आज अचानक एक सोलो ट्रिप चा योग आला. म्हटलं बघू जाऊन काय अनुभव येतो ते. बस नि प्रवास करताना पहिला तास सगळेच चुपचाप पण नंतर आपोआपच नाश्ता करताना ओळख करून बोलायला लागले. तिथूनच एक तरुण ग्रुप फोटो रील ला भिडला. मला पण खूप आवडत फोटो काढायला काढून घ्यायला. एक गट असा होता तर एक तसा .. अनोळखी असे चार पाच गट दिसले, मला खाद्य मिळालं व्यक्ती वाचनाचं. मस्त दिवसभराच्या चर्चांचा हा आढावा, ऐका तर मग...
तू : बाई बाई बाई ! काय हि पिढी अर्ध लक्ष त्या फोटोतच आणि जीव त्या फोटोच्या काडीत.
तू : हो ना नुसता दिखावा, नाटकी पण नुसता. जस असावं तसच दिसावं.
मैं : छे छे ! हा आमचा हा नाटकीपणा नाही बरका.. स्वछंदीपणा आहे. धैर्य लागतं नकला करायला. स्वच्छंदी जगायला.
मैं : बरोबर आहे वाटू शकत हे काही वेळा खोट्या प्रसिद्धी साठीची धडपड, पण सगळेच फोटो रील करायची आवड असणारे प्रसिध्दीसाठी करतायत असं नाही म्हणू शकत. थोडा फरक आहे.
तू : करतायतना मौज, राहतेय ना पिढी आनंदी मग जगू द्यावं कि त्यांना हव तसं, त्यांच्या नशिबी भरपूर भावंडं नाहीत, त्यांच्या वाट्यास सख्खे सुद्धा नैतिक जबाबदारीमुळे लांब लांब आहेत, सणावाराला नोकरीसोडून दरवेळी जायला पण जमत नाही. तरी जेवढे विचार जमतात तेवढे एकत्र येऊन आनंदी राहतात यात काय वाईट आहे.?
तू : मग काय तर, माणसे एकत्र येण्यासाठी हा मार्ग असेल तर तसं समजायचं हवं तर.
मैं : हो पण हे अति होत कधी कधी अस वाटत नाही का? हागलं पादल सगळं आधी त्या इंटरनेट च्या बोडक्यावर, घरी गावामागून समजतं. आपण कशी मज्जा केली हे सांगायच कशाला सारखं जगाला?
मैं : परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, एकत्र येऊन माणूस आनंद साजरा करण्याच्या त्याच्या वृत्तीला बदलून चालणार नाही. कोणी आनंद शेअर केला तर तो दाखवायला आहे अस का वाटावं? ऊलट प्रोत्साहित व्हावं की आपणही या धकाधकीच्या जीवनात आनंदी राहू शकतो.
तू : खरंय, काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि त्याबरोबर माणसांच्या जगण्याच्या आणि आनंद व्यक्त करण्याच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे आजची प्रत्येक नवीन पद्धत ही “स्वछंद” आहे असे मानणे गरजेचे आहे. .
तू : पूर्वी माणसं एकत्र राहत होती, त्यामुळे सण-समारंभासाठी वेगळे निमित्त शोधावे लागत नव्हते. आज प्रत्येकजण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलेला आहे. जवळची माणसं असूनही नेहमी भेटणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत चार माणसं एखादं निमित्त काढून एकत्र येत असतील,
theme ठरवत असतील, फोटो काढत असतील, Reel करत असतील आणि मनापासून हसत-खेळत असतील, तर त्यात गैर काय आहे?
मैं : आनंद व्यक्त करण्याची पद्धत बदलली म्हणून आनंदाची भावना खोटी होत नाही. पूर्वी आठवणी फोटो अल्बममध्ये जपल्या जायच्या; आज त्या फोटो, व्हिडिओ आणि
Reelमध्ये जपल्या जातात. माध्यम बदललं आहे, पण आठवण जपण्याची भावना तीच आहे. (एक गट सुखावत होता तर एक विचारात पडला होता.)
मैं : शेवटी, दुसऱ्याला आनंद मिळतोय आणि त्यातून कुणाचं नुकसान होत नाही, तर त्या आनंदाकडे थोडं सकारात्मकपणे पाहायला काय हरकत आहे?
तू : अहो हे तर आनंदच म्हणताय तुम्ही. घरात सुतक असताना पण लोक आनंद साजरा करतात. का? तर शहर वेगळं आहे आणि सगळी तयारी आधीच झालीय.
तू : अ ग बाई ! असे पण लोक आहेत ?
मैं : ती पुढची बसलेली जोडी त्यातली एकीची काकू गेलीय परवाच. आज सुतकाचा सात-आठवा दिवस तरी बाहेर फिरतेय बघा.
मैं : तुम्ही ओळखता का तिला?
तू : तिची काकू माझी मैत्रीण आहे... होती... (त्या खूप भावुक झाल्या)
मैं : अहो असं का म्हणायचं.... दुःख तर असणारच पण जग सोडून गेल्याच दुःख करत बसून जिवंत माणसाच्या आनंदात सहभागी न होणं हे पण बरोबर नाही.
