सद्ध्याच्या काही सुशिक्षित हुशार सुजाण बायका मुलींच्या तोंडच हे वाक्य. कनचं? हे मी लावलेल बिरूद. त्याचा अर्थ कोणतं?
कोणत्याही बाबतील स्वतःला कस हवं याची परिभाषा यांची पक्की असते. फक्त करायच कस ते समजत नाही ऊर्फ सुचत नाही किंवा ते मी का करू? ते माझ काम आहे हे सुचत नाही. स्त्रीसुलभ क्षमतेत असणारा समजुन ऊमगुन करणं हा गुण हल्ली कमीच दिसतो.
------
अग गाडी मेन स्टॅड ला लाव.
नाही येत मला.
अग पण काल तर लावलेलीस ना? दोन गाड्या जास्त मावतात.
हो पण काल श्युज घातले होते. श्युज असतील तरच मला मेन स्टॅड गाडी लावता येते.
(खच्याक्)
आम्ही पांढरी निळे पट्टे असलेली स्लीपर घालुन पर्वती चढलो यांच्या वयात.
------
पोहे काय असतात कोपऱ्यावरचे!
मला फार वेगळे वाटले नाहीत. Any special?
खाताना पदार्थ कसा हवा यावर ताशेरे. करता कुठ येतय?
कसे पोहे हवेत हे केल्याशिवाय कळणार नाही. यांचे नखरेच खुप.
गोड पदार्थ हवा पण वेलची नको. ती नसलेलच खाणार.
(खच्याक्)
यांना करायच जमल पाहिजे हे सुचत नाही पण खाण्यात काय हवं कस हवं ते स्व:च मत तत्काळ नोंदवणार.
-----
ईकडे ही सोय हवी ती सोय हवी अश्या ठसक्यात प्रतिक्रिया देणार.
पार्टीत बिर्याणी आणा.. हौस भारी पण वाढायची कशी समजत नाही, खाऊन झाल्यावर आपली प्लेट dustbin bag मधे टाकायची सोय सांगितली नाही म्हणून टेबलवर जमा करून निघून जाणार.
होती का dustbin bag तिकडे?
(खच्याक्)
आपला आपणच वापरलेला परिसर आवरायच समजत नाही.
------
आज काय सण का? अच्छा मी काय करायचय.
अग तुमच्या भागातला सण ना?
हो, पण मला काही ठाऊक नाही.
(खच्याक्)
आमच्याकडे अस असत चा डंका मारताना तो नियम म्हणून समजुन पाळावा हे सुचत नाही.
-----
आपणहुन खर्च करण स्वभाव नाही पण ईतरांनी सहभागी करून घेतल तर आवडतं.
पण एकत्र रीक्षान गेल की उतरल्यावर पैसे आपणहून देण्याच मला सुचतच नाही.
(खच्याक्)
दुसरा पैसे देईल तोवर थांबायच म्हणजे बीपी हाय अशी आमची स्थिती .
----
आज मी मस्त भाजी करा सांगितल घरी.
अग आज हरतालिका ना? ऊपवास तुझा नसेलच आईचा असेल ना पण.
हो वहिनीचा पण आहे. मी आणि दादा मस्त मेनु कर संध्याकाळी आज शुक्रवार आहे सांगुन टाक लं.
(खच्याक्)
आणि यांना बरोबरीचा नवरा हवा. स्वतः च पोट तरी हव ते करून भरता येत का? नाही तेवढ मात्र सुचत नाही.
-----
आपण एकत्र जेवण करू या का?
हो चालेल काय काय करायच? मी मदत करेन अंदाज मात्र मला समजत नाही.
मी काय करू?
(खच्याक्)
आम्हाला समोर दिसायच काय करायच ते. यांच अजबच गणित, यांना समजतच नाही.
---
नवरा हा गहन मुद्दा.
काय ग कसा हवा नवरा?
माझी तर चेक लीस्ट च रेडी आहे.
(खच्याक्)
चेकलीस्ट करून नवरा बायको होत नसतात. एकमेकांच्या सहकार्याने एकत्रीत चेक लीस्ट पूर्ण करायची क्षमता असेल तरच लग्न होतील. हे यांना कधीतरी समजेल का?
-----
ऊद्या traditional dress घाला सगळे. खंडेनवमी आहे.
दोन जणी चकाचक साडीत आणि या सगळ्या किती हेवी वाटतय या धोशात दिवस घालवणार.
