खर तर पुजा करतानाची भावना महत्वाची परंतु काही सामान / वस्तु आंघोळीआधी जमा केल्या जातात. ऊदा. पाट, ताट, पळी भांडे, ताम्हन, फुलं, नाणी, सुपारी, गंध अक्षत, सत्यनारायण पुजा असेल तर चौरंगाचे खुंट, दाराला तोरण, आसनं इत्यादी. पुर्वी ही कोरडी तयारी म्हणायचे जी करण्या आधी जागा स्वच्छ करणे रांगोळी काढणे तसेच पुजा करताना ऊठाव न लागणारी तयारी करून स्नान आटोपुन मग तेल तुप पंचामृत पानं फुल सावरणं प्रसाद करण ही ताजी तयारी म्हणत.
खाद्य पदार्थ प्रसाद पंचामृत सुचीर्भूत होऊन केल की त्यात सकारात्मक आनंदी स्पंद मिळतात. तसच ते आधी ठेवले तर हलण सांडण किंवा काही पडण टाळाव म्हणुन असावेत. तेलाचा दिवा तुपाचा दिवा आधी करायच म्हणजे वाती मुरतात व दिवा जास्त छान प्रज्वलित होतो असा हेतु असावा.
आताच्या पिढीला सांगायच तर कोरडया तयारीच वर्गीकरण घराघरात बदललेत आढळतं. आपण आपली सोय पाहायची.पूर्वी घरातील बायका तयारी करून देत मग घरचा पुरुष पुजा करायचा. पुरूषांना ईतकी तयारी करण जमण शक्य नसेल , तेव्हा पद्धतच नव्हती म्हणा.
माझ्या मते तयारीचे दोन भाग यामुळे च पडले असावेत.
फुले स्वतःमध्ये पवित्र आणि शुद्ध असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या शुद्धतेची आवश्यकता नसते. ती आधी तोडायची कारण हे काम सूर्योदय समयी अथवा आधी असते ती वेळ झाडं जागी असण्याची वेळ. तेव्हा ती टवटवीत असतात. कोणत्याही सजीवास जीव असतो त्याला सोईच असताना काम करण योग्य. तसच आंघोळी नंतर मातीत जाण होण टाळलं असावं. वनस्पती विश्व सतत आहुती देतच असत परंतु मानवान योग्य प्रकारे ते घेतलं असावं ईतकच.
परत हेच की भावना महत्वाची कारण ऊद्याची पुजा असते तेव्हा आफण आदल्या दिवशी फुल पान आणुन ठेवतोच की.
झाडे विश्रांती घेतात आणि टवटवीत होतात, ज्यामुळे त्यांच्या नैसर्गिक चक्राचा आदर करणे महत्त्वाचे होते. या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून, आम्ही सर्व सजीवांच्या परस्परसंबंधांना मान्यता देतो आणि त्यांच्याशी सुसंवाद साधतो. संध्याकाळी झाडांना हलवु नये फुलं तोडु नये यात हेच लाॅजिक असावं की ती तेव्हा ती झोपलेली असतात. पुजेला सडा पडलेली फुल वापरत नाही त यात हेच कारण असावं.
फुलं ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहेत. फुलांचा सुगंध पूजेच्या ठिकाणी सकारात्मक आणि सौंदर्यपूर्ण वातावरण देतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास आणि पूजेसाठी एक आदर्श वातावरण तयार करण्यात मदत करतो.
काहीजण तोडलेली फुलं वाहण्यापूर्वी पाणी शिंपडत कारण असे असावे की फुले अर्पण करण्यापूर्वी ती ताजेतवानी वाटावी तसेच , फुले कीटक किंवा जंतुंपासून मुक्त आहेत याची खात्री केली जात असावी.फुलं त्याच्या शुद्ध स्वरूपात सादर केली जावीत हा निखळ निर्मळ हेतु असावा.
पूर्वजांच्या प्रत्येक कृतीत रहस्य लपलेल आहे आपण समजण्यास कमी पडतो.
