पहिलं वहिलं रोप
एक लहानशी गोष्ट आयुष्यात खुप काही शिकवुन जाते. या लाॅकडाऊनच्या काळात मलाही एक गोष्ट शिकता आली, एक सुप्त आवड जोपासता आली.निसर्ग जवळुन पाहता आला. माझ्या आयुष्तले मी पेरलेलं पहिलं बी पेरून ऊगवलेलं रोप मोहरीच आणि मेथीचं मी या काळात लावलं.
आफण पेरलेलं बी - रोप होताना, वाढताना दिवसाला काय तासा तासाला पाहिलं. रोपाची वाढ होतानाचे बदल, त्यातले बारकावे पाहताना मजा आली. एरवी ऑफिसच्या काळात रोप आणणे, पाणी घालणे आणि सुट्टीच्या दिवशी प्रगती बघणे, असच होत होतं. मोहरी आणि मेथी मी स्वतः पेरली, मेथीची कोवळी गोंडस पानं अंकुर फुटताना ते डौलात ऊभी राहितोवर पाहिली, अनुभवली सुद्धा. तो आनंद वेगळाच होता. या दोन महिन्यात निसर्ग जवळुन अनुभवता आला, शिकता आला. ऊगण्यासाठी
मोकळा श्वास घेण्यासाठी टणक कवच मोडुन बाहेर येणं, अंकुर फुटणं, पानं वाढणं, देठ मोठं होणं, नंतर ती मजबुत होणं, बारीक बारीक पोपटी पानं फुटणं, त्याला छोटसं नाजुक पिवळं फुल येणं, इवलासा तो जीव पण डौलात वार्यावर डोलणं, फुल गळुन पडणं, लांब लांब अतिशय कोवळ्या शेंगा लागणं, पोटपी शेंगांच वजन पेलत ते देठं दिमाखात ऊभी पाहणं फारच मनोहारी होतं.
मधे जोरात वादळ आलं, तीन चार वेळा जोरात पाऊस झाला पण मुळाशी घट्ट पकडुन माझी ही ईवलीशी रोपं तग धरून होती. निसर्ग शिकवत होता, वादळं येणारच, तेव्हा घाबरू नको. डोळे मिटुन मुळाचा विचार करत शांत बसुन रहा. नंतर जोमानं ऊभं राहायचय, परत फुलायचय.
पावसात माझी ही मोहरी मेथीची रोपं कोलमडणार अस वाटुन मनातुन ऊदास वाटत होतं. पण दुसर्या दिवशी खमकेपणानं ती ऊभी होती.
मोहरीच पहिलं फुल
माझ्या आयुष्यात आलेला पहिला रोप लावण्याचा अनुभव भरपुर काही देऊन गेला. नंतर मी डबल बी, बडिशेप, चिक्कु, मिरची बरीच रोपं/ बी पेरलं. आणि आता छोटस टेरेस मस्त बहरलय. पण या सगळ्यात माझं पहिलं वहिलं मोहरीच आणि मेथीच रोप मात्र मोलाचच होत आणि राहिल.
मोहरीच्या हिरव्या शेंगा
गौरी पाठक
९९७०१६८०१४