माझा नंबर आला तस्स पिवळा कपड्यांचा त्या चौकटीचा ऊजेड अधिक जाणवू लागला. दोघी राहिल्यावर मला डोकं टेकायला मिळणार होतं. त्यामुळे आधीच मी माझ सगळ सामान शेजारी असलेल्या सुरक्षारक्षकाकडे दिलं त्यानं ते गाभाऱ्यात पाठवलं. गुरूजींनी तांदूळाची पिशवी पायाजवळ ठेवली आणि लाडु पिशवी ऊंचावुन विचारलं "ईसमे क्या है?" मी हातानच गोल गोल दाखवलं. त्यांनी तत्काळ भगवंताचरणी लावुन मला दिलं. तोवर मिझा नंबर आलाच होता. कुठं कुठं बघु? अस झालेलं. द्वारकाधीशांच्या पायाशी पण एक सुबक मूर्ती होती. शांतपणे पाहु दिलं, डोकं टेकु दिलं. हातात लाडवाची पिशवी दिली, मी दोन पावलं शेजारी झाले. सुरक्षारक्षक म्हणतो दिदी मन भर गया ना? अस म्हणताच डोळे ईतके भरले की तो माणूस मला दिसेचना. त्याच्या शेजारी ऊभी राहिले आणि लक्षात आलं की दिवे ऊटण पिशवीच राहिलय. मी परत आत वळले तर एक शीटी आली "ऊलटा मत जाओ" मी फक्त हातातलं ऊटणं आणि दिवे दाखवले " ये रह गया..." " जाने दो मॅडम को" मी परत आत गेले. गुरूजींना ते दिलं कोणताही अडथळा न येता ते त्यांनी घेतलं आणि त्यामुळे परत एकदा ती मनमोहनाची मनमोहक छबी टिपली. आणि बाहेर आले... मी एकटीच खुप हसत होते. प्रत्येक खांबाला हात लावत मागच्या शारदा शक्तिपीठात गुरू शंकराचार्य यांच्या देवळात गेले. त्याचं देवघर ईतक मोठ्ठय आणि सुरेख पुजा केलेलं, प्रसन्न पण होतं. तिकडन खाली ऊतरून आले तोच लेक शोधत आला आणि मी त्याला कडकडून मिठीच मारली. आज या दोघांमुळेच मला हे सुख लाभल होतं.
(ब्रज भूमीचे द्वारकाधीश, चतुर्भुज मूर्ती, द्वारका नगरी भगवंतांनी वसवली तेव्हा याजागी हरिगृह होतं त्याच जागी द्वारकाधीशांच गर्भगृह आहे. भगवंतांचे नातू वज्रभान यांनी हे बांधल आहे.)
आता जरा भानावर आले तेव्हा समजल सगळे वर काय बघत आहेत? ध्वज बदणार होते तो प्रहर होता. मग आम्ही पण बसलो दिवसात पाच वेळा ध्वज बदलला जातो हे ठाऊक आहे पण कारण शोधायचय मला. ते बघुन प्रदक्षिणा मार्गातल देवकीमाता देऊळ बघितलं. हे देऊळ जगत देऊळ म्हणून पण ओळखतात. मुख्यद्वार मोक्ष द्वार आणि मागच दार जिकडे ५६ पायर्या आहेत ते स्वर्ग द्वार म्हणतात. सप्तपुरीतली ही एक पुरी. एक दुर्वास ऋषींच देऊळ आहे, ते बघुन प्रदक्षिणा पुर्ण करून प्रद्युम्न (मुलगा)आणि अनिरुद्ध (नातु) बलदेवजी त्रिविक्रमजी (वामन अवताराचच एक नाव) व बळीराजा यांची देवळं बघुन समोरच कुशेश्वर महादेवाच दर्शन घेतलं अजुन ध्वजारोहण सुरू च होतं. नंतर खुप गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन बाहेर फडूनच कळसाच दर्शन घेतलं. फोन चपला घेतल्या आणि गोमती घाटाकडे वळलो.