पूजेसाठी फुले घेणे ही केवळ धार्मिक प्रथा नाही तर भक्ती आणि शरणागतीची गहन क्रिया आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रामाणिकपणाने आणि आदराने पालन केल्याने, तुम्ही पूजेचे पावित्र्य वाढवू शकता आणि परमात्म्याशी सखोल संबंध प्रस्थापित करू शकता. तुमच्या फुलांचे अर्पण प्रेम, पवित्रता, आणि आध्यात्मिक महत्त्वाने मनापासून ओतले जाऊन, तुमचा आध्यात्मिक प्रवास समृद्ध व्हावा हाच हेतु फुल वाहण्यात असावा.
२७) भारद्वाज पक्षी दिसला की शुभ का मानतात?
भारद्वाज पक्ष्यास भगवान श्रीकृष्णाचा पुनर्जन्म मानतात म्हणुन तो दिसला की श्रद्धेने नतमस्तक होण्याची प्रथा आहे.
कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा गोष्टीत या सुदाम्याला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आडवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे. कृष्ण भेटीनंतर सुदाम्याचं आयुष्य कसं बदललं हे ठाऊकच आहे. सुदाम्याच्या त्या मळक्या पिशवीमधले मूठभर पोहे कृष्ण खातो तेव्हा सुदाम्याचं घर संपत्तीने भरुन गेलेलं म्हणुन अगदी पार त्या काळापासून सकाळी भारद्वाज दिसणं हे शुभ मानलं गेलं असावं. भारद्वाज दर्शन झालं की श्रीकृष्ण दर्शन घडते ऊर्फ शुभ घडते. असा अर्थ लाऊ शकतो.
आता त्यात लाॅजिक अस की तो तो छोटेमोठे किडे, अळ्या, सापसुरळ्या, छोटे बेडूक, सरडे, पाली, इ. मोठ्या आवडीने खातो. क्वचित कधी मोठे साप पकडून खातानाही तो दिसलेला आहे. त्याच्या दोन इंची नख्या सरळधोप आणि अत्यंत तीक्ष्ण असतात. अवतीभवती भारद्वाज दिसला की आपण निर्धोक व्हावं. सापाचं, विंचूकाट्याचं भय त्याच्या हद्दीत तरी नक्कीच नसतं. सरपटणारा तमाम प्राणीवर्ग त्याला जाम घाबरतो.
आता त्याकाळी जे पटणार होत ते समाजमानसात पटवलं परंतु श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे.
आपण भारद्वाज दिसला की मनानं आनंदतो ते त्याच राजस रूप बघुन आणि ते शुभ असतं म्हणून मग जर आपण असा विचार केला तर तो विचार भावना निर्माण करते आणि मग आपलैतल्या पेशी कार्य करतात. जसा विचार तशी भावना तशीच क्रिया या सुत्रानुसार आपोआपच आपला दिवस शुभ जातो. आहे का नाही गंमत.
२८) पंढरीच्या वारीत डोक्यावर तुळस का घेतात?
पंढरीनाथ हे विष्णुचच रूप आहे. तुळस ही वृंदा आहे म्हणजे लक्ष्मीचच रूप की. संताघरी माऊली असेल तर तुळस हवीच. जेव्हा लोहदंड तीर्थाची पंढरी निर्माण केली तेव्हा कलीचा जोर वाढत होता परंतु भगवान विष्णूच्या विठ्ठल अवतारासमोर त्याच काही चालत नव्हतं. नामाच महत्व परमेश्वर जगतात पटवत होते. तरी सत्यभामेला कलीची बाधा झाली ती ऊतरवण्यासाठी भगवंतांनी युक्ति केली माऊली भक्तांच रिंगण केलं आणि आळीपाळीन तुळशीवृंदावन शेजारच्याकडे डोक्यावर जाईल अस बघितलं. ज्या क्षणी सत्यभामेन रिंगण घालताना तुळशीवृंदावन डोक्यावर घेतल त्क्षणी कलीप्रभाव नष्ट झाला ही तुळशीची ऊर्फ वृंदेची ऊर्फ लक्ष्मीची किमया होती. वृंदाच पतिव्रता असणं काय करू शकतं हेतर सर्वजण जाणतात मग कलीची काय कथा. तुळशीवृंदावन वारीत किंवा रिंगण घालत डोक्यावर घेतला तर कलीचा प्रभाव नष्ट होईल असा ऊल्लेख आढळतो.
