Friday, 31 March 2023

५) वैशाख (एप्रिल - मे ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

वैशाख महिना महत्वं : या महिन्यात भगवान विष्णूची विशेष रुपात पूजा केली जाते. या दिवसापासून वैशाख मास स्नानाला सुरुवात होते. स्कंद पुराणामध्ये वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम मानण्यात आले आहे. वैशाख मासात जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो, व्रत ठेवतो त्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. श्रीहरी कृपेने घरातील दरिद्रता दूर होऊ शकते. सर्व दुःखातून मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. वैशाख मासाचे देवता भगवान मधुसूदन असून या मासात जल दानाचे विशेष महत्त्व आहे..
 
वैशाख महिन्यातील सण :
 
अक्षय्य तृतीया : वैशाख शुद्ध तृतीया- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भारताच्या ऊत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.

बुद्ध पौर्णिमा : बुद्ध पूर्णिमा हा भगवान बुद्धांचा वाढदिवस आहे. ते बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. त्यांचे नाव सिद्धार्थ होते आणि त्यांचा जन्म गौतम गोत्रात झाला होता, म्हणूनच त्यांना गौतम या नावाने देखील ओळखले जात असे. त्याने आपल्या कृतीतून साध्य केले होते. म्हणूनच त्यांचे नाव सिद्धार्थ ते गौतम बुद्ध असे बदलले गेले. आणि मग त्याला भगवान बुद्ध म्हटले जाऊ लागले. आणि लोक त्याची उपासना करू लागले. त्यांच्या जयंतीच्या दिवशी, त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. गौतम बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. म्हणूनच लोकांनी त्या दिवसाचे नाव बुद्ध पूर्णिमा ठेवले. अनेक वर्षे जंगलात भटकंती करून आणि कठोर तपश्चर्ये केल्यावर बुद्धांना बोधगयामध्ये बोधीच्या झाडाखाली सत्य कळले.


वैशाख महिन्यातील यात्रा, जयंत्या :
१) नारद जयंती : नारद मुनी हे भगवान विष्णुच्या परमप्रिय भक्तांपैकी एक  मानले जातात. नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत.
 
२) शनैश्चर जयंती : शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्याच्या दिवशी दिवसा १२ वाजता झाला होता, म्हणूनच वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती स्वरूपात साजरी केली जाते. शनि मकर आणि कुंभाचा स्वामी आहे व याची महादशा १९ वर्षाची असते. शनिचे अधिदेवता प्रजापिता ब्रह्मा आणि प्रत्यधिदेवता राम आहे. यांचा वर्ण कृष्ण, वाहन घुबड व रथ लोखंडाने बनलेले आहे.
 
परांजपे शनी देऊळ

३) परशुराम जयंती : जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला.
४) नृसिंह जयंती वैशाख शुद्ध चतुर्दशी
 
 ५) संभाजी महाराज जयंती : वैशाख दशमी 


गीते, कविता, गाणी :
वैशाखे मेषगे भानौ प्रात: स्नानपरायण:।
अध्यं तेहं प्रदास्यामि गृहाण मधुसूदन।।

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम]

