Tuesday, 26 December 2023
माहेर एक चार्जर
विदेह राजा
Thursday, 7 December 2023
सुडकू आद्ध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा.
मला पूर्वी दोन तीन नावात गडबड वाटायची हे कोण ? नावात सारखेपणामुळे आदरणीय गुरूतत्व समजण्यास असक्षम होते मी. मग मी शंका निरसन करण्यासाठी आद्ध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा सुडकू करू म्हटल म्हणजे सगळी आद्ध्यात्मिक गुरू तत्व समजतील.
पहिला गोंधळ होत होता ते श्रीनृसिंहसरस्वती महाराज, श्रीनरसिंह सरस्वती स्वामी, शंकराचार्य आणि नरसिंह / श्रीलक्ष्मी नरसिंह यांच्यात. लहानपणी हे सगळ गुंतागुंतीच वाटायच. जस जस वाचन वाढल तस तस समजत गेलं. कोणाच अवतार कार्य काय आहे? कोणता अवतार कोणाचा? समजत गेल आणि ऊत्सुकता वाढली.
तसच भद्रकाली, महाकाली आणि कालीमाता बद्दल होतं. महाकाली आणि काली ही एकाच अस्तित्वाची भिन्न व्याख्या आहेत . देवी काली ची स्वतःची अनेक रूपे असताना, महाकालीला बहुतेक वेळा अधिक वैश्विक रूप म्हणून समजले जाते जे केवळ कालीचेच नव्हे, तर तिच्या १० हातात असलेल्या सर्व हिंदू देवतांची शक्ती दर्शवते.
असच एक नोंद करून ठेवलेली असावी म्हणुन
१) श्रीपाद श्रीवल्लभ
दत्तात्रेयांचा पहिला अवतार
जन्म: भाद्रपद शुद्ध ४, गणेश च
पिठापूर, आंध्रप्रदेश
समाधी: अवतार समाप्ती अश्विन व
कार्यकाळ
२) श्री नृसिहसरस्वती महाराज
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार
जन्म: लाडाचे कारंजा, पौष शुद्ध
निजानंदीगमन: इ. स. १४५८
कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५९
३) श्री नरसिंहसरस्वती स्वामी
जन्म: ज्ञात नाही, आळंदीत १८७४ ला आले
समाधी: पौष शु. १५, १८८६ आळंदी येथे
कार्यकाळ: १८७४ ते १८८६
४) भैरवनाथ
भैरवनाथ हे तांत्रिक गोरखनाथ यांचे शिष्य होते, ज्यांचे गुरू मत्स्येंद्रनाथ होते, माता वैष्णो देवीने कालीचे रूप धारण केले आणि भैरवाचे मस्तक कापून टाकले आणि शेवटी त्यांना त्याचे खरे रूप कळले आणि त्यांनी क्षमा मागितली. शेवटच्या क्षणी भैरवाने क्षमा मागितली. देवीला माहित होते की भैरवाचा तिच्यावर हल्ला करण्यामागचा मुख्य हेतू आपली मुक्ती मिळवणे आहे. त्यांनी भैरवांना केवळ पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त केले नाही तर त्यांना एक वरदान देखील दिले ज्याच्या अंतर्गत प्रत्येक भक्ताला वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण करण्यासाठी पवित्र गुहेजवळ असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात जावे लागेल.
५) भैरव / कालभैरव
हिंदू धर्मात कालभैरवाला महादेवाचा पाचवा अवतार मानला जातो आणि महादेवाचा विनाशकारी एक ऊग्र अवतार आहे. याचे वाहन कुत्रा आहे. कालभैरवाची आठ रूपे आहेत.
६) वीरभद्र
वीरभद्र हा महादेवांच्या शूर गणांपैकी एक आणि महादेवाचा पहिला अवतार आहे. महादेवाच्या आज्ञेवरून त्याने दक्षप्रजापतीचा शिरच्छेद केला होता.
७) काली
काली, कालिका किंवा महाकाली ही हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहे. ती मृत्यू आणि परिवर्तनाची देवी आहे. आदिशक्तीचे हे सुंदर रूप म्हणजे दुर्गा देवीचे कठोर, राक्षसी आणि भयभीत रूप आहे, जिचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. रक्तबीजला मारण्यासाठी महाकालीने त्याच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब प्यायला आणि त्याच्या क्रूर प्रतिकृती नष्ट केल्या. रक्तबीजचा वध केल्यावर, काली रागाने तांडव करू लागली आणि तिला शांत करण्यासाठी भगवान महादेवाला तिच्या पायाखाली आडवे पडावे लागले. काली शांत झाली आणि पतीला पायाखाली पाहून तिने आपली जीभ बाहेर काढली अस म्हणतात.
८) भद्रकाली
भगवान शंकराच्या वीरभद्र अवताराची शक्ती किंवा पत्नी म्हणजे भद्रकाली तीला सहा मुलं आहेत.
९) कालरात्री
माँ दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते. दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माँ कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी साधकाचे मन 'सहस्रार' चक्रात वसलेले असते. यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विध्वंसक रूपांपैकी एक मानली जाते - काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्यु - रुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा.
१०) महाकाली
महाकाली हे ते रूप आहे ज्याला दहा तोंडे, हात आणि पाय आहेत, दुर्गा सप्तशतीमध्ये तिला महाकाली म्हणतात, ज्याचा जन्म देवांच्या हाकेवर पार्वतीजींच्या शरीरातून झाला.