तुळशीबाबत आताच्या पिढीला काय लाॅजिक सांगगयच तर हे की वारीच्याबाबत बोलायचं झालं तर लाखो वारकरी रोज पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. अशात लाखो श्वासोच्छवास दर सेकंदाला होत असतात. यात उच्छवासाने हवेतली ऑक्सिजनची पातळी कमी होते. मग हीच ऑक्सिजनची पातळी संतुलीत राखली जाते ती या तुळशीने. डोक्यावरच्या तुळशीने आसपासच्या २० ते २५ फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं. म्हणजे भगवंतांनीच किती छान परंपरा लावछन दिली आहे अस म्हणायला हरकत नाही. "माऊली माऊली, तू संतांची सावली, दारी तुळस लावावी"
२९) सोडमुंज का करायची असते?
ब्रह्मचर्यव्रत धारण केलेल्या विद्यार्थ्याने गुरुगृहातून स्वगृही परत येणे, यास ‘समावर्तन’ किंवा ‘सोडमुंज’, असे म्हणतात. समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वतःच्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. मुलगा गृहस्थाश्रमात परत येणार असल्याने गृहस्थाप्रमाणे रहाणे त्याला या विधीद्वारे शिकविले जाते. शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
सोडमुंज केली कि मगच लग्न करतात. मुंज ते सोडमुंज १२ वर्षाचा कालावधी असतो. जबाबदारीची जाणीव करून देतो सोडमुंज संस्कार. आजकाल मुंज खूप आवडीनं केली जाते त्यातच दुसऱ्या दिवशी सोडमुंज उरकतात. तसे करू नये. सोडमुंज योग्य वयातच करावी. लहानपणी मुंज केली असते परंतु लग्नाच्या वयात मुले परदेशी असतात. त्यांना सोडमुंज संस्कार महत्व समजावून सांगितले पाहिजे तर ते नक्कीच करतील.
मुंज करताना होम हवनात इंद्र आणि ऋषी तत्वांची पूजा होते ती तत्व त्या वयास योग्य, तसेच लग्नाला आलेल्या मुलाच्या सोडमुंजीत केलेल्या हवनात त्या वयास अनुरूप तत्वांची म्हणजे विश्वकर्मा आणि प्रजापतीची पूजा होते. विश्वकर्मा हा पृथ्वीचा निर्मितीकर्ता तसेच पालन पोषण करणारा तो प्रजापती, पुढे गृहस्थाश्रमात युवकाला हेच काम करायचे असते. उर्जारूपी ताकद मिळावी यांचे आशीर्वाद लाभावे हा हेतू. बटु पासून स्नातक असे रूपांतर आहे. लहानपणीच बागडणाऱ्या मनाच्या बालकास येणाऱ्या जबाबदारीची जाणीव हा पूर्वजांचा हेतू या सोडमुंजी संस्कारात असावा.
३०) मासिक पाळीत महिलांनी पुजा का करू नये ?
मासिक पाळी हे पुनरुत्पादक आरोग्याचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवु शकतो. अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते.त्यामुळेच कदाचित या काळात पुजा करण्यास मनाई केली जायची.
देऊळ हे असे ठिकाण आहे जे सकारात्मक उर्जेने भरलेले असते आणि जेव्हा मासिक पाळीच्या काळातली महिला प्रवेश करते तेव्हा ते ऊर्जा प्रवाहामध्ये असंतुलन निर्माण करते. देवळाच्या प्राणाचा परिणाम सुक्ष्म शरीरावर होतो. मासिक पाळीच्या वेळी स्त्रीची उर्जा खालच्या दिशेने जाते, तर देवळात उर्जा वर जाते.
सनातन धर्म मासिक पाळी आणि मासिक पाळी स्त्रियांना गलिच्छ, अस्वच्छ, अशुद्ध मानत नाही.
जे लोक असे करतात त्यांना सनातन धर्म अजिबात समजलेला नाही. अशा स्त्रीयांना कुत्सित वागणुक देऊ नये.
'पंच-वायु' किंवा मानवी शरीरातील ५ आवश्यक तत्वे असलेल्या या आयुर्वेदिक संकल्पनांची माहिती असणे गरजेच आहे.