घातल काय आहे ? तर मैत्रिणीच घर बघायला जाताना घालु ईतका साधा पजाबी ड्रेस.
या लीफच काय करायच?? चक्करच यायच बाकी राहत हे ऐकुन.
(खच्याक्)
खंडेनवमीला काय बहारदार आवरून पुजा होत होती सांगाव नव्हत लागत मोठ्यांना सोनं दिल की नमस्कार करतात.
----
Oh! No! (हाताला क्रीम लावत)
काय झाल ग?
हा आपला डिश वाॅशिंग बार चांगल नाहीये माझे हात आग होतात.
विम बार आहे तो आणखी काह पाहिजे?
ठिके धुते मी डबा रोज तोच वापरून पण नंतर क्रीम लावावच लागतं.
(खच्याक्)
आणि आम्ही राख, नारळाच्या शेंड्याची घासणी, औषधाच कव्हर, निरमा कशाकान भांडी घासत आलो. ओरखडा पण त्रासदायक नव्हता तेव्हा.
यांना गालाला हाताला ओठाला पायाला सगळ्याला वेगळ क्रीमच लागतं.
आणि आम्ही अगदीच गरज वाटली तर खोबरेल तेलाचा ऊपाय करून आजही ठणठणीत आहोत.
---
छान पाच दिवस बाप्पा झाले पण विसर्जनाचा योग नाही.
अच्छा. पण मोदक पार्टी मस्त झाली. दिवस मस्त गेले.
काय काय करायचय? आज विसर्जनाचं?
बघा कस जमतय. ( मनात दु:खाची किनार)
घरी पोचताच... कुठेत सगळे?
विसर्जनाला गेलेत.
एक व्हिडिओ काॅल करून दाखवावा नाही वाटला? निदान घरचे बाप्पा निघाले असा मेसेज तरी?
सुचलं नसेल?
(खच्याक्)
आपण नसतो तेव्हा जी व्यक्ती आपण लांब असुनही आपली आपली आठवण काढते, शक्य तस तिकडुन गोष्टी दाखवते, निदान अपडेट देते आणि जर तीच नसेल तर तीला साधं बाप्पा निघाले मेसेज करणही सुचलं नसेल?
हे तरी अगदी खच्याक् खच्याक्......
आणि यात आई नावाच पात्र दारातच म्हणणार जा पळ खालीच असतील बाप्पा च दर्शन मिळेल. (तळमळ)
कोणी लेकरू म्हणेल वाटल होत मला फोन करू का ? पण वाटल तु गाडीवर असणार. (प्रेम)
----
अग आपल्या दोस्ताचा वाढदिवस आला काही ठरवायच तर ग्रुप करू का?
ग्रुप परत कशाला? आहे की.
हो का मला दिसला नाही ग?
अग बाई तु नाही का त्यात? तुझा तो तुझी ती पण आहेत की तिकडे.
मला अस प्लॅनिंग करताना सहभाग आवडतो हे तीला त्याला ठाऊक असुनही मी तिकडे नाही यावर चकार शब्द काढला नाही कोणीही.
सुचलं नसेल गं?
(खच्याक्)
आणि आम्ही आपली समजतो ती जनता सगळी चढलीय ना गाडीत नीट बघुन हुश्श होतो.
अजब तुझे सरकार...
---
अडचणी फक्त ठराविक घरीच जातात त्यांना त्यांच्यावर मात करणारी घरं बहुतेक पाठ असावीत. तसच ही पिढी कर्म करण्याच न समजुन, अस न सुचणं वाली जनता स्वतः चच नुकसान करते. खरतर तीच खरी हुशार सुजाण आहे अस म्हणाव लागेल.
सुचत नाही जमत नाही म्हणतात त्यांच मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीची असो अप्रुपच वाटत मला. स्वतः चा स्वार्थ बरा चपखल कळतो. आपल समजुन करणं जमल तरच ते सुचतं. काहींना आपला विचार करूनच बुद्धी संपते बहुतेक.
हा न सुचणं, न जमणं रोग आताचया पिढीसारखाच आधीच्या पण दिसतो काही प्रमाणात पण फक्त आई वडिलांच्या पुण्याईमुळे तो ऊघडा पडला नसावा.