=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷

*अक्षय्य तृतीया-एक अक्षय्य पर्व.* 

कधी न क्षय होतो ज्या तिथीचा। अक्षय्य तृतीया म्हणूनि बोलबाला जियेचा।
अति शुभशकुनी असे हे पर्व। देव, यक्ष, गंधर्व, मानव वंदिती यास सर्व।।१।।
अनेक शुभ घटनांची ही तिथी साक्षीदार। श्रीविष्णूनी घेतला सहावा अवतार।
जमदग्नी रेणुकेचा सुत जो झाला। परशु धारण करूनी भार्गवराम अवतरला।।२।।
शिवाचे अधिष्ठान असे जयाचे। एकलिंग गळ्यात साजे जयाचे।
लिंगायत धर्माचा ज्याने उद्धार केला। तो संत बसवेश्वर आज अवतरला।।३।।
पुत्र ब्रह्माचा नाम अक्षय कुमार। आजच्या दिनी प्रकटला अवनीवर।
वाराणसी क्षेत्री प्रकटली आदिशक्ती। अन्नपूर्णा म्हणुनी जाहली पार्वती ती।।४।।
कुबेरास आज धन भांडार लाभले। गंगेचे आज स्वर्गी अवतरण जाहले।
आदित्य देई पांडवांस अक्षय पात्र। महाभारत युध्द संपुनी, शांत झाले कुरुक्षेत्र।।५।।
महर्षी वेदव्यास रचिते झाले महाभारत। श्रीगणेश ज्यांचे जाहले लेखनिक।
जैन तीर्थकर आदिनाथ ऋषभदेव। तेरा महिने उपवास धरूनि, इक्षु रस प्राशीती आज देव।।६।।
बद्रीनाथ ते असे पवित्र धाम। वसती जेथे नित्य नर आणि नारायण।
भक्त दर्शनासाठी आजच्या दिनी। महाद्वार उघडता भक्त घेती लोटांगणी।।७।।
वृन्दावन वसे गोवर्धन गिरीधारी। चरणदर्शन तयाचे घेती नर नारी।
रथ जगन्नाथाचा त्या नटवराचा। रथचक्र बांधणी आज सुरू होय साचा।।८।।
आजच्या दिनी आदिशंकराचार्यांनी। कनकधारा स्तोत्र भक्तांसाठी रचुनी।
लोककल्याणाचे महान कार्य त्यांचे। वैदिक संस्कृतीचे जे अध्वर्यू साचे।।९।।
अशी ही तिथी शुभ आणि पवित्र। राही सदा आपले धन, क्षेम स्वास्थ अक्षय्य नित्य।
अशा ह्या शुभदिनी चला वंदूया। त्या त्रिमूर्तीस शरण जाऊया।।१०।।

लॉजिक नवीन पिढी साठी :
अक्षय तृतिया या दिवशी निसर्ग मशागत करून पेरणीसाठी योग्य जमिनीचा झालेला असतो. जे पेरू ते चौपटीत ऊगवण्याची पहिली पायरी थोडक्यात. जे नियम निसर्गाला तेच मानवाला असतात. म्हणुन हा दिवस ध्यान, दान, सेवाभाव करण्यास ऊत्तम म्हणतात. जे अर्ध ज्ञात मनात पेरू ते चौपाटीत उगवेल.वैशाख महिनाच जणु मंथनाचा त्या मंथनातुनच शुभता सापडते.
लग्नासाठी हो तिथी ऊत्तम म्हणतात कारण सूर्य आणि चंद्र सर्वांत तेजस्वी असतात, ऊच्च स्थानी असतात. हा योग शास्त्रीयदृष्टीन महत्वाचा हे. जो नकारात्मक प्रभाव घालवणारा आहे. पुर्वजांनी निसर्गाचा अभ्यास करूनच काही महत्व सांगितले आहे हे पटते.
 
 
 

Monday, 20 March 2023

४) चैत्र (मार्च - एप्रिल ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

 

चैत्र महिना माहिती 
 आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. उन्हाच्या झळा जाणवत असताना, गुलमोहराला अपूर्व ‌रक्तिमा चढते आणि तो आपल्या फुलांचे सडे घालू लागतो. चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही. तर, त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते. झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी. चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद उतरते आणि मग ती आपणाकडे येते. 
 
सण
गुढीपाडवा  : चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे
 

चैत्र नवरात्रारंभ : महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते.चैत्रांगण काढले जाते. कैरी चे पन्हे आणि डाळ याना फार महत्व आहे.  या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते.
 
