Thursday, 4 July 2024

असाही पांडुरंग माहित असावा ...

पांडुरंग 

श्री विष्णूंच्या गळ्यात असतो तो कौस्तुभ मणी म्हणजे सर्वात मौल्यवान अश्मभाग. जिथे हे रत्न असते तिथे कोणतेही दैवी संकट येत नाही. हे धारण करणारा खुप संपन्न, प्रभावशाली व अजिंक्य असतो, असे मानले जाते. परंतु हे रत्न धारण करण्याची क्षमता त्रिदेवांत फक्त श्री विष्णूंकडेच आहे. समुद्र मंथनात आलेल हे रत्न कोणी घ्यायच कथा छान आहे.

केशर, तुळस, हळद, कापुर, मधाचा एकत्रित लेप करून लाडक्या कान्हाच्या कपाळीची जखम लेपन गोमातांनी केलं होतं. कपाळी केशरी गंध... आणि हाच तो गोपीचंदनाचा टिळा ज्याच टोक जमिनीकडे असलेल आहे, हा गंधाचा टिळा हेच दर्शवतो की आपला अहंकार नष्ट व्हायला हवा. विठ्ठल अवतार लोकाभिमुख असल्यान तो संदेशाच प्रतिक म्हणून आहे.

पांडुरंगानी कानात मासे लावलेले दिसतात. ती कवचकुंडले आहेत. एका भोळ्या मासेमार भक्ताचा हट्ट. आपण भक्तीभावान दिलेलं अत्यंत प्रेमान ते स्विकारतात. तसेच कानातले हे स्मरणपत्र आहेत, की एखादी व्यक्ती काय ऐकते आणि त्यावर विश्वास ठेवते यावर नियंत्रण ठेवणे. तीचा आकार म्हणून मोठा आहे.
पांडुरंगाच्या प्रत्येक गोष्टीत अर्थ लपलेले आहेत.

विठ्ठलमूर्तीची वैशिष्ट्ये
पूर्ण मूर्ती : कटीच्या खालचा भाग ब्रह्मास्वरूप, कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्रीविष्णुस्वरूप, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप आहे.
काळा रंग : मूर्तीचा रंग काळा असला, तरी खऱ्या भक्ताला
सूक्ष्म- दर्शनेंद्रियाने मूतीं पांढरीच दिसते.
भालप्रदेश : हा आज्ञाचक्रातून तेजाची उधळण करतो.
कटेवर हात : कटीप्रदेशाच्या वर ज्ञानेंद्रिये, तर खाली कर्मेद्रिये आहेत. कटेवर हात म्हणजे, कर्मेद्रिये अधीन आहेत.
दृष्टी : समचरण. श्री विठ्ठलावा सर्व समान आहेत. कोणी लहान मोठा नाही. हे भगवंतांच रूप समानतेच प्रतिक आहे.
श्री विठ्ठलाच्या पायांतील तोडे : मनुष्याने स्वतःला बंधन घालून घ्यावे. कोणत्या मार्गाने जायचे, ते ठरवून घ्यावे. वाममार्गाला जात आहोत कि चांगल्या मार्गाने, हे पहावे. 'चांगल्या मार्गाने जातांनासुद्धा अहंकाराची बेडी पडता कामा नये. त्यामुळे चांगल्या मार्गाने जातांनाही काही बंधने पाळणे आवश्यक आहे, असे हे तोडे सांगतात. शिवाय तोडे असेही सांगतात की, चांगले-वाईट काही न मानता साक्षित्वाने रहा.
श्री विठ्ठलाच्या दोन्ही पायांतील काठी : गुरे सैरावैरा धावत असतांना गुराखी काठीच्या साहाय्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो. तसे आपले षड्रिपू मधे मधे उधळत असतात. त्यांना साधनारूपी काठीने नियंत्रित ठेवायचे असते. संयमाने रहायचे असते. त्याचे पतीक ही काठी आहे.
श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा : देवाचे पितांबर सोन्याचे असते. ध्यानमार्गामध्ये तेजाचे प्रतीक म्हणून नील वर्ण, पांढरा रंग आणि शेवटी सुवर्णाचा रंग असे सांगितले आहे. त्या सुवर्णतेजाचे प्रतीक म्हणजे श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा आहे.
श्री विठ्ठलाला कुंकू न लावता बुक्का लावतात.
कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचे प्रतीक आहे. श्री विठ्ठल हे शिवाच्या वैराग्यभावाचे, म्हणजेच साक्षीभावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो. प्रत्येक कर्म अकर्म-कर्मच्या सिद्धांताद्वारे न्याहाळून त्या त्या घटकाला कार्यकारणभावरूपी ऊर्जा प्रदान करून त्यालाही देहबुद्धीच्या पलीकडे नेणे, म्हणजेच शिवत्वाच्या पलीकडे नेणे, हा त्याचा (बुक्क्याचा) स्थायी भाव आहे. शिवत्वाच्या पलीकडे, म्हणजेच पुरुषपकृतीच्या पलीकडे नेणे.
श्री विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे. सगुणाच्या साहाय्याने निर्गुणाची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधून साक्षीभावाच्या विश्वात रमणाऱ्या तत्त्वाचे नाव विठ्ठल आहे. मायेतील आसक्ती त्यागून वैराग्यभावात, म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच साक्षीभाव या पदाला पोहोचू शकतो. बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आजाचकाच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षीभावात्मकरूपी वैराग्यलहरी कार्यरत होऊन त्या जिवासाठी स्वतःतील अनाहतचक्राशी सुप्त असणारी क्रियाशक्ती जागृत करून जिवाला मायेत बहह्म पहाण्याचे बळ देऊन त्याला मायेपासून विलग करतात.

No comments:

Post a Comment