१) प्राण: छाती व डोके : हृदयाचे ठोके आणि श्वास. प्राण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि रक्ताभिसरण प्रणालीद्वारे प्रत्येक पेशीमध्ये पाठविला जातो.
२) उदान: गळा : बोलणे, गाणे, हसणे आणि रडणे याप्रमाणे स्वरयंत्राद्वारे ध्वनी निर्मिती. तसेच ते अस्तित्वाच्या हेतूशी संबंधित स्वरध्वनी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागरूक उर्जेचे प्रतिनिधित्व करते. म्हणून उदानावरील संयम उच्च केंद्रांना शरीरावर संपूर्ण नियंत्रण देते.
३) समान: नाभि :अन्नाचे पचन आणि पेशी चयापचय (म्हणजे नवीन पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती आणि वाढ). समानमध्ये शरीरातील उष्णता नियंत्रित करणाऱ्या प्रक्रियांचाही समावेश होतो.
४) व्यान: संपूर्ण शरीर : ऊर्जा जी सर्वत्र पसरते
शरीर (म्हणजे अभिसरण). शरीराचा विस्तार आणि आकुंचन प्रक्रिया, उदा. ऐच्छिक स्नायू प्रणाली.
५) अपान: गुदद्वार ओटीपोट: फुफ्फुस आणि उत्सर्जन प्रणालीद्वारे शरीरातून टाकाऊ पदार्थांचे उच्चाटन.
यातील शेवटचे - अपान वायु - जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा सर्वात प्रमुख असते. म्हणजेच खालचा वायु सर्वात सक्रिय असतो.
मन आणि चेतना या ५ वायुंशी कमी-अधिक सुसंगत असल्याने मासिक पाळीत, अपान वायु मनावर सर्वात जास्त प्रबळ असतो आणि चेतना अक्षरशः खाली खाली खेचली जाते, म्हणजे बाहेर पडणे. देवळे धार्मिक स्थळे आणि प्रथा यांचा मूळ उद्देश चैतन्य किंवा मनाला आत्म्याकडे किंवा भौतिकतेपासून दूर करणे हा आहे. अशा ठिकाणी ऊर्जेचा जोरदार संचित नमुना असतो.
त्यामुळे साहजिकच आणि स्वाभाविकपणे - मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अशा ठिकाणी राहायचे असते किंवा अध्यात्मिक कार्यात गुंतायचे असते पण परिणामी मनावर प्रचंड ताण पडतो - त्यामुळे ५ वायुंवर विशेषत: अपानावर - त्यामुळे नियमित जैविक क्रियाकलापांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येतो.
मन आणि मनाचा कल यामुळे वायुच असंतुलन देखील होते आणि त्यांच्या नैसर्गिक सुसंवादात अडथळा येतो ज्यामुळे जैविक संतुलन बिघडते. प्राचीन काळी स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी स्वयंपाक करण्याची परवानगीही याच कारणास्तव नव्हती - अग्नी ही उर्जेचा जोरदार ऊर्ध्वगामी नमुना होता. शारीरिक ऊर्जेच्या पातळीवर एक चक्र कार्यान्वित होत असते, याकाळात तीचे लक्ष धार्मिक कार्यात लागणार नाही यासाठी तीला आराम शांतता गरजेची होती ती दिली गेली परंतु ही पद्धत पाळताना विटाळ भावना का आली असेल हे मात्र शोधतेय मी.
(आता कालानुरूप कस कराव हा विचार करण्याचा आपापला भाग झाला. शास्त्रीय कारण मात्र विचार करण्यासारखे आहे.)
३१) हिंदु धर्मात विवाह का असतात?
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुसरून विविध पद्धतीनी पतिपत्नीमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात या नात्यास लग्नगाठ म्हणतात लग्न हे पवित्र बंधन आहे.
विविध विधीचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे. धार्मिक विधी द्वारे त्याला सामाजिक सहमती प्रदान कण्यात येते. वैवाहिक विधीचा मुख्य उद्देश नवीन संबंधाची माहिती देणे, त्याला सुखमय बनवणे तसेच नानाप्रकाराचे अनिष्टांपासून त्याचे रक्षण करणे आहे.
