Sunday, 9 February 2025

माझ्या आयुष्यातील आरसा "अंगण"

माझ्या आयुष्यातील आरसा "अंगण"

"अंगण" म्हणजे घराचा आरसा म्हणतात. घराची, त्यात जपल्या जाणाऱ्या संस्कारांची झलक अंगणात होते. माझं माहेर वाडा संस्कृतीतल असल्यामुळे अंगण म्हटलं की मला तेच आधी आठवतं. माणसांनी गजबजलेली मागे पुढे अशी दोन अंगणं असा भरगच्च वाडा होता आमचा. 

(संग्रहीत)
वाड्याच पुढच अंगण सतत दिसायचं कारण ते घरासमोर होतं. आमच्या खिडकीतून ते दिसायचं. अंगण म्हणजे दंगा, अंगण म्हणजे दुपारच्या कामाचा कारखाना, अंगण म्हणजे पत्ते; नवा व्यापार आणि शिरापुरीचे रंगलेले डाव. याच अंगणात टिपरी पाणी पण व्हायचं. याच अंगणात रात्री भिंतीवरल्या सावल्या पाहुन काल्पनिक सिनेमे चालायचे. याच अंगणात वाड्यातले लग्नाचे जागरण गोंधळ व इतर कार्यक्रम होत असत. चारी बाजुनी घरं मधे अंगण याच साजर रूप दसरा पाडव्याला असायचं. याच अंगणात टोपलीत मांजराची पिल्लं ठेवायचो; आपुलकीने आमच पुढचं अंगण ओतप्रोत भरलेल असायचं. याच अंगणात लहानांपासून मोठ्यांपर्यंतची भांडण पण होत असत. आता आठवण म्हणून फक्तं पुसटशी रेघ उरलीय त्याची.

असच चेहेलपहेल असलेल आमचं मागच अंगण. आरोळे वहिनीनी लावलेली उंबर, कापुस आंबा अशी पण मोजकीच झाडं होती. अर्थात तुळस होतीच. या अंगणात आंधळी कोशिंबीर रंगत असे. इकडे मोठी मोरी होती. जवळच विहिर होती. पूर्वी ऊघडीच होती नंतर बंद केली. याच अंगणाला होळी पेटवायचा मान होता. वाडा संस्कृतीचा वारसा आणि आमच्या मनाचा आरसाच होती ही दोनही अंगणं'.

आता चित्र वेगळ पण तितकच मनमोहक. फलॅट संस्कृतीचा आरसा अंगण म्हणजे टेरेस. अंगणाची जागा जागा टेरेसनी घेतलेली, पण ती पण हक्काची जागा. पण हे आधुनिक अंगण पण काही कमी नाही. याच अंगणात माझे लेकरू दुडु दुडू धावताना पाहिलय. तुळशीतली माती खाणं, दिवाळीत किल्ला करणं हे मी आणि त्याया लेकरानं याच अंगणात अनुभवतय. मोठी नाही पण लहान वाळवणं इकडे होतातच. ब्रम्हकमळाला भरपुर फुल येतात तेव्हा त्याची पुजा इकडे होते, जणु गर्भार बाईच झोकातल डोहाळजेवणच सुरू आहे.

या माझ्या छोट्याश्या अंगणात तुळस, कढीपत्ता, लाल-  पिवळा जास्वंद, तगर, मोगरा, अनंत, मिरची, झेंडू, शेवंती आनंदान गुण्या गोविंदान नांदत आहेत. मधे मधे एकवेळ पुरेल एवढी मेथी येतेच. तो आनंद काय वर्णावा, आपण लावलेलं झाड, त्याच आलेलं फळ काय आनंद.

  हा आनंद मला माझ हे छोटसं अंगण देतं. सूर्योदय पाहात, वाचन, लिखाण, व्यायाम इकडेच होतो. याच अंगणात कॅरम पत्ते डाव भिडतात. अलिकडेच या अंगणात मी रांगोळ्या पण काढते. माहेरी अंगणात रांगोळी काढण्याची उर्वरित ईच्छा आता एकडे पुरी झाली. माझ्या या सोनपावलाच्या अंगणात केन वुडचा झोका बांधुन किती तरी डोहाक जेवण झाली.

मला जितक स्वयंपाकघर आवडतं आवडतं तितकच अंगणही निटनेटकच आवडतं. जे आहे त्यात आनंद मानून आपण सुखी होऊ शकतो हे मला या माझ्या पिटुकल्या अंगणानी शिकवलं. लहान लहान गोष्टीतला आनंद शोधायला शिकवलं. मी या माझ्या आयुष्यातल्या दोन्ही अंगणांची खूप खुप आभारी आहे. एकाने माहेरचं सुख दिलं तर दुसऱ्याने सासरचं!
धन्यवाद! तुम्हाला आठवतय का तुमच अंगण? दोन चार वाक्यात कमेंट बॉक्स मधे लिहा. मला आवडेल.

सौः गौरी पाठक.
०३.०४.२०२०
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++


अंगण ईतिहास 
*अंगणाचे स्थापत्य नियोजन सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरू झालेल दिसतं. *भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अंगणांना वेगवेगळी नावे आहेत. केरळमध्ये, त्याला नालुकेट्टू (खोल्यांच्या संचाने वेढलेले मध्यवर्ती अंगण), राजस्थानमध्ये हवेली , गुजरातमधील वाडा घरे ,अहमदाबादमधील पोलमधील घरे इत्यादी म्हणून संबोधले जाते. रोमन संस्कृतीत घराच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेला कर्णिका असे संबोधले जाते , जिथे ते बागकाम करतात आणि पावसाचे पाणी गोळा करतात. *गोव्यात, ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही अनेक "राजंगन" किंवा अंगणातील घरे आहेत. या प्रकारची वास्तुकला कर्नाटकातील थोट्टीमाने शैली, तामिळनाडूतील चेट्टीनाड शैली आणि राजस्थानातील हवेलींच्या वंशावळीत येते . *अंगण इमारतीचा कार्बन फूटप्रिंट अधिक प्रभावीपणे कमी करते.  
(संग्रहित)

8 comments:

  1. सुदैवाने माझ्या पुण्यातल्या आणि कोकणातल्या घराला देखील प्रशस्त अंगण आहे.

    ReplyDelete
  2. क्या बात है ताई तत्काळ ऊत्तरासाठी खरच धन्यवाद

    ReplyDelete
  3. तुझा लेख वाचून मला पण आम्ही पूर्वी वाड्यात रहायचो ते दिवस आठवले.. आम्ही पण डबा ऐसपैस खांब खांब खांबोळी खेळायचो.. भांड्याला कल्हाई लावायला एक फेरीवाला यायचा ती प्रोसेस पाहण्यात पण interest असायचा कारण अंगण्यात च तो त्याचा सरंजाम मांडायचा.. बऱ्याच आठवणी नी फर्डी केली एकदम 😄

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर लिहिलं आहेस.

      Delete
  4. Great... Mast.. 👌

    ReplyDelete
  5. आकाशाचा चंद्र दिसे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल उभा माझ्याच घरात हे भजन आठवलं

    ReplyDelete