प्रिय पंचवीस,
सौ. गौरीची स्नेह पूर्ण घट्ट मिठी. तुझा ३६५ दिवसांचा सहवास कायम लक्षात राहिल. जसा विचार, तशी भावना, तशी क्रिया या ब्रह्मविद्येच्या नियमानुसार बघितल तर मी खुप सकारात्मकपणे जग बघायला तुझ्याबरोबर शिकले. तुझ्या सहवासात कुठ बोलावं आणि कुठ करावं हे ठोकताळे आखले गेले.
आज आपल्या भेटीचा अखेरचा दिवस... तुझ्या बरोबर असताना नकळत काही मन दुखावली गेली असतील, काहींना धन्यवाद म्हणायच राहिले असेल तर कोणा बद्दल प्रेमाची भावना आदर वाटत असूनही तो व्यक्त करायचा राहून गेला असेल तर त्यांना फक्त जो आहे तो निरोप दे खराखरा! हो खराखुरा अशासाठी की मी सकारात्मक बघत असले तरी ईतरांना हा साक्षात्कार झाला असेल नसेल?
पंचवीस दोस्ता तुझ्या सहवासात मी लग्नाच पंचवीसाव वर्ष सुरू केल. ते संपताना तुझी खुप खुप आठवण येईल रे. तुझ्या जगतात मला मी ओळखायला मदत करणारे दुवे सापडले, त्यातले काही तर मी प्रत्यक्ष भेटलेलीही नाही. काही टारगट्टं मनं सामोरी आली, काही अतिशय कठोर प्रसंग आले, काही वेळा मन खट्टु झाल पण यातुन कान्हाजींनी मार्ग काढायची कार्यशाळाच करून घेतली. तुझ्या बरोबरच इंजिनिअर मुलाची आई म्हणवली जाण ही आणखी मोलाची गोष्ट घडली. भरून पावले. घरात छान शुभ कार्य झालं वरिष्ठांच्या सहवासात राहता आलं आशिर्वाद लाभले. स्वतः ची लेखन सवय तसेच गीता गाथेचा सहवास लाभला. मी तुझी खुप आभारी आहे.
मी आज तुझ्या बरोबरचा सगळा सहवास झर्रकन डोळ्यासमोर अनुभवते आहे. एका आजीच वाक्य आठवलं, "जीवनात अव्यवस्था म्हणून आलेली सारावी माती आणि शोधावे त्यातले मोती" नवीन सुनेला आईन लिहलेल पत्र होत ते. खुप सुंदर. आता मी माझ्या नवीन जोडीदार सव्विस बरोबरच्या सहवासात त्या मोत्यांची ऊजळणीच करणार आहे. हे करताना शरीर स्वास्थ्य ठणठणीत असेलच सोबत तुझ्या बरोबरच्या कान्हाजींच्या वर्क शॉप ची जोड असेलच की.
उद्यापासून तुझ्या सहवासातली सगळी अनुभवाची शिदोरी घेऊन सव्विस बरोबर भरपूर मजा करणार आहे. तू कायमच मनाच्या कप्प्यात असशील. मी आठवण काढली की ये बरं का! मी सहजासहजी कोणाला विसरत नाही.
चल रे पळते, सव्विसच स्वागत आनंदात उत्साहात करायचय ना. मला सगळ प्लॅनिंग नी आवडतं. तुला भेटले की सांगेनच. संतुलन आणि सुसंवाद ही याची खासियत आहे म्हणे. (अंकशास्त्र आणि आद्ध्यात्मात) हो देवदूत संख्या आहे तो. त्याच्या सहवासात हिंदू धर्माचा प्रचंड प्रसार होवो, सर्व विश्व संतोषात जगण्याची कर्म करोत आणि मला भरपुर लिखाण लाभो हीच लालसा...
जय श्रीकृष्ण
तुझीच
सौ. गौरी पाठक ©
३१.१२.२०२५
###
####
नवीन वर्षात कोणतं परिवर्तन (स्वतःमध्ये )गरजेचं ?
आज ग्रुपमधे या विषयावर लिहायचं ठरलं. मला तर माझी यादीच करावी लागणार आहे जी फार मोठी असेल. मला तर आजकाल वाटत मी योग्य विचाराची व्यक्ती होण्याच्या वाटेवर पहिल्याच वळणावर आहे.
मला माझ्यात भरपूर परिवर्तन आणाव लागणार आहे. शिकण्याची आणि बदलण्याची आणि अनुभवण्याची अशी अनंत काम आणि बदल मला या नवीन वर्षात करायचे आहेत.
सर्वात आधी स्वतः नियमितपणे व्यायाम करायचा आहे. जो करतेय तो पुरेसा नाही. माझ्या वयाच्या जवळपासच्या मैत्रिणींना या वयाच्या वळणावर येताना मदत करायची आहे. मी कान्हाजींच्या कृपेने मनातल लिहु शकते म्हणजे फार ग्रेट नाही मला माझ्या सहवासात आलेल्यांची मनं वाचता यायला हवीत ते महत्वाचं आहे. जे यला शिकायचय. लिखाण काय आपोआपच होऊन जातं, ते आजच्या जगात
जपल पाहिजे हे मात्र खरय. पण मन वाचुन लिहायला जमल तर मजा आहे.
स्वतः मधील कमतरता सांगुन त्यावर प्रभुत्व मिळवावं ही ईच्छा झाली हे पण मी आज परिवर्तनच समजते. जे मी स्वतः लिहतेय.
माझ्या नवीन वर्षाच्या परिवर्तनाच्या गरजा आजच कान्हाजींना सांगुन मी मन शांत केल आहे. मोठ्ठी यादी प्रेमान ऐकून घेतली त्यांनी. जस जशी प्रगती होईल तस तस दिसेलच जगाला.
माझ्यातला बदल तुम्ही मला नक्की कळवाल ग.
आणखी काही गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या आहेत आता मी पळते.
जय श्रीकृष्ण
सौ. गौरी पाठक
०१.०१.२०२६