विवाह संस्कार वा विधीमध्ये विस्मयकारक वैविध्य आढळते. ह्या संस्कारात चार पायऱ्या असतात. पहिली पायरी हा वधूच्या स्थितीमध्ये होणाऱ्या परिवर्तन सुचित करणारी विधि आहे. दुसरी पायरी ही विवाहामध्ये कन्यादान करून कन्येच्या पित्याकडून पतीच्या नियंत्रणात जाण्याची स्थिती घोषित करते. तिसरी पायरी ही उर्वरताची प्रतीक आणि संतानसमुद्रीची कामना सूचित करते. चौथ्या पायरीवरच्या विधी वधु-वराचे ऐक्य आणि अभिन्नतेला सूचित करते.
विवाहात विधींचे महत्त्व मोलाचे आहे. एकमेकांना समजुन सांभाळून घेण्यासाठी केलेल्या वचनांची नोद आहे. परत ईकडे निसर्गाच्या नियमाची आठवण होते ती हीच की विचार भावना क्रीया. या विधीद्वारे एकमेकांना आपल मानुन तारून नेण्याचा विचार करून ते विधी केल्यानं तो नोंद केला जाते जेणेकरून तो पाळण्याची क्रिया व्हावी. हिंदू संस्कृतीनुसार कुटुंब व्यवस्था नीट जपली जाण्यासाठी खुप विचार करून यांची आखणी केली गेली असावी. विवाह विधी हा संस्कार आहे यात प्रेम आत्मियता जाणवेल. परंतु करारात व्यवहाराची झालर येते. जी कुटुंब व्यवस्थेसाठी ऊपयोगी नाही.
३२) विवाहात विधी का असतात?
कन्यादानाचा विधी वधूच्या पालकांकडून केला जातो. दोन्ही कुटुंबे जोडप्याच्या मिलनासाठी करत असलेल्या बांधिलकीची कबुली देण्यासाठी सर्व आमंत्रित पाहुण्यांसमोर हा विधी केला जातो. वधूच्या कल्याणाची जबाबदारी वराकडे हस्तांतरित करण्याचाही तो संकेत आहे. कन्यादान हे सुनिश्चित करण्यासाठी केले जाते की वराने सर्व पाहुण्यांसमोर आपल्या वधूची काळजी घेण्याचे कर्तव्य स्वीकारले आहे, ज्यामुळे त्याची जबाबदारी वाढते.
लाजा होम : भारतीय स्त्रीचा मनाचा मोठेपणा आणि अंतःकरणाचा दिलदारपणा या लाजासमर्पणातून व्यक्त होतो. स्वतःच्या सुखापेक्षाही इतरांचे सुख मोलाचे आहे. आपण आनंदी राहण्यापेक्षा इतरांना आनंदी ठेवणे, ही आत्मसमर्पणाची भावना स्त्री या विधीच्या माध्यमातूनच सुरू करते. आजपासून तू मला पितृकुळापासून वेगळे कर, पण पतिकुळापासून कधी विभक्त करू नकोस. ही प्रार्थना आहे अर्यमा देवासाठी अर्यमा म्हणजेच न्यायव्यवस्थेला सांभाळणारा. यम-नियमांपासून कधीच वेगळा न होणारा. अशा या न्यायकारी देवाजवळ केली गेलेली प्रार्थना सफल ठरेल व तो निश्चितच स्त्रीशक्तीला योग्य तो न्याय देत राहील. तो न्यायशील ईश्वर स्त्रियांच्या त्याग व समर्पण भावनेला वैवाहिक जीवनात योग्य ती दिशा देत राहील. यामुळे श्वसुरगृहाशी त्यांची इतकी एकरूपता वाढेल की, या कुळापासून त्या दूर राहणार नाहीत. तिच्या या मंतव्यातून भविष्यातील उज्ज्वल यश दृष्टिपथात येत आहे. यामुळे पतिकुळासह पितृकुळसुद्धा सुखी व आनंदी राहील. वैदिक विवाह संस्कारातील प्रत्येक विर्धीची भावना इतकी उदात्त, उदार व दिव्य आहे की, तिची बरोबरी इतर कोणत्याच विवाह पद्धर्तीशी होऊ शकत नाही. अशा विविध मौलिक विधीप्रसंगांतून उच्च आदर्शाची पेरणी होऊन समाजाची नवनिर्मिती होण्यास मदत मिळते. लाजाहोम हा त्यांपैकीच एक महत्त्वाचा मानला जाणारा विधी, जो की उत्कट हृदयस्पर्शी आणि उच्च आदर्शाना अभिव्यक्त करणारा आहे
मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे. पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे. प्राचीन काळी नोंदोंगी वगैरे नसल्यामुळे लग्न सार्वजनिक करण्यासाठी हारांची देवाणघेवाण "जय माला" हा एक पारंपारिक भारतीय विवाह विधी आहे ज्यामध्ये वधू आणि वर एकमेकांच्या स्वीकृती आणि आदराचे प्रतीक म्हणून फुलांच्या हारांची देवाणघेवाण करण्यासाठी जातात. सर्व जाती- पंथांमध्ये विवाह हा धार्मिक, पवित्र आणि अत्यंत शुभ मानला जातो कारण दोन व्यक्ती कायमचे बंधनात बांधणार आहेत. हारांची देवाणघेवाण करण्याची कृती आध्यात्मिक महत्त्व दर्शवू शकते आणि विवाहातील दोन आत्म्यांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करू शकते. इतरांसाठी. ही एक महत्त्वाची आध्यात्मिक अर्थ नसलेली सांस्कृतिक परंपरा आहे, जय माला समारंभाला अध्यात्माची जोड आहे की नाही हे सहभागी व्यक्तीच्या दृष्टिकोनावर आणि विधीचे पूर्ण महत्त्व समजून घेण्यावर अवलंबून असते.
मंगळसूत्र म्हणजे वराने वधूला दिलेले वचन, विनंती, आशीर्वाद आणि वचनबद्धता आहे. नुसते मंगळसूत्र बांधून लग्न पूर्ण होत नाही. वर आणि वधू यांनी मिळून सप्तपदी नावाची खालील ७ व्रते घ्यावीत
गठबंधन हे दोन व्यक्तीमधील अतूट बैबाहिक बंधनाचे प्रतीक आहे. गाठ बांधणे म्हणजे काहीही सुरक्षित करणे. खरे तर असे मानले जाते की या विधीने वधू-वरांचे नाते कायमचे सुरक्षित होते. वधू आणि बर जेव्हा त्यांच्या संबंधित कपड्यांसह गाठ बांधतात तेव्हा ते प्रतीकात्मकपणे एकमेकांशी जोडलेले असतात लग्न समारंभात, वधूची चुनरी आणि वराचा पटका म्हणजेच दुपट्टा एकत्र जोडला जातो. जो एकता आणि सौहार्दाच्या बंधनाचे प्रतीक मानला जातो. होय आणि म्हणूनच या विधीला गठबंधन म्हणतात
३३) एकादशीचा ऊपवास का करतात?
एकादशी व्रत ज्यांची श्रद्धा आहे आणि भगवान विष्णूची उपासना करण्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात फलदायी व्रतांपैकी एक मानला जातो. एकादशी व्रतामुळे तुमच्यात शांती, सौहार्द आणि समृद्धी येउ शकते. उपवास तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाला जाऊ देतो आणि तुमचा जागरूक आत्मा शुद्ध करतो. या तिथीला वैज्ञानिक दृष्टीने कमी व योग्य जेवणे शरीरार उपयुक्त आहे.
एकादशीचे व्रत केवळ तुमचा आत्मा स्वच्छ करत नाही तर तुमचे शरीर विषमुक्त करते आणि शरीरातील चयापचय चांगले करते. भगवान विष्णूच्या उपासकांना एकादशीच्या व्रताची जाणीव आहे. परम मोक्ष, समृद्धी आणि धार्मिक श्रद्धा हे काही एकादशी व्रताचे फायदे आहेत.
३४) आषाढी एकादशी चा ऊपवास द्वादशीला का सोडतात?
द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्व आहे. या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो. एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जाऊन उपवास सोडतात.
याची कथा अशी की अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत. एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन ते नदीवर गेले. सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला.
अखेर त्यांनी थेंब भर पाणी पिऊन उपास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले. अंबरीश ऋषींना १० जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला आणि त्यांनी दहा अवतार घेतले, परमेश्वरान आपल्या भक्तासाठी हे केलं तसेच या दिवशी भगवान विष्णु अवतरले. अशी मान्यता वारकरी सांप्रदायात आहे.