यावर माझ्या मैत्रिणीच्या तोंडचा अप्रतिम डायलॉग आठवला तो असा -
"आपण सुखानं नांदतो ही आपलीच चुक ग गौरी. आपल्यात समयसूचकता ठासुन आहे ही आपलचीच चुक ईतरांना तर सुचतच नाही" मला कोणात्याही पिढीतल्या कोणाही व्यक्तीवर बोट ठेवायच नाही पण अनुभव असे आलेत आजुबाजुला की विचार येतो की आपल समजुन आपलस करण्याची कला आपल्यात आहे म्हणून आनंद वाटुन घ्यायचा की दु:ख!
विनोदाचा भाग वगळता मी स्वतःला नशिबवान समजते कारण मी अशी नाही. या पिढीच कस होईल ही चिंता न करणे आणि याचा परिणाम हा असेल कि या लेखात भर पडत राहणार...
(खच्याक्)
----
आता हे खच्याक् काय आहे ते सांगते आधी.
सर्वसामान्य माफक अस वागण समोर न येता जर काही अस न सुचणारं किंवा बाळबोध किंवा अबोध वागणं समोर आलं तर अवाक् होऊन मर्मी घाव बसतो तेव्हा असा आवाज येतो खच्याक् ही माझी साधी सरळ भावना.
So i am enjoying the company of all types of people's and improving my consciousness definitely growing now with free mind!!
Yours lovely
गौरी
अगदी सुरेख वर्णन केलं आहेस गौरी , पूर्वीच्या बायका ( आपल्या आई, आजी, पणजी) इतक्या कडक आणि तंदुरुस्त आता कोणी नाही
ReplyDeleteखरय ग. पिढीत परिवर्तन होतय. यातुनच मार्ग काढत सकारात्मकतेन पुढ जायच आता आपल्याला शिकाव लागणार आहे.
ReplyDeleteखुप छान गौरी अगदी माझा मनातलं लिहलं आहेस..Awareness वर मला बोलावंसं वाटतं खुप तुला माहित आहे का लिफ्ट cha वापर करणे चुकीचा, tissu पेपर kitihi kasehi vapartat,.मी बरोबर track var ahe na??असो तु 100% लिहलं आहेस.. 👌👍🙏🙏
ReplyDeleteसगळ बरोबर पण तत्वान लाॅजिकन पटवुन देण ही कला आत्मसात करूनच या पिढीशी यावर बोलण योग्य ठरेल.
Deleteसुंदर👌 गौरी ताई, खूप छान वाटते लेख वाचून.
ReplyDeleteनविन दिशा मिळते विचारांना, नवीन काहीतरी शिकायला मिळते 🙏🙏
धन्यवाद. ही तर श्रीकृष्ण कृपा.
Deleteवाह वाह...खूपच छान लेखन....वाचताना उत्सुकता वाटत होती....खच्याक काय सांगितलं बरं केलंत नाहीतर आमचे डोके खच्याक् 😍👍🙏🌹
ReplyDeleteधन्यवाद. काही शब्दांचा माझा असा वेगळा शब्दकोश आहे जो असच काही भन्नाट दर्शवतो. बर झाल विचारलस मी सगळे लिहुन काढते आता.
ReplyDeleteKhup sundar vichar ani anubhav mandales 👌👌 barechse relatable watle mala jas ki sobat travel kel kiva kahi snacks chaha coffee vagere la gelo tari barobbar kahi Janina call yeto ani "ag me dile aste na" mhnaycha chance milto. Ani khar sangu ka economic status aplya peksha khup bhari ast tyanch pn hi ashi saway ka kunas thavuk.
ReplyDeleteAni chhotyaa chhotya goshtinmadhe sudha (male/ female doghehi) mala mahitch nahi kiva tu chhan krtes as mhnun alagad bajula honare ani swatachi soy pahnare khup. Tyanna ky watata samorchyala kalat nahi ka 😀 pn jyala saway aste na aplyala mahitiye , yetay tar chala patkan karun gheu ase lok nahi konachi wat baghat ani yet nasel tr shikaylahi ready astat. Chhan lihiles tu खच्याक 😜
खरय असे अनुभव बरेच जणांना येतात स्पष्ट कधी कोणी व्यक्त होत नाहीत. संबंध खराब होण्याची भिती असते. पण जर ते भक्कम असतील तर काय चिंता करायची.
Deleteआपण आपल आयुष्य जगताना काय करायच आणि काय नाही याची चेक लिस्ट अपडेट करत राहुन आनंदी जगायच.
या पिढीला खुप कमी अनुभव आहेत. काही झाल तरी यांच्याशी निभवायचय ना, मग योग्य लाॅजिक शोधुन सकारात्मकतेने पुढे जायच. बाकी कान्हाजींची ईच्छा!