Saturday, 15 September 2012

मनातला मोर

मनातला मोर / मनातला मोर /

मनातला मोर / मनातला मोर //
मोर होता जगत आयुष्य संथ /
उत्तम सुरु होता त्याचा प्रपंच पंथ //१//

मनातला मोर / मनातला मोर //
मोर होता धावत डोंगर पार करत दूर /
तुझ्यामुळे सापडले त्याला ताल आणि सूर //२//

मनातला मोर / मनातला मोर //धृ //
मनातल्या मोराला बोलत केलस तू /
निमित्त होती एक मैत्रीण पण वास्तव दाखवलास तू //३//

मनातला मोर / मनातला मोर //धृ //
मनातला मोर होता आधी बाथरूम डान्सर /
घरातच मिळतात त्याला आता वन्स मोअर //४//

मनातला मोर / मनातला मोर //धृ //
तू आहेस वर टेकडीवर उंच / फुलवून पिसारा कार्यात व्यस्त /
आज मानायचे आहेत तुझे गुरु म्हणून आभार / कळेल का तुला या मोराच्या मनच //५//