 
चैत्रांगण
 


१) मत्स्य जयंती
) राम नवमी :   : या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.
४) महावीर जयंती : हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे. शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो. भारतभर त्यांनी जैन तत्वज्ञानाचा प्रचार केला . आणि  ६ वे शतक इ.स.पू. मध्ये मोक्ष प्राप्ती - महावीरांचे वर्षांच्या ७२ वयात निर्वाण झाले . अहिंसा, सत्य , अस्तेय ( चोरी न करणे), अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. त्यांनी अनेकान्तवाद (अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन) व स्याद्वाद यांचे सिद्धांत शिकवले.

५) हनुमान जयंती : चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. हनुमान हा सप्त चिरंजिवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे.
गाणी कविता :
 
नटली चैत्राची नवलाई
घालू सडा अंगणी चल ताई
सकाळ आली बाई
त्यावर काढू चल रांगोळी
ठिपके देऊ आळीपाळी
घेईन गरगर गिरक्या ताई
मी तर भवरी बाई
पूजिन तुलसीवृंदावन मी
मागीन वर लवलाही


भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे | 
वसंत वनात जनात हसे, सृष्टीदेवी जणु नाचे उल्हासे | 
गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट
 
 लॉजिक नवीन पिढी साठी : 
चैत्र  नवरात्र
आता नवरात्र म्हणजे नक्की काय? तर पुरूष आणि प्रकृतीमधली प्रकृती म्हणजे स्त्री तीची महती जाणुन घेणं. तीला सलग नऊ दिवस व रात्र एकाग्रतेने पुजण हे झाल एक प्रकारच मेडीटेशनच. प्रत्येकात असलेल्या या ऊर्जेल शक्तीला समजुन घेण्यासाठी हिंदु धर्मात चैत्र व अश्विन अशी दोनदा देवीची शक्तीची आराधना करतात. 
पावसाळा संपून हराभरा परिसर झालेला असतो तो निसर्ग भरभरून देतो तेव्हा तो आनंद वाटुन सिजरा केला पाहिजे. कोणतही नवरात्र सुरू होण्याची तिथी ही तितकीच महत्वाची इणि आजच्या पिढीचूया दृष्टीनं लाॅजिकची आहे.  त्या त्या तिथीला निसर्गात होणारे बदल मानवाला वापर होऊन त्याची प्रगती होण्यासाठी काही नियम घातले आपल्या पुर्वजांनी. थोडक्यात काय तर या आठवड्यात आपल्याला ऊपयोगी अशा निसर्गाच्या ऊत्पन्नतेचा फायदा करून मन एकाग्र करून योग्य जगण्याचा मार्घ सापडण्यास मदत होऊ शकते. त्यावेळच्या समाजात हे करताना जे नियम वापरून त्याचा लाभ घेता येईल अस ते आखले गेले.  आताच्या शतकात त्यामागचा हेतु लक्षात घेऊन आपण तो निसर्गाच्या ऊधळणीचा फायदा करून घेतला पाहिजे. कोणौअयाही नवरात्रात न ऊ अःइवस त्या आराध्याला नमस्कार करून दिवा लावुन पण ते प्राप्त होईलच की जर ते केल नाही तर निसराग जे देतो ते फुकट जाईल जे ही पिढी विकत घेऊ शकत नाही. 

अक्षय तृतीया 
ज्या तिथीचा क्षय होत नाही असा दिवस. नवीन काम सुरू क,ताना ऊल्हास ऊभारी असेल तर ते काम सहज सुखर होतं. निसर्गात या दिवशी मन ऊलाहासित राहण्यासारखे वातावरण असते जे मानवाला एभारी अःएते. म्हणुन ननीन गोष्टीचा शुभारंभ या दिवशी करतात. 
आताच्या पिढीन आज आंबे निसर्गाच सर्वोत्तम गोडवा देणारं फळ अनूभवाव म्हणजे  लाॅजिक समजेल. आज आराध्याला नमस्कार करून निसर्गाचे आभार मानत आमरसावर ताव मारायचा. आपल्याला जे काधी मिळालय यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात त्यांना स्मरून कृतज्ञता म्हणुन का होईना नैवेद्य दाखवतात अस लाॅजिक लावल तरी हरकत नाही.