३५) हिंदु संस्कृतीत हातावर पायावर जास्त करून महिला मेहूंदी का काढतात?
मेहंदीचा रंग नैसर्गिक असतो. लग्न असो वा सण, मेहंदी लावण्याची प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे.
महत्वाच कारण हे की मेहंदी तणाव कमी करण्यात मदत करते. मेहंदी हे औषध आहे. लग्नाच्या वेळी वातावरण तणावपूर्ण असते, त्यामुळे ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळेच लग्नाला उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच स्त्रिया वधू-वर मेहंदी काढतात. हाताच्या दोन्ही बाजूंना मेहंदी लावल्याने हाताच्या दोन्ही बाजूंना असणारे पिगमेंटेशन नियंत्रित होते. त्यामुळे तणाव नियंत्रित राहतो. पायातही तत्सम पेशी आढळतात. त्यामुळे पायाला मेंदी लावल्याने परिस्थितीही बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. विज्ञानही हे मान्य केलय.
यातला सर्वात चांगला भाग म्हणजे त्याचा वास, सुंदर सागरी रंग आणि मेंदीमुळे मिळणारे आरोग्य फायदे. शिवाय मेहेंदीचा सुगंध बरेच दिवस टिकतो. यामुळे लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रेम वाढण्यास मदत होते. निसर्गाच्या सहकार्यास दादच दिली पाहिजे.
इतकेच नाही तर मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता.
हिंदू धर्मात १६ अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. म्हणुनच कदाचित
मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
+++
अनुक्रमणिका
१) मंगल प्रसंगी आंब्याच्या पानाचच तोरण दारावर लावतात?
२) रोजची पूजा का महत्त्वाची?
३) मुंज करण गरजेच का व मुंज म्हणजे काय?
४) दारासमोरच तुळस का लावायची?
५) वडीलधाऱ्यांच्या पाया का पडायचे?
६) पिंपळच झाड का लावावी?
७) कपाळाला कुंकु का लावायच?
८) हिंदु संस्कृतीत कान टोचण्याची पद्धत का आहे?
९) जमिनीवर बसुन एकत्रच का जेवले पाहिजे?
१०) दक्षिणेला डोक करूनच का झोपायचे?
११) ऊपवास का करायचे पूर्वीचे लोक?
१२) परमेश्वर सर्वत्र आहे म्हणता मग मूर्ती पुजा का करायची?
१३) बांगड्या भरण्याची पद्धत का असेल?
१४) पुजेत मंगलकार्यात नारळच का वापरतात?
१५) सणासुदीला तसेच शुभ प्रसंगी देवळात जायच अस का म्हणतात?
१६) जानवं का घालायच?
१७) नवरात्र कोणत पण असो ९ दिवसच का असतं?
१८) आपण १०८ वेळा मंत्र का पाठ करतो?
१९) औक्षण करण्याचे महत्त्व काय ?
२०) देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?
२१) गौरीहार का पुजायचा?
२२) पूजेमध्ये विड्याच पानाचे महत्त्व?
२३) नवरात्रीचा उपवास का?
२४) आंघोळ करूनच पुजा का करतात?
२५) पुजेची काही तयारी आंघोळी आधी व काही नंतर चालते अस का?
२६) आता फुल पारोशान तोडतात मग ती न धुता वाहायची चालतात ?
२७) भारद्वाज पक्षी दिसला की शुभ का मानतात?
२८) पंढरीच्या वारीत डोक्यावर तुळस का घेतात?
२९)
सोडमुंज का करायची असते?
३०) मासिक पाळीत महिलांनी पुजा का करू नये ?
३१) हिंदु धर्मात विवाह का असतात
३२) विवाहात विधी का असतात
३३) एकादशीचा ऊपवास का करतात?
३४) आषाढी एकादशी चा ऊपवास द्वादशीला का सोडतात?
३५) हिंदु संस्कृतीत हातावर पायावर जास्त करून महिला मेहूंदी का काढतात?
सुंदर माहिती गौरी
ReplyDeleteछान संकलन केलय
भन्नाट ! मस्तच
ReplyDelete