गोमती नदी नेपाळहून निघते ती ईकडे अरबी समुद्रात मिळते. पुराणात वाचलं ते अस की ही वसिष्ठ ऋषींची कन्या, गंगेईतकी पवित्र. ऋषी दुर्वासांची सेवा श्रीकृष्ण रूक्मिणी नी ईकडे केली. असा हा पवित्र गोमती घाट जिकडे भगवंतांनी स्वत: स्नान केले होते. द्वारकाधीश देवळाकडून निघणारे स्वर्गद्वार ५६ पायरी ऊतरून आपण या घाटावर पोचतो.
घाटावरुन सरळ चालत आपण समुद्रनारायण देव मंदिरापाशी जिकडे गोमती समुद्रात मिळते तिकडे पोचतो तो.... घाट. ईकडे नारायण देव म्हणजे विष्णु आणि गोमती माता मूर्ती आहेत. समुऊकिनारी अगदी टोकावर हे आहे. ऊंच पायर्या आहेत. आत अंधार होता वर चौथरा दिसला आत या मूर्त्या असाव्या. खुप अंधार होता मी आत गेले नाही.
(गुगलकृपा ...) कारण सुदामासेतू डागडुजी कामामुळे तो बंद होता. गोमतीघाटच्या पलिकडे ऋषी दुर्वास ध्यान स्थल आहे. पंचतीर्थ आहे, पाच गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. सुदामासेतुशिवाय पलिकडे जाता येत नाही.
पंचतीर्थ मधे
१) चंद्रभागा तीर्थ : पुल / अंगीरा ऋषी - सहदेव कुंड- चंद्रभागा नदी - महाराष्ट्र ओरीसा
२) कुशावती तीर्थ - अत्री ऋषी - नकुल कुंड - गोवा
३) गोमती तीर्थ - मरीची ऋषी- - अर्जुन कुंड - गोमती नदी लखनौ
४) जांबवती तीर्थ - कृत ऋषी - भीम कुंड - जांबवती नदी - गया
५) लक्ष्मणा तीर्थ - अत्री ऋषी- युधीष्ठीर कुंड - लक्ष्मणा नदी - हिमाचल व बद्रीनाथ
पुर्ण घाट आणि द्वारकेच्या रसत्यांवर माणसांसारख्या गाई वासरं फिरतात. दुचाकीस्वार, गाई आणि शेण शेवटपर्यंत बरोबर होतं. (हा खालचा समुद्र नारायण देऊळ बीचवरून काढलेला फोटो)
जवळच छानस छोटसच चक्रनारायणाच (सुदर्शनचक्र) देऊळ आहे. मनोरथधार नावाची ध्यान गुफा ईकडेच आहे. घाटावर अशी बरीच देवळ आहेत सगळीकडे मी गेले नाही. सनसेट मात्र खुप छान बघितला द्वारका बीचवरून... द्वारका बीच ते महाराष्ट्र मंडळ निवास वीस मिनिटे गुगलवर दाखवलं. आम्ही चालच गेलो. मधे चहा घेतला. दुपारच काठियावाडी जेवण ऊतरल ईतक घाटावर चालणं झालं. रूमवर गेलो आराम केला. परज जेवायला तासाभरान बाहेर पडलो. गुरूप्रेरना रेस्टॉरंट मधे पाव भाजी दोसा जेवलो. सकाळी आजोबा सात साडेसातला येतील. बेक द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग ऊद्या करायच ठरलं.
नागेश्वर ज्योतिर्लिंग (२८ ऑक्टोबर)
सकाळी लवकर उठून नागेश्वर ज्योतिर्लिंग ला अभिषेक करायचा म्हणून सोवळं आणि पाणी अस किरकोळ सामान घेऊन रूमवरून निघालो. सातला आजोबा हजर. ते खुष होते द्वारकेला सासुरवाडी होती मग काय.
दारूकवन ऊर्फ नागेश्वर ज्योतिर्लिंग अर्धातास वाट होती. पण इतक धुकं होतं की काय सांगू. सूर्य तर धुरकट दिसत होता. पक्षी जमिनीवर गायांचे गट म्हशींचे गट पण वाटेत खुप होते. गाडी फार फार जपुन चालवावी लागत होती. वाटेत राधा बल्लभ बर्ड पाॅइंट लागतो. मायासर लेक लागतं पत हे सगळं पूर्ण धुक्यातच गुरफटून होतं. १०० मीटर रस्ता दिसत होता फक्तं. सुपरफास्ट आजोबांचा हलेडुले पाळणा झाला होता. तासाभरानी नागेश्वर ज्योतिर्लिंग आलं. समोर अतिभव्य शिवमूर्ती गुलाबीसर रंगाची.