तू : हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे हि की जाणारा भरभरून जागून सगळं आनंद उपभोगून गेला पण. मग उरलेल्यानी का नाही मुक्त जगावं. तेवढच लक्ष दुसरीकडे वळवल जातं.
तू : पण मग पूर्वापार पाळत आलेल्या सुतकाच काय?
मैं : अहो झालं सुतक संपल असेल कि. वस्तुतः ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपल्ब्ध नव्हती, त्याकाळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी. सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुनः आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता. दुखवटा पाळावाच पण जिवंत माणसाचे मनही पाहावे, व्यावहारिक दृष्टीकोन पण विचारात घेणे काळाची गरज आहे.
मैं : घरातील दुःखद प्रसंग किंवा बालकाच्या जन्मानंतर कुटुंबाला सावरण्यासाठी व विश्रांती मिळण्यासाठी वेळ देणे. यातच मुद्दाम घरी सुतक असताना कोण फिरायला जाणारे नसणारच. शेजारच्या माणसासाठी आपण घरी थांबून साथ देणे योग्यच पण काही वेळा अपवाद असावेत. ते समजून घ्यावेत.
तू : खरंच काकू तितके जवळचे नसतील ते किंवा मन वळवण्याची त्यांची हि पद्धत असेल. गेलेला माणूस काय माझ्या मागे रडा म्हणत नसेल तो हेच म्हणेल कि सगळे आनंदी राहा.
तू : कोणतीही रूढी परंपरा पाळायचीच पण ती परिस्थितीप्रमाणे बदल करून केली तर काही हरकत नाही अश्या मताची मी पण आहे. नात्या नात्यांत यात फरक असणारच..
मैं : हो, माझे बाबा गेले त्यानंतर आम्ही सगळे आठवडाभर रोज एकत्र पॉट लॉग केला होता. तिघ भाऊ दोन बहिणी बरका, पुढची पिढी काही होती काही नव्हती. बाबांच्या आठवणी काढून गप्पा मारून सगळे रोज रात्री एकत्र होतो. नो रडारड आणि नो नकारात्मक विषय. त्यामुळे सुतक हि एक भयंकर गोष्ट आहे असा पुढच्या पिढीस वाटले नाही. तसेही जिवंत होते तोवर बाबां बरोबर भरपूर जगलोय आम्ही. शो मस्ट गो ऑन
मैं : आज तुमच्या सगळ्यांशी या विषयावर चर्चा झाली आपोआपच नव नवीन दृष्टिकोन समजले.छान वाटलं.
तू : (निसर्ग पाहून मन मोहरून सगळे परत गाडीत बसलो.) तरुणाईने केली रील बघून मन दहा वर्षे मागे गेलं आणि वाटलं कि किती छान आनंद साजरा करते हि तरुणाई! जो क्षण आहे तो पुरेपूर जगतात हे. मला आवडला भन्नाट... आनंदी राहावं, आनंद शोधावा, तो साजरा करावा आणि तो वाटावा तरच त्यात मजा आहे.
तू : परफेक्ट, शेवटी, स्वतःला आनंद मिळतोय आणि त्यातून कुणाचं नुकसान होत नाही, तर त्या आनंदाकडे थोडं सकारात्मकपणे पाहायला काय हरकत आहे?
तू : क्या बात है!
मैं : बघा कि तुम्ही म्हणालात कि ती काकूंच्या दुःखात आहे तरी इथं कशी?... तर तीला पुढे जगताना आजचा तिचा स्वतःचा आनंद किती वर्ष उभारी देईल.
तू : अगदी बरोब्बर, तस्साच हि तरुणाई जो सहवास मिळतोय किंवा तो ती आखून जमावतेय, तो आनंदून साजरा करतेय तो पण आयुष्यातला मोलाचा क्षण म्हटलं पाहिजे.
मैं : नवीन पद्धत स्वीकारणे म्हणजे जुन्या मूल्यांना विसरणे नव्हे. नाती, आपुलकी आणि आनंद जपून काळानुसार त्यांची अभिव्यक्ती बदलणे हेही जीवनाचाच एक भाग आहे.
तू : मस्त ! चला कार्ल लेणीचा पायथा आलाय, उतरा....
मैं : आजचा हा लोणावळ्याचा निसर्ग, तुमची विविध सुंदर मतं आणि अनोळखी असल्यानी कोणाची मन न दुखावता खूप काही समजलं.
तू : आज मला जेन झी ची पण मैत्री मिळालीय आणि पारंपरिक गाणी जोगवे म्हणणारी अनुभवी मैत्रीण पण मिळाली.
मैं : आता पुढची ट्रिप पण एकत्र करूयात ग... मी लगेचच ग्रुप करते आपण टच मध्ये राहू...
लोणावळ्यातला मनांचा मेळावा भरला होता. आज लोणावळ्यानी मला खूप काही दिलं .
गौरी अनिरुद्ध पाठक
९९७०१६८०१४
२३.०८.२०२६
No comments:
Post a Comment