Monday, 15 May 2023

६) ज्येष्ठ (मे - जुन) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

ज्येष्ठ महिना महत्वं : 

या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठ नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला जेष्ठ महिना असे म्हणतात .वर्षातला सर्वात मोठा म्हणजेच जेष्ठ दिवस याच महिन्यात येतो म्हणूनही जेष्ठ महिन्याचे महत्व आहे.

ज्येष्ठ महिन्यातील सण :
गंगा दशहरा :  (
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा) ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे दशहरा संपल्याचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा, हा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.


शिवराज्याभिषेक दिन : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ,(६ जून , १६७४) 

वट पौर्णिमा :  (ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ) सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||


ज्येष्ठ महिन्यातील यात्रा, जयंत्या :

कबीर जयंती :  महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर.

गायत्री जयंती : जेष्ठ शुद्ध एकादशी
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू : ज्येष्ठ कृष्ण सप्तमी.


संत
ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान,आळंदी : ज्येष्ठ कृष्ण अष्टमी


धर्मवीर संभाजी महाराज जयंती , ज्येष्ठ शुद्ध द्वादशी

 दर्श अमावस्या:  ज्येष्ठ महिन्याची अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. कारण यानंतर आषाढ महिना सुरू होतो. पितरांना वंदन करण्याच्या उद्देशाने ही अमावस्या विशेष मानली जाते. या अमावस्याला दर्श अमावस्या असेही म्हणतात

गीते, कविता, गाणी :
'पाहन पूजे हरि मिलैं, तो मैं पूजौं पहार।
वा ते तो चाकी भली, पीसी खाय संसार।।'
कबीर माया पापणी, फंध ले बैठी हटी ।
सब जग तौं फंधै पड्या, गया कबीरा काटी ||
अर्थ - कबीर दास जी कहते है की यह पापिन माया फंदा लेकर बाज़ार में आ बैठी है । इसने  बहुत लोगों पर  फंदा डाल दिया है , पर कबीर ने उसे काटकर साफ़ बाहर निकल आयें है । हरि भक्त पर फंदा डालने वाला खुद ही फंस जाता है ।

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।
योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
--ज्ञानेश्वर माउली

 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावरी ठेवुनिया ॥१॥ 
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । 
कंठी कौस्तुभमणी विराजित ॥२॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । 
पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥

-- संत तुकाराम

लॉजिक नवीन पिढी साठी :

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व : पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे झाड विशेष आहे. वर्षात एकदा तरी याचा सहवास शारीरिक  सुधारणेला ऊपयुक्त असतो. या दिवसात झाडांना पाणी घालणे पण निसर्गाचे आभार मानल्यासारखेच आहे. पाणी हवा हे फुकट मिळणारे पदार्थ जपण काम आपलच आहे. त्यामुळे झाडाजवळ जाऊन पाणी घालुन आभार मानणे. त्या दिवशी बायकांनी ऊपवास करणे याला पण काही कारण आहे. ऊपवासामुळे  अग्नीपर्दीप्त होऊन आरोग्य टिकुन राहते. ऊप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या कर्मेद्रीयाच्या आणि ऊभयात्मक मनाच्या जवळ जाणे म्हणजे ऊपवास करणे. आपलं लक्ष म्हणेच आपला वास म्हणजे consciousness आपले मन एकाग्र करणे हा खरा ऊपवास. वटपौर्णिमा बायकांनीच का करायचा ऊपवास यावर नेहमी चर्चा होते. सर्वसाधारणपणे रोजच्या कामात स्त्रीया जास्त क्रियाशील असतात त्यांना ऊपवासाचा फायदा होतो जो गरजेचा आहे ऊदा. ऊत्साही वाटणे, पित्त कमी होणे, रक्तशुद्धी होणे, एकाग्रता वाढणे. त्याकाळी स्त्रीया कष्टाची काम अधिक करावी लागत म्हणुन त्यांनी करावा अस असेल. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.

 


4 comments:

  1. छान माहिती मिळाली. या महिन्यात इतके सन असतात हे कळले आणि प्रत्येकाचे महत्व पण कळले.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद अश्विनी

      Delete
  2. गौरी, तुझ्या या माहितीने प्रत्येक सणाचे पारंपारिक महत्व समजले. छान काम करतेस तू.

    ReplyDelete
  3. खूप छान सारांश एक महिन्याचा…

    ReplyDelete