गाव तस फारच छोटस वाटलं. अजिबात गर्दी आही. चपला काढुन डायरेक्ट तिकीट काऊंटरवर अभिषेक नोंदवायला. ईकडे प्रत्येकी २००.०० अभिषेक पण पुजा की सामग्री फुल थाली वेगळी घेणे अस होतं. (तिकडे सगळ गुरूजींनी आणलेल आणि ३०००.०० दक्षिणा होती.) २५०.०० ची थाली घ्या तोवर पितांबर नेसतील अस सांगितलं. दोघ सोवळं नेसले मी थाली घेतली. पायरीवर बसवलं. आत फोटो काढु नका बाहेरू काढा. अस सतत सांगत होते. गाभारा आठ पायरी ऊतरून आत आहे. पुजा साहित्यात दोन चांदीचे नाग होते छोटुसे. ईकडे शंकर पार्वती नाग रूपात आहेत. नागनाथ दर्शन पण म्हणतात.
दवं पडल्यान देवळा भोवतीचा परिसर पूर्ण ओला होता. देवळामागे मोठा तलाव आहे.
दारूका राक्षसीणीला पार्वतीकडू वरदानात मिळालेल हे दारूकावन. मागे भीमगज तलाव आहे.
मोजुन १० मिनिटांत गोपीतलावला पोचलो. गोपी तलावाकाठची माती गोपीचंदन अशी कथा आहे कारण श्रीकृष्ण गोलोक प्रस्थानानंतर सगळ्या गोपींनी या तलावात समाधी घेऊन त्यापण गोलोकी गेल्या. ईकडे गोपीनाथ मंदिर आहे. वस्ती कमी आणि पुरातन आहे सगळं. स्वच्छता बोंबललेली दिसली. नशीब गोपीतलाव स्वच्छ होता.
तलावाबाहेरच चहा बिस्कीट नाश्ता झाला. आपल्याला चालेल पटेल अस काही खाण्यासारखं नव्हतच. ईकडून ओखा ठिकाणी जाऊन मग सुदर्शन सेतू मार्गे बेट द्वारका जायचं होतं. मधे मिठागरं टाटा नमक फॅक्टरी दिसली. आणि कधी तो पुल आला समजलच नाही.
सुदर्शन सेतू पार करून बेट द्वारका आली की आपण आपल वाहन नेऊ शकत नाही. तिकडच्या टमटमनच सगळं फिरायचं. वैयक्तिक टमटम ५००.०० रू. करूनच आम्ही निघालो कारण पर सीट ५०.०० नी ती भरली की मगच हलणार होती.
बेट द्वारकेच्या प्रवेशद्वारावर पोचलो. परत सगळं लाॅकरमधे टाकलं. शहाबाधी फरशा होत्या सगळीकडे, परिसर स्वच्छ आणि पोलिस पण थोड्या थोड्या अंतरावर होते.
आत परत वेग वेगळी रांग होती पण बायकांच्या रांगेत तीन जणी पुरूषांच्या रांगेत चारच पुरुष ईतक सहज होतं. सराईतासारखं भर्रकन गेलो ते प्रत्यक्ष केशवराजांसमोरच. हो ईकडे भगवान श्रीकृष्णाला केशवराज म्हणतात. हे कान्हाजी जरा डोळे ऊघडे असलेले आहेत. गुबरे गालाचे लोभस.
ईतकं शांत आणि हवा तितका वेळ दर्शन मिळालं. अगदी मोरपिसापासून तोड्यांपर्यंत न्याहाळता आलं. भगवंतांचा राणीवसा बेट द्वारकेत होता ती ही जागा. जी ब्राम्हण समाजाने नंतर बाधली अस समजल. ज्या वास्तुला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा सहवास लाभला ती ही पवित्र भूमी.. त्यांच्या या संदर्भातील सर्व कथा झरझर डोळ्यासमोर येत होत्या. पांढरट भुरकट माती किती भाग्यवान, ईकडचे लोक रोज हे आध्यात्मिक अस्तित्व अनुभवत असतील ते पण किती भाग्यवान . ही वास्तू जतन करून आपल्या सारख्यांसाठी जपली हे केवढ आपल भाग्य! बरोब्बर पंधरा वीस मिनिटे आम्ही समोर असू. मन आवरुन बाहेर पडलो मागे साक्षी गोपालच देऊळ आहे. जो आपण येऊन गेलो ची नोंद देतो. ही खुप लहान मूर्ती आहे. आम्ही गेलो तेव्हा श्रृंगार सुरू होता. मोठी गोष्ट लिहली होती पण वाचता कोणाला येतय? बाहेर पडताच सलग दालनं दिसली.
बेट द्वारका लाच भेट द्वारका म्हणतात. सुदामा कृष्णासाठी तांदूळ घेऊन आला ती जुनी वास्तू जतन केलेली दिसलं. जुनं हिरवं निळ गुलाबी कोरीवकाम होतं. सुदामाला बसवलेलं आसन गादी होती दिलेले तांदूळ एक माणूस गादीवर ठेवत होता. बलभीम, रूक्मिणी जांबवंती यांची दालनं पण बघितली. पण मूर्ती बघु शकलो नाही. भोग के लिए पडदे लगाए गए थे.. आपण विचारल कितना समय लगेगा तर वेगवेगळं समजलं. रूक्मिणीचा चेहरा तर बघतच होतो आणि गणि घंटा वाजवत पडदा सारला. आम्ही थोडावेळ वाट पाहून निघालो. मन नखशिखांत तृप्त होतं मी पण निघु म्हटलं. बाहेरचा रस्ता भलतीकडेच होता. चपला काढलेल दार शोधत मस्त चक्कर मारून झाली. फोन ताब्यात घेतले आणि मस्त पेरू खाल्ला.
टमटमनी पुढे एका सिख गुरूद्वारा मधे गेलो. मला प्रथमच जाण्याची संधी होती ही. या जागेविषयी या धर्माविषयी मी अनभिज्ञ होते.
गुरूद्वारा भाई मोहकिमसिंहजी - या ठिकाणी ईतकं समाधानी शांत वाटल. हे पाच पैकी चौथे गुरू आहेत. हे त्यांच जन्मस्थान आहे. तिकडे एक काका होते. त्यांनी आपुलकीने माहिती दिली. आल्यामुळे छान वाटल म्हटले. आपले हिंदू धर्मिय लोक ईकडे आले पाहिजेत. त्यांनी नंबर दिला आणि परत याल तेव्हा ईकडे ऊतरा. आता ४० खोल्यांची सोय तयार आहे. आपण ये जा ठेवली तर धर्म वाचेल. ईतकं छान शांत समजवत सांगत होते. लंगरमधे जेवणाचा पण खुप आग्रह केला पण वेळेअभावी थांबु शकलो नाही. परत नक्की येऊ अस म्हणत निरोप दिला.
यानंतर टमटमनी सहा किलोमीटर जाऊन मग मकरध्वज देऊळ आलं.
श्री हनुमंताचा मुलगा मकरध्वज. समुद्र ओलांडून लंकेला जातान पडलेल्या स्वेद थेंबास माशानी ग्रहण केलं आणि हनुमंत पुत्र मकरध्वज जन्मला. याच संगोपन रावणाचा भाऊ राजा अहिरावणनी पाताळलोकच्या राजानं केलं. ही गोष्ट तिकडे नीट समजली. श्री हनुमान निश्चिंत आणि आनंदी, श्री मकरध्वज देखील आनंदी असा विग्रह ईकडे दिसतो. या दोघांच्या हातात कोणतेही हत्यार नाही. गुजरातमध्ये आनंदी मनःस्थिती, आनंद 'दांडी'द्वारे व्यक्त केली जाते. श्री हनुमान आणि श्री मकरध्वज विराजमान असलेल्या या मंदिराला 'दांडी हनुमान' म्हणजेच आनंदी हनुमान म्हणतात. पूर्ण देवळात हनुमान चालीसा चित्रासहीत आहे.
नंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. आमच्या लिस्टमध्ये हे नव्हतं पण टमटमवाल्याची खुपच ईच्छा होती की ते आम्ही बघावच.
श्री चौरासी धुना सिद्ध पीठ आणि आशापुरा माता मंदिर. कशाच आहे माहिती नव्हती पण खुप यज्ञकुंड होती. हे बेट द्वारकेच्या शेवटच्या टोकाला आहे अगदी.
त्याचही समाधान झालं आम्हाला पण छान वाटलं. एका गुरूंचा फोटो होता ते बघुन गिरनारचे काश्मीरी बापु आठवले. नमस्कार करून परतीचा मार्ग धरला. टमटमवाल्याशी बोलताना समजल की बोटीनं सात तास कराची आहे. खुप आश्चर्य वाटल मग मी विचारलं की भीती वाटत नाही का? तर नाही म्हटला नेव्हीची गस्त असते आणि आपली जन्मभूमी घाबरायच काय? एकंदरच मोदी सरकारन सुखसोई केल्यान रोजगार मिळवून दिला अस समाधानी वक्तव्य त्यानी पण केलं.
परत सुदर्शन सेतुकडे पोचवलं. आजोबा वाट बघतच होते. परत निघालो तेव्हा आजोबांनी त्यांच्या साडूंच्या बेकरीत चलण्याचा खुप आग्रह धरला. ओखामधे ती बेकरी होती. पण म्हटल चला बघु तरी आपण कशाला परत ओखात येतोय बेकरी बघायला. वाॅर्डरोब सारखी ऊंच मोठी भट्टी होती. डबल डोअर कपाट उघडताच भपखन आगीच गरम झोतच... आगीच कपाटभर गरम टोस्ट आले की बाहेर. त्यांनी कधीही कल्पना करू शकत नाही भेटलो नाही तरी असे सगळे भाचे ओळख करून दिले. साडू जी खुष होते. नुसत कस निघायच म्हणुन मी एक नानकटाई च पाकिट घेतलं. ते पैसे घेईनात. पेहली बार आए हो पैसे नही लेना मुझे.. वरून आग्रहाच कोल्ड्रिंक्स पाजुन तळपत्या ऊन्हाचा दाह कमी करून आम्ही पुढं निघालो. कोणतीही व्यक्ती विनाकारण आयुष्यात येत नाही हे मला आज पटतय कारण कळेलच पुढे आहे.
आम्हाला वाटल आता फक्त रूक्मिणी देऊळ करून रूमवर जायचं पण आजोबांनी मधे मूल द्वारका तीर्थ धामला नेलं. मूल द्वारका तीर्थ मधे रणछोड देऊळ आहे.
कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीच देऊळ वाटेत आहे. रणछोडजींचे मंदिर द्वारकाचे सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तेथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची चार फूट उंच मूर्ती आहे.
तिकडच्या गुरूजींनी सांगितले की कृष्णाची द्वारका देवळं तीन . पहिली ही मुल द्वारका - रणछोड नाव मिळाल तेव्हा भगवंत ईकडे आले रूक्मिणी बरोबर या जागी वास केला. दुसरी द्वारका गोमती काठी शहर वसवलं जीकडे द्वारकाधीश देऊळ आहे पण राणीवसा पाण्याच्या मध्यभागी ठेवला ती बेट द्वारका ते तिकडे केशवराज आहेत.
भगवंतांचा एकंदरच सौराष्ट्रात फार वावर झाला हे मला समजलं. आपल्याला ऊगाचच वाटत की मला किती ठाऊक आहे हा माज भगवंत ऊतरवतात जेव्हा ही माहिती ते गुरूजी सांगतात. परमेश्वराची कृपा ते अहंकार चढुच देत नाहीत.
आता आम्ही रूक्मिणी देवळाकडे वळलो.
दुर्वासा ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवी रूक्मिणी काही वर्षां विलग राहिल्या. देऊळ खुप कोरीव आणि समुद्रीखडकांतल बांधकाम अस आहे.
ईकडे मात्र भोग लावल्यानं जरी पडदा लावला असला तरी आम्ही थांबुन दर्शन घेऊनच पुढे भाडेश्वर महादेव देवळाकडे जो या वेळचा शेवटचा पाॅइंट होता तिकडे गेलो.
समुद्रात भरती आली की हा रस्ता बंद होतो. योगायोगान आम्ही देऊळ पाहू शकलो. दुपारच्या तळपत्या दोन अडीच्या ऊन्हात पाय भाजत ते बघितलं. नंतर समजलं की रूम जिकडे आहेत तिकडून ते चालत जाण्यासारखं होतं. काल लक्षात आले असते तर आलो असतो की जेवल्यावर. आता मात्र आजोबांची जेवणाची गडबड सुरू झाली होती कारण तीनला बंद होतं. काल रात्री जेवलो तिकडेच डायरेक्ट पोचवलं. सकाळपासून चालतच होतो, नाश्ता पण विशेष केला नव्हता. मग काय तुटून पडलो जेवणावर. पाऊणेक तासात त्यांनी रूमवर सोडलं. बॅग आवरून दीड तास झोपलो आणि संध्याकाळी पाचला वसुबारसेच्या दिवशी सहवास लाभलेल्या कान्हाजींच्या द्वारकेस नमस्कार करून पोरबंदरला निघालो.
पोरबंदर ते पुणे प्रवास आठवणींचा हिंदोळा घेत घेत कसा संपला समजलच नाही. फक्त एक फजिती मात्र लिहणार आहे मी माझी. जीच्यातून मला कान्हाजींनीच सोडवलं. हसु येतय पण स्वतः ची फजिती पण एन्जॉय करता यायला हवीच की.
तर झाल अस की ट्रेन मधे झोपले असताना कानावर पेरू घ्या पेरू आवाज आला. झोपेतच होतं ते कारण मराठीत कोण ओरडणारे तिकडे. मधल्या बर्थवरून एकदम जागी झाले तर समोर एक मुलगा वरच्या मुलीला पेरू देत होता. मी म्हटल मला हवाय. ते दोघही बघतच राहिले. ते काय भाषा बोलत होते मला आणि माझी त्यांना समजत नव्हती. किती पैसे सांग. काही समजल नाही. शेवटी माझा चेहरा बघुन की काय त्या मुलीन मला तो रसरशीत पेरू दिला. मला वाटल ती दुसरा घेईल कसल काय तो मुलगा ती दोघही प्रवासी होते. तो विक्रेता नव्हताच. तरी मी पैसे देऊ केले ते दोघे घेईचनात. ते दोघं हसत कुजबुज आणि मी मनातल्या मनात कुजबुज. प्रतिक्षिप्त क्रिया ही की मी तो पेरू मन लाऊन खाऊ लागले. त्यामुलीनं मला वेट टिशू पण दिला. मी मनापासून हसले. पेरू संपला पोट भरलं. ती दोघं घरी व्हिडिओ काॉलवर हे सगळ जेव्हा इंग्रजी त सांगत होती तेव्हा मला नीट कळली माझी मजा. तेव्हा मला काय वाटल कोण जाणे पटकन तो नानकटाई चा पुडा काढला आणि त्यांच्या हातात दिला. काय खुष झाले ते दोघं. ईतके की तो त्यांनी आईला दाखवला.
मुद्दा हा की त्या क्षणी ते पैसे घेत नव्हते आणि माझं अस त्यांना देण्यासाठी काहीच नव्हतं हे त्या कान्हाजींना ठाऊक असावं म्हणुन बेकरीची सफर घडवली.
जय श्रीकृष्ण! जय द्वारकाधीश! जय रणछोड!
******
०६.११.२०२४
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
९९७०१६८०१४
फारच सुंदर गौरी, नेऊन आणलंस तुझ्या बरोबर, तुझ्या स्पीडने.....🙏🏻🙏🏻🙏🏻 नेहमी प्रमाणे
ReplyDeleteजय श्रीकृष्ण
DeleteBeautiful and detailed !
DeleteGauri kharach tuzya mule amhalahi dwarkadhishache darshan Ani khup chan mahiti milali. Khup chan lihale ahes.
ReplyDeleteजय श्रीकृष्ण
Deleteजय श्रीकृष्ण
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली धन्यवाद
ReplyDeleteजय श्रीकृष्ण
Delete